Marathi Bible Reading |Tuesday 18th February 2025 | 6th Week in Ordinary Time

सामान्य काळातील ६वा    सप्ताह  

मंगळवार  दिनांक १८  फेब्रुवारी  २०२५

तेव्हा तो त्यांना म्हणाला, "अजून तुम्हाला समजत नाही काय ?"

And he said to them: How do you not yet understand?


✝️

संत कुरियाकोस एलायस चावरा

✝️

 प्रभूच्या  मळ्यात सेवाकार्य करण्यासाठी प्रभू सर्वांना बोलावित आहे. ख्रिस्तसभा आज पहिला भारतीय असलेले संत फा. कुरियाकोस चावरा ह्यांचा स्मृति दिन साजरा करीत आहोत. प्रभू येशूंच्या हाकेला प्रतिसाद देऊन फा. कुरियाकोस ह्यांनी आपल्या जीवनाद्वारे देवाची सुवार्ता घोषवली. एक तत्वज्ञानी आणि समाज सुधारक असलेल्या संत फा. कुरियोकोस ह्यांनी तळागाळातील लोकांपर्यत ख्रिस्ताची सुवार्ता पसरविली. विशेषतः त्यांनी प्रवचने व पवित्र जपमाळेची भक्ती आणि क्रुसावरील येशूची भक्ती ह्यांना प्राधान्य दिले. त्यांनी  Carmelites of Mary Immaculate ह्या संस्थेची स्थापना केली.
प्रभू येशूच्या मळ्यात सेवाकार्य करुन संतपदाला पोहोचलेले पहिले भारतीय वंशाचे संत म्हणून संत कुरियाकोस एलायस चावरा ह्यांचा आपल्याला  अभिमान आहे. त्यांच्या मध्यस्थीद्वारे अधिकाधिक ख्रिस्ती भाविकांना  ख्रिस्ताच्या हाकेला प्रतिसाद द्यावा म्हणून आपण प्रार्थना करु या.

 ✝️ 

पहिले वाचन  उत्पत्ती ६:५-८; ७:१-५.१०
वाचक :उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन
“मी उत्पन्न केलेल्या मानवाला भूतलावरून नष्ट करीन."

पृथ्वीवर मानवांचा दुष्टपणा फार आहे, त्यांच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुतापं झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. तेव्हा परमेश्वर म्हणाला, “मी उत्पन्न केलेल्या मानवाला भूतलावरून नष्ट करीन. मानव, पशू, रांगणारे प्राणी, आकाशातील पक्षी हे सारे नाहीसे करीन; कारण त्यांना उत्पन्न केल्याचा मला अनुताप झाला आहे." परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती.

मग परमेश्वराने नोहाला सांगितले, “तू आपल्या सगळ्या कुटूंबासह तारवात चल, कारण मी पाहिले आहे की या पिढीत तूच माझ्यापुढे नीतिमान आहेस. सर्व शुद्ध पशूंपैकी नरमाद्या सात सात आणि अशुद्ध पशूंपैकी दोन दोन आणि आकाशातील पक्ष्यांपैकी नरमाद्या सात सात बरोबर घे, अशाने भूतलावर त्यांचे बीज राहील. अजून सात दिवसांचा अवकाश आहे, मग मी चाळीस दिवस आणि चाळीस रात्री पृथ्वीवर पर्जन्य पाडीन आणि मी केलेले सर्व काही भूतलावरून नाहीसे करीन.' तेव्हा नोहाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही केले. सात दिवसांनंतर प्रलयाचे पाणी पृथ्वीवर आले.
प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Genesis : Genesis 6: 5-8; 7: 1-5, 10
And God seeing that the wickedness of men was great on the earth, and that all the thought of their heart was bent upon evil at all times, It repented him that he had made man on the earth. And being touched inwardly with sorrow of heart, He said: I will destroy man, whom I have created, from the face of the earth, from man even to beasts, from the creeping thing even to the fowls of the air, for it repenteth me that I have made them. But Noe found grace before the Lord. 
And the Lord said to him: Go in thou and all thy house into the ark: for thee I have seen just before me in this generation. Of all clean beasts take seven and seven, the male and the female. But of the beasts that are unclean two and two, the male and the female. Of the fowls also of the air seven and seven, the male and the female: that seed may be saved upon the face of the whole earth. For yet a while, and after seven days, I will rain upon the earth forty days and forty nights; and I will destroy every substance that I have made, from the face of the earth.And Noe did all things which the Lord had commanded him.And after the seven days were passed, the waters of the flood overflowed the earth.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र २९:१-४,  १०
प्रतिसाद :   परमेश्वर आपल्या लोकांना शांतीचे वरदान देईल.

१ अहो दिव्यदूतहो, परमेश्वराला श्रेय द्या, 
परमेश्वराला गौरव आणि सामर्थ्य ह्यांचे श्रेय द्या, 
परमेश्वराला त्याच्या वैभवी नावाचे श्रेय द्या, 
पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची आराधना करा.

२ परमेश्वराचा ध्वनी जलामधून चढत आहे, 
परमेश्वर जलाशयांवर आहे; 
परमेश्वराचा ध्वनी प्रबल आहे, 
परमेश्वराचा ध्वनी प्रतापमय आहे.

३ प्रतापशाली देव गर्जना करीत आहे 
त्याच्या मंदिरात सर्वत्र महिमा ! महिमा! असा ध्वनी दुमदुमतो. 
परमेश्वर जलप्रलयावर आरूढ होतो, 
परमेश्वर राजासनावर सर्वकाळ बसलेला आहे.


