सामान्यकाळातील ३२ वा रविवार
दि. ९ नोव्हेंबर २०२५
येशूने त्यांना उत्तर दिले, "तुम्ही हे मंदिर मोडून टाका आणि मी तीन दिवसात ते उभारीन."
Jesus answered them, "Destroy this temple, and in three days I will raise it up."
रोम शहरात उभारलेल्या आपल्या प्रभू आणि तारणकर्त्या येशू ख्रिस्ताच्या महामंदिराच्या समर्पणाचा सोहळा आज देऊळमाता साजरा करते. रोम शहरातील आणि जगभरातील सर्व ख्रिस्तमंदिरांची माता आणि सम्राज्ञी म्हणून ह्या महामंदिराकडे पाहिले जाते, कारण हे महामंदिर खुद्द पोपमहाशयांचे कॅथिड्रल आहे. त्यामुळे त्याला संत पीटर महामंदिरापेक्षा वरचे स्थान आहे.
इ. स. ३१३ साली कॉन्स्टन्टाईन राजाच्या फाऊस्टा ह्या धर्मपत्नीने पोप संत मिल्ट्यिाडेस ह्यांना आपला राजमहाल बक्षीसादाखल दिला. नोव्हेंबर ३२४ रोजी संत सिल्व्हेस्टर (पोप) ह्यांनी त्या राजवाड्याचा काही भाग आपल्या अतिपवित्र तारणाऱ्याच्या नावाने आशीर्वादित केला. एखाद्या ख्रिस्तमंदिराचे जाहीर समर्पण करण्याची जगातील ही पहिलीच घटना होय. तसा हा सोहळा खूप साधेपणाने साजरा झाला. परंतु आज नवीन ख्रिस्तमंदिराचे समर्पण सोहळे करण्याचा जो धार्मिक विधी आहे तो अगदी चौथ्या शतकातही अस्तित्वात होता हेच यावरून दिसून येते.
हा राजवाडा पुढील हजारो वर्षे पोपमहाशयांचे निवासस्थान म्हणून वापरला गेला. चौथ्या आणि सोळाव्या शतकाच्या दरम्यान ह्याच ठिकाणी पाच सर्वपंथीय परिषद आणि महागुरूंच्या वीस परिषदा भरविण्यात आल्या होत्या. बाराव्या शतकात संत योहान बाप्तिस्ता ह्याच्या नावाने ह्या राजवाड्याला संत जॉन लॅटरन (महामंदिर) असे नामाभिधान प्राप्त झाले.
ख्रिस्तसभेतील ह्या महान, गौरवशाली व राजेशाही महामंदिरामध्ये संत पेत्र व पौलच्या कवटीचे अवशेष चांदीच्या पेटीमध्ये कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आलेले आहेत. युदेनच्या घरी संत पेत्राने प्रभुभोजनासाठी वापरलेली वेदी आणि अखेरच्या भोजनावेळी पवित्र मिस्साच्या स्थापनेसाठी आपल्या प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताने वापरलेले पवित्र मेज ह्याही ऐतिहासिक वस्तू ह्या महामंदिरात पाहायला मिळतात.
✝️
पहिले वाचन : यहेज्केल ४७:१-९.१२
वाचक : यहेज्केल यातून घेतलेले वाचन.
देवदूताने मला मंदिराच्या द्वाराकडे परत नेले, तो पाहा, मंदिराच्या उंबरठ्याखालून पाण्याचा झरा निघून पूर्वेकडे वाहत होता; मंदिराच्या उजव्या बाजूने वेदीच्या दक्षिणेस खालून वाहत होता. त्याने मला उत्तरद्वाराच्या वाटेने बाहेर नेले व बाहेरच्या रस्त्याने सभोवार फिरवून बाहेरल्या द्वाराकडे म्हणजे पूर्वाभिमूख असलेल्या द्वाराकडे नेले, तो पाहा, द्वाराच्या उजव्या बाजूस पाणी वाहत होते. मग तो पुरुष सर्व दिशेस चालला व त्याच्या हाती मापनसूत्र होते; त्याने एक हजार हात अंतर मापून मला पाण्यातून चालावयास सांगितले, तो तेथे पाणी घोट्यापर्यंत होते. त्याने आणखी हजार हात अंतर मापून मला पाण्यातून चालाव्यास सांगितले, तो तेथे पाणी कमरेपर्यंत होते. त्याने आणखी हजार हात अंतर मापले, तो त्या नदीतून माझ्याने चालवेना, कारण पाणी फार झाले; मला त्यातून पोहून जाता आहे असते; उतरून जाता आले नसते, एवढी ती नदी झाली. तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, तू हे पाहिले ना?" मग त्याने मला नदीतीराने माधारी नेले. परत येत असता नदीच्या दोन्ही तीरांवर बहुत झाडे असलेली मी पाहिली. तो मला म्हणाला, "हे पाणी पूर्वप्रदेशांकडे वाहत जाते आणि तेथून अराबात उतरून समुद्राकडे जाते; ही नदी समुद्रास मिळून त्याचे पाणी निर्दोष होते. ही महानदी जाईल तेथेतेथे तीत जे जीवजंतू भरलेले असतील ते जगतील व तीत मासे विपुले होतील; कारण जेथेजेथे हे पाणी जाईल तेथेतेथे सर्व काही निरोगी होईल; जेथेजेथे ही नदी जाईल तेथेतेथे सर्व प्राणी जिवंत राहतील. नदीच्या उभय तीरांनी खाण्याजोगी फळे देणारी हरत-हेची झाडे वाढतील. त्यांची पाने वाळणार नाहीत; त्यांच्या फळांचा बहर खुंटणार नाही; प्रतिमासी ती पक्क फळे देतील, कारण त्या नदीचे पाणी पवित्रस्थानातून निघाले आहे. त्या वृक्षांची फळे खाण्याजोगी व त्यांची पाने औषधी होतील."
