सामान्यकाळातील ११ वा सप्ताह
शनिवार दि. २१ जून २०२५
उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला. ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे."Be not therefore solicitous for tomorrow; for the morrow will be solicitous for itself. Sufficient for the day is the evil thereof.
संत अलॉयशिअस गोन्झागा
- वर्तनसाक्षी (१५६८-१५९१)
आपला जन्म कोणत्या घराण्यात झालेला आहे त्यावरून आपली महानता ठरत नाही. राजे आणि रंक दोघांची एक दिवस माती होणारच आहे ना!
- संत अलॉयशिअस गोन्झागा •
मानवाला सुखाने जगता यावे म्हणून देवाने संपूर्ण सृष्टीमध्ये सर्व वस्तुंचा साठा ठेवलेला आहे. आपली बुद्धीमत्ता व शहाणपणा वापरुन त्याचा योग्य तो उपभोग आपण घ्यायचा आहे. आपल्या जिवाला व आपल्या शरीराला सूख देण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा अशा मूलभूल गोष्टींची गरज आहे. ह्या सर्व गोष्टी निसर्गातच आहेत ह्याची जाणीव प्रभू येशू आज करुन देत आहे. आकाशातील पक्षी, पशू, रांगणारे सर्व पक्षी व जिव ह्या सर्वांना आपल्या अन्नाची व सुरक्षेची सोय करावीच लागते. देवाने त्यांच्यासाठीपण योग्य ती सुविधा तयार केलेली आहे. मात्र आपण मानव आपल्या जिवाविषयी व जगण्याविषयी सतत चिंता करीत असतो.
प्रभू येशू म्हणत आहे, 'पहिल्याने त्याचे राज्य व नीतिमत्व मिळविण्यास झटा म्हणजे त्याच्याबरोबर सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.' देवाला आपल्या सर्व गरजा ठावूक आहेत व योग्य वेळी तो सर्व गोष्टींचा पुरवठा करीत असतो. आपण देवावरील श्रद्धेत दृढबनत आहोत का? आपण त्याच्या आज्ञेप्रमाणे व वचनाप्रमाणे जीवन आचरण करतो का? आपण देवबरोबर व बंधुभगिनींबरोबर प्रेमाने व समेटाने जीवन जगतो का ?
जीवनात चिंता करीत बसणे म्हणजे नकारात्मक विचारांना चालना देण्यासारखे आहे. चिंता केल्यामुळे मानसिक समतोल ढासळतो व शारीरिक आजार बळावतात, म्हणूनच सकारात्मकतेने, नीतिने व विश्वासाने जीवन जगण्यासाठी प्रयत्न करु या.
✝️
पहिले वाचन : २ करिंथ १२:१-१०वाचक : पौलचे करिंथकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन
"मी आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. "
प्रौढी मिरवणे मला भाग पडते, तरी तसे करण्यापासून काही फायदा नाही. मी प्रभूचे दृष्टान्त आणि प्रकटीकरणे ह्याच्याकडे आता वळतो. ख्रिस्ताच्याठायी असलेला एक मनुष्य मला माहीत आहे, त्याला चौदा वर्षामागे तिसऱ्या स्वर्गापर्यंत उचलून नेण्यात आले होते; (त्याला सदेह नेण्यात आले किंवा विदेह असे नेण्यात आले हे मला ठाऊक नाही, देवाला ठाऊक आहे) त्याच मनुष्याविषयी मला माहीत आहे की, त्या मनुष्याला सुखलोकात उचलून नेण्यात आले. (सदेह) किंवा विदेह हे मला ठाऊक नाही, देवाला ठाऊक आहे) आणि माणसाने ज्याचा उच्चारही करणे उचित नाही अशी वाक्ये त्याने ऐकली. अशा मनुष्याविषयी मी प्रौढी मिरवणार; मी स्वतः विषयी नाही, तर केवळ आपल्या दुर्बलतेची प्रौढी मिरवीन. जरी मी आपली प्रौढी मिरवण्याची इच्छा धरली तरी मी मूर्ख ठरणार नाही, कारण मी खरे तेच बोलेन, तथापि मी बोलत नाही; कारण मी जो आहे म्हणून लोकांना दिसतो, किंवा माझ्याकडून लोक जे ऐकतात त्यापलीकडे मला कोणी समजू नये. प्रकटीकरणाच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीराचा एक काटा, म्हणजे मला मार देण्यासाठी सैतानाचा एक दूत ठेवण्यात आला आहे; मी चढून जाऊ नये म्हणून त्याला ठेवण्यात आला आहे; हा माझ्यापासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ तीनदा विनंती केली; परंतु त्याने मला म्हटले, "माझी कृपा तुला पुरे आहे,कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते." म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्यांची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेषकरून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, सकंटे ह्यात मला संतोष आहे; कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading : Second Corinthians 12: 1-10
