Marathi Bible Reading | Monday 12th May 2025 | 4th week of Easter

पुनरुत्थान चौथा सप्ताह  

सोमवार  दि. १२ मे २०२ 

  मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी आणि ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे." I came that they may have life and have it abundantly.

✝️


संत नेरियस, आखिलियस आणि डॉमिटिला

- रक्तसाक्षी (पहिले शतक)

अगदी चौथ्या शतकापासून संत नेरियस, आखिलिस आणि डॉमिटिला ह्यांची भक्ती पूर्वापार चालत आलेली आहे. एकदा त्यांच्या सणाच्या शुभप्रसंगी रोम शहरात संत ग्रेगरी महान ह्यांनी आपल्या प्रवचनात सांगितले "ह्या जगातील सर्व प्रकारची सुखे आणि समृद्धी ह्या रक्तसाक्ष्यांच्या चरणाशी लोटांगण घालत होती. त्याचवेळी त्यांनी आपल्या सुखासीनतेवर लाथ मारली आणि सर्व उपभोग पायाखाली चिरडून टाकले." संत ग्रेगरी ज्या चर्चमध्ये हे प्रवचन देत होते ते चर्च ह्या संतांच्या थडग्यावर उभारण्यात आलेले होते आणि पोप ह्या नात्याने ते त्यांचे अठ्ठाविसावे प्रवचन होते.

नेरियस आणि आखिलियस हे प्रेटोरियन सैनिक होते आणि फ्लेविया डॉमिटिला हिच्या घरी षंढ म्हणून काम करीत होते. ख्रिस्ती श्रद्धेसाठी जेव्हा डॉमिटिला हिला हद्दपार करण्यात आले होते तेव्हा या दोघांनी तिला पाठिंबा दिला. त्यामुळे टेरासिना बेटावर दोघांचा शिरच्छेद करण्यात आला आणि ट्राजन सम्राटने मूर्तीपूजा करण्यास नकार देणाऱ्या डॉमिटिला हिला जिवंत जाळून टाकले.
✝️

पेत्राने लोकांना पश्चात्ताप करण्याचे आवाहन करुन बाप्तिस्मा स्वीकारण्यास सांगितले. बाप्तिस्मा स्वीकारलेल्यांना पवित्र आत्म्याच्या दानाचे आश्वासन दिले. प्रभू येशू अशा सर्व  लोकांसाठी तारणप्राप्तिचे दार बनला. प्रभू येशू म्हणत आहे, “मी दार आहे, माझ्याद्वारे कोणी आंत योईल तर त्याला तारण प्राप्ति होईल."  प्रभूवर विश्वास ठेवून त्याची वचने आणि आज्ञा पाळणाऱ्यांना प्रभू येशूद्वारे तारणाची कृपा मिळणार आहे. त्याच्या कृपेच्या अखंडित झऱ्यांमध्ये आपण स्वतःला झोकून देऊ या.
  
