सामान्यकाळातील १३ वा सप्ताह
सोमवार दि.३० जून २०२५
तू माझ्यामागे ये आणि मेलेल्यांना त्यांच्या मेलेल्यांना पुरू दे.
But Jesus said to him: Follow me, and let the dead bury their dead.
रोमचे पहिले रक्तसाक्षी
- (६४-३१४)
रोमची ख्रिस्तसभा ज्या दोन भक्कम आधारस्तंभावर उभारलेली होती अशा संत पीटर आणि पौल या प्रेषिताचा सण साजरा केल्यानंतर या ख्रिस्तसभेच्या प्रसारासाठी ज्यांनी रक्त सांडले अशा आद्य रक्तसाक्ष्यांची स्मृती साजरी करणे हे साहजिकच आहे.
तसे प्रारंभीच्या ख्रिस्तसभेच्या काळात रोमन साम्राज्य खूप व्यापक स्वरुपात पसरलेले होते त्यामुळे कुठे ना कुठे तरी ख्रिस्ती धर्मियांचा छळ चालूच असायचा. ह्या महत्त्वाच्या घटना ख्रिस्तसभेने आपल्या रक्तरंजित इतिहासात लिहून ठेवलेल्या आहेत.अशा प्रकारे इ. स. ६४ ते ३१४ पर्यंत २५० वर्षे ख्रिस्तसभाछळाच्या भोवऱ्यात सापडलेली होती. परंतु ह्या २५० वर्षांनंतर ख्रिस्तसभेत शांतीचे साम्राज्य प्रस्थापित झाले. इ. स. ३१४ साली कॉन्स्टन्टाईन राजाने आपल्या मिलानच्या जाहिरनाम्याद्वारे ख्रिस्ती धर्म हा रोमन साम्राज्याचा अधिकृत धर्म असल्याचे जाहीर केले. ख्रिस्ती धर्माला राजाश्रय मिळाला.
ख्रिस्तसभा ह्या रक्तसाक्ष्यांचा आज विशेष सोहळा दोन कारणास्तव साजरा करते. पहिले कारण म्हणजे रक्तसाक्षींचे रक्त हे श्रद्धेचे बीज आहे. हे आपल्याला पटावे! जी श्रद्धा आपल्यापर्यंत चालत आलेली आहे ती श्रद्धा जोपासण्यासाठी अनेकांनी आपल्या जीवाची किंमत मोजलेली आहे. त्यामुळे आपल्या श्रद्धेचे मूल्य खूप मोठे आहे. दुसरे कारण म्हणजे श्रद्धेची जोपासना करणे ही काही गुलाबी गालिचावरून केलेली मृदू मुलायम वाटचाल नव्हे. ती तारेवरची कसरत आहे. प्रसंगी आपल्याही श्रद्धेची कसोटी पाहिली जाते. त्यावेळी आपल्याला आपल्या विश्वासाशी एकनिष्ठ राहता यावे म्हणून या रक्तसाक्षींची खास आठवण ख्रिस्तसभा करते.
पहिले वाचन : उत्पत्ती १८:१६-३३
वाचक :उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन
“तू दुर्जनांबरोबर नीतिमांनांचाही संहार करणार काय ?"
आब्राहामकडे आलेले पुरुष मम्रे येथून उठून सदोम नगराकडे जायला निघाले आणि आब्राहाम त्यांना वाटेस लावण्यास गेला. परमेश्वर म्हणाला, “मी जे काय करणार आहे ते आब्राहामपासून लपवून ठेवू काय? कारण त्याचे मोठे आणि समर्थ राष्ट्र खात्रीने होणार आणि त्याच्याद्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्र आशीर्वादित होणार आहेत. मी त्याची निवड केली आहे की त्याने आपल्या लेकरांना आणि आपल्या पश्चात आपल्या घराण्याला आज्ञा द्यावी आणि त्यांनी न्यायनीतीने वागण्यासाठी परमेश्वराचा मार्ग आचरावा आणि परमेश्वर आब्राहामविषयी जे बोलला ते त्याने त्यांना प्राप्त करून द्यावे." मग परमेश्वर म्हणाला, “सदोम आणि गमोरा त्यांच्याविषयींची जी ओरड माझ्या कानी आली आहे आणि तशीच त्यांची करणी आहे की काय हे पाहायला मी खाली जातो; म्हणजे खरे काय ते मला कळून येईल."
