Marathi Bible Reading | 11th week in ordinary Time| Wednesday 18th June 2025

सामान्यकाळातील ११ वा सप्ताह 

बुधवार दि.  १८ जून  २०२५

तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल.”but to thy Father who is in secret: and thy Father who seeth in secret, will repay thee.


संत मार्क व मार्सेलियन
- रक्तसाक्षी ( २८७)

 रोममधील एका उच्चवर्णीय व प्रतिष्ठित घराण्यात मार्क व मार्सेलियन ह्या जुळ्या बंधूंचा जन्म झाला. तरुणपणातच त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केलेला होता आणि मोठ्या सन्मानाने व थाटामाटात ख्रिस्ती पद्धतीने त्यांचा विवाहसंस्कार पार पडलेला होता.
इ. स. २८४ साली डायक्लेशियन हा सम्राट रोमच्या गादीवर आला आणि ख्रिस्ती धर्मियांच्या छळाला सुरूवात झाली. त्यात मार्क मार्सेलियन ह्यांना पकडूनतुरूंगात टाकण्यात आले आणि त्यांचा शिरच्छेद केला जावा अशी आज्ञा देण्यात आली. परंतु त्या दोघांच्या मित्रांनी मध्यस्थी करून त्यांची शिक्षा ३० दिवसांनी स्थगित केली. आपल्या या दोन ख्रिस्ती मित्रांना आपण मूर्तीपूजेस प्रवृत्त करू शकू असा वेडा आशावाद त्यांना वाटत होता.

दरम्यानच्या काळात त्यांचे मातापिता, पत्नी आणि अगदी कोवळी बालके ह्यांनी या दोघांना ख्रिस्ती श्रद्धा सोडून देण्याची विनंती केली. आपल्या कोवळ्या लेकरांचे व प्रिय पत्नीचे अश्रू पाहून कुणाचे हृदय द्रवणार नाही परंतु “ज्याने माझ्यासाठी आपले घरदार, भाऊबहिणी, बायको मुले, शेतीवाडी आणि संपत्ती ह्यांचा त्याग केलेला आहे त्याला येणाऱ्या युगात ह्याच गोष्टी शतपटीने प्राप्त होतील" ह्या प्रभुवचनानुसार त्यांनी आपल्या जीवनाद्वारे रक्ताच्या नात्यापेक्षा श्रद्धेचे नाते अधिक भक्कम असते हे दाखवून दिले.
त्याकाळी सम्राटच्या घराण्यातील एक बडा अधिकारी (संत) सेबेस्टीयन (सण २० जानेवारी ) दररोज मार्क व मार्सेलियन ह्यांना भेटून आपल्या श्रद्धेशी एकनिष्ठ राहण्यास त्यांना प्रोत्साहन देत असे. मार्क आणि मार्सेलियन ह्यांच्याकडे पाहून निकोस्ट्राटस या लिपिकाने आणि क्रॉमिशिअस या न्यायाधीशानेदेखील ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला आणि दोघांना तुरूंगातून मुक्त केले.
पुढे फेबियन हा न्यायाधीश न्यायासनावर बसला. तो क्रूर कर्मी होता. त्यामुळे श्रद्धावंतांनी मार्क व मार्सेलियन ह्यांना राजवाड्यातच लपवून ठेवले. मात्र एका मूर्तिपूजक सेवकाने त्यांना शोधून काढले. फेबियन या न्यायाधीशाने दोघांना खांबावर बांधले. त्यांच्या पायांना जोरजोराने खिळे ठोकले. एक दिवस व एक रात्र दोघे त्या अवस्थेत प्रभू ख्रिस्तासाठी दुःखसहन करीत होते. शेवटी त्यांच्या कुशीत भाला भोसकून त्यांना ठार करण्यात आले.


'संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो.'  आपण आपले दान देताना दुःखी मनाने देऊ नये कारण सर्व समर्थ देव  आपल्यावर विपूल प्रमाणात कृपा दानांचा वर्षाव करीत असतो.
आपण खूप धार्मिक आहोत, भक्तीमान आहोत व दानशूर आहोत, असे दाखविण्याचा काहीजण प्रयत्न करित असतात. प्रभू येशूच्या काळी अशा  प्रकारचे धर्माचरण व ढोंग करणारी माणस होती. आपले धर्माचरण, दानधर्म,  प्रार्थना व उपवास त्यांच्या सारखे नसावेत म्हणून ख्रिस्तप्रभू आपणास मार्गदर्शन करीत आहे.
परमेश्वर सर्वस्थळी व सर्वज्ञ आहे, पण तो अदृश्य म्हणजेच गुप्तदर्शी  आहे. परमेश्वर अंतर्यामी आहे म्हणून आपला प्रत्येक विचार शुद्ध अंतःकरणापासून करायला हवा. आपले धार्मिक आचारण माणसांनी पाहावे  म्हणून न करता परमेश्वर पिता संतुष्ट व्हावा म्हणून करायला हवे. आपली  सात्विकता, आचारण, प्रार्थना, दानधर्म व उपवास परमेश्वर पित्याला प्रिय असेल तरच परमेश्वर आपल्यावर कृपादानांचा वर्षाव करील.    
            ✝️             