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये ११:१-१८
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"देवाने परराष्ट्रीयांनाही जीवन मिळावे म्हणून पश्चात्तापबुद्धी दिली आहे."
प्रेषितांनी आणि यहुदिया प्रांतात असलेल्या बंधुजनांनी असे ऐकले की, परराष्ट्रीयांनीही देवाचे ग्रहण केले. मग पेत्र येरुशलेमला गेला तेव्हा सुंता झालेले लोक त्याच्याबरोबर वाद घालू लागले की, सुंता न झालेल्या माणसांकडे जाऊन त्यांच्याबरोबर तुम्ही का जेवलात ? तेव्हा पेत्रने अनुक्रमाने सविस्तर सांगण्यास सुरुवात केली, "मी यापो नगरात प्रार्थना करीत होतो. तेव्हा देहभान सुटून मी असा एक दृष्टान्त पाहिला की, एक पात्र उतरले आणि ते मोठ्या चांदव्यासारखे चार कोपरे धरून आकाशातून सोडलेले असे माझ्यापर्यंत आले. त्याच्याकडे मी न्याहाळून पाहून विचार करीत होतो तो पृथ्वीवरले चतुष्पाद, श्वापदे, सरपटणारे जीव आणि आकाशातील पाखरे माझ्या दृष्टीस पडली आणि मी अशी वाणीही माझ्याबरोबर बोलताना ऐकली की, "पेत्र, ऊठ, मारून खा, " परंतु मी म्हणालो, "नको, प्रभू ! कारण निषिद्ध किंवा अशुद्ध असे काही माझ्या तोंडात अजून कधी गेले नाही. मग दुसऱ्यांदा आकाशातून वाणी होऊन ती मला म्हणाली, "देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नको." असे तीनदा झाले. नंतर ते अवघे सारे पुन्हा आकाशात वर ओढले गेले. इतक्यात पाहा, ज्या घरात आम्ही होतो त्याच्यापुढे कैसरियातून माझ्याकडे पाठवलेली तीन माणसे येऊन उभी राहीली. तेव्हा आत्म्याने मला सांगितले की, काही संशय न धरता त्यांच्याबरोबर जा. मग हे सहा बंधूही माझ्याबरोबर आले आणि आम्ही त्या माणसाच्या घरी गेलो. त्याने आम्हांला सांगितले की, "मी आपल्या घरी देवदूत उभा राहिलेला पाहिला." तो म्हणाला, "यापो येथे कोणाला पाठवून पेत्र म्हटलेल्या शिमोनाला बोलावून आण. ज्यांच्या योगे तुझे आणि तुझ्या सर्व कुटुंबांचे तारण होईल अशा गोष्टी तो तुला सांगेल." मी बोलू लागलो तो, जसा आरंभी आपल्यावर तसा त्यांच्यावरही पवित्र आत्मा उतरला. तेव्हा प्रभूने सांगितलेली गोष्ट मला आठवली, ती अशी की, योहान पाण्याने बाप्तिस्मा करी हे खरे, परंतु तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल. जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तेव्हा जसे आपणांला तसे त्यांनाही देवाने सारखेच दान दिले, तर मग देवाला अडवणारा असा मी कोण ?" हे ऐकून ते गप्प राहिले आणि देवाचा गौरव करीत बोलले, "तर मग देवाने परराष्ट्रीयांनाही जीवन मिळावे म्हणून पश्चात्तापबुद्धी दिली आहे."
प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Acts 11:1-18
In those days: The apostles and the brothers who were throughout luase heard that the Gentiles also had received the word of God. So when Peter went up to Jerusalem, the circumcision party criticized him, saying, "You went to uncircumcised men and ate with them." But Peter began and explained it to them in order: "I was in the city of Joppa praying, and in a trance 1 sne a vision, something like a great sheet descending, being let down from heaven by its four corners, and it came down to me. Looking at it closely, I observed animals and beasts of prey and reptiles and birds of the air. And I heard a voice saying to me, 'Rise, Peter, kill and eat. But I said, "By no means, Lord; for nothing common or unclean has ever entered my mouth. But the voice answered a second time from heaven, What God has made clean, do not call common. This happened three times, and all was drawn up again into heaven, And behold, at that very moment three men arrived at the house in which we were, seng to me from Caesarea. And the Spirit told me to go with them, making no distinction. These six brothers also accompanied me, and we entered the man's house. And he told us how he had seen the angel stand in his house and say, 'Send to Joppa and bring Simon who is called Peter, he will declare to you a message by which you will be saved, you and all your household. As I began to speak, the Holy Spirit fell on them just as on us at the beginning And I remembered the word of the Lord, how he said, 'John baptised with water, but you will be baptised with the Holy Spirit." If then God gave the same gift to them as he gave to us when we believed in the Lord Jesus Christ, who was I that I could stand in God's way?" When they heard these things they fell silent. And they glorified God, saying, "Then to the Gentiles also God has granted repentance that leads to life."
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ४२:२,३,४३:३-४
प्रतिसाद :  माझा जीव देवाकरिता तान्हेला आहे.

१) पाण्याच्या प्रवाहासाठी एखादी हरिणी धापा टाकते 
तसाच माझा जीव हे देवा, तुझ्यासाठी धापा टाकीत आहे.

२) माझा जीव देवाकरिता, 
जिवंत देवाकरिता तान्हेला झाला आहे. 

३) तुझे तेज, तुझे सत्य प्रकट कर. 
ते मला मार्गदर्शन करोत.
तुझ्या पवित्र डोंगरावर, 
तुझ्या निवासस्थानी घेऊन जावोत.

४) मग मी देवाच्या वेदीजवळ देव 
जो माझा परमानंद त्याच्याजवळ जाईन 
माझ्या उद्धारका, हे देवा, माझ्या देवा,
वीणेवर मी तुझे गुणगान गाईन.


Psalm 42:2-3; 43:3, 4
My soul is thirsting for you, the living God. 

Like the deer that yearns for running streams, 
so my soul is yearning for you my God. 
My soul is thirsting for God, the living God; 
when can I enter and appear before the face of God? R 

O send forth your light and your truth; 
they will guide me on. 
They will bring me to your holy mountain, 
to the place where you dwell. R 

And I will come to the altar of God, 
to God, my joy and gladness. 
To you will I give thanks on the harp, 
O God, my God. R

जयघोष  

आलेलुया, आलेलुया! 
हे येशूखिस्ता, तू विश्वसनीय साक्षी व मेलेल्यांमधून प्रथम जन्मलेला आहेस. तू आम्हांवर प्रीती करतोस आणि आपल्या रक्ताने आम्हांला पापांपासून मुक्त करतोस. 
आलेलुया !