म्हणून तेथून ते पुरूष वळून सदोमकडे चालते झाले, पण आब्राहाम तसाच परमेश्वरासमोर उभा राहिला. आब्राहाम जवळ जाऊन म्हणाला, "तू दुर्जनांबरोबर नीतिमांनांचाही संहार खरेच करणार काय? त्या नगरात कदाचित पन्नास नीतिमान असतील तर त्यांचा तू खरेच संहार करणार काय? त्यांच्यातल्या पन्नास नीतिमानांसाठी त्या नगराची तू गय करणार नाहीस काय? या प्रकारची कृती तुझ्याकडून न होवो. नीतिमानांची आणि दृष्टाची सारखीच गत होईल असा दुर्जनाबरोबर नीतिमानांचा वध करणे तुझ्यापासून दूर राहो; सर्व जगाचा न्यायाधीश योग्य ते करणार नाही काय? परमेश्वर म्हणाला, “मला सदोम नगरात पन्नास नीतिमान आढळले तर त्यांच्यासाठी मी त्या सगळ्या स्थलाची गय करीन. आब्राहाम म्हणाला, “पाहा, मी केवळ धूळ आणि राख असून प्रभूशी बोलण्याचे धाडस करीत आहे. कदाचित पन्नासात पाच कमी नीतिमान असतील तर पाच कमी म्हणून तू सर्व नगराचा नाश करशील काय?" तेव्हा तो म्हणाला, "मला तेथे पंचेचाळीस आढळले तर मी त्याचा नाश करणार नाही." त्याने पुन्हा म्हटले, “तेथे कदाचित चाळीसच आढळले तर?" तो म्हणाला, त्या चाळिसांकरिता मी तसे करणार नाही." मग तो म्हणाला, “मी बोलतो याचा प्रभूला राग न यावा. तेथे कदाचित तीसच आढळले तर ?” तो म्हणाला, मला तीसच आढळले तर मी तसे करणार नाही मग तो म्हणाला, “पाहा, मी प्रभूशी बोलण्याचे धाडस करत आहे. तेथे कदाचित वीसच आढळले तर?" तो म्हणाला, “त्या वीसांकरिता मी त्यांचा नाश करणार नाही.” तो म्हणाला, “प्रभूला राग न यावा, मी आणखी एकदाच बोलतो. तेथे कदाचित दहाच आढळले तर ? तो म्हणाला, "दहाकरिता त्याचा नाश करणार नाही. मग आब्राहामाशी बोलणे संपल्यावर परमेश्वर निघून गेला आणि आब्राहाम आपल्या ठिकाणी परत आला.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
: Genesis 18: 16-33
And when the men rose up from thence, they turned their eyes towards Sodom: and Abraham walked with them, bringing them on the way. And the Lord said: Can I hide from Abraham what I am about to do: Seeing he shall become a great and mighty nation, and in him all the nations of the earth shall be blessed? For I know that he will command his children, and his household after him to keep the way of the Lord, and do judgment and justice: that for Abraham’s sake the Lord may bring to effect all the things he hath spoken unto him. And the Lord said: The cry of Sodom and Gomorrha is multiplied, and their sin is become exceedingly grievous. I will go down and see whether they have done according to the cry that is come to me: or whether it be not so, that I may know. And they turned themselves from thence, and went their way to Sodom: but Abraham as yet stood before the Lord. And drawing nigh he said: Wilt thou destroy the just with the wicked? If there be fifty just men in the city, shall they perish withal? and wilt thou not spare that place for the sake of the fifty just, if they be therein? Far be it from thee to do this thing, and to slay the just with the wicked, and for the just to be in like case as the wicked, this is not beseeming thee: thou who judgest all the earth, wilt not make this judgment. And the Lord said to him: If I find in Sodom fifty just within the city, I will spare the whole place for their sake.
And Abraham answered, and said: Seeing I have once begun, I will speak to my Lord, whereas I am dust and ashes. What if there be five less than fifty just persons? wilt thou for five and forty destroy the whole city? And he said: I will not destroy it, if I find five and forty. And again he said to him: But if forty be found there, what wilt thou do? He said: I will not destroy it for the sake of forty. Lord, saith he, be not angry, I beseech thee, if I speak: What if thirty shall be found there? He answered: I will not do it, if I find thirty there. Seeing, saith he, I have once begun, I will speak to my Lord. What if twenty be found there? He said: I will not destroy it for the sake of twenty. I beseech thee, saith he, be not angry, Lord, if I speak yet once more: What if ten should be found there? And he said: I will not destroy it for the sake of ten. And the Lord departed, after he had left speaking to Abraham: and Abraham returned to his place.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १०२:१-४,८-११
प्रतिसाद :परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे.
१ )हे माझ्या मना, परमेश्वराला धन्यवाद दे,
हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाला धन्यवाद दे.
हे माझ्या मना, परमेश्वराला धन्यवाद दे.
त्याचे सर्व उपकार विसरू नकोस.
२ )तो तुझ्या सर्व दुष्कर्माची क्षमा करतो,
तो तुला दया आणि करुणा ह्यांचा मुकुट घालतो.
तो तुझे सर्व रोग बरे करतो,
तो तुझा जीव विनाशगर्तेतून उद्धरतो,
३) परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे,
तो मंदक्रोध आणि दयामय आहे.
