Marathi Bible Reading | Friday 17th January 2025| 1st Week in Ordinary Time

सामान्यकाळातील पहिला सप्ताह 

शुक्रवार   दि. १७ जानेवारी  २०२५

  ✝️ 

त्याला स्पर्श केला आणि म्हटले, "माझी इच्छा आहे, बरा हो,” तेव्हा लागलेच त्याचे कुष्ठ जाऊन तो बरा झाला. 
saith to him: I will. Be thou made clean. And when he had spoken, immediately the leprosy departed from him,


संत अँथनी महान
- मठाधिकारी, वर्तनसाक्षी (२५१-३५६)

मठाधिकारी अँथनी १०५ वर्षांच्या प्रदीर्घ जीवनमानानंतर ख्रिस्तवासी झाले. त्यांना हॉस्पिटलमधील कर्मचारी, खाच खणणारे, खाटिक, ब्रश आणि टोपल्या तयार करणारे, ह्यांचा आश्रयदाता संत म्हणून गौरविण्यात आले आहे. अपस्मार, फिट्स येणे, मरी, त्वचा रोग इ. आजारांतून मुक्ती मिळावी म्हणून संत अँथनी ह्यांची मध्यस्थी केली जाते.

चिंतन : हजारो फुलांमधून मकरंद गोळा करणाऱ्या मधमाशीप्रमाणे ख्रिस्ती व्यक्तीने आपल्या मित्रांकडून चांगले तेच घ्यावे. कोणाकडून सौजन्य, कोणाकडून साधेपणा आणि मौन, तर कोणाकडून सहनशीलता शिकून घ्यावी. - संत अँथनी महान


✝️

पहिले वाचन इब्री  :१-५:११

वाचक :  इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन

 "त्या विसाव्यात येण्याचा आपण होईल तितका प्रयत्न करावा."

    प्रभूच्या विसाव्यात येण्याविषयीचे वचन अद्यापि देऊन ठेवलेले आहे, ह्यामुळे तुम्हांतील कोणी त्याला अंतरल्यासारखे दिसू नये म्हणून आपण भिऊन वागू. कारण त्यांच्यासारखी आपल्यालाही सुवार्ता सांगण्यात आली आहे, परंतु ऐकलेले वचन त्यांना लाभदायक झाले नाही, कारण त्यांचा ऐकणाऱ्यामध्ये विश्वासाबरोबर संयोग झाला नाही. त्यांची कृत्ये जगाच्या स्थापनेपासून समाप्त झाली. तथापि, "त्याप्रमाणे मी रागाने शपथ वाहून म्हणालो, हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाहीत. असे ज्या विसाव्याविषयी त्याने सांगितलेले आहे त्यात, आपण विश्वास ठेवला आहे व आपण प्रवेश करीत आहो. "सातव्या दिवशी असे एका ठिकाणी त्याने म्हटले, देवाने आपल्या सर्व कृत्यांपासून विसावा घेतला" आणि ह्या ठिकाणी पुन्हा म्हटले आहे,"हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाहीत." त्यांच्या अवज्ञेच्या उदाहरणाप्रमाणे कोणी पतित होऊ नये. तर त्या विसाव्यात येण्याचा आपण होईल तितका प्रयत्न करावा.

प्रभूचा शब्द 
सर्व : देवाला धन्यवाद. 

First Reading :
: Hebrews 4: 1-5, 11
 Let us fear therefore lest the promise being left of entering into his rest, any of you should be thought to be wanting. For unto us also it hath been declared, in like manner as unto them. But the word of hearing did not profit them, not being mixed with faith of those things they heard. For we, who have believed, shall enter into rest; as he said: As I have sworn in my wrath; If they shall enter into my rest; and this indeed when the works from the foundation of the world were finished. For in a certain place he spoke of the seventh day thus: And God rested the seventh day from all his works. And in this place again: If they shall enter into my rest.
Let us hasten therefore to enter into that rest; lest any man fall into the same example of unbelief.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद   ७७:३-४,६-७,८

प्रतिसाद : देवाची कृत्ये विसरु नयेत.

