Marathi Bible Reading |Monday 17th February 2025 | 6th Week in Ordinary Time

सामान्य काळातील ६वा    सप्ताह  

सोमवार दिनांक १७  फेब्रुवारी  २०२५

ह्या पिढीला चिन्ह मुळीच दिले जाणार नाही."

 I say to you, a sign shall not be given to this generation.


✝️

सेर्वाईट संस्थेचे सात पवित्र संस्थापक 
- (तेरावे शतक)

✝️

    इ. स. १२३३ साली इटलीतील फ्लॉरेन्स ह्या ठिकाणी ख्रिस्तसभेतील भिक्षुकांच्या पाचव्या संस्थेची स्थापना झाली. शहरातील अत्यंत प्रतिष्ठीत कुटुंबांतील सात तरूण मुलांना पवित्र मरियेने आपल्या स्वर्गनयन सोहळ्याच्या दिवशी दर्शन दिले. ही मुले त्यावेळी “पवित्र मरियेचे भक्त” “लॉडेसी” नामक संघटनेमध्ये प्रार्थना व भक्ती करण्यात गुंग होते. पवित्र मरियेने सेवक (सेवाईट) नामक संघ  स्थापन करण्याची इच्छा त्यांच्याजवळ व्यक्त केली.
पवित्र मरियेने आपल्याला दिलेली आज्ञा प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी हे तरूण शहरापासून ११ मैल दूर मोन्ते सिनारियो नामक एकांत जागी गेले. ह्या ठिकाणी पवित्र मरिया पुन्हा त्यांना भेटली व आपल्या दुःखाचे आणि क्रुसाजवळील वेदनेचे प्रतीक म्हणून ह्या तरुणांनी काळे अंगरखे वापरावेत अशी मार्गदर्शक सूचनादेखील केली आणि संत अगस्तीनच्या आचारसंहितेवर आधारीत संघ स्थापन करण्याच्या विनंतीचा तिने पुनरुच्चार केला.
हा नवा संघ अगदी अद्भुतरित्या पसरत गेला. ५० वर्षामध्ये १०,००० • युवकांनी भिक्षुक म्हणून संघात प्रवेश केला आणि १४ व्या शतकापासून क्रेत बेटावर आणि भारतात १०० हून अधिक शाखा त्यांनी उघडल्या. याशिवाय बंदिस्त खोलीत राहून प्रार्थना करू इच्छिणाऱ्या तरूणींसाठी “क्लॉईस्टर्ड नन्स” (बंदीस्त व्रतस्थ) ची दुसरी संघटना आणि परोपकाराची व शिक्षणदानाची कृत्ये करणाऱ्या उत्साही तरूण तरुणींसाठी एक तिसरी संघटना त्यांनी तेराव्या शतकाच्या अखेरीस स्थापन केली. ह्या तिसऱ्या संघटनेच्या स्थापनेमध्ये संत ज्युलियाना फाल्कोनिएरी (सण ७ फेब्रुवारी) ह्यांचा सिंहाचा वाटा होता.
सेर्वाईट संघाची स्थापना करणाऱ्या संस्थापकांना १८८७ साली संत मालिकेतसामील करण्यात आले. त्यांचे अवशेष एकाच थडग्यांत, मोन्टे सिनारिओच्या, मठख्रिस्तालयात भाविकांसाठी ठेवलेले आहेत.

ख्रिस्तसभेच्या इतिहासात ख्रिस्तासाठी छळ सोसून सुवार्तेसाठी आपले  सर्वस्व समर्पण केलेले अनेक संत महात्मे आहेत. अनेक श्रद्धावंतांनी आत्मत्याग  करुन ख्रिस्ताठायी ऐक्याचे जीवन जगले आहे. आपण कोणता त्याग करुन ख्रिस्ताठायी व सुवार्तेसाठी जीवन जगणार आहोत त्यावर आज चिंतन करु या.. 