If I must glory (it is not expedient indeed), but I will come to visions and revelations of the Lord. I know a man in Christ above fourteen years ago (whether in the body, I know not, or out of the body, I know not; God knoweth), such a one caught up to the third heaven. And I know such a man (whether in the body, or out of the body, I know not: God knoweth), That he was caught up into paradise, and heard secret words, which it is not granted to man to utter. For such an one I will glory; but for myself I will glory nothing, but in my infirmities. For though I should have a mind to glory, I shall not be foolish; for I will say the truth. But I forbear, lest any man should think of me above that which he seeth in me, or any thing he heareth from me. And lest the greatness of the revelations should exalt me, there was given me a sting of my flesh, an angel of Satan, to buffet me. For which thing thrice I besought the Lord, that it might depart from me. And he said to me: My grace is sufficient for thee; for power is made perfect in infirmity. Gladly therefore will I glory in my infirmities, that the power of Christ may dwell in me.
For which cause I please myself in my infirmities, in reproaches, in necessities, in persecutions, in distresses, for Christ. For when I am weak, then am I powerful.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ३४ :८-१३
प्रतिसाद :परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पाहा.
१ )परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्यांसभोवती छावणी देतो
आणि त्यांचे संरक्षण करतो.
परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पाहा.
जो त्याच्यावर भाव ठेवतो तो धन्य!
२) परमेश्वराचे पवित्र जनहो, त्याचे भय धरा.
कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही.
तरुण सिंहांनाही वाण पडते आणि त्यांची उपासमार होते,
पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही
चांगल्या वस्तूची वाण पडत नाही.
३ )मुलांनो या, माझे ऐका;
मी तुम्हाला परमेश्वराचे भय धरावयाला शिकवीन.
सुख भोगावे म्हणून जीविताची इच्छा धरणारा
आणि दीर्घायुष्य अपेक्षिणारा असा मनुष्य कोण ?
Psalms Psalms 34: 8-9, 10-11, 12-13
R. (9a) Taste and see the goodness of the Lord.
8 The angel of the Lord shall encamp round
about them that fear him: and shall deliver them.
9 O taste, and see that the Lord is sweet:
blessed is the man that hopeth in him.
R. Taste and see the goodness of the Lord.
10 Fear the Lord, all ye his saints:
for there is no want to them that fear him.
11 The rich have wanted, and have suffered hunger:
but they that seek the Lord shall not be deprived of any good.
R. Taste and see the goodness of the Lord.
12 Come, children, hearken to me:
I will teach you the fear of the Lord.
13 Who is the man that desireth life:
who loveth to see good days?
R. Taste and see the goodness of the Lord.
आलेलुया, आलेलुया!
प्रभो, तुझे वचन हेच सत्य आहे; तू आम्हाला सत्यात समर्पित कर.
.
आलेलुया!
Acclamation:
R. Alleluia, alleluia.
Jesus Christ became poor although he was rich, so that by his poverty you might become rich.
