Marathi Bible Reading |Saturday 28th December 2024 | Feast of Holy Innocent

ख्रिस्त जन्मोत्सव - नाताळ सप्ताह 

शनिवार २८ डिसेंबर २०२४

  ✝️ 

  "ऊठ, बाळक व त्याची आई ह्यांना घेऊन इजिप्त देशात पळून जा
"Rise, take the child and his mother, and flee to Egypt, 



निरपराध बालके, रक्तसाक्षी
✝️   
.
प्रथम त्या तीन मागी लोकांना बाळाच्या शोधार्थ पाठविले. त्या तीन मागी लोकांना येशू बाळाचा शोध लागला. परंतु त्यांना स्वप्नात देवदूताने सूचना दिल्यामुळे ते परत हेरोदकडे न जाता दुसऱ्या वाटेने आपल्या देशात निघून गेले. जेव्हा ही बातमी हेरोदला समजली तेव्हा त्याच्या अंगाचा तीळपापड झाला. त्याच्या तळपायाची आग मस्तकाला जाऊन भिडली. त्याने शिपायांना आदेश दिला की, दोन वर्षे आणि त्याहून कमी वय असलेल्या बालकांची हत्या करा. देऊळमाता आज अशा सर्व बालकांचा सण साजरा करीत आहे.
ही बालके एकूण किती होती हे सांगणे कठीण आहे परंतु बेथलेहेमसारखे लहानसे गाव लक्षात घेता आधुनिक बायबलपंडितांच्या मते ही संख्या २५च्या आसपास असावी. हेरोद राजाने केलेल्या विविध क्रूर आणि अमानुष छळांची संख्या इतकी मोठी होती की, जोसेफुस नावाच्या इतिहासकाराला लहान बाळांचे हे हत्याकांड आपल्या लिखाणात समाविष्ट करावेसे वाटले नाही. परंतु ख्रिस्तसभेने मात्र ह्या बालकांना रक्तसाक्षी म्हणून गौरविलेले आहे कारण येशूबाळाच्या अप्रत्यक्षरित्या संरक्षणार्थ ह्या बाळकांना मरण पत्करावे लागले. त्या बाळकांच्या मातांच्या सांत्वनासाठी ख्रिस्तसभेने आजच्या मिस्साबलीतील उपासनेत धर्मगुरूंना लाल वेदीवस्त्र वापरण्याची आज्ञा केलेली आहे. निरपराध बालकांचा सोहळा पहिल्यांदा ४८५ मध्ये साजरा करण्यात आला. इंग्लंडमध्ये तो बालकदिन म्हणून साजरा केला जायचा तर जर्मनी आणि फ्रान्स या देशांमध्ये संत निकोलसच्या दिनी (६ डिसेंबर) सांता क्लॉज म्हणून ज्या मुलांची निवड झालेली असायची त्याच मुलाला महागुरुस्वामींच्या आसनावर बसविले जायचे. हा बाल-महागुरू मिस्सामधील प्रास्ताविक प्रार्थना गायचा वा म्हणायचा, छोटेसे प्रवचनवजा कथाकथन करायचा आणि शेवटी आशीर्वाददेखील द्यायचा. ही निरपराध बालके गायनमंडळाची आश्रयदाती मानली जातात.
चिंतन : बाळकांस माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना मना करू नका कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे. (लूक १८:१६ )

देवाला निष्पाप बालके प्रिय असतात कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्या सारख्यांचेच आहे. 'देव प्रकाश आहे,' मात्र अंधाराच्या राज्याची आस धरलेली माणसे सत्ता, वैभव आणि धन दौलतीसाठी भ्रष्टाचाराचा आणि रक्तपाताचा मार्ग  अवलंबित असतात. अशा सर्व अंध राज्यकर्त्या पासून आपले रक्षण करण्याच्या  प्रभू परमेश्वराठायी आपण आपले जीवन समर्पित करु या. विशेषत: आपल्या  गावपरिवारात व कुटुंबात आपलेल्या सर्व बालकांसाठी विशेष प्रार्थना करु या. 


