Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bible Reading | Mary Mother of the Church | Monday 9th June 2025

सामान्यकाळातील ८वा सप्ताह 

सोमवार दिनांक  ९ जून  २०२५

“बाई, पाहा, हा तुझा मुलगा. मग त्याने त्या शिष्याला म्हटले,

 “पाहा, ही तुझी आई" 

"Woman, behold, your son!"

Then he said to the disciple, "Behold, your mother!" 


 
पवित्र मारिया ख्रिस्तसभेची माता
आजचा सण 'पवित्र मरिया ख्रिस्तसभेची माता' हा असून २०१८ साली पोप फ्रान्सिस ह्यांनी पवित्र आत्म्याच्या सोहळ्यानंतर येणाऱ्या पहिल्या सोमवारी तो साजरा करण्यात यावा असे घोषित केले. पॅन्टेकोस्टच्या दिवशी पवित्र मरियेसह प्रेषितांवर पवित्र आत्म्याचा वर्षाव झाला
पोप पॉल सहावे ह्यांनी मरिया देवाची माता हा सोहळा १९७० साली अधिकृतपणे साजरा केला. हा सोहळा आपण नववर्षाच्या दिनी १ जानेवारीला  साजरा करतो. देवानेच ध. कु. मरियेची निवड देवपुत्राची माता होण्यासाठी केली होती. (लूक१:२६-३८) मरियेचा जन्म निष्कलंक गर्भसंभवाने झाला हे ख्रिस्तसभा मान्य करते.
मरिया प्रभू येशूच्या जन्मापासून ते त्यांच्या वधस्तंभावरील मरणापर्यंत  त्याच्या बरोबर होती. प्रभू येशू वधस्तंभावर यातना सहन करीत असतानाच  त्याने आपल्या आईला जगाची माता म्हणून जाहीर केले. येशूने आपल्या आईला म्हटले, 'बाई पाहा, हा तुझा मुलगा' शिष्याला म्हटले, 'पाहा ही तुझी  आई.' अशाप्रकारे मरिया माता योहानाची आणि सर्वांची आई बनली. प्रभू येशूच्या स्वर्गरोहणानंतर माडीवरील खोलीत प्रार्थनेत सहभागी होत असे.  मरिया मातेच्या मार्गदर्शनानुसार प्रेषिताचा विश्वास बळकट होत गेला म्हणूनच  ती सर्व प्रेषितांची माता आणि राणी बनली. आजच्या पहिल्या वाचनात सांगितले  आहे की एवा संपूर्ण जिवधारी जनांची माता होती, आणि तिच्या अधःपतनानंतर मरियामातेद्वारे तारणारा जन्मणार होता त्यामुळे मरिया माता सर्वांची माता बनली होती आणि ती आज प्रत्यक्षपणे संपूर्ण जगाची माता बनली आहे, हे आपण मान्य करतो.
ख्रिस्तसभेत मरियामातेला देवाची माता आणि संपूर्ण ख्रिस्तसभेची माता  असा सर्वोच्च सन्मान आपण देतो. आपल्या सर्वांसाठी मरिया मातेच्या मध्यस्थीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तिच्या मध्यास्थीने ख्रिस्तसभा वैभवाने  व डौलाने उभी आहे. ती संपूर्ण ख्रिस्तसभेची माता बनून आपल्याला तिच्याद्वारे  कृपा व आशीर्वाद लाभत आहे.

✝️
             
पहिले वाचन : उत्पत्ती  ३:९-१५.२०
वाचक : उत्पत्ती ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"तू आणि स्त्री यांमध्ये मी परस्पर वैर स्थापीन."

आदामने बऱ्यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाल्ल्यावर परमेश्वर देवाने आदामास हाक मारून म्हटले, “तू कोठे आहेस ?" तो म्हणाला, “मी बागेत तुझा आवाज ऐकला, तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिऊन लपलो.” देवाने म्हटले, "तू नग्न आहेस हे तुला सांगितले? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्लेस काय ?’’
आदाम म्हणाला, “जी स्त्री तू मला सोबतीस दिली तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले," परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला, “हे तू काय केलेस ?" स्त्री म्हणाली, “सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले.” तेव्हा परमेश्वर देव सर्पाला म्हणाला,
"तू हे केलेस म्हणून सर्व ग्रामपशू आणि वनचर यांपेक्षा तू शापग्रस्त आहेस.
तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील.
तू आणि स्त्री,तुझी संतती आणि तिची संतती यांमध्ये मी परस्पर वैर स्थापीन.ती तुझे डोके ठेचील आणि तू तिची टाच फोडशील."
आदामाने आपल्या पत्नीचे नाव एवा ठेवले, कारण ती सर्व जीवधारी जनांची माता होती.