प्रभूचा शब्द.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
Ezekiel 47:1-2, 8-9, 12:
In those days: The angel brought me back to the door of the temple, and behold, water was issuing from below the threshold of the temple towards the east (for the temple faced east). The water was flowing down from below the south end of the threshold of the temple, south of the altar. Then he brought me out by way of the north gate and led me round on the outside to the outer gate that faces towards the east; and behold, the water was trickling out on the south side. And he said to me, "This water flows towards the eastern region and goes down into the Arabah, and enters the sea; when the water flows into the sea, the water will become fresh. And wherever the river goes, every living creature that swarms will live, and there will be very many fish. For this water goes there, that the waters of the sea may become fresh; so everything will live where the river goes. And on the banks, on both sides of the river, there will grow all kinds of trees for food. Their leaves will not wither, nor their fruit fail, but they will bear fresh fruit every month, because the water for them flows from the sanctuary. Their fruit will be for food, and their leaves for healing.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ४६: २- ३, ५- ६
प्रतिसाद : नदीचे पाणी देवाच्या पवित्र निवासस्थानाला आनंदमय करते.
१)देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे
.तो संकटसमयी साहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो .
म्हणून पृथ्वी उलथीपालथी झाली,
पर्वत कोसळून सागरतळी बुडाले,
सागराच्या लाटा गर्जून उसळल्या,
त्यांच्या उचंबळ्याने पर्वत हालले, तरी आम्ही भिणार नाही.
२)त्या नगराच्या ठायी देव आहे ते ढळावयाचे नाही.
प्रभात होताच देव त्याला साहाय्य करील.
राष्ट्रे खवळली, राज्य डळमळली,
त्याने गर्जना केली तो पृथ्वी विरघळून गेली.
३)या परमेश्वराची कृत्ये पाहा.
त्याने पृथ्वीची कशी नासधूस केली आहे.
तो दिगंतापर्यंत लढाया बंद करतो,
तो धनुष्य मोडतो, भाला तोडून टाकतो,
रथ अग्नीत जाळून टाकतो.
Palm Psalm 46:2-3, 5-6, 8-9
The waters of a river give joy to God's city, the holy place, the dwelling of the Most High.
God is for us a refuge and strength,
an ever-present help in time of distress:
so we shall not fear
though the earth should rock
though the mountains quake
to the heart of the sea. R
God is within, it cannot be shaken;
God will help it at the dawning of the day. R
The Lord of hosts is with us:
the God of Jacob is our stronghold.
Come and behold the works of the Lord,
the awesome deeds he has done on the earth. R
दुसरे वाचन १करिंथकरांस पत्र ३:९-११,१६-१७
वाचक : पौलचे करिंथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन :
तुम्ही देवाची इमारत आहा. माझ्यावर झालेल्या देवाच्या अनुग्रहाच्या मानाने मी कुशल कारागिरीच्या पद्धतीप्रमाणे पायी घातला आणि दुसरा त्याच्यावर इमारत बांधत आहे तर त्याच्यावरचे बांधकाम आपण कसे करत आहो ह्याविषयी प्रत्येकाने जपावे. येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया, त्याच्यावाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. ह्या पायावर कोणी सोने, रुपे. मोलवान पाषाण, लाकूड, गवत, पेंढा ह्यांनी बांधतो. तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल, तो दिवस ते उघडकीस आणील. कारण तो अग्नीसह प्रकट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे ह्याची परीक्षा ह्या अग्नीनेच होईल. तुम्ही देवाचे मंदिर आहा आणि तुम्हामध्ये आत्मा निवास करतो हे तुम्हास ठाऊक नाही काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करील. कारण देवाचे मंदिर पवित्र आहे, तेच तुम्ही आहा.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
Second Reading:
First Corinthians 3: 9c-11, 16-17
You are God’s husbandry; you are God’s building. According to the grace of God that is given to me, as a wise architect, I have laid the foundation; and another buildeth thereon. But let every man take heed how he buildeth thereupon. For other foundation no man can lay, but that which is laid; which is Christ Jesus. Know you not, that you are the temple of God, and that the Spirit of God dwelleth in you? But if any man violate the temple of God, him shall God destroy. For the temple of God is holy, which you are.
