Marathi Bible Reading |Friday 27th December 2024 | Feast of John Apostle & Evangelist

ख्रिस्त जन्मोत्सव - नाताळ सप्ताह 

शुक्रवार  २७ डिसेंबर २०२४

  ✝️ 

"तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर धावत पुढे गेला आणि कबरेजवळ प्रथम पोहोचला."
but the other disciple outran Peter and reached the tomb first. 


संत जॉन, प्रेषित व सुवार्तिक

ख्रिस्तसभा आज संत योहान प्रेषित व सुवार्तिक ह्याचा सण साजरा करीत आहे. संत योहान हा येशूच्या तीन जवळच्या शिष्यांपैकी एक होता. येशूच्या अनेक चमत्कारांचा साक्षिदार तसेच क्रुसाच्या पायथ्याशी प्रभूच्या अंतिम समयी योहानाने ख्रिस्त प्रभूचे मानवावरील प्रेम अनुभवले. प्रभू येशूच्या पुनरुत्थानानंतर गालिलच्या समुद्रकिनाऱ्यावर प्रेषितांना प्रभू येशूचे दर्शन घडले तेव्हा योहानाने त्याला प्रथम ओळखले.
संत योहानाने नव्या करारातील चौथे शुभवर्तमान लिहिले. प्रभू येशूचे  दैवी रुप अधिक प्रखर व प्रभावीपणे मांडल्यामुळे संत योहानाचे शुभवर्तमान चिंतनशील आणि बोधपर झालेले आहे. देवाचे मानवावरील प्रेम हा संत योहानच्या शुभवर्तमानाचा गाभा आहे. आपली सहभागिता पित्याबरोबर आणि प्रभूयेशू ख्रिस्ताबरोबर आहे हे पटवून देण्यासाठी संत योहानाने प्रभूच्या चमत्काराचा व दाखल्यांचा अर्थ प्रतिकात्मक चिन्हाद्वारे केला आहे. 'मी  जीवनाची भाकर आहे. मी मार्ग, सत्य व जीवन आहे. मीच उत्तम मेंढपाळ आहे. |मीच खरा द्राक्षवेल आहे. पुनरुत्थान व जीवन मीच आहे.' अशा सर्व वचनांद्वारे ख्रिस्त प्रभू आपल्या जीवनाशी अत्यंत जवळिक साधत असून आपल्याला चिंतन करायला लावित आहे.
प्रभू येशूच्या स्वर्गारोहणानंतर तब्बल १२ वर्षे म्हणजे हेरोद अग्रीप्पा पहिला ह्याने ख्रिस्ती लोकांचा छळ आरंभिण्यापूर्वीपर्यंतच्या काळापर्यंत शिष्य पॅलेस्टाईनमध्येच येशूची सुवार्ता गाजवीत होते. जेव्हा सर्वांची पांगापांग झाली, तेव्हा संत जॉन आशिया मायनर ह्या भागात आला आणि इफिस येथून त्याने सात ख्रिस्तमंडळ्या स्थापन केल्या. येथील मूर्तिपूजकांमध्ये रोमन आणि ग्रीक परंपरा मोठ्या काटेकोरपणे जतन करून पाळण्यात येत असत. ह्या लोकांना त्यांच्या तत्त्वज्ञानामुळे “लोगॉस" (शब्द हाचि देव) हा परवलीचा शब्द वाटत असे. हा लोगॉस कधी एकदा अवतरतो त्याची हे लोक उत्कंठेने वाट पाहात होते. संत जॉनने त्यांना हा लोगॉस म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा शब्द असून त्याने देह धारण केला असल्याचे समजावून सांगितले.
इफिसमधील थोड्याशा सुवार्ताप्रसारानंतर योहानला पात्म नावाच्या बेटावर तुरुंगात बंदिस्त करून टाकण्यात आले. डोमिशियन या सम्राटाच्या काळात ख्रिस्ती लोकांचा छळ सुरू करण्यात आलेला होता. ह्याच पात्म बेटावर असताना त्याला जे स्वर्गीय दृष्टान्त झाले ते त्याने प्रकटीकरण ह्या पुस्तकात वर्णन केलेले आहे. ह्या दृष्टान्तामध्ये परमेश्वराचे भक्त आणि सैतान ह्या दोहोमध्ये संघर्ष येशूच्या पुनरागमनापर्यंत सुरू राहील आणि शेवटी पृथ्वीचा संहार होईल हे सत्य प्रकट करण्याचा प्रयत्न संत जॉनने केलेला आहे. 
लोकांविषयी असलेली कळकळ दिसून येते. त्याच्या पत्रात "मुलांनो एकमेकांवर प्रेम करा.” “मुलांनो आपण केवळ शब्दांनी नव्हे तर प्रत्यक्ष कृतीद्वारे परस्परांवरील प्रेम व्यक्त करावे.” “जो तुझा भाऊ तुला दिसतो त्यावर तुला जर प्रीती करता येत नसेल तर तुला न दिसणाऱ्या परमेश्वरावर प्रीती करता येणे कसे शक्य आहे? ज्याच्याठायी प्रीती आहे त्याच्याठायी देवाचे जीवन आहे. कारण स्वतः देव प्रीती आहे."