पहिले वाचन १योहान १:५-२:२
वाचक :योहानचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"येशू ख्रिस्ताचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुध्द करते."

जो संदेश आम्ही येशू ख्रिस्तापासून ऐकला आहे तो तुम्हांला जाहीर करतो. तो संदेश हा की, देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठायी मुळीच अंधार नाही. त्याच्याबरोबर आपली सहभागिता आहे असे जर आपण म्हणत असलो पण अंधारात चालत असलो, तर आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो, तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुध्द करते.
आपल्या ठायी पाप नाही असे जर आपण म्हणत असलो, तर आपण स्वतःला फसवतो आणि आपल्याठायी सत्य नाही. जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय आणि न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनीतीपासून शुध्द करील. आपण पाप केले नाही, असे जर आपण म्हटले तर आपण त्याला लबाड ठरवतो आणि त्याचे वचन आपल्याठायी नाही.
अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून हे मी तुम्हांला लिहितो. जर कोणी पाप केले, तर नीतिसंपन्न असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त आहे, केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे.
प्रभूचा शब्द 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :1 John 1:5-2:2

Beloved: This is the message we have heard from Jesus Christ and proclaim to you, that God is light, and in him is no darkness at all. If we say we have fellowship with him while we walk in darkness, we lie and do not practise the truth. But if we walk in the light, as he is in the light, we have fellowship with one another, and the blood of Jesus his Son cleanses us from all sin. If we say we have no sin, we deceive ourselves, and the truth is not in us. If we confess our sins, he is faithful and just, to forgive us our sins and to cleanse us from all unrighteousness. If we say we have not sinned, we make him a liar, and his word is not in us. My little children, I am writing these things to you so that you may not sin. But if anyone does sin, we have an advocate with the Father, Jesus Christ the righteous. He is the propitiation for our sins, and not for ours only but also for the sins of the whole world.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र १२४:२-५,७-८
प्रतिसाद : आमचा जीव पक्ष्याप्रमाणे पारध्याच्या पाशातून मुक्त झाला आहे.

१) लोक आमच्यावर उठले तेव्हा 
जर परमेश्वर आमच्या पक्षाचा नसता, 
तर त्यांचा क्रोध आमच्यावर भडकला 
त्यावेळी त्यांनी आम्हांला जिवंत गिळून टाकले असते.

२) जलांनी आम्हाला बुडवले असते, 
त्यांचा लोंढा आमच्या गळ्याशी आला असता, 
खवळलेले लोंढे आमच्या गळ्याशी आले असते.

३) खरोखर पाश तुटून आम्ही मुक्त झालो आहोत. 
आकाश आणि पृथ्वी ह्यांचा निर्माणकर्ता
 परमेश्वर त्याच्या नावामुळे आमचा उध्दार होतो.




Psalm Psalm 124:2-3, 4-5, 7cd-8

Our life, like a bird, has escaped from the snare of the fowler. 

"If the Lord had not been on our side 
when people rose against us, 
then would they have swallowed us 
alive when their anger was kindled."

"Then would the waters have engulfed us, 
the torrent gone over us 
over our head would have swept 
the raging waters."

Indeed, the snare has been broken,
and we have escaped. 
Our help is in the name of the Lord,
who made heaven and earth.


जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया! 
हे देवा, आम्ही तुझी स्तुती करतो,
तू प्रभू आहेस हे आम्ही मान्य करतो.
हे प्रभो, रक्तसाक्षींचे महान सैन्य तुझी स्तुती करते.
  आलेलुया!

Acclamation: 
We praise you, O God; we acclaim you as Lord; the white-robed army of martyrs praise you.

