ख्रिस्त जन्मोत्सव - नाताळ सप्ताह
२६ डिसेंबर २०२४
"बोलणारे तुम्ही नाही, तर तुमच्या पित्याचा आत्मा हाच तुमच्या ठायी बोलणारा आहे."
For it is not you who speak, but the Spirit of your Father speaking through you.
%2C_undated%2C_oil_on_copper_-_Accademia_Ligustica_di_Belle_Arti_-_DSC02144.JPG)
पहिल्या रक्त साक्षी संत स्टीफनचा सण
(३६)
आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या स्वर्गारोहणानंतर प्रेषितांवर पवित्र आत्मा उतरला आणि पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने भारावून गेलेल्या प्रेषितांनी अगदी निर्भयपणे ख्रिस्ताची सुवार्ता पसरायला सुरुवात केली. लवकरच संपूर्ण जेरूसलेमभर ५,००० लोक ख्रिस्ती झाले. इतक्या लोकांना एकाच वेळी ख्रिस्ती ज्ञानात आणि श्रद्धेत वाढविण्यासाठी बारा प्रेषितांची ताकद कमी पडू लागली. त्यामुळे त्यांनी सात प्रसेवक नेमले. ह्या विषयीची विस्तृत माहिती प्रेषितांची कृत्ये अध्याय ६ मध्ये आलेली आहे. ह्या सात प्रसेवकांना उपदेश करण्याचे, बाप्तिस्मा देण्याचे आणि गरजूंना अन्नदान करण्याचे अधिकार देण्यात आलेले होते.
अशा सात प्रसेवकांमध्ये पहिली दीक्षा संत स्टीफन ह्याला देण्यात आलेली होती. त्याचे शिक्षण गमलिएल नावाच्या अत्यंत विद्वान अशा शास्त्र्याच्या मार्गदर्शनाखाली झालेले होते. त्याला परुशी पंथाचे पूर्ण शिक्षण मिळालेले होते. त्याला ग्रीक भाषा येत असल्यामुळे जे हेल्लेणी ख्रिस्ती झालेले होते त्यांना तो मार्गदर्शन व उपदेश करीत असे. त्याकाळी पॅलेस्टाईनमधले यहुदी हे हेल्लेणी लोकांना कमी लेखत त्यामुळे त्यांना शिकविण्यासाठी विश्वास आणि पवित्र परिपूर्ण असलेला, कृपा आणि सौजन्यपूर्ण असा स्टीफन पुढे आला. स्टीफनला देवाने समर्पित वृत्ती आणि अद्भुत कार्ये करण्याची आगळीवेगळी शक्ती दिलेली होती. इ.स.पूर्व ६३ मध्ये यहुदी लोकांना पॉम्पे ह्याने पकडून रोममध्ये हद्दपार अवस्थेत नेले होते आणि तेथे त्यांना मुक्त अवस्थेत सोडून देण्यात आलेले होते. अशा मुक्त लोकांच्या सभास्थानामध्ये जाऊन स्टीफन शिक्षण देत असे. तसेच सिरेनी, आलेक्झांड्रिया, किलिकिया आणि आशिया येथील सभास्थानातदेखील तो उपदेश करीत असे. येथील लोक स्वत:हून, पूजा, आराधना व उपासना आयोजित करीत असत. त्यावेळी येरूशलेममध्ये ४०० हून अधिक प्रार्थनामंदिरे होती.
स्टीफनला परमेश्वराने धैर्याचा आत्मा दिलेला होता. प्रभू येशू ख्रिस्त हा केवळ निवडलेल्या इस्त्रायली लोकांनाच नव्हे तर सर्वांनाच मुक्ती देण्यासाठी आला होता, हे सत्य तो आपल्या श्रोत्यांच्या हृदयावर बिंबविण्यात कर्तबगार बनलेला होता. ख्रिस्तसभा ही सभास्थानापेक्षा वेगळी आहे हे त्याने आपल्या अधिकारयुक्त भाषणांनी पटवून दिले. परूशी लोकांनी मशिहा असलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताला कुसावर खिळून मारल्याबद्दल तो त्यांच्यावर उघडपणे ताशेरे ओढीत असे. त्यामुळे त्यावेळच्या समाजातील हा वर्ग आपोआपच संत स्टीफनचा काटा काढण्यासाठी टपलेला होता.