प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Genesis 3:9-15, 20
[After Adam had eaten of the tree,] The Lord God called to the man and said to him, "Where are you?" And he said, "I heard the sound of you in the garden, and I was afraid, because I was naked, and I hid myself." He said, "Who told you that you were naked? Have you eaten of the tree of which I commanded you not to eat?" The man said, "The woman whom you gave to be with me, she gave me fruit of the tree, and I ate." Then the Lord God said to the woman, "What is this that you have done?" The woman said, "The serpent deceived me, and I ate." The Lord God said to the serpent, "Because you have done this, cursed are you above all livestock and above all beasts of the field; on your belly you shall go, and dust you shall eat all the days of your life. I will put enmity between you and the woman, and between your offspring and her offspring; he shall bruise your head, and you shall bruise his heel. "The man called his wife's name Eve, because she was the mother of all living.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ८७:१-३,५-७
प्रतिसाद : परमेश्वराचे अधिष्ठान पवित्र पर्वतांवर आहे.

१) परमेश्वराचे अधिष्ठान पवित्र पर्वतांवर आहे.
याकोबाच्या सर्व वसतीस्थानांहून सीयोनेची द्वारे त्याला अधिक प्रिय आहेत.

२) हे देवाच्या नगरी, तुझ्या वैभवाच्या कथा सांगतात;सीयोनेविषयीं म्हणतील कीं, हा आणि तो तिच्यांतच जन्मले होते, आणि परात्पर स्वतः तिला प्रस्थापित करील.

३) लोकांची नांवनिशी करितांना ह्याचा जन्म तेथलाच, असें परमेश्वर लिहील. गायन व नृत्य करणारे म्हणतील :"माझे सर्व उगम तुझ्याच ठायीं आहेत."


Psalm 87:1-2, 3 and 5, 6-7
Of you are told glorious things, O city of God

Founded by him on the holy mountain, 
the Lord loves the gates of Sion, 
more than all the dwellings of Jacob.
Of you are told glorious things, you, O city of God!

But of Sion it shall be said,
'Each one was born in her.'
He, the Most High, established it.
In his register of peoples the Lord writes,
 "Here was this one born."
The singers cry out in chorus, 
"In you, all find their home."R

जयघोष  
आलेलुया, आलेलुया! 
कारण 'त्याने' आपल्या 'दासीच्या दैन्यावस्थेचें 
अवलोकन केलें आहे.' पाहा, 
आतांपासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील;. 
आलेलुया !

Acclamation: 
 O happy Virgin, you gave birth to the Lord; O blessed mother of the Church, you warm our hearts with the Spirit of your Son Jesus Christ.

शुभवर्तमान योहान  १९:२५-२७
वाचक :  योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरिया आणि मरिया माग्दालेना ह्या उभ्या होत्या. मग येशूने आपल्या आईला आणि ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, “बाई, पाहा, हा तुझा मुलगा. मग त्याने त्या शिष्याला म्हटले, “पाहा, ही तुझी आई" आणि त्यावेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले.
ह्यानंतर, आतां सर्व पूर्ण झालें आहे हें। जाणून येशूनें शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून, 'मला तहान लागली आहे.' असें म्हटलें. तेथे आंब भरून ठेवलेलें एक भांडें होतें; म्हणून त्यांनी आंब भरलेला स्पंज एजोब झाडाच्या काठीवर बसवून त्याच्या तोंडाला लावला. येशूनें आंब घेतल्यानंतर, 'पूर्ण झालें आहे,' असे म्हटलें आणि मस्तक लववून आपला आत्मा समर्पण केला. येशूच्या कुशीत भाला तो तयारीचा दिवस होता, म्हणून शब्बाथ दिवशीं शरीरें वधस्तंभावर राहू नयेत, कारण तो शब्बाथ मोठा दिवस होता, म्हणून त्यांचे पाय मोडावे आणि त्यांना घेऊन जावें अशी यहूद्यांनी पिलाताला विनंती केली. मग शिपायांनी येऊन त्याच्याबरोबर वध- स्तंभावर खिळलेल्या पहिल्याचे व दुसऱ्याचे पाय मोडले,  परंतु येशूजवळ आल्यावर तो मरून गेला आहे असें पाहून त्यांनी त्याचे पाय मोडले नाहीत;  तरी शिपायांतील एकानें त्याच्या कुशीत भाला भोसकला; आणि लागलेंच रक्त व पाणी बाहेर निघालें.
 "प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:John 19:25b-34

