Marathi Bible Reading | 16th February 2025| 6th Sunday in Ordinary Time

सामान्य काळातील ६वा  रविवार 

 दि. १६ फेब्रुवारी  २०२५


“अहो, दीनांनो, तुम्ही धन्य; कारण देवाचे राज्य तुमचे आहे."
 Blessed are ye poor, for yours is the kingdom of God.



✝️
परमेश्वराला जीवनात अग्रस्थान देऊन विश्वासाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे आचरण करणारी माणसे खरोखरच धन्य असतात. माणसांवर आणि भौतिक गोष्टींवर विश्वास ठेवून जागतिक जीवनात रममाण होणाऱ्यांच्या वाट्याला संकटे आणि दु:खे येतात, त्यांचे जीवन निष्क्रिय बनते. मात्र परमेश्वरावर विश्वास ठेवणारे जीवनात यशस्वी व फलद्रुप बनता प्रभू येशू धन्योद्गार काढत असतानाच दुःखोद्गारपण काढत आहे. प्रभू येशूने देवराज्याची शिकवणूक देतांना स्पष्टपणे म्हटले की, 'देवाचे राज्या तुमचे आहे.' देवप्रीति, परस्परप्रीति, सेवा, दयाळूपणा, क्षमाशीलता, समेट, शांती अशा सर्व स्तरावर प्रभू येशूने  देवराज्याचा संदेश दिला. गरीब, भूकेले, शोकग्रस्त, दु:खी, पीडित,  आजारग्रस्त आणि भूतग्रस्त अशा सर्वांनाच प्रभूने त्याच्या सामर्थ्यशाली  वैभवाने जीवनदान दिले व मुक्ति मिळवून दिली. विशेषत: गरीबांचा कैवारी  असलेल्या प्रभूने धनवानांचा आणि समाजावर बंधने लादणाऱ्या पुढाऱ्यांचा निषेध केला. ज्यांच्याविषयी धन्योद्गार काढले त्यांना स्वर्गात प्रतिफळाचे ! आश्वासन दिले. मात्र धनवानांना आणि अन्यायी जनांना म्हटले की, 'तुमची केवढी दुर्दशा होणार.'

प्रभू येशू आपल्याला संबोधून कोणते उद्गार काढीत आहे. आपण अन्यायग्रस्त व दुःखित आहोत की तृप्त आणि लोभी आहोत ? प्रभू करुणेचा आणि दयेचा सागर आहे, म्हणूनच आपण परस्परप्रीतिची आज्ञा पाळून सर्वांना बंधु प्रीतिने बागवावे म्हणून प्रभूकडे कृपा व प्रेरणा मागू या

✝️   

पहिले वाचन यिर्मया १७:५-८
वाचक :यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन

"यराबामने सोन्याची दोन वासरे तयार केली. "
"जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवतो तो शापित आहे. जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो तो धन्य!" परमेश्वर असे म्हणतो, “जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवतो, मानवाला आपला बाहू करतो आणि ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे तो शापित आहे. तो वैराणातल्या झुडपासारखा होईल आणि जे कल्याण होईल ते तो पाहणार नाही. अरण्यातील रुक्ष स्थळे, क्षारभूमी आणि प्रदेश यात तो वस्ती करील. जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो, ज्याचा भावविश्व परमेश्वर आहे तो धन्य! तो जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा होईल, तो आपली मुळे नदीकिनारी पसरील. उन्हाची झळई येते तिला तो भिणार नाही, त्याची पाने हिरवी राहतील. अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही, तो फळे देण्याचे सोडणार नाही.
प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading : : Jeremiah 17: 5-8
5 Thus saith the Lord: Cursed be the man that trusteth in man, and maketh flesh his arm, and whose heart departeth from the Lord.
6 For he shall be like tamaric in the desert, and he shall not see when good shall come: but he shall dwell in dryness in the desert in a salt land, and not inhabited.
7 Blessed be the man that trusteth in the Lord, and the Lord shall be his confidence.
8 And he shall be as a tree that is planted by the waters, that spreadeth out its roots towards moisture: and it shall not fear when the heat cometh. And the leaf thereof shall be green, and in the time of drought it shall not be solicitous, neither shall it cease at any time to bring forth fruit.

This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद  स्तोत्र १:१- २,३,४.६
प्रतिसाद :  जो मनुष्य देवावर भाव ठेवतो तो धन्य होय!

१)जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, 
पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही 
आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, 
तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, 
त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो तो धन्य!