तसा स्टीफन अतिशय बुद्धीमान होता. त्याचं वाक्चातुर्य वाखाणण्यासारखं होतं. त्यामुळे परुशी लोकांशी वादविवाद करताना तो सरस ठरे. त्यामुळे शास्त्री- परुशी काहीसे डिवचले गेले होते. त्यांनी लोकांना स्टीफन विरुद्ध चिथविले. शिवाय हिंसात्मक अशांतता पसरविली. त्यामुळे स्टीफनला अटक करण्यात आली. त्याला सन्हेद्रीन ह्या न्यायसभेसमोर आणण्यात आले आणि त्याच्यावर ईश्वरनिंदा करीत असल्याचा आरोप करण्यात आला.
अशाही परिस्थितीत आपल्या शैलीदार आणि स्पष्ट खणखणीत आवाजातील भाषणाद्वारे स्टीफनने ख्रिस्तसभेची खरी भूमिका न्यायसभेसमोर मांडली. देवाने भूतकाळात इस्राएली लोकांवर केलेल्या दयादानांबद्दलची माहिती त्याने उपस्थितांना ऐकविली. अशा प्रेमळ परमेश्वराशी इस्राएली जनता कशी कृतघ्नतेने वागली तेही त्याने अगदी निर्भयपणे स्पष्ट केले. त्यामुळे त्याचे बोलणे असह्य होऊन लोकसमुदायाने त्याला शहराबाहेर ओढत ओढत नेले आणि देवनिंदा करणाऱ्याला दगडमार करावा अशा मोशेच्या आज्ञेनुसार त्यांनी त्याच्यावर हात उचलले (प्रेषितांची कृत्ये ७).एका टेकडीवर त्याला उभे करण्यात आले. त्याचे हात बांधण्यात आले. ज्यांनी स्टीफनवर आरोप केले होते असे "अधिकृत साक्षीदार" पुढे आले. त्यांनी त्याला त्या टेकडीवरून जमिनीवर ढकलून दिले. त्यानंतर दोन माणसांनादेखिल उचलणे कठीण जाईल इतक्या वजनाचा एक दगड उचलला आणि तो त्याच्या अंगावर फेकून दिला. असह्य वेदनांनी तळमळत असलेल्या स्टीफनने अशाही परिस्थितीत आपली दृष्टी देवावरच लावली. आपल्या प्रभू आणि गुरूला शोभेल असे शब्द त्याच्या तोंडून बाहेर पडले. "हे प्रभो हे त्यांचे पाप त्यांच्यासाठी मोजू नकोस" आणि "हे प्रभू येशू माझ्या आत्म्याचा स्वीकार कर" असे बोलून त्याने प्राण सोडला. अशाप्रकारे ख्रिस्तसभा अत्यंत बाल्यावस्थेत असताना अंकुरत असताना स्टीफनने पहिला रक्तसाक्षी बनून आपल्या रक्ताचे सिंचन ह्या ख्रिस्तसभारूपी वेलीला घातले.
