सामान्यकाळातील १० वा सप्ताह
मंगळवार दिनांक १० जून २०२५
“तुम्ही पृथ्वीचे मीठ आहा,
You are the salt of the earth.
संत जेटुलियुस व त्यांचे सहकारी
रक्तसाक्षी (. १२०)
✝️
समाजातील ख्रिस्ती माणसाची भूमिका व त्याचे जीवन कसे असायला हवे, हे प्रभू येशू ख्रिस्त मीठ आणि प्रकाश ह्या दोन प्रतिकांचा वापर करुन आज स्पष्ट करीत आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये खऱ्या जीवनाची सहभागिता अनुभवून समाजातील सर्वांना त्याची चव आणि त्याचा प्रकाश कसा देता येईल ही खऱ्या ख्रिस्ती माणसाची जबाबदारी आहे. प्रभू येशू म्हणतो, 'तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडूद्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गीय पित्याचे गौरव करावे'.
मीठामुळे जसे अन्न रूचकर बनते तसेच आपणास इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करता आला पाहिजे. ख्रिस्ती माणसाचा गुणस्वभाव मीठासारखा रुचकर बनवणारा असावा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थित प्रकाशात आपल्यात बाप्तिज्मा मिळाला आहे. आपण त्याच्या प्रकाशाचे भागिदार बनलो आहेत म्हणूनच भीती आणि अज्ञानाच्या अंधारात जीवन जगणाऱ्या सर्वाना आपण ख्रिस्ताच्या प्रकाशाची साक्ष दिली पाहिजे. ख्रिस्ती माणूस स्वयंप्रकाशित बनून इतरांच्या जीवनात प्रकाशाची ज्योत लावण्यास समर्थ बनू शकतो.संत पौल, सिल्वानस आणि तिमोथी ह्यांनी आपल्या जीवनाच्या उदाहरणाने प्रभू येशूची सुवार्ता सर्वत्र पसरविली.
ख्रिस्तीसभा आपल्या सर्वांना आज पृथ्वीचे मीठ व जगाचा प्रकाश बनण्यासाठी आपले जीवन वेचण्यास सांगत आहे. प्रथम आपण आपले जीवन मीठासारखे रुचकर व प्रकाशा सारखे लख्ख बनवू या. त्यासाठी प्रभूकडे कृपा मागू या. ख्रिस्तसभा आज भक्तिमान व परोपकारी संत अंतोनी पादुआ ह्याचा सण साजरा करीत आहे. त्याचा मध्यस्थिने आपण परोपकारी जीवन जगण्यासाठी प्रार्थना करू या.
पहिले वाचन२करिंथ १: १८-२२
वाचक : पौलचे करिंथकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन
"येशू होय आणि नाही नव्हता. त्याच्या ठायी सर्वदा होय होते.”
देव विश्वसनीय आहे. आमचे तुम्हाबरोबरचे बोलणे होय आणि नाही, असे नाही. कारण देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याची घोषणा आम्हाकडून म्हणजे मी, सिल्वाना आणि तिमथी ह्यांच्याकडून तुम्हांमध्ये झाली ती होय आणि नाही, अशी नव्हती; तर त्याच्या ठायी होय अशीच होती. देवाची वचने कितीही असोत, त्याच्या ठायी होय हे आहे. म्हणून आम्ही देवाच्या गौरवाला त्याच्याद्वारे आमेन म्हणतो. जो आम्हांला अभिषेक करून तुमच्याबरोबर ख्रिस्ताच्या ठायी स्थिर करत आहे तो देव आहे, त्याने आम्हांला मुद्रांकित केले आणि आमच्या अंत:करणात आपला आत्मा हा हमीपत्र म्हणून दिला.
प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
: Second Corinthians 1: 18-22
But God is faithful, for our preaching which was to you, was not, It is, and It is not. For the Son of God, Jesus Christ who was preached among you by us, by me, and Sylvanus, and Timothy, was not, It is and It is not, but, It is, was in him. For all the promises of God are in him, It is; therefore also by him, amen to God, unto our glory. Now he that confirmeth us with you in Christ, and that hath anointed us, is God: Who also hath sealed us, and given the pledge of the Spirit in our hearts.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ११९:१२९-१३३,१३५
प्रतिसाद : तू आपला मुखप्रकाश आपल्या दासावर पाड.
१) हे देवा, तुझे निर्बंध आश्चर्यकारक आहेत,
म्हणून माझा जीव ते पाळतो.
तुझ्या वचनांच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो,
त्याने भोळ्यांना ज्ञान प्राप्त होते.
२) मी तोंड उघडून धापा टाकल्या,
कारण मला तुझ्या आज्ञांचा ध्यास लागला.
तू माझ्याकडे वळ आणि आपल्या नावाची
आवड धरणाऱ्यांवर करतोस तशी कृपा माझ्यावर कर.