१.ज्या आम्ही ऐकल्या, ज्या आम्हांला समजल्या, 

आमच्या वडिलांनी ज्या आम्हांला सांगितल्या 

त्या गोष्टी आम्ही त्याच्या वंशजांपासून गुप्त ठेवणार नाही, 

तर परमेश्वराची स्तुत्य कृत्ये, त्याचा पराक्रम 

आणि त्याने केलेली अद्भुत कृत्ये पुढच्या पिढीला सांगू.


२.पुढच्या पिढीने, म्हणजे पुढे जन्मास येणाऱ्या 

संततीने ह्या गोष्टी जाणाव्या,

त्या आपल्या मुलांस कथन करण्यास 

त्यांनी उद्युक्त व्हावे.त्यांनी देवावर भाव ठेवावा, 

देवाची कृत्ये विसरु नयेत, तर त्याच्या आज्ञा पाळाव्या.


३.त्यांनी आपल्या पूर्वजांसारखी हट्टी 

आणि बंडखोर स्वभावाची पिढी, 

आपली अंत:करणे नीट न राखणारी 

आणि देवाशी एकनिष्ठ नसणारी पिढी होऊ नये.


   Psalms 78: 3 and 4bc, 6c-7, 8
R. (7b) Do not forget the works of the Lord!

3 How great things have we heard and known, and our fathers have told us.

4bc They have not been hidden from their children, in another generation. Declaring the praises of the Lord, and his powers, and his wonders which he hath done.

R. Do not forget the works of the Lord!

6c The children that should be born and should rise up, and declare them to their children.

7 That they may put their hope in God and may not forget the works of God: and may seek his commandments.

R. Do not forget the works of the Lord!

8 That they may not become like their fathers, a perverse and exasperating generation. A generation that set not their heart aright: and whose spirit was not faithful to God.

R. Do not forget the works of the Lord!

जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया! 

हे परमेश्वरा, तुझ्या नियमाने चालण्यास 

मला शिकव ते मनापासून पाळण्यास मला सुबुद्धी दे.

  आलेलुया!

Acclamation: 
R. Alleluia, alleluia.
 A great prophet has arisen in our midst and God has visited his people.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान  मार्क २: १-१२

वाचक :  मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे 

      येशू पुन्हा कफर्णहूमात आला आणि तो घरी आहे असे लोकांच्या कानी पडले. तेव्हा इतके लोक जमले की, दारात देखील त्यांना जागा होईना, तेव्हा तो त्यांना संदेश देत होता. मग लोक त्याच्याकडे एका पक्षघाती माणसाला घेऊन आले, त्याला चौघांनी उचलून आणले होते. त्यांना दाटीमुळे त्याच्याजवळ जाता येईना, म्हणून तो होता तेथील छप्पर त्यांनी उस्तरून काढले आणि वाट करून ज्या बाजेवर पक्षघाती पडून होता ती खाली सोडली. त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती माणसाला म्हणाला, "मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे." कित्येक शास्त्री तेथे बसले होते, त्यांच्या मनात असा विचार आला, "हा असे का बोलतो ? हा दुर्भाषण करतो. एकावाचून म्हणजे देवावाचून पापांची क्षमा कोण करू शकतो ?" ते स्वत:शी असा विचार करीत आहेत हे येशूने अंतर्ज्ञानाने लगेच ओळखून त्यांना म्हटले, "तुम्ही आपल्या मनात असले विचार का आणता ? तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,' असे पक्षघाती माणसाला म्हणणे सोपे किंवा 'ऊठ, आपली बाज उचलून चाल' असे म्हणणे सोपे? परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हांला समजावे म्हणून तो पक्षघाती माणसाला म्हणाला, "मी तुला सांगतो, ऊठ, आपली बाज उचलून घे आणि आपल्या घरी जा." मग तो उठला आणि लगेच आपली बाज उचलून सर्वांच्यादेखत निघाला. ह्यावरून सर्वजण थक्क झाले आणि देवाचा गौरव करीत म्हणाले, "आम्ही असे कधीच पाहिले नव्हते!".

वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता,  तुझी स्तुती असो. 

Gospel Reading:
Mark 2: 1-12
1 And again he entered into Capharnaum after some days.

2 And it was heard that he was in the house, and many came together, so that there was no room; no, not even at the door; and he spoke to them the word.

3 And they came to him, bringing one sick of the palsy, who was carried by four.

4 And when they could not offer him unto him for the multitude, they uncovered the roof where he was; and opening it, they let down the bed wherein the man sick of the palsy lay.

5 And when Jesus had seen their faith, he saith to the sick of the palsy: Son, thy sins are forgiven thee.

6 And there were some of the scribes sitting there, and thinking in their hearts:

7 Why doth this man speak thus? he blasphemeth. Who can forgive sins, but God only?

8 Which Jesus presently knowing in his spirit, that they so thought within themselves, saith to them: Why think you these things in your hearts?

9 Which is easier, to say to the sick of the palsy: Thy sins are forgiven thee; or to say: Arise, take up thy bed, and walk?

10 But that you may know that the Son of man hath power on earth to forgive sins, (he saith to the sick of the palsy,)

11 I say to thee: Arise, take up thy bed, and go into thy house.

12 And immediately he arose; and taking up his bed, went his way in the sight of all; so that all wondered and glorified God, saying: We never saw the like.
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन: 
प्रभू येशूला आपल्या प्रेषित कार्यामध्ये बऱ्याच विरोधाला सामोरे जावे लागले आणि त्याचा शेवट त्याच्या क्रुसावरील मृत्यूने होतो.

प्रभू येशूच्या प्रेषित कार्याची दुसरी बाजू अशी आहे की, बऱ्याच लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. प्रभू येशूजवळ येण्यासाठी आणि त्याला भेटण्यासाठी ते काहीही करायला तयार होते. आजच्या शुभवर्तमानातील पक्षघाती माणसाचे उदाहरण त्याचेच प्रतीक आहे. लोकांचा विश्वास इतका मजबूत होता की, घराचे छप्पर उघडून त्यांनी पक्षपाती माणसाला येशूसमोर आणले. त्यांचा विश्वास पाहून, प्रथम प्रभू येशू त्या माणसाला त्याच्या पापांची क्षमा करतो. इतरांना ते दुर्भाषण वाटते; परंतु प्रभू येशू आपली ओळख करून देताना आणि त्याला पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे म्हणून पक्षघातीमाणसाला सांगतो, "मी तुला सांगतो, उठ. आपली बाज उचलून घे आणि आपल्या घरी जा." क्षमा करण्यात किती प्रमाणात बरे करण्याची शक्ती आहे, हे आपण ओळखू शकतो का? पक्षघाती माणूस फक्त शरीरानेच आजारी नव्हता; तर आध्यात्मिक दृष्ट्यादेखील आजारी होता. प्रभू येशूने त्याचा शारीरिक आजारच बरा केला नाही, तर त्याला त्याच्या पापांच्या ओझ्यातून देखील मुक्त केले. आपणांस प्रभू येशूने बहाल केलेल्या प्रेम आणि क्षमा ह्या स्वातंत्र्यामध्ये चालण्यास गर्व किंवा असूया सारखी कोणती गोष्ट मज्जाव करते का? प्रभू येशू आपणांस पूर्णपणे बरे करण्यासाठी समर्थ आहे. आपणात नम्रता हवी.

प्रार्थना : दयाळू परमेश्वरा, मज पाप्यावर दया कर, मला सशक्त बनव आणि तुझी आरोग्यदायी कृपा बहाल कर आमेन.

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या