चिंतन : रुस्पेचे संत फुलोन्शिअस म्हणतात, "प्रेम हे शस्त्र धारण करून स्टीफनने सर्व प्रकारचे युद्ध जिंकले. हिंसक बनलेल्या जमावाला विरोध करण्यापासून परावृत्त करणे केवळ देवप्रीतीमुळे त्याला शक्य झाले. शेजारप्रीतीमुळे त्याला दगडमार करणाऱ्यांसाठी तो प्रार्थना करू शकला. जे पाप करीत होते त्यांच्याकडे दर्यार्द्र नजरेने पाहण्यास प्रेमानेच त्याला प्रेरित केले आणि त्यांच्या पापांची क्षमा करण्याची सद्बुद्धी त्याला झाली. त्यांना शिक्षा होऊ नये म्हणून त्याने प्रार्थना केली."✝️
पहिले वाचन : प्रे.कृ. ६ : ८-१०, ७ : ५४-८:१
वाचक : प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन
स्तेफान कृपा आणि सामर्थ्य ह्यांनी पूर्ण होऊन लोकात मोठी अद्भुते आणि चिन्हे करत असे. तेव्हा लिबिर्तिन नामक लोकांच्या सभास्थानातील काहीजण तसेच कुरेनेकर आलेक्सांद्रियेकर आणि किलिकिया व आशिया ह्यातील लोकांपैकी कित्येक उठले आणि स्तेफानबरोबर वितंडवाद घालू लागले. पण तो ज्या ज्ञानाने आणि ज्या आत्म्याने बोलत होता त्याला त्यांच्याने तोंड देववेना. त्याचे हे भाषण ऐकणाऱ्यांच्या अंत:करणाला इतके झोंबले की ते त्याचे दातओठ खाऊ लागले परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले तेव्हा देवाचे तेज आणि देवाच्या उजवीकडे येशु उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला आणि त्याने म्हटले, "पाहा, आकाश उघडलेले आणि मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे." तेव्हा ते मोठयाने ओरडून आणि कान बंद करून एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले. मग ते त्याला शहराबाहेर घालवून दगडमार करू लागले आणि साक्षीदारांनी आपली वस्त्रे शौल नावाच्या एका तरुणाच्या पायांजवळ ठेवली. ते दगडमार करत असता स्तेफान धावा करत म्हणाला, “हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.” मग गुडघे टेकून तो मोठयाने ओरडला, "हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नकोस." असे बोलून तो झोपी गेला. शौलला तर त्याचा वध मान्य होता.
First Reading : Acts 6:8-10; 7:54-59
In those days: Stephen, full of grace power, was doing great wonders and signs among the people. Then some of those who belonged to the synagogue of the Freedmen (as it was called), and of the Cyrenians, and of the Alexandrians, and of those from Cilicia and Asia, rose up and disputed with Stephen. But they could not withstand the wisdom and the Spirit with which he was speaking Now when they heard these things they were enraged, and they ground their teeth at him. But he, full of the Holy Spirit, gazed into heaven and saw the glory of God, and Jesus standing at the right hand of God. And he said, "Behold, I see the heavens opened, and the Son of Man standing at the right hand of God." But they cried out with a loud voice and stopped their ears and rushed together at him. Then they cast him out of the city and stoned him. And the witnesses laid down their garments at the feet of a young man named Saul. And as they were stoning Stephen, he called out, "Lord Jesus, receive my spirit."
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ३१:३बक-४,६.८ अब, १७.२१अब
प्रतिसाद : प्रभो, मी माझा आत्मा तुझ्या स्वाधीन करतो.
१) तू माझा आश्रयदाता पहाड हो,
माझा बचाव करणारा दुर्ग हो आणि
माझे रक्षण कर, कारण तूच माझा आश्रयदाता पहाड
आणि दुर्ग आहेस. तुझ्या नावाच्या महिम्यासाठी
मला मार्गदर्शन कर, माझा नेता हो.
२) मी माझा आत्मा तुझ्या स्वाधीन करतो.
हे परमेश्वरा, सत्यस्वरूप देवा, तूच माझा उध्दार करशील.
माझी तर प्रभूवर श्रध्दा आहे,
तुझ्या वात्सल्यामुळे मला आनंदोत्सव होईल.
३) तू आपल्या सेवकावर आपला मुखप्रकाश पाड.
तू आपल्या वात्सल्याने माझा बचाव कर.
जे तुझ्यावर श्रध्दा ठेवतात त्यांना
तू आपल्या समक्षतेच्या गुप्त स्थळी
मनुष्यांच्या कारस्थानांपासून लपवतोस.
Psalm 31:3bc-4, 6 and Bab, 16bc and 17
Into your hands, O Lord, I commend my spirit.
Be a rock of refuge for me,
a mighty stronghold to save me.
For you are my rock, my stronghold!
Lead me, guide me, for the sake of your name.