Psalm: 29: 1a and 2, 3ac-4, 3b and 9c-10
R. (11b) The Lord will bless his people with peace.

1a Bring to the Lord, O ye children of God.
2 Bring to the Lord glory and honour: 
bring to the Lord glory to his name: 
adore ye the Lord in his holy court.
R. The Lord will bless his people with peace.

3ac The voice of the Lord is upon the waters; 
The Lord is upon many waters.
4 The voice of the Lord is in power; 
the voice of the Lord in magnificence.
R. The Lord will bless his people with peace.

3b The God of majesty hath thundered.
9c The voice of the Lord prepareth the stags: 
and he will discover the thick woods: 
and in his temple all shall speak his glory.
10 The Lord maketh the flood to dwell: 
and the Lord shall sit king for ever.
R. The Lord will bless his people with peace.



जयघोष 
आलेलुया, आलेलुया !  
हे प्रभो, तुझ्या पुत्राची वचने स्वीकारण्यासाठी आमचे अंतःकरण प्रफुल्लित कर.
 आलेलुया!

Acclamation: 
R. Alleluia, alleluia.
Whoever loves me will keep my word, says the Lord; and my Father will love him and we will come to him.
Alleluia, alleluia.

शुभवर्तमान 
मार्क ८:१४-२१
वाचक :  मार्क लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 "परुश्यांचे खमीर आणि हेरोदचे खमीर ह्यांविषयी जपून राहा.'
शिष्य भाकरी घ्यावयास विसरले होते आणि मचव्यात त्यांच्याजवळ एकच भाकरी होती. मग येशूने त्यांना निक्षून सांगितले, “सांभाळा, परुश्यांचे खमीर आणि हेरोदचे खमीर ह्यांविषयी जपून राहा.” तेव्हा "आपल्याजवळ भाकरी नाहीत" अशी ते आपसांत चर्चा करू लागले. हे जाणून येशू त्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ भाकरी नाहीत ह्याविषयी चर्चा का करता ? तुम्ही अजून ध्यानात आणत नाही आणि समजतही नाही काय ? तुमचे अंत:करण कठीण झाले आहे काय ? डोळे असून तुम्हाला दिसत नाही काय ? कान असून तुम्हाला ऐकू येत नाही काय ? तुम्हाला आठवत नाही काय ? मी पाच हजार लोकांना पाच भाकरी मोडून वाटून दिल्या तेव्हा तुम्ही उरलेल्या तुकड्यांच्या किती टोपल्या भरून घेतल्या ?" ते त्याला म्हणाले, “बारा.” “तसेच चार हजारांसाठी सात भाकरी मोडल्या तेव्हा तुम्ही किती पाट्या तुकडे भरून घेतले?” ते म्हणाले, “सात.” तेव्हा तो त्यांना म्हणाला, "अजून तुम्हाला समजत नाही काय ?"
प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
  Mark 8: 14-21
And they forgot to take bread; and they had but one loaf with them in the ship. And he charged them, saying: Take heed and beware of the leaven of the Pharisees, and of the leaven of Herod. And they reasoned among themselves, saying: Because we have no bread. Which Jesus knowing, saith to them: Why do you reason, because you have no bread? do you not yet know nor understand? have you still your heart blinded? Having eyes, see you not? and having ears, hear you not? neither do you remember. When I broke the five loaves among five thousand, how many baskets full of fragments took you up? They say to him, Twelve. When also the seven loaves among four thousand, how many baskets of fragments took you up? And they say to him, Seven. And he said to them: How do you not yet understand?
  This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतन
प्रभू येशूचे शिष्य त्याने केलेली सर्व चिन्हे डोळ्यादेखत पाहूनही त्याच्यावर विश्वास ठेवण्यास व त्याला ओळखण्यास अपात्र ठरतात. प्रभू येशू त्याविषयी हळहळ व्यक्त करताना आपल्या शिष्यांना स्वतःची ओळख करून देतो आणि त्यांना सावध करताना सांगतो की, "सांभाळा, परूश्यांचे खमीर आणि हेरोदाचे खमीर ह्यांविषयी जपून राहा." परूशी आणि हेरोद हे अविश्वास आणि अनीतीची उदाहरणे आहेत आणि खमीर जसे पिठाला फुगवते त्याचप्रमाणे त्यांची वाईट कृत्ये ही समाजात पसरतात व समाज धुळीला मिळवतात, म्हणून प्रभू येशू आपल्या शिष्यांना नित्य सावध करतो व त्याच्यावर विश्वास ठेवण्यास व नीतीच्या मार्गाने चालण्यास त्यांना आवाहन करतो. प्रभू येशूने प्रकट केलले सत्य आणि त्याची स्वतःची ओळख शिष्य समजू शकले नाहीत, म्हणून प्रभू येशू त्यांचे अंतःकरण आणि कान उघडण्याचा प्रयत्न करतो. शिष्य प्रभू येशूबरोबर असूनही नश्वर ऐहिक गोष्टींचा विचार करीत होते. आपणही बऱ्याच वेळेला शिष्यांप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो आणि ऐहिक गोष्टींना देवापेक्षा जास्त प्राधान्य देतो. आपणांस परमेश्वराचे खमीर लाभले पाहिजे, ज्यामुळे आपले जीवन प्रेम, विश्वास आणि आनंद ह्यांनी आपण भरून जाऊ. आपण प्रार्थनेद्वारे व पवित्र जीवन जगून सतत परमेश्वराचे खमीर मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

प्रार्थना : हे प्रभू येशू, सर्व अनिष्टांपासून आमचे रक्षण कर व तुझ्या वचनानुसार जीवन जगण्यास प्रेरणा दे, आमेन.

✝️        

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या