३) तुझ्या वचनाच्या द्वारे माझी पावले स्थिर कर
आणि कसल्याही दुष्टपणाची सत्ता माझ्यावर चालू देऊ नको.
तू आपला मुखप्रकाश आपल्या दासावर पाड
आणि तुझे नियम मला शिकव.
Psalms 119: 129, 130, 131, 132, 133, 135
R. (135a) Lord, let your face shine on me.
129 Thy testimonies are wonderful:
therefore my soul hath sought them.
R. Lord, let your face shine on me.
130 The declaration of thy words giveth light:
and giveth understanding to little ones.
R. Lord, let your face shine on me.
131 I opened my mouth and panted:
because I longed for thy commandments.
R. Lord, let your face shine on me.
132 Look thou upon me, and have mercy on me,
according to the judgment of them that love thy name.
R. Lord, let your face shine on me.
133 Direct my steps according to thy word:
and let no iniquity have dominion over me.
R. Lord, let your face shine on me.
135 Make thy face to shine upon thy servant:
and teach me thy justifications.
R. Lord, let your face shine on me.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे येरुशलेम, प्रभूचे गुणगान गा तो आपले आदेश पृथ्वीवर पाठवतो.
आलेलुया!
Acclamation:
R. Alleluia, alleluia.
Let your light shine before others that they may see your good deeds and glorify your heavenly Father.
R. Alleluia, alleluia..
मत्तय ५:१३-१६
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन“
"तुम्ही जगाचा प्रकाश आहा."
येशूने आपल्या शिष्यांना म्हटलेः “तुम्ही पृथ्वीचे मीठ आहा, पण जर मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल ? पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायाखाली तुडवले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही.
“तुम्ही जगाचा प्रकाश आहा. डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. दिवा लावून मापाखाली ठेवत नसतात, दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की, त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा.'
"प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading: Matthew 5: 13-16
You are the salt of the earth. But if the salt lose its savour, wherewith shall it be salted? It is good for nothing any more but to be cast out, and to be trodden on by men. You are the light of the world. A city seated on a mountain cannot be hid. Neither do men light a candle and put it under a bushel, but upon a candlestick, that it may shine to all that are in the house. So let your light shine before men, that they may see your good works, and glorify your Father who is in heaven.
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:परमेश्वराची वचने ही विश्वसनीय आहेत व तो नेहमी आपल्या दिलेल्या वचनाला जागतो. ख्रिस्ती म्हणून आपणही त्याचे हे गुण अंगिकारत आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाचे जीवनमार्ग उजळणारा प्रकाश व्हावे ह्यासाठी आजची शास्त्र-वाचने आपल्याला आवाहन करीत आहेत. आजचे पहिले वाचन हे परमेश्वराच्या विश्वासार्हतेची खात्री देते. तसेच ख्रिस्त जो आपल्या सर्व प्रश्नांसाठी एकमेव व अंतिम उत्तर आहे त्या त्याच्या पुत्रात परमेश्वराच्या वचनाची पूर्तता झाली आहे ह्याचा उलगडा करते. तर शुभवर्तमानात येशूच्या शिष्यांना पृथ्वीचे मीठ व जगाचा प्रकाश संबोधलेले आहे. आज जगाला खऱ्या प्रकाशाची गरज आहे जो त्याला संघर्षातून आणि पापांच्या अंधारातून पित्याच्या प्रेमाने आर्कषून घेत गौरवाच्या खऱ्या तेजाकडे नेईल. ख्रिस्ताच्या प्रेमाचा व सेवेचा प्रकाश सर्वत्र पोहचवण्यासाठी आज आपल्याला उपासना आमंत्रण करीत आहे. दिवसेंदिवस जीवनाच्या सर्वच पातळीवर विश्वासार्हता लोप पावत असलेल्या आजच्या युगात ख्रिस्ताचे सच्चे अनुयायी म्हणून व्यवहारात नेहमी दिलेल्या वचनाला जागण्यासाठी; त्याद्वारे मीठाप्रमाणे मानवी जीवनातील चव व चांगुलपणा टिकवून ठेवण्यासाठी आजची उपासना आपल्याला आवाहन करीत आहे. त्याप्रमाणेच, आपल्या सद्गुणांचा प्रकाश समाजात सर्वत्र पसरावा, त्याद्वारे अनेकांच्या अंधारमय जीवनात प्रकाश उजळावा व आपल्या सद्वर्तनाने ख्रिस्ताच्या प्रकाशाची जगाला ओळख व्हावी म्हणून आज आपण प्रार्थना करू या.
प्रार्थना : हे प्रभू येशू, आमच्या शब्दाने व आचरणाने आम्ही तुझा प्रकाश इतरांपर्यंत पोहोचविण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन.

0 टिप्पण्या