Marathi Bible Reading | Sunday 22nd June 2025 | Feast of The Blood & Body of Christ

ख्रिस्ताच्या अति पवित्र शरीर व रक्ताचा सोहळा.

रविवार २२ जून २०२५ 

 तेव्हा सर्वजण जेवून तृप्त झाले आणि उरलेले बारा टोपल्या तुकडे त्यांनी उचलून घेतले.And they did all eat, and were filled. And there were taken up of fragments that remained to them, twelve baskets.

 
Feast of corpus christ
ख्रिस्ताच्या अति पवित्र शरीर व रक्ताचा सोहळा.

 ख्रिस्तसभा आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र शरीर व रक्ताचा सोहळा साजरा करीत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपले शरीर सर्वाच्या उद्धारासाठी मोडले व आपल्या रक्ताने प्रभू येशूने सर्व पापांपासून मुक्त केले आहे. वल्हाडणाच्या दिवशी प्रभू येशूने प्रतिकात्मक रूपाने त्याच्या शरीराचे व रक्ताचे समर्पण करुन  ख्रिस्तशरीर संस्काराची स्थापना केली. ख्रिस्ताच्या समर्पणाचा विधी आपण प्रत्येक मिस्सा बलीदानात साजरा करीत असतो.

आपली आध्यात्मिक तहान व भूक भागविण्याचे सामर्थ्य प्रभू येशूच्या शरीर व रक्ताच्या कृपासंस्कारात आहे. शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्ताने पाच भाकरी व दोन मासे ह्यांचा चमत्कार करुन पाच हजारांपेक्षा अधिक लोकांची शारीरिक भूक तृप्त केली होती. मौल्यवान अशी आध्यात्मिक भूक शमविणारी भाकर प्रभू  येशूख्रिस्ताने आपल्या सर्वांना दिली आहे. ह्या कृपासंस्काराद्वारे प्रभू येशू  ख्रिस्ताने आपल्यासाठी देवाबरोबर नवा करार स्थापन केला आहे. प्रभूने म्हटले आहे, 'हे माझ्या स्मरणार्थ करा.'
आपण सर्वजण त्याच्या  शरीराचे अवयव आहोत, म्हणूनच आपल्या सर्वांना जीवन देणाऱ्या भाकरीचा आपण योग्य तो सन्मान करुन आपले जीवन अधिक पवित्र, शुद्ध व परोपकारी  बनविण्यासाठी प्रभूकडे कृपा मागू या.
  
पहिले वाचन :  उत्पत्ती  १४ : १८-२०
वाचक : उत्पत्ती ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"मलकीसदेक भाकर आणि द्राक्षारस घेऊन त्याला सामोरा आला.' "
शालेमाचा राजा मलकीसदेक भाकर आणि द्राक्षारस घेऊन त्यास सामोरा आला, हा परात्पर देवाचा याजक होता. त्याने त्याला आशीर्वाद दिला :
"आकाशाचा आणि पृथ्वीचा स्वामी जो परात्पर देव तो अब्रामला आशीर्वाद देवो, "ज्या परात्पर देवाने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले तो धन्य !
तेव्हा अब्रामने त्याला सर्वांचा दहावा भाग दिला.
प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
: Genesis 14: 18-20
But Melchisedech the king of Salem, bringing forth bread and wine, for he was the priest of the most high God, Blessed him, and said: Blessed be Abram by the most high God, who created heaven and earth.
And blessed be the most high God, by whose protection the enemies are in thy hands. And he gave him the tithes of all.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  ११०:१-४
प्रतिसाद : मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुगे याजक आहेस.

१). माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो :
“मी तुझे वैरी तुझे पदासन करीपर्यंत 
तू माझ्या उजवीकडे बैस.'

२.) परमेश्वर तुझा राजदंड सीयोनेतून पुढे नेईल. 
तो म्हणतो, तू आपल्या शत्रूंवर प्रभुत्व कर.

३). तुझ्या पराक्रमाच्या दिवशी तुझे लोक संतोषाने तुझे होतात,
पावित्र्याने मंडित झालेले तुझे तरुण तुला पहाटेच्या दहिवरासारखे आहेत.

४) परमेश्वराने शपथ वाहिली आहे आणि ती तो बदलणार नाही.
“मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुगे याजक आहेस.'

Psalms  Psalms 110: 1, 2, 3, 4
R. (4b) You are a priest forever, in the line of Melchizedek.
1 The Lord said to my Lord: Sit thou at my right hand: Until I make thy enemies thy footstool.
R. You are a priest forever, in the line of Melchizedek.
2 The Lord will send forth the sceptre of thy power out of Sion: rule thou in the midst of thy enemies.
R. You are a priest forever, in the line of Melchizedek.
3 With thee is the principality in the day of thy strength: in the brightness of the saints: from the womb before the day star I begot thee.
R. You are a priest forever, in the line of Melchizedek.
4 The Lord hath sworn, and he will not repent: Thou art a priest for ever according to the order of Melchisedech.
R. You are a priest forever, in the line of Melchizedek.


दुसरे वाचन  १करिंथ  ११:२३-२६
वाचक:  पौलचे करिंथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता आणि हा प्याला पिता, तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची घोषणा करता.

जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हांला सांगितले आहे की, ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, “हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा.' मग भोजन झाल्यावर त्याने प्याला " घेऊन तसेच केले आणि म्हटले, “हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे, जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा." कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता आणि हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता..
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

Second reading :  First Corinthians 11: 23-26
 For I have received of the Lord that which also I delivered unto you, that the Lord Jesus, the same night in which he was betrayed, took bread. And giving thanks, broke, and said: Take ye, and eat: this is my body, which shall be delivered for you: this do for the commemoration of me. In like manner also the chalice, after he had supped, saying: This chalice is the new testament in my blood: this do ye, as often as you shall drink, for the commemoration of me.
For as often as you shall eat this bread, and drink the chalice, you shall shew the death of the Lord, until he come.
This is the word of God 
Thanks be to God 


जयघोष  
आलेलुया, आलेलुया!
प्रभू म्हणतो, स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे,
या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल.
 आलेलुया!

