Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bible Reading | 11th week in ordinary Time| Monday 16th June 2025

सामान्यकाळातील ११ वा सप्ताह 

सोमवार दि.   १६ जून  २०२५

  जो तुझ्याजवळ काही मागतो त्याला दे आणि जो तुझ्यापासून उसने घेऊ पाहतो त्याला पाठमोरा होऊ नकोस

Give to him that asketh of thee and from him that would borrow of thee turn not away.

 संत जॉन फ्रान्सिस रेजिस
- वर्तनसाक्षी (१५९७-१९६४०)

चिंतन : हे माझ्या देवा! तुझ्या पवित्र नावासाठी आणखी आत्मक्लेश भोगण्याची संधी मला दे, ह्या दुःखसहनात किती आनंद आहे! मी आता सुखाने मरणाला सामोरा जाईन. - संत जॉन रेजिस

आपण सर्वजण ह्या जगातील देवाची निर्मिती आहोत. ह्या जगातील आपण प्रवासी आहोत म्हणूनच आपले स्वतःचे असे येथे काहिच नाही.  आपल्यावर पूर्णपणे देवाची अधिसत्ता आहे. म्हणूनच, स्वर्गाची, पृथ्वीची, स्वतःची किंवा आपल्या वस्तुची आणि माणसांची शपथ वाहू नये. सत्य हे सत्यच असते ते बदलू शकत नाही किंवा सत्य अंधारात दडपून ठेवले जाऊ शकत नाही.  आपला स्वार्थ साधण्यासाठी किंवा आपला स्वाभिमान व अहंकार  जोपासण्यासाठी खोटी साक्ष देऊन शपथ वाहणे खरोखरच चुकीचे आहे. अनेकदा खूप बढाया मारण्याची सवय आपल्याला असते. 
परंतु  देवाच्या कृपेशिवाय आणि त्याच्या इच्छेशिवाय आपण काहिच करु शकत नाही. म्हणूनच आज आपण सर्वस्वी प्रभूला शरण जाऊ या आणि त्याच्या वचनाप्रमाणे खरे ख्रिस्ती जीवन आचरण  करण्यासाठी प्रयत्नशील बनू या.


पहिले वाचन :  करिंथ  ६:१-१०
वाचक : पौलचे करिंथकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन 
"सर्व गोष्टींत देवाचे सेवक म्हणून आम्ही आमची लायकी पटवून देतो."
आम्ही देवासह कार्य करता करता विनंती करतो की, तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नये. कारण तो म्हणतो, “अनुकूलसमयी मी तुझे ऐकले आणि तारणाच्या दिवशी मी तुला साहाय्य केले." पाहा, आताच समय अनुकूल आहे; आताच तारणाचा दिवस आहे. आम्ही करत असलेल्या सेवेत काही दोष दिसून येऊ नये म्हणून आम्ही कोणत्याही प्रकारे अडखळण्यास कारण होत नाही, तर सर्व गोष्टीत देवाचे सेवक म्हणून आम्ही आपली पात्रता पटवून देतो. फार धीराने, संकटात, विपत्तीत, पेचप्रसंगात, फटके खाण्यात, बंदिवासात, दंग्याधोप्यात, काबाडकष्टात, जागरणात, उपवासात; तसेच शुद्धतेने, ज्ञानाने, सहनशीलतेने, ममतेने,  पवित्र आत्म्याने, निष्कपट प्रीतीने, सत्याच्या वचनाने, देवाच्या सामर्थ्याने आणि उजव्या आणि डाव्या हातातील नीतिमत्त्वाच्या शस्त्रास्त्रांनी, गौरवाने आणि अपमानाने, अपकीर्तीने आणि सत्कीर्तीने, आम्ही आपली पात्रता पटवून देतो. फसवणारे मानलेले तरी आम्ही खरे; अप्रसिद्ध मानलेले तरी सुप्रसिद्ध; मरणोन्मुख असे मानलेले तरी पाहा, आम्ही जिवंत आहो; शिक्षा भोगणारे असे मानलेले तरी जिवे मारलेले नाही; दुःखी मानलेले तरी सर्वदा आनंद करणारे; दरिद्री मानलेले तरी पुष्कळांना सधन करणारे; कफल्लक असे मानलेले तरी सर्ववस्तुसंपन्न, अशी आम्ही आपली पात्रता पटवून देतो.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading : Second Corinthians 6: 1-10
And we helping do exhort you, that you receive not the grace of God in vain. For he saith: In an accepted time have I heard thee; and in the day of salvation have I helped thee. Behold, now is the acceptable time; behold, now is the day of salvation. Giving no offence to any man, that our ministry be not blamed: But in all things let us exhibit ourselves as the ministers of God, in much patience, in tribulation, in necessities, in distresses, In stripes, in prisons, in seditions, in labours, in watchings, in fastings, In chastity, in knowledge, in longsuffering, in sweetness, in the Holy Ghost, in charity unfeigned, In the word of truth, in the power of God; by the armour of justice on the right hand and on the left; By honour and dishonour, by evil report and good report; as deceivers, and yet true; as unknown, and yet known; As dying, and behold we live; as chastised, and not killed; As sorrowful, yet always rejoicing; as needy, yet enriching many; as having nothing, and possessing all things.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ९८ :१-४
प्रतिसाद : परमेश्वराने आपला विजय जगजाहीर केला आहे.

१) परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, 
कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत. 
त्याने आपल्या उजव्या हाताने, 
आपल्या पवित्र बाहूने स्वतःसाठी विजय साधला आहे.

२) परमेश्वराने आपला विजय जगजाहीर केला आहे. 
राष्ट्रांसमक्ष आपले न्यायीपण प्रकट केले आहे. 
त्याने इस्राएलच्या घराण्यावरील आपली दया 
आणि आपली सत्यता ह्यांचे स्मरण केले आहे.

३) पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या
 देवाचा विजय पाहिला आहे. 
अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, 
परमेश्वराचा,जयजयकार करा; 
उच्च स्वराने आनंदाने गा;
 त्याची स्तोत्रे गा.

Psalms   98: 1, 2b, 3ab, 3cd-4
R. (2a) The Lord has made known his salvation.

1 Sing ye to the Lord anew canticle: 
because he hath done wonderful things.
His right hand hath wrought for him salvation,
 and his arm is holy.
R. The Lord has made known his salvation.

2b He hath revealed his justice 
in the sight of the Gentiles.
3ab He hath remembered his mercy 
his truth toward the house of Israel.
R. The Lord has made known his salvation.

3cd All the ends of the earth have seen 
the salvation of our God.
4 Sing joyfully to God, all the earth; 
make melody, rejoice and sing.
R. The Lord has made known his salvation.

जयघोष  
आलेलुया, आलेलुया! 
प्रभू म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे, 
जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.
आलेलुया!

Acclamation: 
R. Alleluia, alleluia.
 A lamp to my feet is your word, a light to my path.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान  मत्तय ५:३८-४
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले,  "डोळ्याबद्दल डोळा आणि दाताबद्दल दात' असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो त्याच्याकडे दुसरा गाल कर; जो तुझ्यावर फिर्याद करून तुझी बंडी घेऊ पाहतो त्याला तुझा अंगरखाही घेऊ दे आणि जो कोणी तुला वेठीस धरून एक कोस नेईल त्याच्याबरोबर दोन कोस जा. जो तुझ्याजवळ काही मागतो त्याला दे आणि जो तुझ्यापासून उसने घेऊ पाहतो त्याला पाठमोरा होऊ नकोस.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

Gospel Reading:Matthew 5: 38-42
You have heard that it hath been said, An eye for an eye, and a tooth for a tooth. But I say to you not to resist evil: but if one strike thee on thy right cheek, turn to him also the other: And if a man will contend with thee in judgment, and take away thy coat, let go thy cloak also unto him. And whosoever will force thee one mile, go with him other two, Give to him that asketh of thee and from him that would borrow of thee turn not away.
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .                                            

चिंतन
येशूचे शिष्य होणे म्हणजेच सर्व विपरित परिस्थितीतही संत पॉलप्रमाणे धैर्याने, दयाळूपणाने आणि प्रामाणिकपणाने श्रद्धेत टिकन राहणे होय. जीवनातील आव्हानांना व संकटांना परमेश्वरावर श्रद्धा ठेवून धीराने, सचोटीने सामोरे जाण्यासाठी आजचे पहिले वाचन आपल्याला मार्गदर्शन करीत आहे. आजचे स्तोत्रवचनही जीवनातील प्रत्येक क्षणी व अडी-अडचणीवेळी परमेश्वर आपल्या बचावकार्यात गुंतलेला आहे हे समजून घेण्यास सांगत आहे. देवाचा न्याय आणि दया विजयी आहे ह्यावर ठाम विश्वास ठेवून कठीण परिस्थितीतही परमेश्वराचे गुणगौरव गाणे न थांबवण्यास सांगत आहे. तर शुभवर्तमान आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला, त्रासाला, संकटांना सूडाने प्रतिसाद न देता संयमाने वागण्यास शिकवित आहे. अर्थात, असे करून आपल्याला निष्क्रीय होऊन अन्याय सहन करण्यास प्रभू येशू शिकवत नसून प्रेम, करुणा व क्षमेने दुर्जनांना जिंकण्याचा तो नवा मंत्र देतआहे. अन्यायाला सूडाने प्रतिसाद दिल्यास सर्वांची हानी होते. ह्या उलट, दुर्जनांवर आपण संयम, प्रेम, दया, क्षमा व लवचिकता ह्यांनी मात करू शकतो. अशाने क्षमाशील स्वर्गीय पित्याची व आपला शांतीचा दूत प्रभू येशू ख्रिस्त ह्यांची जगाला ओळख होण्यासाठी आपल्याला संधी मिळते. जीवनात म्हणूनच प्रतिकाराने प्रतिसाद देण्याऐवजी, प्रेमाने सर्वांचे परिवर्तन व्हावे ह्यासाठी आपण झटू या.
प्रार्थना : हे प्रभू येशू ख्रिसता, आम्हाला प्राप्त दानांचा आम्ही योग्य तो वापर करुन गरजवंतांना मदत करता यावी म्हणून आम्हाला प्रेरणा दे, आमेन.


✝️