सामान्यकाळातील ११ वा सप्ताह
मंगळवार दि. १७ जून २०२५
तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करितात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
Love your enemies: do good to them that hate you: and pray for them that persecute and calumniate you:
संत ग्रेगरी बार्बारिगो
- महागुरू, वर्तनसाक्षी (१६२५-१६९७)
संत पौल सुवार्ता प्रसार करीत असतांना गरजवंतांच्या साहाय्यासाठी करिंथकरांसमोर दान मागतो कारण त्यातूनच परोपकाराचा संदेश तो देत होता. आपण केवळ स्वतःवरच नव्हे तर देवावर आणि आपला बंधुभगिनींवर सुद्धा करावी असा संदेश संत पौलाने आपल्या वाणीद्वारे आणि आचरणद्वारे दिला.
प्रभू येशूची शिकवण त्या काळच्या प्रवाहाविरूद्धची होती. प्रभू येशू खऱ्या प्रेमाची शिकवण देत आहे. प्रभू येशूने सर्वांवर खारखीच प्रीति केली. क्रुसावरील बलिदानाद्वारे प्रभूने दाखवून दिले आहे की प्रभू स्वतः त्याग आणि समर्पणाचे मूर्तीमंत उदाहरण आहे. प्रभूने आपल्या सर्व मारेकऱ्यांना क्षमा करुन त्यांच्यासाठी परमेश्वरपित्याकडे प्रार्थना केली. आपल्या सर्वांच्या तारणासाठी समेटाचा बली अर्पण केला व देवा बरोबर आपला समेट घडवून आणला. म्हणूनच प्रभू येशू आज आपल्या समोर आव्हानात्मक संदेश देत आहे की, 'तुमचा स्वर्गीय पिता जसा पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा' कारण सर्वांगपूर्णशील वैऱ्यावर प्रीति करण्यात आणि त्यांच्यासाठीप्रार्थनाकरण्यातच सामावलेले आहे. परमेश्वराठायी कुठलाच भेदभाव नाही. तो सर्वांवर आपला सुर्य उगवतो आणि सर्वांवर पाऊस पाडतो, आपण प्रभूसारखे परिपूर्ण बनण्याचा सतत प्रयत्न करायला हवा.
संत पौल ने म्हटले आहे, 'प्रीति सहनशील आहे, परोपकारी आहे, प्रीति हेवा करीत नाही, प्रीति बढाई मारीत नाही, फूगत नाही, प्रीति अंतर देत नाही. (१ करिंथ १३:४४७
पहिले वाचन : २ करिंथ ८:१-९
वाचक : पौलचे करिंथकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन
"ख्रिस्त तुम्हाकरिता गरीब झाला. "
बंधूंनो, मासेदोनियातील मंडळ्यांवर झालेल्या देवाच्या कृपेविषयी आम्ही तुम्हांला कळवतो की, संकटाच्या बिकट परीक्षेत त्यांचा आत्यंतिक आनंद आणि त्यांची कमालीची गरिबी, ह्यांमध्ये त्यांची औदार्यसंपदा विपुल झाली. कारण त्यांनी आपल्या शक्तीप्रमाणे आणि शक्तीपलीकडेही आपण होऊन दान दिले अशी मी साक्ष देतो. त्यांनी आम्हांजवळ आग्रहपूर्वक मागितले की, पवित्र जनांची सेवा करण्यास आम्हाला सहकार्य करू देण्याची कृपा व्हावी. आम्हांला आशा होती त्याप्रमाणेच केवळ नव्हे, तर प्रथम त्यांनी आपणा स्वतःला प्रभूला दिले आणि देवाच्या इच्छेने आपणास आम्हालाही दिले. ह्यावरून आम्ही तीतजवळ विनंती केली की, जसा त्याने पूर्वी आरंभ केला होता त्याप्रमाणे तुमच्यामध्ये कृपेचा आणि कार्याचा शेवटही करावा. तर विश्वास, भाषण, ज्ञान, प्रत्येक गोष्टीची आस्था आणि आम्हावरील तुमची प्रीती ह्या सर्वांमध्ये जसे तुम्ही समृद्ध आहा, तसे कृपेच्या या कार्यातही असावे.