प्रेम हा संत योहानच्या लेखनाचा व जीवनाचा सारांश होय. असं म्हणतात की एकदा एफिसस येथे ९०-९५ साली एक धर्मसभा भरलेली होती. काही तरूणांनी एका म्हाताऱ्या माणसाला उचलून समोर आणले आणि दोन शब्द बोलण्यास सांगितले. तो म्हातारा मनुष्य म्हणाला, “प्रिय बंधुभगिनींनो एकमेकावर प्रेम करा,' आणि तो म्हातारा थांबला. बराच वेळ झाला तरी तो काही बोलेना. शेवटी एका तरुणाने त्या म्हाताऱ्याला सांगितले, “आजोबा, तुम्ही एकसारखे एकमेकांवर प्रेम करा, परस्परांवर प्रेम करा असं का म्हणता? आणखी काहीतरी सांगा." तो म्हातारा म्हणाला, "माझ्या मुला, जर आयुष्यभर तू इतरांवर प्रेम केलंस तरी तेवढं पुरेसं आहे. प्रेम करणे हा येशूच्या शिकवणुकीचा सारांश आहे.” हा म्हातारा दुसरा तिसरा कुणी नसून शुभवर्तमानकार योहान असावा अशी दंतकथा आहे.
सम्राटाच्या मृत्यूनंतर पात्म बेटावरून तो एफिसस ह्या गावी परतला आणि मृत्यूपर्यंत तिथेच राहिला. प्रेषितांमध्ये तो सर्वात शेवटी मरण पावला.
ईश्वर प्रेमस्वरुप आहे आणि प्रभूयेशू त्या प्रेमाचे साक्षात स्वरुप आहे.
ख्रिस्ताच्या प्रेमात आणि परमेश्वरपित्याच्या देवराज्यात सहभागिता मिळविण्यास पात्र बनावे, म्हणून आपण प्रार्थना करु या.
.

पहिले वाचन १योहान १:१-४
वाचक :योहानचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन

“जे आम्ही पाहिले आहे आणि ऐकले आहे ते तुम्हासही कळवतो.'

जे प्रारंभापासून होते, जे आम्ही ऐकले आहे, जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे, जे आम्ही न्याहाळले आणि आपल्या हातांनी चाचपले, त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो. ते जीवन प्रकट झाले, ते आम्ही पाहिले आहे आणि त्याची आम्ही साक्ष देतो. ते सार्वकालिक जीवन पित्याजवळ होते व आम्हांला प्रकट झाले, ते तुम्हांला कळवतो. जे आम्ही पाहिले आहे आणि ऐकले आहे ते तुम्हांलाही ह्यासाठी कळवतो की, तुम्हीही आमच्याशी सहभागी व्हावे. आपली सहभागिता तर पित्याबरोबर आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याबरोबर आहे. तुमचा आमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून आम्ही हे लिहितो.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading : 1 John 1:1-4

Beloved: That which was from the beginning, which we have heard, which we have seen with our eyes, which we looked upon and have touched with our hands, concerning the word of life the life was made manifest, and we have seen it, and testify to it and proclaim to you the eternal life, which was with the Father and was made manifest to us that which we have seen and heard we proclaim also to you, so that you too may have fellowship with us; and indeed our fellowship is with the Father and with his Son Jesus Christ. And we are writing these things so that our joy may be complete.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ९७:१-२, ५-६, ११-१२
प्रतिसाद : अहो नीतिमान जनहो, परमेश्वराच्या ठायी हर्ष करा.

१) परमेश्वर राज्य करतो,  
पृथ्वी उल्हास करो,
द्वीपसमूह हर्ष करो.
ढग आणि अंधार त्याच्याभोवती आहेत, 
नीती आणि न्याय त्याच्या राजासनाचा आधार आहेत.

२) परमेश्वरासमोर, सर्व पृथ्वीच्या प्रभूसमोर
पर्वत मेणाप्रमाणे वितळले. 
आकाशाने त्याची नीती प्रकट केले, 
सर्व लोकांनी त्याचा गौरव पाहिला.

३) नीतिमानांसाठी प्रकाश आणि जे सरळ 
अंतःकरणाचे आहेत त्यांच्यासाठी हर्ष पेरला आहे. 
अहो नीतिमान जनहो, परमेश्वराच्या ठायी हर्ष करा, 
त्याच्या पवित्र नामाचे कृतज्ञतापूर्वक स्तवन करा.