At that time: Standing by the cross of Jesus were his mother and his mother's sister, Mary the wife of Clopas, and Mary Magdalene. When Jesus saw his mother and the disciple whom he loved standing nearby, he said to his mother, "Woman, behold, your son!"
Then he said to the disciple, "Behold, your mother!" And from that hour the disciple took her to his own home. After this, Jesus, knowing that all was now finished, said (to fulfil the Scripture), "I thirst." A jar full of sour wine stood there, so they put a sponge full of the sour wine on a hyssop branch and held it to his mouth. When Jesus had received the sour wine, he said, "It is finished", and he bowed his head and gave up his spirit. Since it was the day of Preparation, and so that the bodies would not remain on the cross on the Sabbath (for that Sabbath was a high day), the Jews asked Pilate that their legs might be broken and that they might be taken away. So the soldiers came and broke the legs of the first, and of the other who had been crucified with him. But when they came to Jesus and saw that he was already dead, they did not break his legs. But one of the soldiers pierced his side with a spear, and at once there came out blood and water.
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतन:आजची शास्त्र वाचने ही मनुष्याच्या देवासोबतच्या नातेसंबंधाबद्दल आणि तारणाच्या इतिहासात पवित्र मरियेची महत्वाची भूमिका ह्याविषयी आपल्याला एक सखोल दृष्टीकोन देतात. बऱ्या-वाईटाचे ज्ञान व त्यानुसार आचरण हे आपल्या उद्धाराचे रहस्य आहे. तथापि, दुर्दैवाने पापात पडून मनुष्याचे पतन झाले. तरीही देव सर्पासोबतच्या वादात अंती स्त्री व तिची संतती ह्यांचा विजय होईल असे भाकीत करतो (उत्पत्ती ३:१५). ह्यालाच आपल्या तारणाचे वा मुक्तीचे पूर्वभाकीत (प्रोटोइव्हेंजेलियम) म्हणून ओळखले जाते. अशाप्रकारे, जगात सत् व असत् प्रवृत्तीच्या द्वंद्वात अंतिमतः सत्याचा विजय होईल ह्यावर शिक्कामोर्तब करून सन्मार्गाने चालणाऱ्यांना दिलासा देतो. शुभवर्तमानात वधंस्तंभावर खिळलेला ख्रिस्त त्याच्या प्रिय शिष्याला (प्रतिकात्मकरित्या त्याच्या प्रिय ख्रिस्तसभेला) त्याच्या आईच्या म्हणजे पवित्र मरियेच्या हवाली करतो. त्याच्या ह्या कृतीद्वारे येशूचे खिस्तसभेवरील प्रेम व पवित्र मरियेविषयी खात्री व ख्रिस्तसभेतील तिची भूमिका व जबाबदारी ह्या बाबी अधोरेखित होतात. त्याचबरोबर त्याच्या कुशीतून वाहणाऱ्या रक्त व पाण्याने त्याने स्थापिलेल्या ख्रिस्तसभेला सातत्याने पाण्याने शुद्धीकरण व रक्ताने नवजीवनाचे आश्वासन मिळते. प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातील घेतलेल्या आजच्या पर्यायी उताऱ्यात प्रभूच्या स्वर्गारोहणानंतर सुरुवातीचा ख्रिस्ती समुदायाचा पवित्र मरियेच्या प्रमुख उपस्थितीत प्रार्थनेसाठी एकत्र जमल्याचा उल्लेख आहे. ह्यातून पवित्र मरियेची कठीण काळात तिच्या सर्व लेकरांना एकत्र ठेवण्यातील तिची मातृ-काळजी आपल्या लक्षात येते. त्याचबरोबर, ख्रिस्तसभेच्या ऐक्यासाठी, आध्यात्मिक उन्नत्तीसाठी पवित्र मरियेची उपस्थिती व भूमिका किती म्हत्वाची आहे हे कळून चुकते. अशा प्रकारे पवित्र मरिया ख्रिस्ताने स्थापिलेल्या चर्चमध्ये कुणालाही पोरके न ठेवता सर्वांना ख्रिस्ताठायी एकत्र ठेवून तिच्या उत्कट श्रद्धेचे, भक्तीचे, सेवेचे व मातृतुल्य काळजीचे दर्शन घडवते. आज ख्रिस्तसभा त्याच पवित्र मरियेचा खिस्तसभेची माता म्हणून यथोचित गौरव करीत असताना आपणही तिच्या साान्निध्यात, तिच्या जीवन-उदाहरणाद्वारे ख्रिस्तसभेचे आदर्श सदस्य होण्यासाठी झटू या. तसेच, मरियेप्रमाणे, आपणही ख्रिस्ताने स्थापिलेल्या ख्रिस्तसभेची काळजी घेण्यासाठी नेहमी तत्तपर राहून उत्साहाने पुढे येऊ या.
प्रार्थना : हे ख्रिस्तसभेचे माते, तुझ्या पुत्राच्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून आम्हासाठी प्रार्थना कर.