Marathi Bible Reading | 11th week in ordinary Time| Thursday 19th June 2025

सामान्यकाळातील ११ वा सप्ताह 

गुरुवार  दि.  १९ जून  २०२५

“कारण जर तुम्ही लोकांना त्याच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करील,

For if you will forgive men their offences, your heavenly Father will forgive you also your offences.


संत रोमाल्ड
- मठाधिकारी, वर्तनसाक्षी (९५२-१०२७)

हे प्रिय येशू ! हे माझ्या प्रिय येशू! मला व्यक्त करता येणार नाही अशी तू माझी अदम्य इच्छा आहेस ! तू माझा आनंद आहेस ! तू दुतांचा आनंद आहेस! तू संतांचे माधुर्य आहेस! - संत रोमाल्ड

 देवबापाची इच्छा आहे की, आपण सर्वांनी स्वर्गात असावे. परमेश्वर सर्वांचा  पिता, बाप, आब्बा आहे. आपले ह्या जगातील आई-बाप म्हणजे शारीरिक दृष्ट्या निसर्ग नियमानुसार जन्म देणारे पालक आहेत. मात्र स्वर्गीय पिताच खऱ्या अर्थाने जीवनदान देणारा पिता आहे. आपण सर्वजण स्वर्गीय पित्याची निर्मिती व मुले आहोत. एकच पित्याची मुले असल्यामुळे आपण सर्वांनी प्रेमाने, शांतीने, आनंदाने, सौख्याने भरलेले जीवन जगणे आवश्यक आहे. आपण आपल्या स्वर्गीय पित्याच्या सहवासात जाण्यासाठी योग्य ते जीवन आरचण करु या. 
            ✝️             

पहिले वाचन  करिंथ  ११:१-११
वाचक : पौलचे करिंथकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन 
“मी देवाची सुवार्ता विनामूल्य तुम्हांस सांगितली."
माझा थोडासा वेडेपणा तुम्ही समजून घेतला तर बरे आणि ते तुम्ही करतच आहा. तुम्हाविषयीची माझी आस्था ईश्वरप्रेरित आस्था आहे. मी एका पतीबरोबर तुमचे वाग्दान केले आहे, अशारीतीने तुम्हाला शुद्ध कुमा असे ख्रिस्ताला सादर करावे. जसे सापाने कपट करून एवेला ठकवले तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपणे शुद्धता ह्यांपासून भ्रष्ट होतील ह्याची मला भीती आहे. कारण जर कोणी येऊन ज्याची आम्ही घोषणा केली नाही अशा अन्य येशूची घोषणा करतो, किंवा तुम्हांला मिळाला नाही असा दुसरा आत्मा जर तुम्ही घेता, अथवा तुम्ही स्वीकारली नाही अशी दुसरी सुवार्ता जर स्वीकारता, तर ह्यात तुमची कितीतरी सहनशीलता आहे. अतिश्रेष्ठ अशा प्रेषितांपेक्षा मी किंचितही उणा नाही असे मी मानतो. मी जरी भाषण करण्यात अप्रवीण असलो तरी ज्ञानात तसा नाही, हे आम्ही सर्व लोकांत आणि सर्व प्रकारे प्रकट केले.
तुम्ही उच्च व्हावे म्हणून मी आपणाला लीन करून देवाची सुवार्ता विनामूल्य तुम्हांला सांगितली, हे मी पाप केले काय? मी तुमची सेवा करावी म्हणून दुसऱ्या मंडळींपासून वेतन घेऊन त्यांना लुटले आणि मी तुम्हांजवळ असता मला.उणे पडले तेव्हाही मी कोणावर भार घातला नाही, कारण मासेदोनियाहून आलेल्या बंधूंनी मला पडलेली उणीव भरून काढली. कोणत्याही प्रकारे तुम्हांवर माझा भार पडू नये म्हणून मी जपलो आणि जपेनही. ख्रिस्ताचे सत्य माझ्या ठायी आहे आणि मी सांगतो की, माझ्या ह्या अभिमानास अखाया प्रातांत प्रतिबंध होणार नाही. मी का बरे जपावे ? मी तुम्हावर प्रीती करीत नाही म्हणून काय ? देवाला हे सारे ठाऊक आहे.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :: Second Corinthians 11: 1-11
Would to God you could bear with some little of my folly: but do bear with me. For I am jealous of you with the jealousy of God. For I have espoused you to one husband that I may present you as a chaste virgin to Christ.  But I fear lest, as the serpent seduced Eve by his subtilty, so your minds should be corrupted, and fall from the simplicity that is in Christ. For if he that cometh preacheth another Christ, whom we have not preached; or if you receive another Spirit, whom you have not received; or another gospel which you have not received; you might well bear with him. For I suppose that I have done nothing less than the great apostles. For although I be rude in speech, yet not in knowledge; but in all things we have been made manifest to you. Or did I commit a fault, humbling myself, that you might be exalted? Because I preached unto you the gospel of God freely? I have taken from other churches, receiving wages of them for your ministry. And, when I was present with you, and wanted, I was chargeable to no man: for that which was wanting to me, the brethren supplied who came from Macedonia; and in all things I have kept myself from being burthensome to you, and so I will keep myself. The truth of Christ is in me, that this glorying shall not be broken off in me in the regions of Achaia. Wherefore? Because I love you not? God knoweth it.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र १११ :१-४, ७-८
प्रतिसाद : प्रभो, तुझी कृत्ये न्याय्य आणि सत्य आहेत.
१)  परमेश्वराचे स्तवन करा,
सरळ जनांच्या सभेत आणि मंडळीत
 मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकारस्मरण करीन. 
परमेश्वराची कृत्ये थोर आहेत, 
ज्यांना ती आवडतात ते सर्व त्यांचा शोध करतात.