Psalm  97:1-2, 5-6, 11-12 

Rejoice in the Lord, you just.

The Lord is king, let earth rejoice; 
let the many islands be glad. 
Cloud and darkness surround him; 
justice and right are the foundation of his throne. 

The mountains melt like wax before the face of the Lord,
before the face of the Lord of all the earth. 
The skies proclaim his justice; 
all peoples see his glory. 

 Light shines forth for the just one, 
and joy for the upright of heart. 
Rejoice in the Lord, you just,
 to the memory of his holiness give thanks.


जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया! 
हे देवा, आम्ही तुझी स्तुती करतो, 
तू प्रभू आहेस हे आम्ही मान्य करतो. 
हे प्रभो, प्रेषितांच्या गौरवमय सहवासाबद्दल 
आम्ही तुझी स्तुती करतो..
  आलेलुया!

Acclamation: 
We praise you, O God; we acclaim you as Lord; the glorious company of Apostles praise you.
.

शुभवर्तमान  योहान २०:२-८
वाचक : योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

 "तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर धावत पुढे गेला आणि कबरेजवळ प्रथम पोहोचला."

आठवड्याच्या पहिल्या दिवशी मरिया माग्दालेना शिमोन पेत्र आणि येशूचा दुसरा प्रिय शिष्य ह्यांच्याकडे धावत येऊन त्यांना म्हणाली, “त्यांनी प्रभूला कबरेतून नेले आणि त्याला कोठे ठेवले हे आम्हांला ठाऊक नाही.”

ह्यावरून पेत्र आणि तो दुसरा शिष्य बाहेर पडून कबरेकडे जाण्यास निघाले. तेव्हा ते दोघे बरोबर धावत गेले परंतु तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर धावत पुढे गेला व कबरेजवळ प्रथम पोहोचला आणि ओणवा होताच त्याला तागाची वस्त्रे पडलेली दिसली, परंतु तो आत गेला नाही. मग शिमोन पेत्रही त्याच्यामागून येऊन पोहचला व कबरेत शिरला आणि तागाची वस्त्रे पडलेली व त्याच्या डोक्यालाहोता तो रुमाल तागाच्या वस्त्रांजवळ नव्हे, तर वेगळा एकीकडे गुंडाळून पडलेला आहे असे त्याला दिसले. तेव्हा जो दुसरा शिष्य पहिल्याने कबरेजवळ आला होता तोही आत गेला आणि त्याने पाहून श्रध्दा ठेवली.

प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading : John 20:2-8

On the first day of the week: Mary Magdalene ran and went to Simon Peter and the other disciple, the one whom Jesus loved, and said to them, "They have taken the Lord out of the tomb, and we do not know where they have laid him." So Peter went out with the other disciple, and they were going towards the tomb. Both of them were running together, but the other disciple outran Peter and reached the tomb first. And stooping to look in, he saw the linen cloths lying there, but he did not go in. Then Simon Peter came, following him, and went into the tomb. He saw the linen cloths lying there, and the face cloth, which had been on Jesus' head, not lying with the linen cloths but folded up in a place by itself. Then the other disciple, who had reached the tomb first, also went in, and he saw and believed.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन: पहिल्या वाचनात योहान साक्ष देत आहे की, त्याने प्रेषित आणि इतर शिष्यांनी स्वतः येशूचे जीवन प्रत्यक्ष पाहिले आहे. ते त्याच्याबरोबर राहीले व जेवले आहेत, त्याच्याबरोबर प्रवास केला आहे. त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी येशूला अनेक चमत्कार करताना पाहिले आहे. येशू खरोखरच अनंत जीवन आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना हे जीवन प्राप्त होण्याचे पित्या परमेश्वराने वचन दिले आहे. येशू हा शब्द आहे जो पित्यासोबत अगदी सुरुवातीपासून अस्तित्वात होता. आणि या शब्दातूनच पित्याने जग निर्माण केले. येशू हा देवाचा पुत्र आहे जो मनुष्य बनला आणि आपल्यामध्ये राहिला. अशाप्रकारे जे हे सत्य नाकारतात, योहान खोट्या शिक्षकांचे खंडन करतो. केवळ येशूद्वारे विश्वासी पवित्र त्रैक्य ईश्वराच्या जीवनात सहभागी होऊ शकतात. आणि हा संदेश संपूर्ण जगाला कळावा म्हणून येशूने आपल्या प्रेषितांना आणि शिष्यांना हे मिशनकार्य दिले आहे. बाप्तिस्मा घेतलेल्या प्रत्येकाला हे मिशन सुरू ठेवण्यासाठी बोलावले जाते.

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझी सहभागिता अनुभवण्यास व तुजवर प्रेम करण्यास मला प्रेरणा दे, आमेन
नाताळ  सणाच्या हार्दिक शुभेच्छा  -

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या