पहिले वाचन :  करिंथ  ९:६-११
वाचक : पौलचे करिंथकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन 
"संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो."

हे ध्यानात घ्या की, जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील आणि जो सरळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील. प्रत्येकाने आपआपल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे, दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो. सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे; ह्यासाठी की, सर्व गोष्टींत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्वकाही तुमच्याजवळ विपुल व्हावे.
“तो चहूकडे वाटप करत असतो, गरिबांना दानधर्म करत असतो; त्याचे नीतिमत्त्व युगानुयुग राहते.” असे शास्त्रात लिहिले आहे. जो पेरणाऱ्याला बी पुरवतो आणि खाण्याकरिता अन्न पुरवतो तो तुम्हाला बी पुरवील आणि ते बहुगुणित करील आणि तुमच्या नीतिमत्त्वाचे फळ वाढवील म्हणजे तुम्ही सर्व प्रकारच्या औदार्यासाठी सर्व गोष्टींनी संपन्न व्हाल; त्या औदार्यावरून आमच्याद्वारे देवाचे आभार प्रदर्शन होते.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading : Second Corinthians 9: 6-11

Now this I say: He who soweth sparingly, shall also reap sparingly: and he who soweth in blessings, shall also reap blessings. Every one as he hath determined in his heart, not with sadness, or of necessity: for God loveth a cheerful giver.  And God is able to make all grace abound in you; that ye always, having all sufficiency in all things, may abound to every good work, As it is written: He hath dispersed abroad, he hath given to the poor: his justice remaineth for ever. And he that ministereth seed to the sower, will both give you bread to eat, and will multiply your seed, and increase the growth of the fruits of your justice: That being enriched in all things, you may abound unto all simplicity, which worketh through us thanksgiving to God.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ११२ :१-४, ९

प्रतिसाद :जो मनुष्य परमेश्वराचे भय बाळगतो तो धन्य!

१)  परमेश्वराचे स्तवन करा, जो मनुष्य परमेश्वराचे भय बाळगतो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य! त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल, सरळ जनांचा वंश आशीर्वादयुक्त होईल.

२) धनसंपदा त्याच्या घरी असते, त्याचे नीतिमत्त्व सर्वकाळ टिकते. सरळ जनांना अंधकारात प्रकाश प्राप्त होतो, त्याच्या ठायी कृपा, दया, आणि न्याय ही आहेत.

३)  त्याने सढळ हाताने गरिबांना दान दिले आहे, त्याचे नीतिमत्त्व सर्वकाळ राहील; त्याचा सन्मानपूर्वक उत्कर्ष होईल




Psalms   112: 1bc-2, 3-4, 9
R. (1b) Blessed the man who fears the Lord.

1 Blessed is the man that feareth the Lord: he shall delight exceedingly in his commandments.
2 His seed shall be mighty upon earth: the generation of the righteous shall be blessed.
R. Blessed the man who fears the Lord.

3 Glory and wealth shall be in his house: and his justice remaineth for ever and ever.
4 To the righteous a light is risen up in darkness: he is merciful, and compassionate and just.
R. Blessed the man who fears the Lord. 

9 He hath distributed, he hath given to the poor: his justice remaineth for ever and ever: his horn shall be exalted in glory.
R. Blessed the man who fears the Lord.


जयघोष  
आलेलुया, आलेलुया! 
मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे; माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही. 
आलेलुया!