शुभवर्तमान  मत्तय  :१३-१८
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

 “हेरोदने बेथलेहेममधील सर्व बाळकांना माणसे पाठवून ठार केले. "

ज्ञानी लोक गेल्यावर, पाहा, प्रभूचा दूत योसेफला स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, "ऊठ, बाळक व त्याची आई ह्यांना घेऊन इजिप्त देशात पळून जा आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा, कारण बाळकाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध करणार आहे." मग तो उठला आणि बाळक व त्याची आई ह्यांना घेऊन रातोरात इजिप्त देशात निघून गेला आणि हेरोदच्या मरणापर्यंत तेथे राहिला. "मी आपल्या पुत्राला इजिप्त देशातून बोलावले आहे" हे जे प्रभूने संदेष्टयाच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. 

तेव्हा ज्ञानी लोकांनी आपणाला फसवले हे पाहून हेरोद अतिशय संतापला आणि जी वेळ त्याने ज्ञानी लोकांपासून नीट विचारून घेतली होती तिच्याप्रमाणे त्याने बेथलेहेमात व आसपासच्या सर्व प्रदेशात जे दोन वर्षाचे आणि त्याहून कमी वयाचे बाळक होते त्या सर्वांना त्याने माणसे पाठवून ठार केले. यिर्मया संदेष्टयाच्या द्वारे जे सांगितले होते, ते त्यासमयी पूर्ण झाले. ते असे “रामा येथे रडणे आणि मोठा आकांत ह्यांचा शब्द ऐकण्यात आला, राहेल आपल्या मुलांकरिता रडत आहे आणि ती नाहीत म्हणून तिचे सांत्वन होत नाही."

प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading : Matthew 2:13-18

When the wise men had departed, behold, an angel of the Lord appeared to Joseph in a dream and said, "Rise, take the child and his mother, and flee to Egypt, and remain there until I tell you, for Herod is about to search for the child, to destroy him." And he rose and took the child and his mother by night and departed to Egypt and remained there until the death of Herod. This was to fulfil what the Lord had spoken by the prophet, "Out of Egypt I called my son." Then Herod, when he saw that he had been tricked by the wise men, became furious, and he sent and killed all the male children in Bethlehem nd in all that region who were two years old or under, according to the time that he had ascertained from the wise men. Then was fulfilled what was spoken by the prophet Jeremiah: "A voice was heard in Ramah, weeping and loud lamentation, Rachel weeping for her children; she refused to be comforted, because they are no more."
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन: पहिल्या वाचनात प्रकाश आणि अंधार हे अनुक्रमे चांगल्या आणि वाईटांसाठी वापरलेले प्रतिक आहेत. योहान स्पष्ट करतो की, चांगले आणि वाईट एकत्र असू शकत नाही. प्रकाश कितीही लहान असला तरी तो नेहमी अंधारावर मात करतो किंवा दूर करतो. येशू हा जगाचा प्रकाश आहे आणि जो कोणी त्याचे अनुसरण करतो तो अंधारात राहणार नाही. सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवापासून कमी पडले आहेत. परंतु जर आपण स्वतःला नम्र केले आणि येशूला क्षमा करण्यास सांगितले तर तो आपल्या पापांची क्षमा करेल. आणि मग आपण खऱ्या अर्थाने त्याच्याशी आणि समाजाचा सहवास ठेवू शकू जेव्हा खोटे शिक्षक दावा करतात की, त्यांनी पाप केले नाही ते फक्त स्वतःची फसवणूक करत आहेत आणि स्वतःला देवाचे प्रेम आणि दया नाकारतात. आज तुम्ही तुमच्या पापांची कबुली देण्यास आणि ख्रिस्ताच्या प्रकाशात चालण्याचे निवडण्यास तयार व्हाल का
प्रार्थना : -हे प्रभू येशू, बालकांप्रमाणे नम्र व आज्ञाधारक बनण्यास आणि परस्परावर प्रीति करण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

✝️      

नाताळ  सणाच्या हार्दिक शुभेच्छा  -

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या