२)जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, 
ते आपल्याला हंगामी फळ देते, 
ज्याची पाने कोमेजत नाहीत, 
अशा झाडासारखा तो आहे आणि जे काही 
तो हाती घेतो ते सिद्धीस जाते.

३) दुर्जन तसे नाहीत.
ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे आहेत. 
कारण नीतिमानांचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, 
पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो.

 Psalm: Psalms 1: 1-2, 3, 4 and 6
R. (40:5a) Blessed are they who hope in the Lord.

1 Blessed is the man who hath not walked in the counsel of the ungodly, nor stood in the way of sinners, nor sat in the chair of pestilence.
2 But his will is in the law of the Lord, and on his law he shall meditate day and night.
R. Blessed are they who hope in the Lord.

3 And he shall be like a tree which is planted near the running waters, which shall bring forth its fruit, in due season. And his leaf shall not fall off: and all whatsoever he shall do shall prosper.
R. Blessed are they who hope in the Lord.

4 Not so the wicked, not so: but like the dust, which the wind driveth from the face of the earth.
6 For the Lord knoweth the way of the just: and the way of the wicked shall perish.
R. Blessed are they who hope in the Lord.

दुसरे वाचन पौल १५:१२.१६-२०
वाचक :पौलचे करिंथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन

"ख्रिस्त उठवला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ आहे. "
ख्रिस्त गेलेल्यांतून उठवला गेला आहे अशी त्याच्याविषयी घोषणा होत आहे, तर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही, असे तुमच्यापैकी कित्येकजण म्हणतात हे कसे? कारण मेलेले उठवले जात नसतील तर ख्रिस्तही उठवला गेला नाही आणि • ख्रिस्त उठवला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ, तुम्ही अजून आपल्या पापातच आहा आणि ख्रिस्तामध्ये जे महानिद्रा घेत आहेत त्यांचाही नाश झाला आहे. आपण ज्या आयुष्यात ख्रिस्तावर केवळ आशा ठेवणारे असलो तर मग सर्व माणसांपेक्षा आपण लाचार आहो. तरीपण ख्रिस्त मेलेल्यांतून उठवला गेला आहेच. तो महानिद्रा घेणाऱ्यांतले प्रथम फळ असा आहे.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

Second Reading: 
First Corinthians 15: 12, 16-20
Now if Christ be preached, that he arose again from the dead, how do some among you say, that there is no resurrection of the dead? For if the dead rise not again, neither is Christ risen again. And if Christ be not risen again, your faith is vain, for you are yet in your sins. Then they also that are fallen asleep in Christ, are perished. If in this life only we have hope in Christ, we are of all men most miserable. But now Christ is risen from the dead, the firstfruits of them that sleep:
This is the word of God 
Thanks be to God 


जयघोष 
आलेलुया, आलेलुया ! 
 प्रभू म्हणतो, स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे
ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल.
 आलेलुया!

Acclamation: 
R. Alleluia, alleluia.
  Rejoice and be glad; your reward will be great in heaven.
Alleluia, alleluia.