प्रभू येशू सर्वांनाच उदारपणे देत राहिला. अंधांना दृष्टी, भुकेल्यांस अन्न, बहिऱ्यांस कान, मुक्यांना वाचा आणि रोग्यांना आरोग्य देऊन प्रभूने त्याचे दैवी सामर्थ्य प्रकट केले. तरी सुद्धा कठोर अंत:करण आणि संशयी वृत्तीने वागणाऱ्या परुश्यांनी प्रभूकडे चिन्हाची माणगी केली. देवाचे वचन व देवाची दया महान आहे. येशूला ओळखण्यासाठी त्याचे सामर्थ्य जाणण्यासाठी व त्याच्या योजना समजण्यासाठी आपल्याला पवित्र आत्म्याची कृपा आवश्यक आहे.

विश्वासाने आपले सर्वस्व प्रभूचरणी समर्पित करु या. 

 ✝️ 

पहिले वाचन  उत्पत्ती ४:१-१५,२५
वाचक :उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन
"काइनने आपला भाऊ हाबेल याच्यावर चालून जाऊन त्यास ठार केले. "
आदामने आपली स्त्री एवा हिला जाणले, ती गर्भवती होऊन तिने काइनला जन्म दिला. ती म्हणाली, “परमेश्वराच्या साहाय्याने मला पुत्रसंतान लाभले आहे.” नंतर तिने त्याचा भाऊ हाबेल यास जन्म दिला. हाबेल मेंढपाळ झाला आणि काइन शेतकरी झाला. काही काळ लोटल्यावर असे झाले की काइनने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले. हाबेलनेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यांतून, म्हणजे त्यातल्या पुष्ट मेंढरांतून काही अर्पण आणले. परमेश्वराने हाबेल आणि त्याचे अर्पण यांचा आदर केला, पण काइन आणि त्याचे अर्पण यांचा त्याने आदर केला नाही. म्हणून काइन संतापला आणि त्याचे तोंड उतरले. तेव्हा परमेश्वर काइनला म्हणाला, "तू का संतापलास? आणि तुझे तोंड का उतरले ? तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे; त्याचा रोख तुझ्यावर आहे, याकरिता तू पापाला सत्तेखाली ठेव.” एके दिवशी काइन आपल्या भावाला म्हणाला, "चल, आपण शेतात जाऊ. त्याप्रमाणे ते शेतात असता काइनने आपला भाऊ हाबेल याच्यावर चालून जाऊन त्याला ठार केले. मग परमेश्वराने काइनला विचारले, “तुझा भाऊ हाबेल कोठे आहे ?" तो म्हणाला, “मला ठाऊक नाही, मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे ?" परमेश्वर म्हणाला, “तू हे काय केले? ऐक. तुझ्या भावाचे रक्त भूमीतून माझ्याकडे ओरड करीत आहे. तर आता तुझ्या हातून तुझ्या भावाचे पडलेले रक्त प्राशन करण्यास ज्या भूमीने तोंड उघडले आहे, तिचा तुला शाप आहे. तू जमिनीत मशागत करशील तेव्हा ती यापुढे तुला आपले सत्त्व देणार नाही. तू पृथ्वीवर परागंदा आणि भटकणारा होशील.” तेव्हा काइन परमेश्वराला म्हणाला, "ही माझी शिक्षा मला सोसावणार नाही इतकी भारी आहे. पाहा, ह्या जमिनीवरून तू मला आज हाकून दिले आहे. मी तुझ्या दृष्टिआड लपलेला असेन, मी पृथ्वीवर परागंदा आणि भटकणारा होईन आणि ज्या कोणाला मी सापडेन तो मला ठार करील." परमेश्वर त्यास म्हणाला, “तर मग जो कोणी काइनला ठार मारील त्याचा सातपट सूड घेण्यास येईल" आणि काइन कोणाला सापडल्यास त्याने त्याला मारू नये म्हणून त्याला परमेश्वराने खूण नेमून दिली. आदामने आपल्या बायकोला पुन्हा जाणले आणि तिला मुलगा झाला. त्याचे नाव तिने शेथ ठेवले. ती म्हणाली, "काइनने, हाबेलचा घात केला म्हणून देवाने त्याच्या जागी मला दुसरे अपत्य दिले आहे."
प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Genesis : Genesis 4: 1-15, 25
 And Adam knew Eve his wife: who conceived and brought forth Cain, saying: I have gotten a man through God. And again she brought forth his brother Abel. And Abel was a shepherd, and Cain a husbandman. And it came to pass after many days, that Cain offered, of the fruits of the earth, gifts to the Lord. Abel also offered of the firstlings of his flock, and of their fat: and the Lord had respect to Abel, and to his offerings. But to Cain and his offerings he had no respect: and Cain was exceedingly angry, and his countenance fell. And the Lord said to him: Why art thou angry? and why is thy countenance fallen? If thou do well, shalt thou not receive? but if ill, shall not sin forthwith be present at the door? but the lust thereof shall be under thee, and thou shalt have dominion over it. And Cain said to Abel his brother: Let us go forth abroad. And when they were in the field, Cain rose up against his brother Abel, and slew him. And the Lord said to Cain: Where is thy brother Abel? And he answered, I know not: am I my brother’s keeper? And he said to him: What hast thou done? the voice of thy brother’s blood crieth to me from the earth.Now, therefore, cursed shalt thou be upon the earth, which hath opened her mouth and received the blood of thy brother at thy hand. When thou shalt till it, it shall not yield to thee its fruit: a fugitive and a vagabond shalt thou be upon the earth.
And Cain said to the Lord: My iniquity is greater than that I may deserve pardon. Behold thou dost cast me out this day from the face of the earth, and I shall be hidden from thy face, and I shall be a vagabond and a fugitive on the earth: every one, therefore, that findeth me, shall kill me. And the Lord said to him: No, it shall not be so: but whosoever shall kill Cain, shall be punished sevenfold. And the Lord set a mark upon Cain, that whosoever found him should not kill him. Adam also knew his wife again: and she brought forth a son, and called his name Seth, saying: God hath given me another seed, for Abel whom Cain slew.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ५०१.८, १६ बक- १७,२०-२१
प्रतिसाद :  देवाला आभाररूपी यज्ञ कर.

