सामान्य काळातील ४ था सप्ताह
बुधवार दि.५ फेब्रुवारी २०२५
“संदेष्ट्याचा सन्मान होत नाही असे नाही; मात्र त्याच्या देशात, त्याच्या आप्तेष्टांत अथवा त्याच्या घरच्या मंडळीत त्याचा सन्मान होत नसतो."
A prophet is not without honor, but in his own country, and in his own house, and among his own kindred.
संत आगथा
- कुमारिका, रक्तसाक्षी (२५१)
✝️
इटलीतील कँटानिया नामक गावातील एका श्रीमंत घराण्यात आगथा हिचा जन्म झाला. अगदी बालवयातच तिने स्वतःस देवाला वाहून घेतले. आमरणकौमार्याचे व्रत तिने स्वीकारले. राजदरबारात सल्लागारांच्या पंक्तीत बसणारा क्विटेन नावाचा प्रतिष्ठीत पुरुष आगथाच्या सौंदर्यावर इतका मोहित झाला की, त्याने तिला सरळ लग्नाची मागणीच घातली. परंतु आगथाने स्पष्टपणे त्याला आपला नकार कळविला. हा आपला अपमान आहे असे वाटल्याने त्याने घडलेल्या घटनेचा सूड उगवायचा असे मनाशी ठरविले.
आपल्या वासना शमविण्यासाठी ख्रिस्ती लोकांविरोधी असलेल्या कायद्यान्वये क्विन्टेन ह्याने आगथा हिला राजासमोर उभे केले. तसेच तिला वेश्यागृहात पाठविण्यात यावे असा धूर्त, सल्लासुद्धा राजाला दिला. तिथे तिला मरणप्राय यातनांना तोंड द्यावे लागले. परंतु ती मुळीच मागे हटली नाही. एकदा नांगराला हात घातलाय ना! मग आता मागे का सरायचे?
एक महिनाभर ती हे सर्व अन्याय, छळ सहन करीत होती. क्विन्टेन ह्याने तिला वेगवेगळ्या मार्गांनी धमक्या देण्याचे सत्र सुरू केले. ह्या धमक्यांना तिने काडीमात्र किंमत दिली नाही. उलट अधिक उत्साहाने आणि मोठ्या धैर्याने “येशू ख्रिस्त हाच आपला मुक्तीदाता आणि प्रकाश आहे” असे जाहीर केले. तिला फटके मारण्यात आले. टोकदार अशा तीक्ष्ण धातूंच्या सळया तापवून तिच्या शरीरावरून विशेषतः स्तनांवर फिरविण्यात आल्या. ह्या सर्व डागण्या ती खूप सहनशीलतेने सहन करीत होती. शेवटी त्याने तिला तुरुंगात डांबले. तिला अन्नपाणी वा औषधही पुरविले जाऊ नये असा आदेश दिला.
परंतु देवाने तिची आवश्यक ती काळजी घेतली. तुरूंगात असताना एका दृष्टातांत तिला संत पीटर ह्याने दर्शन दिले आणि तिच्या सर्व जखमा बऱ्या केल्या. तिचे शरीर लहान बाळासारखे पूर्ववत झाले. हे पाहून क्विन्टेन आश्चर्यचकित झाला. परंतु त्याचे मनपरिवर्तन मात्र झाले नाही. उलट त्याच्यातील बीभत्सपणा आणि कामवासना आणखी जागृत झाली. आगथाला पुन्हा एकदा राजासमोर हजर करण्यात आले. परंतु दुसऱ्यांदा तिने येशू ख्रिस्तावरील आपला विश्वास आणि आमरण कौमार्य व्रत निर्भयपणे जाहीर केले.
आता मात्र क्विन्टेन अक्षरश: पेटून उठला. सगळा जळफळाट त्याने आगधाला आणखी भयंकर यातना देऊन व्यक्त केला. जळत्या निखाऱ्यात फुटलेल्या भांड्याचे तुकडे मिसळून त्यावरून आगथाचा नग्न देह त्याने फरफटून नेण्याचा आदेश दिला. त्यावेळी एक भूकंप झाला आणि क्विन्टेन घाबरून पळून गेला. त्याच्या दुसऱ्याच रात्री आगथाने अखेरचा श्वास घेतला. तो दिवस होता ५ फेब्रुवारी २५१. मरतेसमयी तिच्या तोंडून पुढील शब्द निघाले :
"हे प्रभो, माझ्या निर्माणकर्त्या, तू अगदी पाळण्यापासून माझे संरक्षण करीत आलेला आहेस. माझ्याकडून तू ऐहिक सुखाची ओढ काढून घेतलीस आणि त्याऐवजी मला सहनशीलतेची देणगी दिलीस. आता माझा आत्मा स्वीकार."