शुभवर्तमान लूक  ६:१७.२०-२६
वाचक :लूकलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 येशू त्यांच्याबरोबर खाली उतरून सपाटीच्या जागेवर उभा राहिला आणि त्याच्या शिष्यांचा मोठा समुदाय आणि सर्व यहुदिया आणि येरुशलेम येथून आणि सोर आणि सिदोन ह्याकडल्या समुद्रकिनाऱ्यापासून त्याचे श्रवण करावयास आणि आपले रोग बरे करून घ्यावयास जे लोक आले होते, त्यांचा मोठा जमाव तेथे उभा होता.
तेव्हा त्याने आपल्या शिष्याकडे दृष्टी लावून म्हटले, “अहो, दीनांनो, तुम्ही धन्य; कारण देवाचे राज्य तुमचे आहे."
“अहो जे तुम्ही आता भुकेले आहा ते तुम्ही धन्य, कारण तुम्ही तृप्त व्हाल."
“अहो जे तुम्ही आता रडता ते तुम्ही धन्य, कारण तुम्ही हसाल."
"मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हांला वाळीत टाकतील, तुमची निंदा करतील आणि तुमचे नाववाईट म्हणून टाकून देतील, तेव्हा तुम्ही धन्य!"त्या दिवशी आनंदित होऊन उड्या मारा; कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. त्याचे पूर्वज संदेष्ट्यांना असेच करीत असत.“परंतु तुम्हा धनवानांची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही आपले सांत्वन भरून पावलाच आहा!"“अहो जे तुम्ही आता तृप्त झाला आहा त्या तुमचीकेवढी दुर्दशा होणार! कारण तुम्हाला भूक लागेल." “अहो जे तुम्ही आता हसता त्या तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही शोक कराल आणि रडाल.""जेव्हा सर्व लोक तुम्हांला बरे म्हणतील तेव्हा तुमची केवढी दुर्दशा होणार! त्यांचे पूर्वज खोट्या संदेष्ट्यांना असेच म्हणत असत."
प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
 Luke 6: 17, 20-26
And coming down with them, he stood in a plain place, and the company of his disciples, and a very great multitude of people from all Judea and Jerusalem, and the sea coast both of Tyre and Sidon, And he, lifting up his eyes on his disciples, said: Blessed are ye poor, for yours is the kingdom of God. Blessed are ye that hunger now: for you shall be filled. Blessed are ye that weep now: for you shall laugh. Blessed shall you be when men shall hate you, and when they shall separate you, and shall reproach you, and cast out your name as evil, for the Son of man’s sake. Be glad in that day and rejoice; for behold, your reward is great in heaven. For according to these things did their fathers to the prophets. But woe to you that are rich: for you have your consolation. Woe to you that are filled: for you shall hunger. Woe to you that now laugh: for you shall mourn and weep. Woe to you when men shall bless you: for according to these things did their fathers to the false prophets.
  This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनप्रभू येशू आशीर्वाद देताना चार धन्यवादितांना उद्देशून उच्चारलेल्या शब्दांना मिळून, जे स्वतःला आत्मसंतुष्ट समजतात व उदासीन वागतात अशांना उद्देशून प्रभू ख्रिस्त चार दुःखोद्‌गारसुद्धा काढतात हे आपण ऐकतो. धनवान, तृप्त पावलेले, समाधानी व आनंदीत जीवन जगणारे व रास्त आत्मस्तुती गाणारे अशांचा प्रभू येशू निषेध करत नाही. परंतु, त्यांना सावध करून परिवर्तित होण्यासाठी आमंत्रण करतात. वेळ निघून गेली नाही, तो पर्यंत स्वतःमध्ये शुभवर्तमानाला अनुसरून बदल घडवून आणण्याचे आव्हान प्रभू येशू सर्वांना करतात. प्रभू येशूचे प्रेम सर्वांपर्यंत पोहचणारे आहे. परमेश्वर सर्वांना पुरेल एवढे देतो. पण मानवाचा लोभी, स्वार्थी स्वभाव व उदासिनतेने वागण्यामुळे जगात विषमता पसरते. जे धनवान आहेत, त्यांनी ह्याचा विचार करूनआपली जीवनशैली बदलावी असा बोध परमेश्वर करतो. श्रद्धेच्या प्रकाशात प्रत्येक समाजात पारख होऊन दारिद्र्याच्या शृंखलातून गरीब, उपेक्षित, भुकेले व शोकग्रस्त ह्यांची सुटका होणे, हे देवराज्य स्विकारल्याचे चिन्ह ठरते. श्रद्धावंतांनी कंबर कसून प्रभू येशूने सुरू केलेल्या देवराज्याला उचलून धरणे, हा आपल्या ख्रिस्ती जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. जे दुःखी, कष्टी व भाराक्रांत आहेत, त्यांची सुटका परमेश्वर करणारच व जे धनवान व बलाढ्य आहेत, त्यांना त्यांच्या धोकादायक फसवणुकीपासून व आत्मस्तुतीबद्दल परमेश्वर आताच सावध करत आहे. त्यासाठी परस्परावरील प्रेम, विशेषकरून रंजल्या-गांजल्याना विशेष प्राधान्य हा एकमेव उपाय ठरतो. श्रद्धा परमेश्वरावरील निष्ठा बळकट करते व आपण बनवलेल्या ऐहिक गोष्टी दैव बनवते. श्रद्धा आपली अंत:करणे खऱ्या व जिवंत देवासमोर खुली करते. शेवटी एकमेव नवी आज्ञा हीच : "तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी; जशी मी तुम्हांवर प्रीती केली, तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी, म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा" (योहान १३:३४-३५). प्रभूचा शिष्य असण्याची अस्मिता समाजात एक दिलाचे व एक मनाचे जीवन एकत्र जगणे होय.
प्रार्थना : हे प्रभू येशू तुझ्या आज्ञा पाळून परस्पराची सेवा करण्यास व तुला अनुसरण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.
✝️        

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या