हे मी आज्ञा म्हणून सांगत नाही तर दुसऱ्यांच्या आस्थेवरून तुमच्याही प्रीतीचा खरेपणा पडताळून पाहतो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे. तो धनवान असता तुम्हांकरिता गरीब झाला, अशा हेतूने की, त्याच्या गरिबीने तुम्ही धनवान व्हावे.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading : Second Corinthians 8: 1-9
Now we make known unto you, brethren, the grace of God, that hath been given in the churches of Macedonia. That in much experience of tribulation, they have had abundance of joy; and their very deep poverty hath abounded unto the riches of their simplicity. For according to their power (I bear them witness), and beyond their power, they were willing. With much entreaty begging of us the grace and communication of the ministry that is done toward the saints. And not as we hoped, but they gave their own selves first to the Lord, then to us by the will of God:
Insomuch, that we desired Titus, that as he had begun, so also he would finish among you this same grace. That as in all things you abound in faith, and word, and knowledge, and all carefulness; moreover also in your charity towards us, so in this grace also you may abound. I speak not as commanding; but by the carefulness of others, approving also the good disposition of your charity. For you know the grace of our Lord Jesus Christ, that being rich he became poor, for your sakes; that through his poverty you might be rich.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १४६ :२,५-९
प्रतिसाद : हे माझ्या मना, परमेश्वराचे स्तवन कर.
१ ) माझ्या जिवात जीव आहे तोवर मी परमेश्वराचे स्तवन करीन, मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाचे स्तोत्र गाईन.
२) ज्याच्या सहाय्याकरिता याकोबचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्वर ह्यावर आहे, तो धन्य! त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र आणि त्यातील सर्वकाही निर्माण केले.
३) तो सदा आपले सत्यवचन पाळतो, तो छळलेल्यांचा न्यायनिवाडा करतो.
तो भुकेल्यांना अन्न देतो. परमेश्वर बंदिवानांना मोकळे करतो.
४ ) परमेश्वर आधळ्यांना दृष्टी देतो, परमेश्वर वाकलेल्यांना उभे करतो, परमेश्वर उपऱ्यांचे रक्षण करतो, अनाथ आणि विधवा यांची दाद घेतो.
Psalms 146: 2, 5-6ab, 6c-7, 8-9a
R. (1b) Praise the Lord, my soul!
2 I will sing to my God as long as I shall be.
Put not your trust in princes:
R. Praise the Lord, my soul!
5 Blessed is he who hath the God of Jacob for his helper,
whose hope is in the Lord his God:
6 Who made heaven and earth, the sea,
and all things that are in them.
R. Praise the Lord, my soul!
7 Who keepeth truth for ever:
who executeth judgment for them that suffer wrong:
who giveth food to the hungry.
The Lord looseth them that are fettered:
R. Praise the Lord, my soul!
8 The Lord enlighteneth the blind. The Lord lifteth up them that are cast down: the Lord loveth the just.
9a The Lord keepeth the strangers.
R. Praise the Lord, my soul!
आलेलुया, आलेलुया!
प्रभू म्हणतो, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्या मागे येतात.
आलेलुया!
Acclamation:
R. Alleluia, alleluia.
I give you a new commandment: love one another as I have loved you.
R. Alleluia, alleluia.
शुभवर्तमान मत्तय ५:४३-४८
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
" आपल्या वैऱ्यांवर प्रीती कर."