R. Alleluia, alleluia.
शुभवर्तमान मत्तय ६:२४-३४
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"उद्याची चिंता करू नका. "
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “कोणीही दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील आणि दुसऱ्यावर प्रीती करील; अथवा एकाशी निष्ठेने वागेल आणि दुसऱ्याला तुच्छ मानील. तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही.“ह्यांस्तव मी तुम्हाला सांगतो की, आपल्या जीवनाविषयी, म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे आणि आपल्या शरीराविषयी, म्हणजे आपण काय पांघरावे, ह्याची चिंता करीत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही ? आकाशातील पाखरांकडे निरखून पाहा, ती पेरणी करीत नाही, कापणी करीत नाहीत की कोठारात साठवीत नाहीत; तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयाला देतो, तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहा की नाही ? चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढविण्यास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे ? तसेच वस्त्राविषयी का चिंता करीत बसता ? रानातील फुले पाहा, ती कशी वाढतात ? ती कष्ट करीत नाहीत आणि सूत कातीत नाहीत तरी मी तुम्हांला सांगतो, शलमोनदेखील आपल्या वैभवात त्यातल्या एकासारखा सजला नव्हता. जे रानातले गवत आज आहे आणि उद्या भट्टीत पडते त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर अहो तुम्ही अल्पविश्वासी, तो विशेषकरून तुम्हांला पोषाख घालणार नाही काय? ह्यास्तव 'काय खावे,' 'काय प्यावे,' 'काय पांघरावे,' असे म्हणत चिंता करीत बसू नका. कारण ही सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पाहिल्याने त्याचे राज्य आणि त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हांला मिळतील.
“ह्यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला. ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे."
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:Matthew 6: 24-34
No man can serve two masters. For either he will hate the one, and love the other: or he will sustain the one, and despise the other. You cannot serve God and mammon. Therefore I say to you, be not solicitous for your life, what you shall eat, nor for your body, what you shall put on. Is not the life more than the meat: and the body more than the raiment? Behold the birds of the air, for they neither sow, nor do they reap, nor gather into barns: and your heavenly Father feedeth them. Are not you of much more value than they? And which of you by taking thought, can add to his stature by one cubit? And for raiment why are you solicitous? Consider the lilies of the field, how they grow: they labour not, neither do they spin. But I say to you, that not even Solomon in all his glory was arrayed as one of these. And if the grass of the field, which is today, and tomorrow is cast into the oven, God doth so clothe: how much more you, O ye of little faith? Be not solicitous therefore, saying, What shall we eat: or what shall we drink, or wherewith shall we be clothed?For after all these things do the heathens seek. For your Father knoweth that you have need of all these things. Seek ye therefore first the kingdom of God, and his justice, and all these things shall be added unto you.
Be not therefore solicitous for tomorrow; for the morrow will be solicitous for itself. Sufficient for the day is the evil thereof.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:
संत अलॉयशियस गोन्झागा ह्यांच्या स्मृती दिनाच्या आजच्या उपासनेची वाचने त्यांच्या जीवनाशी निगडीत आहेत. ती आपल्याला मानवी दुर्बलतेमध्ये परमेश्वराचे सामर्थ्य अनुभवण्यास व परमेश्वर आपली नेहमी काळजी घेईल ह्या सत्यावर भरवसा ठेवण्यास मार्गदर्शक ठरतात. तर संत पॉल आज त्यांच्या शरीरात रुतलेल्या व त्यांना कायम अस्वस्थ करणाऱ्या काट्यांविषयी सांगत आहेत. अनेकदा, विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेल्या व्यक्तींना त्यांचे ध्येय स्वस्थ बसू देत नाही. त्याची बोचरी जाणीव त्यांना सतत होत असते. ह्या उलट, काटा म्हणजे दुःख, वेदना ह्या अप्रिय बाबी जीवनात आपल्याला नेहमी ताळ्यावर ठेवण्यासाठी आवश्यक ठरतात. तसेच आपल्या त्या दुर्बलतेतून परमेश्वराचे सामर्थ्य प्रकट होत असते. संत अॅलॉयशियस ह्यांनी येशूचा शोध घेऊन त्याचे अनुकरण करण्यासाठी आपली प्रतिष्ठा, संपत्ती आणि इतर सर्व गोष्टी पणाला लावल्या. प्रभू येशू त्यांच्या जीवनाची खरी संपत्ती आणि सर्वस्व बनला. आपण नेहमीच परमेश्वर आणि त्याच्या इच्छेला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे, कारण जर आपल्या बरोबर परमेश्वर आहे तर आपल्याठायी सर्व काही आहे. प्रभू येशूचे वचन आहे, "माझी कृपा तुला पुरे आहे, कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते." परमेश्वराचे सामर्थ्य आम्हांवर सदैव राज्य करो.
प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, आमच्या चिंता दूर कर व आम्हाला तुझ्या आज्ञेप्रमाणे जीवन जगण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन.
0 टिप्पण्या