१ देवाधिदेव परमेश्वर बोलला आहे, 
त्याने सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत 
पृथ्वीला हाक मारली आहे. 
"तुझ्या यज्ञासंबंधाने तर मी तुला बोलावीत नाही,
तुझे होमबली माझ्यापुढे नित्य आहेतच.”

२ "माझे नियम विदित करणारा तू कोण ? 
माझा करार आपल्या मुखाने उच्चारणारा तू कोण ? 
माझी वचने मागे झुगारून देतोस."
तू तर शिस्तीचा द्वेष करतोस,

३ “तू आपल्या भावाविरूद्ध बोलत बसतोस, 
तू आपल्या सख्ख्या भावाची चहाडी करतोस.
असे तू केले तरी मी गप्प कसा बसू ? 
मी तुझ्यासारखाच आहे असे तुला वाटले काय ?


Psalm: 
   50: 1 and 8, 16bc-17, 20-21
R. (14a) Offer to God a sacrifice of praise.

1 The God of gods, the Lord hath spoken: 
and he hath called the earth. From the rising of the sun, 
to the going down thereof:
8 I will not reprove thee for thy sacrifices: 
and thy burnt offerings are always in my sight.
R. Offer to God a sacrifice of praise.

16 Why dost thou declare my justices, a
nd take my covenant in thy mouth?
17 Seeing thou hast hated discipline: 
and hast cast my words behind thee.
R. Offer to God a sacrifice of praise.

20 Sitting thou didst speak against thy brother, 
and didst lay a scandal against thy mother’s son:
21 These things hast thou done, and I was silent. 
Thou thoughtest unjustly that I should be like to thee:
but I will reprove thee, and set before thy face.
R. Offer to God a sacrifice of praise.


जयघोष 
आलेलुया, आलेलुया !  
प्रभू म्हणतो, मी तुम्हांला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हांला कळवले आहे.
 आलेलुया!

