Marathi Bible Reading | Thursday 6th February 2025| 4th Week in Ordinary Time

सामान्य काळातील ४ था   सप्ताह   

गुरुवार  दि.६ फेब्रुवारी  २०२५

त्याने त्यांना अशुद्ध आत्म्यांवरचा अधिकार दिला

and gave them power over unclean spirits.


संत पॉल मिकी व सहकारी  सण 
रक्तसाक्षी 

✝️

इ. स. १८६२ साली पोप पायस नववे ह्यांनी ३ येशूसंघीय, ६ फ्रान्सिस्कन्स, आणि १७ प्रापंचिक लोकांचा मिळून बनलेल्या २६ जणांना रक्तसाक्षीत्वाचा मुकूट प्रदान केला. 

त्याच्या जीवनाचा शेवटचा टप्पा फार काळ टिकला नाही. जेव्हा जपानमध्ये ख्रिस्ती धर्मियांचा व मिशनऱ्यांच्या  छळ सुरू झाला तेव्हा गोन्सालो गार्सिया ह्याच्यासह संत पॉल मिकी व सहकारी  पाच फ्रान्सिस्कन, तीन येशूसंघीय आणि सतरा जपानी प्रापंचिक (धर्मशिक्षक) ह्यांना नागासकीच्या टेकडीवर ५ फेब्रुवारी १५९७ रोजी क्रुसावर खिळण्यात आले. पोप पायस नववे ह्यांनी १८६२ रोजी त्यांना संतपदाचा मुकूट बहाल केला.

चिंतन : रक्तसाक्षींच्या रक्तावरच आजची ख्रिस्तसभा उभी आहे. आजच्या रक्तसाक्षींवर उद्याची ख्रिस्तसभा उभी राहील.
✝️   

पहिले वाचन इब्री लोकांस पत्र १२:१८-१९.२१-२४ 
वाचक : इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन  
     स्पर्शनीय आणि अग्नीने पेटलेला पर्वत, घनांधकार, निबिड काळोख, वादळ, कर्ण्याचा नाद आणि शब्दध्वनी ह्यांच्याजवळ तुम्ही आला नाही; तो ध्वनी ऐकणाऱ्यांनी विनंती केली की, त्याच्यायोगे आम्हांबरोबर अधिक बोलणे होऊ नये. जे दिसले ते इतके भयंकर होते की, मोशे म्हणाला, "मी अति भयभीत आणि कंपित झालो आहे." पण तुम्ही सियोन पर्वत, जिवंत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय येरुशलेम, लाखो देवदूत, स्वर्गातील यादीतल्या ज्येष्ठांचा समाज आणि मंडळी, सर्वांचा न्यायाधीश देव, पूर्ण केलेल्या नीतिमानांचे आत्मे, नव्या कराराचा मध्यस्थ येशू आणि शिंपडण्याचे रक्त ह्यांच्याजवळ आला आहा; त्या रक्ताचे बोलणे हाबेलच्या रक्ताच्या बोलण्यापेक्षा श्रेष्ठ आहे.
हा प्रभूचा शब्द 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
: Hebrews 12: 18-19, 21-24
18 For you are not come to a mountain that might be touched, and a burning fire, and a whirlwind, and darkness, and storm,19 And the sound of a trumpet, and the voice of words, which they that heard excused themselves, that the word might not be spoken to them: 21 And so terrible was that which was seen, Moses said: I am frighted, and tremble. 22 But you are come to mount Sion, and to the city of the living God, the heavenly Jerusalem, and to the company of many thousands of angels, 23 And to the church of the firstborn, who are written in the heavens, and to God the judge of all, and to the spirits of the just made perfect, 24 And to Jesus the mediator of the new testament, and to the sprinkling of blood which speaketh better than that of Abel.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  स्तोत्र  ४८:२-४,९-११

प्रतिसाद : हे देवा, तुझ्या मंदिरात आम्ही तुझ्या वात्सल्याचे चितंन करतो.

१) परमेश्वर थोर आहे, आमच्या देवाच्या नगरात, त्याच्या पवित्र पर्वतावर, तो स्तुतीस अत्यंत पात्र आहे; उच्चतेमुळे सुंदर आणि सर्व पृथ्वीचा आनंद आहे.

२) उत्तर सीमेवरील सियोन पर्वत, राजाधिराजाचे नगर! देव त्याच्या प्रासादांमध्ये आश्रयदुर्ग असा प्रगट झाला आहे.

३) जे आम्ही ऐकले ते सेनाधीश परमेश्वराच्या नगरात, आमच्या देवाच्या नगरात पाहिले; ते हे की, देव सर्वकाळ ते स्थिर राखील.

४) हे देवा, तुझ्या मंदिरात आम्ही तुझ्या वात्सल्याचे चिंतन करतो. हे देवा, जसे तुझे नाव, तशी तुझी कीर्ती पृथ्वीच्या शेवटपर्यंत जात आहे. तुझा उजवा हात न्यायपूर्ण आहे.


Psalm:  48: 2-3ab, 3cd-4, 9, 10-11
R. (10) O God, we ponder your mercy within your temple.