This is the word of God
Thanks be to God
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
प्रभू म्हणतो, माझे नाव त्या मंदिरात कायम राहावे म्हणून मी त्याची निवड केली आहे व ते समर्पित केले आहे.
आलेलुया!
Acclamation:
R. Alleluia, alleluia.
I have chosen and consecrated this house, says the Lord, that my name may be there for ever.
R. Alleluia, alleluia.
शुभवर्तमान योहान २:१३-२२
वाचक :योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
यहूद्यांचा वल्हांडण सण जवळ आला व येशू यरुशलेमास गेला आणि मंदिरात गुरे, मेंढरे व कबुतरे विकणारे आणि सराफ हे बसलेले त्याला आढळले. तेव्हा त्याने दोन्यांचा एक कोरडा करून मेंढरे आणि गुरे ह्या सर्वांस मंदिरातून घालवून दिले. सराफांचा खुर्दाही ओतून टाकला व चौरंग पालथे केले आणि तो कबुतरे विकणाऱ्यांना म्हणाला, "ही येथून काढून घ्या, माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका." तेव्हा तुझ्या मंदिराविषयींचा आवेश मला ग्रासून टाकील,” असा शास्त्रलेख असल्याचे त्याच्या शिष्यांना आठवले. त्यावरून यहूदी त्याला म्हणाले, "तुम्ही हे करता तर आम्हाला तुमच्या अधिकाराचे काय चिन्ह दाखवता?" येशूने त्यांना उत्तर दिले, "तुम्ही हे मंदिर मोडून टाका आणि मी तीन दिवसात ते उभारीन." ह्यावरून यहूदी म्हणाले, हे मंदिर बांधण्यास शेचाळीस वर्षे लागली आणि तुम्ही हे तीन दिवसात उभारणार काय?" तो तर आपल्या शरीररुपी मंदिराविषयी बोलला होता. म्हणून तो असे म्हणत असे हे तो मेलेल्यातून उठल्यावर त्याच्या शिष्यांना आठवले आणि त्यांनी शास्त्रावर व येशूने जे वचन सांगितले होते त्यावर विश्वास ठेवला.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading :John 2:13-22:
The Passover of the Jews was at hand, and Jesus went up to Jerusalem. In the temple he found those who were selling oxen and sheep and pigeons, and the money-changers sitting there. And making a whip of cords, he drove them all, out of the temple, with the sheep and oxen. And he poured out the coins of the money-changers and overturned their tables. And he told those who sold the pigeons, "Take these things away; do not make my Father's house a house of trade." His disciples remembered that it was written, "Zeal for your house will consume me." So the Jews said to him, "What sign do you show us for doing these things?" Jesus answered them, "Destroy this temple, and in three days I will raise it up." The Jews then said, "It has taken forty-six years to build this temple, and will you raise it up in three days?" But he was speaking about the temple of his body. When therefore he was raised from the dead, his disciples remembered that he had said this, and they believed the Scripture and the word that Jesus had spoken.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:
रोममधील ४ महामंदिरापैकी संत योहानचे लॅटरन महामंदिर उच्चतम श्रेणीचे आहे. ते रोमच्या धर्मप्रांताचे महामंदिर आहे. ते पोप महोदयांचे म्हणजेच रोमच्या धर्मप्रांताचे अधिकृत बैठक स्थान (कथीड्रा). संत पिटर महामंदिर हे रोमच्या बिशपांचे अधिकृत बैठक स्थळ आहे असे चुकीने पुष्कळाना वाटते. या महामंदिराला पवित्र तारकाचे वा योहान बॅप्टिस्टाचे चर्च म्हणत. याच चर्चमध्ये पुरातन काळातील रोममध्ये सर्वांना बाप्तिस्मा देत. सम्राट कॉन्सन्टाईनच्या कालखंडात हे महामंदिर उभारलेले आहे व पोप सिल्वेस्टर यांनी ३२४ मध्ये त्याचा समर्पण विधी केला होता. यहुदी धर्माचं एकमेव मंदिर येरुशलेमला होते. त्याचे शुद्धीकरण प्रभु येशू करतो. आपले मनमंदिर पवित्र आत्म्याचं मंदिर नेहमी शुद्ध ठेवण्याचे संकेत करतो.
प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या पवित्र मंदिरात शुद्ध अंत:करणाने प्रवेशण्यास व तुझी कृपा अनुभवण्यास आमचे मन मोकळे कर आमेन.

0 टिप्पण्या