Acclamation: 
R. Alleluia, alleluia.
 Whoever loves me will keep my word, and my Father will love him and we will come to him.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान  मत्तय :१-६, १६-१८
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल."
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "माणसांनी पाहावे ह्या हेतूने तुम्ही आपले धर्माचरण त्यांच्यासमोर न करण्याविषयी जपा. केले तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हांला प्रतिफळ नाही.
"जेव्हा जेव्हा तू दानधर्म करतोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपला गौरव करावा म्हणून, ढोंगी जसे सभास्थानात आणि रस्त्यात आपणापुढे शिंग वाजवतात तसे करू नकोस. मी तुम्हांला नक्की सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर दानधर्म करतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करतो ते तुझ्या डाव्या हाताला कळू नये; अशारीतीने तुझा दानधर्म गुप्तपणे व्हावा म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तुझे फळ देईल.
“तसेच जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तेव्हा ढोंग्यांसारखे करू नका, लोकांनी आपणांस पाहावे म्हणून सभास्थानांत आणि चवाठ्यांवर उभे राहून प्रार्थना करणे ढोंगी लोकांना आवडते. मी तुम्हांला नक्की सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा आणि दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर म्हणजे तुझा गुप्तदर्शीपिता तुला तिचे फळ देईल. 

“तुम्ही जेव्हा उपास करता तेव्हा ढोग्यांसारखे म्लानमुख होऊ नका, आपण उपास करीत आहो असे लोकांना दिसावे म्हणून ते आपले तोंड विद्रूप करतात. मी तुम्हांला नक्की सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर उपास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव आणि आपले तोंड धू; अशा हेतूने की, तू उपास करीत आहेस हे लोकांना नव्हे, तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल.”

प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

Gospel Reading:Matthew 6: 1-6, 16-18
Take heed that you do not your justice before men, to be seen by them: otherwise you shall not have a reward of your Father who is in heaven. Therefore when thou dost an almsdeed, sound not a trumpet before thee, as the hypocrites do in the synagogues and in the streets, that they may be honoured by men. Amen I say to you, they have received their reward. But when thou dost alms, let not thy left hand know what thy right hand doth. That thy alms may be in secret, and thy Father who seeth in secret will repay thee. And when ye pray, you shall not be as the hypocrites, that love to stand and pray in the synagogues and corners of the streets, that they may be seen by men: Amen I say to you, they have received their reward. But thou when thou shalt pray, enter into thy chamber, and having shut the door, pray to thy Father in secret: and thy Father who seeth in secret will repay thee. And when you fast, be not as the hypocrites, sad. For they disfigure their faces, that they may appear unto men to fast. Amen I say to you, they have received their reward. But thou, when thou fastest anoint thy head, and wash thy face; That thou appear not to men to fast, but to thy Father who is in secret: and thy Father who seeth in secret, will repay thee.
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .                                            

चिंतन
नम्रता व औदार्य हा सज्जनांचा दागिना आहे व देणारा परमेश्वराला विशेष प्रिय असतो. जो मनापासून, हातचे काहीही न राखता देतो तेव्हा परमेश्वर त्याची परतफेड अनेकपटीने आपल्या जीवनात करत असतो व आपल्याला त्याच्या कृपेनेही सर्व प्रकारे समृद्ध करत असतो. आजचे स्तोत्र-वचनही जे दयाळू आहेत ते परमेश्वराचा आदर करीत असून जगातील अंधारात ते परमेश्वराचा प्रकाश पसरवणारे दीपस्तंभ आहेत असे सांगत आहे. त्याचप्रमाणे त्यांना परमेश्वराच्या आशीर्वादाचा लाभ होतो हे जाहीर करीत आहे. संत पौल म्हणूनच आजच्या पहिल्या वाचनात आपल्याला सर्वांशी उदारतेने वागण्यास प्रोत्साहित करतात. तर शुभवर्तमान आपल्याला नम्रतेने वागून वैयक्तिक जीवनात श्रद्धेचे पालन करण्याचा सल्ला देत आहे. शुभवर्तमान ह्यावरही भर देते की परमेश्वर आपल्या कृतीपेक्षा अंतःकरणातील हेतू लक्षात घेतो. म्हणून जेव्हा कुणी कुठल्याही सन्मान वा प्रशंसेची अपेक्षा न करता देतो, तेव्हा परमेश्वर अधिक संतुष्ट होऊन त्यांना कृपेचे बक्षीस देतो. म्हणूनच, आपल्यासाठी परमेश्वराच्या कृपेचा झरा मोकळा करणारे पावित्र्याचे, परोपकाराचे, औदार्याचे व तरीही नम्रतेचे प्रामाणिक जीवन जगण्यासाठी आज आपण विशेष प्रार्थना करू या.

प्रार्थना : हे सर्व चांगुलपणाच्या उगमा, आमचे आचरण, प्रार्थना, दानधर्म व उपवास शुद्ध आणि पवित्र हेतूने करण्यासाठी आम्हाला तुझी कृपा दे, आमेन.


✝️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या