संत आगधाने आपले सर्वस्व प्रभू येशू ख्रिस्ताला वाहिले. कौमार्याची शुद्धता तिने त्याला अर्पण केली आणि त्यात टिकून राहण्यासाठी तिने त्याच्याकडे संरक्षण मागितले आणि आजवरही ख्रिस्ताने तिचा देह कोवळा लुसलुशीत आणि ताजा टवटवीत ठेवलेला आहे. जेव्हा जेव्हा माऊंट एना येथे उद्रेक होतात तेव्हा कॅटानियाचे श्रद्धावंत ख्रिस्ती लोक तिचा अविनाशी देह दर्शनासाठी बाहेर काढतात. संत पीटरच्या स्पर्शाने पूर्ववत झालेली तिची त्वचा वेगळ्याच तेजाने झळाळते. तेव्हा तिचा देह खरोखर पवित्र आत्म्याचे मंदिर असावे असे जाणवल्यावाचून राहत नाही.
चिंतन : “हे येशू ख्रिस्ता, सर्वांच्या प्रभो, तू माझ्या हृदयाकडे पहा, तुला माझ्या सर्व इच्छा आकांक्षा ठाऊक आहेत. जे काही माझे आहे ते सर्व तुझेच आहे. तू माझा मेंढपाळ, मी तुझे कोकरू आहे. मला दुष्ट शक्तीवर विजय मिळविण्यास सहाय्य व सत्पात्र कर" संत आगथाची प्रार्थना.
✝️
पहिले वाचन इब्री - १२:४-७.११-१५
वाचक : इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन
तुम्ही पापाशी झगडत असता रक्त निघेपर्यंत अजून प्रतिकार केला नाही हा तुम्हांला पुत्राप्रमाणे केलेला बोध तुम्ही विसरून गेला आहा काय?
"माझ्या मुला, परमेश्वराच्या शिक्षेचा अनादर करू नको आणि त्याच्याकडून दोष पदरी पडला असता खचू नको. कारण ज्याच्यावर परमेश्वर प्रीती करतो, त्याला तो शिक्षा करतो आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला तो शिक्षा करतो."
शिक्षणासाठी तुम्ही शिक्षा सहन करीत आहा. देव तुम्हाला पुत्रांप्रमाणे वागवतो आणि ज्याला बाप शिक्षा करीत नाही असा कोण पुत्र आहे ? कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते, तरी ज्यांना तिच्यापासून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्त्व शांतिदायक फळ देते.
म्हणून लोंबकळणारे हात आणि लटपटणारे गुडघे सरळ करा आणि आपल्या पायांसाठी सरळ वाटा करा. ह्यासाठी की लंगड्याचा सांधा उखळू नये, तर उलट तो बरा व्हावा. सर्वांबरोबर शांततेने राहण्याचा आणि ज्यावाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रीकरण मिळवण्याचा झटून प्रयत्न करा. देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये; ज्यामुळे पुष्कळजण बिघडून जातील असे कोणतेही “कडूपणाचे मूळ" अंकुरित होऊन ऊपद्रव देणारे होऊ नये. कोणी जारकर्मी होऊ नये, ह्याकडे लक्ष द्या.
हा प्रभूचा शब्द
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
: Hebrews 12: 4-7, 11-15
4 For you have not yet resisted unto blood, striving against sin:
5 And you have forgotten the consolation, which speaketh to you, as unto children, saying: My son, neglect not the discipline of the Lord; neither be thou wearied whilst thou art rebuked by him.6 For whom the Lord loveth, he chastiseth; and he scourgeth every son whom he receiveth.7 Persevere under discipline. God dealeth with you as with his sons; for what son is there, whom the father doth not correct?11 Now all chastisement for the present indeed seemeth not to bring with it joy, but sorrow: but afterwards it will yield, to them that are exercised by it, the most peaceable fruit of justice.12 Wherefore lift up the hands which hang down, and the feeble knees,13 And make straight steps with your feet: that no one, halting, may go out of the way; but rather be healed.14 Follow peace with all men, and holiness: without which no man shall see God.15 Looking diligently, lest any man be wanting to the grace of God; lest any root of bitterness springing up do hinder, and by it many be defiled.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १०३:१-२,१३-१४,१७-१८अ
प्रतिसाद : परमेश्वराची दया त्याचे भय करणाऱ्यांवर युगानुयुगे असते.
१) हे माझ्या जिवा, परमेश्वराला धन्यवाद दे,
हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाला धन्यवाद दे.
हे माझ्या जिवा, परमेश्वराला धन्यवाद दे,
त्याचे सर्व उपकार विसरू नको.
२) जसा बाप आपल्या मुलांवर ममता करतो.
तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यांवर ममता करतो;
तो आमची प्रकृती जाणतो, आम्ही केवळ माती आहो हे तो आठवतो.
३ ) परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर युगानुयुगे असते
आणि त्याच्या न्यायीपणाचा अनुभव जे त्याचा करार पाळतात
त्या पुत्रपौत्रांना घडतो.