Acclamation: 
I am the good shepherd, says the Lord; I know my own and my own know me.

शुभवर्तमान  योहान १०:१-१०
वाचक :योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"मी मेंढरांचे दार आहे."
येशू म्हणाला, "मी तुम्हांला खचित सांगतो, जो मेंढवाड्यात दाराने न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर आणि लुटारू आहे. जो दाराने जातो तो मेंढपाळ आहे. त्याच्यासाठी द्वारपाळ दार उघडतो. मेंढरे त्याची वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो आणि त्यांना बाहेर नेतो. तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्यांच्यापुढे चालतो आणि मेंढरे त्याच्यामागे चालतात, कारण ती त्याची वाणी ओळखतात. ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाहीत, तर ती त्याच्यापासून दूर पळतील. कारण ती परक्यांची वाणी ओळखत नाहीत." हा दृष्टान्त येशूने त्यांना सांगितला. तरी ज्या गोष्टी तो त्यांच्याबरोबर बोलला त्या काय आहेत हे त्यांना समजले नाही.
म्हणून येशू त्यांना पुन्हा म्हणाला, मी तुम्हांला सत्य सांगतो की, मी मेंढरांचे दार आहे. जे माझ्यापूर्वी आले ते सर्व चोर आणि लुटारू आहेत, त्यांचे मेंढरांनी ऐकले नाही. मी दार आहे, माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारणाप्राप्ती होईल, तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला खायला मिळेल. चोर येतो तो केवळ चोरी, घात आणि नाश करायला येतो मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी आणि ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे."
 "प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
John 10:1-10

At that time: Jesus said, "Truly, truly, I say to you, he who does not enter the sheepfold by the door but climbs in by another way, that man is a thief and a robber. But he who enters by the door is the shepherd of the sheep. To him the gatekeeper opens. The sheep hear his voice, and he calls his own sheep by name and leads them out. When he has brought out all his own, he goes before them, and the sheep follow him, for they know his voice. A stranger they will not follow, but they will flee from him, for they do not know the voice of strangers." This figure of speech Jesus used with them, but they did not understand what he was saying to them. So Jesus again said to them, "Truly, truly, I say to you, I am the door of the sheep. All who came before me are thieves and robbers, but the sheep did not listen to them. I am the door. If anyone enters by me, he will be saved and will go in and out and find pasture. The thief comes only to steal and kill and destroy. I came that they may have life and have it abundantly.
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनचोर येतो ते केवळ चोरी, घात आणि नाश करावयास येतो. मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी आणि ती विपुल प्रमाणात व्हावी म्हणून आलो आहे.' ह्या एका वाक्यात येशूने मानवी जीवनातील एक महान सत्य सांगितलेले आहे. माणसाच्या मनात एखादा वाईट विचार येतो. त्या विचाराला कल्पनाशक्तीची जोड मिळते. हळूहळू तो विचार योजना आखण्यास माणसाला प्रवृत्त करतो. माणसाला त्या योजनेची स्वप्ने पडू लागतात. माणूस संधी शोधू लागतो, कृतियोजना आखू लागतो. चांगल्या विचारांना तो बाजूला सारू लागतो. त्याच्या हातून कृती घडते. ती पुन्हा पुन्हा घडली की, त्याची सवय बनते. त्याची शांती, प्रतिष्ठा, पैसा, आरोग्य, नातेसंबंध धोक्यात येतात. त्याचे चारित्र्य डागाळू लागते. अशाप्रकारे एक वाईट विचार त्याला रसातळाला घेऊन जातो. याउलट एक चांगला विचार उलट क्रमाने त्याला कळसाला घेऊन जातो. माणसाला विपुल प्रमाणात जीवनप्राप्ती देऊन जातो. मात्र त्यासाठी उत्तम मेंढपाळाची वाणी ऐकन माणसाने त्याच्यामागे जायला हवे. माझ्या जीवनात मला सुविचारांची बुद्धी व्हावी व कुविचारांना थारा नसावा म्हणून मी कोणती काळजी घेतो. मी येशूची वाणी ऐकतो की सैतानाची ?

प्रार्थना :-हे प्रभू येशू, तूच आमचे तारणप्राप्तिचे दार आहेस. तुला अनुसरण्यास आम्हाला प्रेरणा व सामर्थ्य दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या