2 Great is the Lord, and exceedingly to be praised in the city of our God, in his holy mountain.
3ab With the joy of the whole earth.
R. O God, we ponder your mercy within your temple.

3cd Mount Sion founded, on the sides of the north, the city of the great king.
4 In her houses shall God be known, when he shall protect her.
R. O God, we ponder your mercy within your temple.

9 As we have heard, so have we seen, in the city of the Lord of hosts, in the city of our God: God hath founded it for ever.
R. O God, we ponder your mercy within your temple.

10 We have received thy mercy, O God, in the midst of thy temple.
11 According to thy name, O God, so also is thy praise unto the ends of the earth: thy right hand is full of justice.
R. O God, we ponder your mercy within your temple.

जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया! 
हे प्रभो, तू माझे नेत्र उघड म्हणजे तुझ्या धर्मशास्त्रातील अलौकिक गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील.
  आलेलुया!

Acclamation: 
R. Alleluia, alleluia.
The Kingdom of God is at hand; repent and believe in the Gospel.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान   मार्क ६:७-१३
वाचक :  मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
           येशूने बारा जणांस आपल्या जवळ बोलावले व तो त्यांना जोडीजोडीने बाहेर पाठवू लागला. त्याने त्यांना अशुद्ध आत्म्यांवरचा अधिकार दिला आणि त्यांना आज्ञा केली की, "वाटेसाठी काठीवाचून दुसरे काही घेऊ नका, भाकरी, झोळणा किंवा कमरकशात पैसे घेऊ नका, वहाणा घालून चाला, दोन अंगरखे घालू नका. तुम्ही कोठेही एखाद्याच्या घरी उतराल तेव्हा ते ठिकाण सोडीपर्यंत तेथेच राहा आणि ज्या ठिकाणी तुमचे स्वागत होणार नाही आणि जेथील लोक तुमचे ऐकणार नाहीत, तेथून निघताना, त्यांना साक्ष व्हावी म्हणून आपल्या तळपायांची धूळ तेथेच झाडून टाका." ते तेथून निघाले आणि लोकांनी पश्चात्ताप करावा अशी त्यांनी घोषणा केली, पुष्कळ भुते काढली आणि अनेक रोग्यांना तेल लावून बरे केले.
प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
Mark 6: 7-13
7 And he called the twelve; and began to send them two and two, and gave them power over unclean spirits.8 And he commanded them that they should take nothing for the way, but a staff only: no scrip, no bread, nor money in their purse,9 But to be shod with sandals, and that they should not put on two coats.10 And he said to them: Wheresoever you shall enter into an house, there abide till you depart from that place.11 And whosoever shall not receive you, nor hear you; going forth from thence, shake off the dust from your feet for a testimony to them.12 And going forth they preached that men should do penance:13 And they cast out many devils, and anointed with oil many that were sick, and healed them.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन: 
आज आपण संत पॉल मिकी आणि संत गोन्सालो गार्सिया समवेत इतर रक्तसाक्षींची स्मृती साजरी करीत आहोत. १५९६ साली जपानमध्ये २६ जणांना त्यावेळच्या जापनीज सम्राटाकडून प्रभू येशूवर विश्वास ठेवल्यामुळे आणि येशूची शिकवण लोकांना दिल्यामुळे नागासाकी टेकडीवर क्रुसी खिळण्यात आले.

आज ख्रिस्तसभा नागासाकीच्या ह्या २६ रक्तसाक्ष्यांची आठवण करीत असताना आपणांस चर्चच्या प्रेषित कार्याची आठवण करून देते, जे प्रेषितकार्य आजपर्यंत अखंडितपणे चालू आहे. प्रभू येशू स्वतःच्या मिशनमध्ये आपणांससुद्धा सहभागी करतो आणि प्रथम आपल्या शिष्यांना प्रेषितकार्य करण्यासाठी पाठवतो. प्रभू येशू शुभवर्तमान प्रसाराला प्रथम प्राधान्य देतो आणि आपल्या शिष्यांस तसे करण्यास शिकवतो. प्रेषितांच्या पावलावर पाऊल ठेवून अनेकजण शुभवर्तमानाच्या प्रसारासाठी जगाच्या कानाकोपऱ्यात गेले आणि त्यांपैकी बऱ्याच जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. संत पौल मिकी आणि संत गोन्सालो गार्सिया, तसेच त्यांचे सहकारी असेच ख्रिस्ताठायी झपाटलेले होते. प्रभू येशूने त्याचे प्रेषितकार्य आपल्याकडे सोपवले आहे, मग कशाप्रकारे मी ह्या प्रेषितकार्याच्या स्वीकार करतो ? शुभवर्तमानाच्या प्रसारासाठी माझ्याकडून काय अपेक्षित आहे आणि मी काय करू शकतो? माझे निवासस्थान बदलण्याऐवजी मी माझे आरपार परिवर्तन करून माझ्या जीवनचरणाद्वारे प्रभू येशूच्या प्रेषितकार्यात सहभागी होवू शकतो.

प्रार्थना : हे प्रभो परमेश्वरा, माझी श्रद्धा बळकट कर आणि तुझे सेवाकार्य  करण्यास व तुझी सुवार्ता घोषविण्यास कृपा दे, आमेन.

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या