Acclamation: 
R. Alleluia, alleluia.
  I am the living bread that came down from heaven, says the Lord; whoever eats this bread will live forever.

R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान लूक ९:११-१७
वाचक :  लूकलिखित पवित्रशुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"सर्वजण जेवून तृप्त झाले."

येशूने लोकसमुदायांचे स्वागत करून तो त्यांच्याबरोबर देवाच्या राज्याविषयी बोलत होता आणि ज्यांना बरे होण्याची जरुरी होती त्यांना तो बरे करत होता. दिवस उतरू लागला तेव्हा बारा जवळ म्हणाले, “लोकसमुदायाला निरोप येऊन त्याला म्हणजे ते द्या, भोवतालच्या गावात आणि शेतांमळ्यांत जाऊन उतरतील   आणि खाण्याची सोय करतील, कारण आपण येथे। रानातल्या ठिकाणी आहो,' पण तो त्यांना म्हणाला, “तुम्हीच त्यांना खायला द्या." ते म्हणाले, “आम्ही जाऊन ह्या सर्व लोकांसाठी अन्न विकत आणले नाही तर पाच भाकरी आणि दोन मासे एवढ्याशिवाय आम्हाजवळ काही नाही.” कारण ते सुमारे पाच हजार पुरुष होते. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “सुमारे पन्नास पन्नास जणांच्या पंक्ती करून त्यांस बसवा.” त्यांनी त्याप्रमाणे करून सर्वांना बसवले. तेव्हा त्याने त्या पाच भाकरी आणि ते दोन मासे घेऊन वर स्वर्गाकडे पाहून त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांचे तुकडे करून ते लोकसमुदायाला वाढण्याकरिता शिष्यांजवळ दिले. तेव्हा सर्वजण जेवून तृप्त झाले आणि उरलेले बारा टोपल्या तुकडे त्यांनी उचलून घेतले.
प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:  Luke 9: 11b-17
Jesus spoke to them of the kingdom of God, and healed them who had need of healing. Now the day began to decline. And the twelve came and said to him: Send away the multitude, that going into the towns and villages round about, they may lodge and get victuals; for we are here in a desert place. But he said to them: Give you them to eat. And they said: We have no more than five loaves and two fishes; unless perhaps we should go and buy food for all this multitude. Now there were about five thousand men. And he said to his disciples: Make them sit down by fifties in a company.And they did so; and made them all sit down. And taking the five loaves and the two fishes, he looked up to heaven, and blessed them; and he broke, and distributed to his disciples, to set before the multitude. And they did all eat, and were filled. And there were taken up of fragments that remained to them, twelve baskets.
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतन:सालेमचा राज-पुजारी मल्कीसदेकने आज वेदीवर भाकरी व द्राक्षारस अपर्ण करणे हे आपला सर्वोच्च धर्मगुरू ह्याच्या कालांतराने होणाऱ्या समर्पणाचे पूर्वचित्र आहे. आजचे स्तोत्र म्हणूनच परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताला मल्किसदेकच्या घराण्याचा राजा व धर्मगुरू ह्या दोन्ही रुपांत नियुक्त करीत आहे जो पुढे पूर्वीप्रमाणे त्याच्या लोकांसाठी वेदीवर भाकरी व द्राक्षारस परमेश्वराला अपर्ण करत नसून कालवारीच्या वेदीवर स्वतःलाच अर्पण करत आहे. संत पॉल अनुयायांना प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या स्मरणार्थ हे समर्पण नित्य साजरे करण्याच्या दिलेल्या आज्ञेची आठवण करून देतात. तर, शुभवर्तमानात आलेली भाकरी व माशांच्या चमत्काराची घटना मिस्साविधीच्या स्थापनेची आद्य आवृत्ती आहे. आजची साजरी होणारी प्रत्येक मिस्सा ही प्रभू येशू त्या वेळीही त्याची कृपा अनेक पटीने, मुबलक प्रमाणात आपल्याला देत असतो व आपले आध्यात्मिक भरण-पोषण करत असतो ह्याकडे लक्ष वेधते. तसेच, त्याची दैवी दया, करुणा व कृपा सर्वांना व्यापून उरते हे वास्तव अधोरेखित करतो. येशूच्या शरीर व रक्ताच्या ह्या सोहळ्याच्या दिवशी आज ख्रिस्तसभा आपल्याला पुन्हा एकदा मिस्साच्या सामर्थ्यावर चिंतन करण्यासाठी बोलावित आहे. तसेच, ख्रिस्ताच्या बलिदानाप्रमाणे प्रेरित होऊन आपणही समाजाच्या व समूहाच्या भल्यासाठी नेहमीत्यागास सिद्ध असण्यास सांगत आहे. येशूने केलेल्या भाकरी व माशांच्या चमत्काराप्रमाणे पवित्र मिस्सावेळी तो आपल्यासाठी कृपेचा चमत्कार करीत असतो. त्याच्या ह्या त्यागसंस्कारातून प्रेरणा घेऊन दुसऱ्यांसाठी त्याग करणाऱ्यांची संख्या अनेकपटीत वाढावी म्हणून आजच्या दिवशी आपण प्रार्थना करू या.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या पवित्र शरीराने व रक्ताने आमचे आध्यात्मिक पोषण कर व आम्हाला तुझी सुवार्ता पसरविण्यास प्रेरणा दे, आमेन.


✝️        

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या