Psalm: Psalms 103: 1-2, 13-14, 17-18a
R. (17) The Lord’s kindness is everlasting to those who fear him.
1 Bless the Lord, O my soul: and let all that is within me bless his holy name.
2 Bless the Lord, O my soul, and never forget all he hath done for thee.
R. The Lord’s kindness is everlasting to those who fear him.
13 As a father hath compassion on his children, so hath the Lord compassion on them that fear him:
14 For he knoweth our frame. He remembereth that we are dust:
R. The Lord’s kindness is everlasting to those who fear him.
17 But the mercy of the Lord is from eternity and unto eternity upon them that fear him: And his justice unto children’s children,
18a To such as keep his covenant.
R. The Lord’s kindness is everlasting to those who fear him.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
तुम्ही आपली मने आज कठोर करू नका. तर परमेश्वराच्या वाणीकडे लक्ष द्या.
आलेलुया!
Acclamation:
R. Alleluia, alleluia.
My sheep hear my voice, says the Lord; I know them, and they follow me
R. Alleluia, alleluia.
शुभवर्तमान मार्क ६:१-६
वाचक : मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
येशू आपल्या गावी आला. त्याचे शिष्य त्याच्यामागे आले. मग शब्बाथ दिवशी तो सभास्थानात शिकवू लागला आणि पुष्कळ लोक त्याचे भाषण ऐकून थक्क झाले आणि म्हणाले, “ह्याला हे सर्व कोठून प्राप्त झाले ? काय हे ज्ञान ह्याला देण्यात आले आहे आणि ह्याच्या हातून केवढी ही महत्कृत्ये होतात! जो सुतार, जो मरियेचा मुलगा आणि याकोब, योसे, यहुदा आणि शिमोन ह्यांचा जो भाऊ तो हाच आहे ना? आणि ह्याच्या बहिणी येथे आपल्याबरोबर आहेत ना?" असे ते त्याच्याविषयी दबकत बोलू लागले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “संदेष्ट्याचा सन्मान होत नाही असे नाही; मात्र त्याच्या देशात, त्याच्या आप्तेष्टांत अथवा त्याच्या घरच्या मंडळीत त्याचा सन्मान होत नसतो." थोड्याशाच रोग्यांवर हात ठेवून त्याने त्यांना बरे केले, ह्याशिवाय दुसरे कोणतेही महत्कृत्य त्याला तेथे करता आले नाही. त्यांच्या अविश्वासामुळे येशूला आश्चर्य वाटले.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
Mark 6: 1-6
1 And going out from thence, he went into his own country; and his disciples followed him. 2 And when the sabbath was come, he began to teach in the synagogue: and many hearing him were in admiration at his doctrine, saying: How came this man by all these things? and what wisdom is this that is given to him, and such mighty works as are wrought by his hands?3 Is not this the carpenter, the son of Mary, the brother of James, and Joseph, and Jude, and Simon? are not also his sisters here with us? And they were scandalized in regard of him.4 And Jesus said to them: A prophet is not without honor, but in his own country, and in his own house, and among his own kindred.5 And he could not do any miracles there, only that he cured a few that were sick, laying his hands upon them.6 And he wondered because of their unbelief, and he went through the villages round about teaching.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:
आज ख्रिस्तसभा संत आगाथाची स्मृती साजरी करते. अगदी सुरुवातीच्या खिस्तसभेत जेव्हा ख्रिस्ती झालेल्या खूप लोकांचा छळ होत असे तेव्हा अनेक रक्तसाक्षींसारखी संत आगाथा एक रक्तसाक्षी झाली. संत आगाथाने ख्रिस्तावरील आपल्या प्रीतीसाठी आजन्म कुमारिका राहण्याचे व्रत घेतले होते; परंतु रोमन - प्रिफेक्ट क्विनटानियुस तिच्या सौंदर्यामुळे हव्यासापोटी तिला आपले करू इच्छित होता. आगाथाने त्याला सतत नकार दिला म्हणून त्याने तिचा प्रचंड छळ करून तिला ठार मारले. राजाच्या छळापुढे आगाथा झुकली नाही आणि देवावरील आपला विश्वास आणि प्रेम व्यक्त - करण्यासाठी ती रक्तसाक्षी झाली. पहिल्या आभारघोष प्रार्थनेत तिचे नाव नोंदले गेले आहे. आपणा सर्वांना आगाथाप्रमाणे परमेश्वराचा स्वीकार करण्यास आणि त्याच्यावर विश्वास ठेवण्यास बोलावले आहे. आजच्या शुभवर्तमानात आपण पाहातो की, प्रभू येशूचा त्याच्या गावातील लोकांनी स्वीकार केला नाही आणि प्रभू ख्रिस्ताला त्यांनी धिक्कारले. प्रभू येशूविषयी संशय ही गंभीर बाब आहे आणि आपला अविश्वास ह्याला कारणीभूत आहे. ते गर्वाचे लक्षण आहे. आपण प्रभू येशूला नम्रतेने धारण केले पाहिजे, कारण तोच एकमेव आपले तारण आहे.
प्रार्थना : हे प्रभू येशू, धैर्याने व विश्वासाने तुला अनुसरण्यास व तुझी सुवार्ता पसरविण्यास कृपा दे, आमेन.
✝️
0 टिप्पण्या