Acclamation: 
R. Alleluia, alleluia.
  I am the way and the truth and the life, says the Lord; no one comes to the Father except through me.
Alleluia, alleluia.

शुभवर्तमान 

मार्क ८:११-१३

वाचक :  मार्क लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

“ही पिढी चिन्ह का मागते? 

परुशी येऊन येशूशी वाद घालू लागले आणि त्याची परीक्षा पाहण्याकरता त्यांनी त्याच्याजवळ आकाशातून चिन्ह मागितले. तेव्हा तो आपल्या अंतःकरणात विव्हळ होऊन म्हणाला, “ही पिढी चिन्ह का मागते? मी तुम्हास खचित सांगतो की ह्या पिढीला चिन्ह मुळीच दिले जाणार नाही." नंतर तो त्यांना सोडून पुन्हा मचव्यात बसून पलीकडे गेला.

प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
 Mark 8: 11-13
And the Pharisees came forth, and began to question with him, asking him a sign from heaven, tempting him. And sighing deeply in spirit, he saith: Why doth this generation seek a sign? Amen, I say to you, a sign shall not be given to this generation. And leaving them, he went up again into the ship, and passed to the other side of the water.
  This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतन
काईन आणि हाबेल आपल्या मिळकतीमधून परमेश्वराला वाहण्यासाठी अर्पणे आणतात. हाबेल आपल्या कळपातील धष्टपुष्ठ व सर्वोत्तम मेंढराचे अर्पण करतो, ह्यावरून देवाशी त्याचे नाते केंद्रस्थानी असल्याचे दिसून येते. देवाला जीवनात अत्युच्च प्राधान्य देणे हेच खरे. परमेश्वराने काईनचे अर्पण नाकारले, कारण ते अर्पण स्वेच्छेने व मनापासून करण्यात आले नाही. काईनच्या अर्पणाने एक वेगळाच संदेश दिला. स्वतःच्या भावाचा द्वेष, त्याच्याविषयी राग आणि हेवा ह्यामुळे त्याने आपल्या भावाचा खून केला. हाबेलचा खून करणाऱ्या काईनला देवाने पृथ्वीवर बैचेन झालेला भटक्या बनवले. ना घर, ना मित्र, ना संरक्षण ही हतबलतेची बोलकी प्रतिमा आहे. ही शिक्षा काईनला भीतीने भरते आणि त्याच्या विनंतीनंतर परमेश्वर त्याला संरक्षण पुरविण्याचे आश्वासन देतो. परमेश्वराचे आश्वासन काईनच्या गुन्ह्यानंतरही त्याच्या प्रती परमेश्वराच्या विश्वासूपणाचे लक्षण आहे. काईनला परमेश्वराच्या संरक्षणाची गरज आहे आणि परमेश्वर संरक्षणात्मकदृष्ट्या विश्वासू राहातो. परमेश्वर विश्वासू आहे तरीही आपण परमेश्वरावर अविश्वास दाखवतो. गर्दीष्ठ परूशी येशूबरोबर वाद घालतात आणि त्याची परीक्षा पाहण्याकरता त्याच्याकडे चिन्ह मागतात. काईन आणि परूशी लोकांप्रमाणे मी देखील चमत्कार मागत देवाजवळ जातो. होय, बऱ्याच वेळेला आपण तसे वागतो. जेव्ही मी एकटा, उदास, हताश, अस्वस्थ, थकलेला, रागावलेला, निराधार, बेरोजगार, बेघर असतो तेव्हा मला देव माझ्यासोबत असल्याचे चिन्ह हवे असते. मी चमत्काराची, जणू परमेश्वर जादू करील असा आग्रह धरतो. खरी श्रद्धा म्हणजे परमेश्वरावर भीस्त ठेवणे.

प्रार्थना : हे ज्ञानाचा उगमा, सर्व समर्थ परमेश्वरा, आमची अंत:करणे नम्र बनव, आमच्यातील अज्ञानाचा अंधकार नाहीसा कर व कृपेचा प्रकाश बहाल कर, आमेन.

✝️        

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या