तो सर्वदाच दोष देत राहणार नाही,
तो आपला क्रोध सर्वकाळ राहू देणार नाही.
४) आमच्या पापांच्या मानाने त्याने
आम्हांला शासन केले नाही,
त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने आम्हांला
प्रतिफळ दिले नाही. कारण जसे पृथ्वीच्यावर
आकाश उंच आहे,तशी त्याची दया
आणि त्याचे भय धरणाऱ्यांवर अपार आहे.
Psalm Psalms 103: 1b-2, 3-4, 8-9, 10-11
R. (8a) The Lord is kind and merciful.
1 Bless the Lord, O my soul: and let all
that is within me bless his holy name.
2 Bless the Lord, O my soul, and never forget
all he hath done for thee.
R. The Lord is kind and merciful.
3 Who forgiveth all thy iniquities:
who healeth all thy diseases.
4 Who redeemeth thy life from destruction:
who crowneth thee with mercy and compassion.
R. The Lord is kind and merciful.
8 The Lord is compassionate and merciful:
longsuffering and plenteous in mercy.
9 He will not always be angry:
nor will he threaten for ever.
R. The Lord is kind and merciful.
10 He hath not dealt with us according to our sins:
nor rewarded us according to our iniquities.
11 For according to the height of the heaven above the earth:
he hath strengthened his mercy towards them that fear him.
R. The Lord is kind and merciful.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
सुवार्तेच्याद्वारे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव प्राप्त करून घेण्यासाठी परमेश्वराने आम्हांला पाचारण केले आहे.
आलेलुया!
Acclamation:
Alleluia, alleluia.
If today you hear his voice, harden not your hearts.
R. Alleluia, alleluia.
शुभवर्तमान मत्तय ८:१८-२२
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
" तू माझ्यामागे ये."
मग येशूने आपल्या सभोवती लोकसमुदाय आहे असे पाहून त्यांना पलीकडे जाण्याची आज्ञा केली. तेव्हा कोणीएक शास्त्री येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, जेथे कोठे आपण जाल तेथे मी आपल्यामागे येईन. येशू त्याला म्हणाला, “खेकड्यांना बिळे आणि आकाशातील पाखरांना घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकायला ठिकाण नाही." मग त्यांच्या शिष्यांपैकी आणखी एक जण त्याला म्हणाला, प्रभुजी, मला पहिल्याने आपल्या बापाला पुरायला जाऊ द्या. परंतु येशूने त्याला म्हटले, तू माझ्यामागे ये आणि मेलेल्यांना त्यांच्या मेलेल्यांना पुरू दे.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading :
Matthew 8: 18-22
And Jesus seeing great multitudes about him, gave orders to pass over the water.And a certain scribe came and said to him: Master, I will follow thee whithersoever thou shalt go. And Jesus saith to him: The foxes have holes, and the birds of the air nests: but the son of man hath not where to lay his head. And another of his disciples said to him: Lord, suffer me first to go and bury my father. But Jesus said to him: Follow me, and let the dead bury their dead.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: आजच्या वाचनात आब्राहाम नेटाने सदोम आणि गमोर ह्या शहरवासीयांसाठी मध्यस्थी करतो व लोकांबद्दल अपार दयेचे दर्शन घडवतो. ह्याद्वारे, परमेश्वर दुसऱ्यांच्या जीवनात आपण करीत असलेली मध्यस्थी, व दाखवत असलेली दया व करूणा ह्याची परमेश्वर नोंद घेऊन त्याला प्रतिसाद जरूर देतो हे दर्शवित आहे. मत्तयच्या शुभवर्तमानातून घेतलेल्या वाचनात येशू शिष्यत्वासाठी मोजाव्या लागणाऱ्या किंमतीबल बोलतो. तसेच, जीवनात इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा येशूशी असलेल्या आपल्या नातेसंबंधाला सर्वांपेक्षा अधिक प्राधान्य देऊन निष्ठापूर्वक त्याचे अनुसरण करण्यास बोलावतो. थोडक्यात, आजची वाचने दयाळूपणे दुसऱ्यांसाठी त्यांच्या गरजांसाठी परमेश्वरापाशी मध्यस्थी करण्याचे आवाहन आपल्याला करते. तसेच आब्राहामाच्या धैर्यातून शिकून परमेश्वराच्या दयेचा लाभ इतरांनाही व्हावा म्हणून मार्गातील सर्व अडचणींवर मात करत येशूच्या मार्गावरून निष्ठेने प्रतिसाद देण्यासाठी बोलावित आहेत.
प्रार्थना : हे प्रभू येशू, जीवनात प्रथम स्थान देऊन व त्याग करत तुला : अनुसरण्यास मला प्रेरणा व शक्ति दे, आमेन.
0 टिप्पण्या