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले: “आपल्या शेजाऱ्या प्रीती कर व आपल्या वैयचा द्वेष कर, असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हांला सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करितात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. अशासाठी की, तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे; कारण तो वाईटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवितो आणि नीतिमानांवर आणि अनीतिमानांवर पाऊस पाडतो. कारण जे तुमच्यावर प्रीती करतात, त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुमचे प्रतिफळ काय? जकातदारही तसेच करतात ना ? तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र प्रणाम करीत असला तर त्यात विशेष ते काय करता ? परराष्ट्रीयही तसेच करतात ना ? ह्यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा..
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:Matthew 5: 43-48
You have heard that it hath been said, Thou shalt love thy neighbour, and hate thy enemy. But I say to you, Love your enemies: do good to them that hate you: and pray for them that persecute and calumniate you: That you may be the children of your Father who is in heaven, who maketh his sun to rise upon the good, and bad, and raineth upon the just and the unjust. For if you love them that love you, what reward shall you have? do not even the publicans this? And if you salute your brethren only, what do you more? do not also the heathens this? Be you therefore perfect, as also your heavenly Father is perfect.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:
माणसातील निःस्वार्थ प्रेम आणि औदार्य हे ह्या जगात परमेश्वराच्या अमर्याद दयेचे खरे रूप आहे. ख्रिस्त येशू श्रीमंत असूनही आपल्यासाठी गरीब झाला, उदार झाला व आपले सर्वस्व त्याने आपल्यासाठी दिले. जेणेकरून आपणही इतरांसाठी औदार्य दाखवण्याची त्याच्यापासून प्रेरणा घ्यावी. म्हणून औदार्य हे जेव्हा आपल्याकडे मुबलक आहे तेव्हा दाखवावे असे नसून गरजूंसाठी आपल्या मनात जेव्हा करुणा उत्पन्न होण्याची कृपा आपल्याला लाभते तेव्हा दिसून येते. आजच्या पहिल्या वाचनात म्हणूनच मसोदेनियाच्या चर्चचे सदस्य गरीब असूनही त्यांनी ज्या प्रकारे प्रेम व औदार्य दाखवले आहे त्याबद्दल संत पॉल त्यांची वाहवा करीत आहेत. तसेच, पुढेही शुभवर्तमान प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणून शुभवर्तमान प्रसारास हातभार लावण्याचे आवाहन करीत आहे. आजचे स्तोत्र आपल्याला स्मरण करून देते की प्रेम ही अशी एक भावना आहे की जी उपेक्षित लोकांसाठीआपल्या अंतःकरणात निर्माण झाली पाहिजे. सर्वांशी न्यायाने वागणे व पीडितांची काळजी वाहणे, गरजूच्या उपयोगी पडणे हे परमेश्वराची स्तुती करण्याचे मार्ग आहेत. शुभवर्तमान एक पाऊल पुढे जाऊन केवळ उपेक्षित व गरजवंतांवरच नाही तर अगदी आपल्या वैऱ्यांवरसुद्धा प्रेम व आपला छळ करणाऱ्यां-साठी प्रार्थना करावी अशी शिकवण देते. ह्यातूनच ख्रिस्ताद्वारे प्रकट झालेल्या परमेश्वर पित्याच्या बिनशर्त प्रेमाचे जगाला दर्शन घडते. थोडक्यात, ख्रिस्ताचे अनुयायी होणे म्हणजे आपल्या मानवी नैसर्गिक प्रवृत्तीच्या पलीकडे जाऊन जसे परमेश्वराने आपल्यावर प्रेम केले आहे तसे इतरांवर प्रेम करायला शिकणे होय. आज आपण ख्रिस्ताचे ह्या जगात सच्चे अनुयायी होण्यासाठी व त्याद्वारे शुभवर्तमानाची साक्ष जगाला देण्यासाठी विशेष कृपा मागू या.
प्रार्थना : हे प्रभू येशू आमच्या वैऱ्यावर देखिल प्रीति करण्यास व तुझ्याशी प्रमाणिक राहण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.
0 टिप्पण्या