२) त्याची कृती साक्षात मान आणि महिमा आहे,
 त्याचे न्यायीपण सर्वकाळ टिकून राहते, 
आपल्या अद्भुत कृत्याचे स्मरण राहावे असे त्याने केले आहे.
 परमेश्वर दयाळू आणि कनवाळू आहे.

३) त्याची कृत्ये न्याय्य आणि सत्य आहेत; 
त्याचे सर्व आदेश विश्वसनीय आहेत, 
ते सत्याने आणि सरळपणाने नेमलेले आहेत. 
ते सदासर्वकाळ अढळ असे आहेत,


Psalms   Psalms 111: 1b-2, 3-4, 7-8
R. (7a) Your works, O Lord, are justice and truth.

1 I will praise thee, O Lord, with my whole heart; in the council of the just: and in the congregation.
2 Great are the works of the Lord: sought out according to all his wills.
R. Your works, O Lord, are justice and truth.

3 His work is praise and magnificence: and his justice continueth for ever and ever.
4 He hath made a remembrance of his wonderful works, being a merciful and gracious Lord:
R. Your works, O Lord, are justice and truth.

7 That he may give them the inheritance of the Gentiles: the works of his hands are truth and judgment.
8 All his commandments are faithful: confirmed for ever and ever, made in truth and equity.
R. Your works, O Lord, are justice and truth.


जयघोष  
आलेलुया, आलेलुया! 
ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील, माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊ. 
आलेलुया!

Acclamation: 
R. Alleluia, alleluia.
 You have received a spirit of adoption as sons through which we cry: Abba! Father!
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान  मत्तय ६:७-१५
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

येशू आपल्या शिष्यांस म्हणाला, “तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका. आपण पुष्कळ बोलला म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता, तुम्ही त्याच्यापाशी मागण्यापूर्वीच, जाणून आहे.” ह्यास्तव तुम्ही ह्याप्रकारे प्रार्थना करा: “हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आपल्या देणेकऱ्यांस देणे सोडले आहे तशी तू आमची देणी आम्हास सोड आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाइटापासून सोडव.” “कारण जर तुम्ही लोकांना त्याच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करील, परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

Gospel Reading:Matthew 6: 7-15
And when you are praying, speak not much, as the heathens. For they think that in their much speaking they may be heard. Be not you therefore like to them, for your Father knoweth what is needful for you, before you ask him. Thus therefore shall you pray: Our Father who art in heaven, hallowed be thy name. Thy kingdom come. Thy will be done on earth as it is in heaven. Give us this day our supersubstantial bread. And forgive us our debts, as we also forgive our debtors. And lead us not into temptation. But deliver us from evil. Amen.
For if you will forgive men their offences, your heavenly Father will forgive you also your offences. But if you will not forgive men, neither will your Father forgive you your offences.
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .                                            

चिंतन
करंथीकरांना ज्या काळी संत पॉल पत्र लिहित होते त्यावेळी करंथीची जनता त्यांच्या विश्वासापासून दूर जाऊ लागली होती. त्याच करंथीच्या जनतेला ख्रिस्तावरील साध्या, शुद्ध भक्तीपासून भरकटले जात आहे म्हणून आज संत पौल चिंता व्यक्त करीत आहेत व त्या सर्वांना पुन्हा एकदा ख्रिस्ताच्या प्रेमाची व आपल्यासाठीच्या समर्पणाची त्यांना आठवण करून पुन्हा माघारी बोलावत आहेत. त्याच संदर्भात पुढे ख्रिस्तावरील आपली भक्ती कुठल्याही ऐहिक गोष्टींच्या प्रभावामुळे विचलित होणार नाही ह्याचे प्रामाणिकपणे परीक्षण करून खात्री करून घेण्यास बोलावित आहे. त्यासाठी अर्थात परमेश्वराच्या शाश्वत वचनांवर चिंतन करून त्यावर लक्ष केंद्रित करण्यास आजचे स्तोत्र आपल्याला सांगत आहे. शुभवर्तमान ख्रिस्ताठायी श्रद्धेचे आदर्श जीवन जगण्यासाठीप्रभुच्या प्रार्थनेचा एक सर्वोच्च नमुना आपल्याला देत आहे. त्यात नेहमी परमेश्वराची स्तुती करण्यास, आपल्या गरजांच्या पूर्ततेसाठी परमेश्वरावर भरवसा ठेवण्यास व आपल्याला ज्या पटीत क्षमा मिळाली आहे त्या पटीत इतरांना क्षमा करण्यास बोलावित आहे. सदर प्रार्थना म्हणजे देवाच्या मार्गदर्शनाची, दया आणि सामर्थ्याची आपल्याला असलेल्या गरजेची नम्र पावती आहे. त्याच प्रार्थनेद्वारे परमेश्वराची अखंड भक्ती करीत, जीवनातील महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून परमेश्वराशी आपले असलेले नाते अधिक घट्ट करण्यासाठी आपण आज विशेष कृपा मागू या.

प्रार्थना :हे आमच्या स्वर्गीय पित्या, ही प्रार्थना शक्य होईल तितक्या हळूवारपणे व चिंतनपर पद्धतीने करु या.


✝️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या