उपवासकाळातील (पवित्र आठवडा)
बुधवार दि. १६ एप्रिल २०२५
"मी तुम्हांला सत्य सांगतो, तुमच्यातला एकजण मला धरून देईल."
"Truly, I say to you, one of you will betray me.
संत मेरी बर्नाडे सौबेरियस
( लुर्डस )
गुरुवार दि. ११ फेब्रु. १८५८ रोजी शेकोटीसाठी आणि सरपणासाठी लाकडाच्या सुक्या फांद्या गोळा करण्यासाठी ती गेली होती. सोबत तिची बहीण मरिया आणि जीन नावाची मैत्रिण होती. नदीकिनारी असलेल्या गुहेत मासाबेलाच्या ग्रोटोमध्ये तिला एक दृश्य दिसले. एक अतिसौंदर्यवान स्त्री तिच्या नजरेस पडली. आपल्याबरोबर असलेल्या मरिया व जीन ह्यांच्याकडे तिने ह्या स्त्रीचे वर्णन केले. शुभ्र वस्त्रे पांघरलेली स्वर्गीय तेजसंपन्न अशी सोळा सतरा वर्षांची ती स्त्री होती.तिच्या कमरेभोवती आकाशी रंगाचा निळा पट्टा होता. डोक्यावरून, पाठीवरून रुळणारी पांढरी ओढणी होती..... तिचे पाय अनवाणी होते आणि दोन्ही पायांवर प्रत्येकी एक गुलाब होते. तिच्या उजव्या हातावर सफेद मण्यांची रोझरी जपमाळ होती.... त्या रोझरीची साखळी सोनेरी रंगाची होती. ते मणी, ती साखळी आणि गुलाब एका आगळ्याच तेजाने झळकत होती.
बर्नाडेट हिने वर्णन केलेली ती स्त्री तिला एकूण सतरा वेळा दिसली. काही प्रसंगी तिने तिच्याशी संभाषणही केले. दि. १८ फेब्रुवारी रोजी दिलेल्या दर्शनात तिने म्हटले, “मी तुला खूप आनंदी व सुखी करू इच्छिते. कदाचित या जगात तू आनंदी व सुखी होणार नाही. पुढील जीवनात तू नक्कीच सुखी समाधानी होशील.” त्यानंतर २४ फेब्रुवारी रोजी ती म्हणाली. पश्चात्ताप करा ! २७ फेब्रुवारी रोजी तिने त्या दर्शनाच्या ठिकाणी एक छोटेसे प्रार्थनामंदिर बांधले जावे अशी सूचना केली. तर २५ मार्च रोजी आपण निष्कलंक गर्भसंभव असलेली माता मरिया असल्याचे तिने बर्नाडेट हिला प्रगट केले.
३ जून रोजी बर्नाडेट हिने आपला प्रथम पवित्र ख्रिस्तशरीर संस्कार स्वीकारला. तिला झालेल्या दृष्टांतावरून बराच वादंग माजला. तिची थट्टा मस्करी सुरू झाली. लुर्डस येथील ग्रोटोजवळ तिला सहज जाता येऊ नये म्हणून लुर्डसच्या महापौरांनी त्या ग्रोटोभोवती तारेचे काटेरी कुंपण घातले. तरीही बर्नाडेटने त्याच अंतरावरून पवित्र मरियेचे दर्शन घेतले
“आपण दु:खाचा स्वीकार प्रेमाने करायला शिकले पाहिजे. आपला प्रभू ज्यांच्यावर विशेष प्रेम करतो त्यांना काट्यांचा मुकूट प्रदान करतो. माझ्या क्रुसावरील बिछान्यात मी एखाद्या मखमली गादीवर बसलेल्या राणीपेक्षाही आनंदी आहे.” - संत मेरी बर्नाडे सौबेरियस
देवाचा पुत्र व आपला तारणारा प्रभू ह्याच्या दुःखासहनाची सुरुवात शेवटल्या भोजनापासून होते त्याचा वृत्तांत दिला आहे. प्रभू येशू बरोबर त्याच्या सेवाकार्यात सहभागी असलेला शिष्य यहुदा इस्कर्योत फितूरी करतो. मुख्य याजकांकडे जाऊन तीस रुपयाच्या नाण्यात जणू तो आपल्या गुरुचा सौदा करतो. यहुदा इस्कर्योत हे व्यक्तिमत्व माणसातील स्वार्थी, लोभी आणि विश्वासघातकी प्रवृत्तीचे दर्शन घडविणारे आहे. प्रभू येशूने जेव्हा म्हटले, 'तुमच्यांतला एकजण मला धरुन देईल', तेव्हा शिष्यांमध्ये गोंधळ उडाला. मात्र अखिल मानवजातीच्या तारणसाठी ते घडणे आवश्यक होते.
यहुदा इस्कर्योत ह्या व्यक्तिमत्वावर आपण चिंतन करु या. 'मला काय द्याल' असा माणूस जेव्हा स्वार्थी विचार करतो तेव्हा माणसातील ज्युदास जागा झालेला असतो. वरवरुन साधी आणि भोळी वाटणारी अशी अनेक माणसे विश्वास घातकी असू शकतात. आपल्यामध्ये असा ज्युदास कार्यरत असेल तर आपण ख्रिस्ती मुल्यांशी प्रामाणिक नाहीत. आपल्यातील स्वार्थी, अहंकारीआणि लोभी विचार काढून टाकून आपण ख्रिस्ताशी एकनिष्ठ बनण्यासाठी कृपा मागू या.
✝️
पहिले वाचन : यशया ५०:४-९
वाचक यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
“उपमर्द आणि छिः थू यांपासून मी आपले तोंड चुकवले नाही."
यशया म्हणतो, शिणलेल्यांना बोलून धीर कसा द्यावा ते समजावे म्हणून प्रभू परमेश्वराने मला शिष्यांची जिव्हा दिली आहे. तो रोजरोज सकाळी मला जागे करतो, शिष्यांप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान उघडले आहेत. मी फितूर झालो नाही, मागे फिरलो नाही. मी मारणाऱ्यांपुढे आपली पाठ केली, केस उपटणाऱ्यांपुढे मी आपले गाल केले. उपमर्द आणि छि: थू यांपासून मी आपले तोंड चुकवले नाही. प्रभू परमेश्वर मला साहाय्य करणार म्हणून मी लज्जित झालो नाही. मी आपले तोंड गारगोटीसारखे केले. माझी फजिती होणार नाही हे मला ठाऊक होते. मला नीतिमान ठरवणारा जवळ आहे. माझ्याबरोबर वाद कोण करणार? आपण समोरासमोर उभे राहू. माझा प्रतिवादी कोण आहे ? त्याने माझ्यापुढे यावे. पाहा, प्रभू परमेश्वर माझा साहाय्यकर्ता आहे. मला दोषी कोण ठरवणार ?
प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
Isaiah 50:4-9a
The Lord God has given me the tongue of those who are taught, that I may know how to sustain with a word him who is weary. Morning by morning he awakens; he awakens my ear to hear as those who are taught. The Lord God has opened my ear, and I was not rebellious: I turned not backward. I gave my back to those who strike, and my cheeks to those who pull out the beard; I hid not my face from disgrace and me; therefore I have not bee been disgraced; therefore I Ispitting. But the Lord God helps I have set my face like a flint, and I know that I shall not be put to shame. He who vindicates me is near. Who will contend with me? Let us stand up together. Who is my adversary! Let him come near to me. Behold, the Lord God helps me; who will declare me guilty!
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ६९:८- १०, २१-२२,३१.३३-३४
