Marathi Bible Reading | 11th week in ordinary Time| Friday 20th June 2025

सामान्यकाळातील ११ वा सप्ताह 

शुक्रवार दि.  २० जून  २०२५

“कारण जर तुम्ही लोकांना त्याच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करील,

For if you will forgive men their offences, your heavenly Father will forgive you also your offences.


संत सिल्वेरियन
परमगुरू, रक्तसाक्षी (५३८

 परोपकार, सेवा आणि दानधर्म ह्याद्वारे आपण त्यागमय जीवन जगू 
शकतो. त्याच बरोबर सुवार्ता प्रसारासाठी वाटेल त्या परिस्थितीला सामोरे
जाऊन स्वर्गीय संपत्तीचे वारसदार बनू शकतो. आपल्याला ह्या जगातील गोष्टीचीगरज आहेच पण मृत्यूनंतर सर्वकाळचे जीवन लाभावे म्हणून आध्यात्मिक संपत्तीचा साठा करणे आवश्यक आहे. आपण आपल्या जागतिक संपत्तिचा त्याग करण्यास कृपा मागुया . 
            ✝️             

पहिले वाचन  करिंथ  ११:१८,२१-३०
वाचक : पौलचे करिंथकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन 
“ह्या आणि इतर गोष्टींखेरीज माझ्या मनावरचे रोजचे ओझे, म्हणजे सर्व मंडळींविषयीची चिंता, ही आहे."

देहस्वभावानुसार पुष्कळ लोक प्रौढी मिरवतात म्हणून मीही प्रौढी मिरवीन. मी तर शरमेने म्हणतो की, त्याबाबतीत फार दुर्बळ पडलो आपण तरी ज्याबाबतीत कोणी धीट असेल, तिच्यात मीही धीट आहे हे मी निर्भीडपणे बोलतो. ते इब्री आहेत काय? मीही आहे. ते इस्राएली आहेत काय? मीही आहे. ते आब्राहाम संतान आहेत काय? मीही आहे. ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक प्रमाणात आहे. हे मी वेडगळासारखे बोलतो; श्रम करण्यात, कैद सोसण्यात, बेसुमार फटके खाल्ल्यामुळे आणि पुष्कळवेळा मृत्यूच्या दाढेत पडल्यामुळे, मी अधिक आहे. पाच वेळा मी यहुद्यांच्या हातून एकूण चाळीस फटके खाल्ले, तीनवेळा छड्यांचा मार खाल्ला, एकदा मला दगडमार झाला. तीन वेळा माझे गलबत फुटले आणि एक दिवस आणि एक रात्र मी समुद्रात घालवली. मी कितीतरी प्रवास केला. नद्यांवरली संकटे, लुटारूंमुळे आलेली संकटे, माझ्या देशबांधवानी आणलेली संकटे, परराष्ट्रीयांनी आणलेली संकटे, नगरातील संकटे, रानातली संकटे, समुद्रावरची संकटे, नामधारी बंधूनी आणलेली संकटे, श्रम आणि कष्ट, कितीतरी वेळा केलेली जागरणे, तहानभूक, पुष्कळ उपासतापास, थंडी आणि अपुरी वस्त्रे, ह्या सर्वांमुळेमी अधिक आहे. शिवाय ह्या आणि अशा इतर गोष्टींखेरीज माझ्या मनावरचे रोजचे ओझे, म्हणजे आपल्या मंडळ्यांविषयींची चिंता, ही आहे. एखादा दुर्बळ असला तर मी दुर्बळ होत नाही काय? आणि एखादा अडखळवला गेला तर मला संताप येत नाही काय ?
मला प्रौढी मिरवणे भाग पडलेच तर मी आपल्या दुर्बलतेच्या गोष्टींची प्रौढी मिरवीन.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :: Second Corinthians 11: 18, 21-30
Seeing that many glory according to the flesh, I will glory also.
 I speak according to dishonour, as if we had been weak in this part. Wherein if any man dare (I speak foolishly), I dare also. 22 They are Hebrews: so am I. They are Israelites: so am I. They are the seed of Abraham: so am I. They are the ministers of Christ (I speak as one less wise). I am more; in many more labours, in prisons more frequently, in stripes above measure, in deaths often. Of the Jews five times did I receive forty stripes, save one. Thrice was I beaten with rods, once I was stoned, thrice I suffered shipwreck, a night and a day I was in the depth of the sea. In journeying often, in perils of waters, in perils of robbers, in perils from my own nation, in perils from the Gentiles, in perils in the city, in perils in the wilderness, in perils in the sea, in perils from false brethren. In labour and painfulness, in much watchings, in hunger and thirst, in fastings often, in cold and nakedness. Besides those things which are without: my daily instance, the solicitude for all the churches. Who is weak, and I am not weak? Who is scandalized, and I am not on fire? If I must needs glory, I will glory of the things that concern my infirmity.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ३४ :२-७
प्रतिसाद : परमेश्वर नीतिमानांना संकटातून मुक्त करतो.  

१)मी परमेश्वराला सर्वदा धन्यवाद देईन,
 माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल; 
माझा जीव परमेश्वराच्याठायी प्रतिष्ठा मिरवील; 
दीन हे ऐकून हर्ष करतील.

२) तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा, 
आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णू या.
 मी परमेश्वराला शरण गेलो 
आणि त्याने माझा स्वीकार केला;
त्याने माझ्या सर्व भयांपासून मला सोडवले.

३) ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले;
 त्याची मुखे लज्जेने कदापि काळवडंणार नाहीत. 
ह्या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला 
आणि त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडवले.



Psalms   Psalms 34: 2-3, 4-5, 6-7
R. (18b) From all their distress God rescues the just.

2 I will bless the Lord at all times, his praise shall be always in my mouth.
3 In the Lord shall my soul be praised: let the meek hear and rejoice.
R. From all their distress God rescues the just.

4 O magnify the Lord with me; and let us extol his name together.
5 I sought the Lord, and he heard me; and he delivered me from all my troubles.
R. From all their distress God rescues the just.

6 Come ye to him and be enlightened: and your faces shall not be confounded.
7 This poor man cried, and the Lord heard him: and saved him out of all his troubles.
R. From all their distress God rescues the just.

जयघोष  
आलेलुया, आलेलुया! 
प्रभू म्हणतो, मी तुम्हांला मित्र म्हटले आहे,
 कारण जे काही मी आपल्या पित्यापासून 
ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हांला कळवले.. 
आलेलुया!

Acclamation: 
R. Alleluia, alleluia.
 Blessed are the poor in spirit: for theirs is the kingdom of heaven.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान मत्तय ६:१९-२३
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनही लागेल.”

येशू आपल्या शिष्यांस म्हणाला, “पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका, तेथे कसर आणि जंग खाऊन नाश करतात आणि चोर घर फोडून चोरी करतात; तर स्वर्गांत आपल्यासाठी संपत्ती साठवा. तेथे कसर आणि जंग खाऊन नाश करत नाहीत आणि चोर घरफोडी करत नाहीत. आणि चोरीही करत नाहीत. कारण जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मन लागेल.“डोळा शरीराचा दिवा आहे. ह्यास्तव तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल, पण तुझा डोळा सदोष असला तर तुझे संपूर्ण शरीर अंधकारमय होईल, ह्यास्तव तुझ्यातील प्रकाश जर अंधार असला तर तो अंधार महाभयंकर आहे.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

Gospel Reading:Matthew 6: 19-23
Lay not up to yourselves treasures on earth: where the rust, and moth consume, and where thieves break through and steal. But lay up to yourselves treasures in heaven: where neither the rust nor moth doth consume, and where thieves do not break through, nor steal. For where thy treasure is, there is thy heart also. The light of thy body is thy eye. If thy eye be single, thy whole body shall be lightsome. But if thy eye be evil thy whole body shall be darksome. If then the light that is in thee, be darkness: the darkness itself how great shall it be!
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .                                            

चिंतन
आजची उपासना आपल्या श्रद्धेचा आढावा घेण्यासाठी व त्याचप्रमाणे जीवनातील खऱ्या अर्थाने मौल्यवान असलेल्या खजिन्याचा शोधघेण्यासाठी आपल्याला आवाहन करीत आहे. संत पॉल आज त्यांच्या दुःख व कष्टांविषयी सांगताना त्यांनी कसा परीक्षेचा सामना केला, दुर्बलतेवर मात केली, कठीण काळातही परमेश्वराशी एकनिष्ठ राहिले हे सर्व ते कथन करीत आहेत. अर्थात हे स्वतःची बढाई मारण्यासाठी नसून दुःख - संकटाशी लढण्याची ही शक्ती त्यांना परमेश्वरापासून प्राप्त होते हे अधोरेखित करण्यासाठी ते हे करीत आहेत. तेव्हा, आपली खरी ताकद ही ऐहिक सुखांच्या मागे लागण्यात नाही तर परमेश्वरावर विसंबून राहण्यात आहे हे ते दर्शवितात. वास्तविक जिथे आपले धन असते तिथेच आपले मन रमते. म्हणूनच, शुभवर्तमान आज आपल्याला सावधगिरीचा इशारा देत आहे व जीवनातील खऱ्या धनाचा, खजिन्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्नशील राहण्यास सांगत आहे. दुर्दैवाने आज अनेकांचा शोध हा ऐहिक सुखांसाठी व भरवसा हा परमेश्वराऐवजी वित्त, संपत्तीवर असतो. मात्र ह्या गोष्टी आपल्या स्वर्गाच्या मार्गावर निरुपयोगी ठरतात. म्हणूनच, आपल्याला जर स्वर्गात पोहचायचे असेल तर आपण आपल्या खजिन्याची, पुण्यकर्माची, सेवाधर्माची साठवणुकही तिथेच केली पाहिजे. म्हणूनच ज्याला कधीही उतरण लागत नाही व जो कधीही नष्ट होऊ शकत नाही असा खजिना स्वर्गात निर्माण करण्यासाठी आजपासून झटण्याचा आपण निश्चय करू या व त्यासाठी आजच्या दिवशी खास प्रार्थना करू या.

प्रार्थना : हे प्रभू येशू, नाशवंत संपत्तीचा मोह मला टाळता यावा आणि चांगले ख्रिस्ती जीवन जगून स्वर्गीय संपत्तीचे वारसदार बनण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.


✝️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या