Into your hands I commend my spirit.
you will redeem me,O lord O faithful God.
Let me be glad and rejoice in your mercy,
for you who have seen my affliction. R
Deliver me from the hands of my enemies
and those who pursue me.
Let your face shine on your servant.
Save me in your merciful love. R
आलेलुया, आलेलुया!
आमच्यावर पवित्र दिवस उजाडला आहे. राष्ट्रांनो या, प्रभूला नमन करा. कारण आज जगावर महातेज पसरले आहे.
Acclamation:
Blest is he who comes in the name of the Lord. The Lord is God, and has given us light.
शुभवर्तमान मत्तय १०:१७-२२
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
येशू आपल्या प्रेषितांना म्हणाला, “माणसांच्या बाबतीत जपून राहा, कारण ते तुम्हाला न्यायसभांच्या स्वाधीन करतील, आपल्या सभास्थानात तुम्हांला फटके मारतील आणि तुम्हांला माझ्यामुळे देशाधिकारी व राजे ह्यांच्यापुढे नेण्यात येईल आणि तुम्ही त्यांना आणि परराष्ट्रीयांना साक्ष व्हाल. जेव्हा तुम्हांला त्यांच्या स्वाधीन करतील तेव्हा कसे अथवा काय बोलावे ह्याची काळजी करू नका, कारण तुम्ही काय बोलावे हे त्याच घटकेला तुम्हांला सुचवले जाईल. कारण बोलणारे तुम्ही नाही, तर तुमच्या पित्याचा आत्मा हाच तुमच्या ठायी बोलणारा आहे. भाऊ भावाला आणि बाप मुलाला जिवे मारण्यासाठी धरून देईल, मुले आईबापांवर उठून त्यांस ठार करतील आणि माझ्या नामामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील. तथापि जो शेवटपर्यंत टिकेल त्याचेच तारण होईल.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading : Matthew 10:17-22: At that time: Jesus said to his apostles, "Beware of men, for they will deliver you over to councils and flog you in their synagogues, and you will be dragged before governors and kings for my sake, to bear witness before them and the Gentiles. When they deliver you over, do not be anxious how you are to speak or what you are to say; for what you are to say will be given to you in that hour. For it is not you who speak, but the Spirit of your Father speaking through you. Brother will deliver brother over to death, and the father his child, and children will rise against parents and have them put to death; and you will be hated by all for my name's sake. But the one who endures to the end will be saved.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो की, स्तेफान हा सात जणांपैकी एक होता.ज्यांना दररोज अन्न वाटपासाठी निवडले गेले होते. स्तेफान हा ईश्वरी स्वभावाचा मनुष्य होता. तो पवित्र आत्मा बुद्धी, विश्वास, कृपा आणि सामर्थ्याने परिपूर्ण होता. स्तेफानने फ्रीडमनच्या सभागृहाच्या लोकांना सांगितलेला संदेश त्यांच्या अंतःकरणास दोषी ठरवितो. स्तेफान ज्या बुद्धीने आणि आत्म्याने बोलला त्याचा त्यांना सामना करता आला नाही. त्यामुळे द्वेषातून त्यांनी स्तेफानवर खोटे आरोप केले आणि शेवटी त्याला दगडाने ठेचून ठार मारले. स्तेफानने सर्व चिन्हे आणि चमत्कार केल्यानंतर, तरीही लोक धर्मांतरित झाले नाहीत. हे त्यांच्या अंतःकरणाच्या कठोरपणामूळे होते. तथापी, प्रचंड विरोध आणि हिंसाचारातही स्तेफानने ख्रिस्तासाठी धैर्याने साक्ष दिली आणि त्याचा छळ करणाऱ्यांना माफ केले. स्तेफानला हे सर्व शक्य झाले कारण तो ईश्वरी स्वभावाचा आणि पवित्र आत्म्याने परिपूर्ण होता.
प्रार्थना : हे प्रभू येशु, श्रध्देने व निष्ठेने तुझी सुवार्ता पसरविण्यास आम्हाला धैर्याचा आत्मा बहाल कर,, आमेन.
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा -
0 टिप्पण्या