Marathi Bible Reading | 31st week in ordinary Time | Saturday 8th November 2025

सामान्यकाळातील ३१ वा सप्ताह 

शनिवार दि. ८ नोव्हेंबर २०२५

 देव तुमची अंतःकरणे ओळखतो, कारण माणसांना जे परमश्रेष्ठ वाटते ते देवाच्या दृष्टीने तिरस्करणीय आहे.
God knows your hearts. For what is exalted among men is an abomination in the sight of God.


  संत गॉडफ्री 
महागुरू, वर्तनसाक्षी (१०५०-१११५)

सोईझीन्सनजिकच्या एका श्रीमंत घराण्यामध्ये गॉडफ्रीचा जन्म झाला. त्याच्या आईच्या अकाली निधनानंतर गॉडफ्रीने स्वत:ला ईश्वरकार्यास वाहून घेतले. वयाच्या पाचव्या वर्षी त्याला संत क्विन्टीनच्या मठामध्ये ठेवण्यात आले. त्याचे धर्मबाप पवित्र मठवासी (त्यांचेही नाव अॅबट गॉडफ्री असेच होते.) ह्याने तेथे त्याचे लालनपालन केले.
गॉडफ्री ह्याने आपल्या तारुण्याची महत्त्वाची वर्षे रात्रंदिवस प्रार्थना करण्यात घालविली. वयाच्या २५ व्या वर्षी त्याला धर्मगुरूपदाची दीक्षा देण्यात आली. त्यानंतर लगेच मोडकळीस आलेल्या कॅम्पबेन इथल्या एका मठाचे अधिकारी म्हणून त्याची नेमणूक करण्यात आली. परंतु त्याने आपल्या चातुर्याने आणि हुशारीने तो मठ पुर्वस्थितीत आणला आणि त्यातील धार्मिक जीवनाचे पुनरुज्जीवन केले.
इ. स. ११०३ साली त्याच्या इच्छेविरुद्ध त्याला एमिएन्सचे महागुरू म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यावेळी तो अनवाणीच, पश्चात्तापाची जाडीभरडी वस्त्रे (गोणताट) पांघरून शहरात शिरला आणि महागुरूंच्या राजमहालात एखाद्या भिक्षूप्रमाणे राहू लागला.
त्याची सहनशीलता, नम्रता आणि गरिबांविषयी त्याला वाटणारी कळकळ अलौकिकच म्हणावी लागेल. ख्रिस्त आणि बारा प्रेषित ह्या नात्याने तो दररोज १३ गरीब लोकांना भोजन देत असे. कुष्ठरोग्यांच्या इस्पितळांना भेटी देणे, त्यांच्या गरजा भागविणे, त्यांना हसतमुख ठेवून त्यांची सेवा करणे ह्यात त्याला परमानंद मिळत असे.
हाईम शहराच्या महापौराशी महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी जात असताना अचानक गॉडफ्री आजारी पडले. त्यांनी अंतिम संस्कार स्वीकारला आणि मोठ्या आनंदाने ह्या जगाचा निरोप घेतला. संत क्रिस्पीनच्या मठात (सोईझॉन्स) ८ नोव्हेंबर १११५ रोजी त्याच्यावर अंत्यविधी संस्कार करण्यात
 आला. 

अनीतिच्या मार्गाने धन मिळविणाऱ्या आणि श्रीमंतीचा अभिमान बाळगणाऱ्या परुश्यांचा प्रभू येशू परखड शब्दात निषेध करीत आहे. विशेषतः प्रभू येशू जगातील लोभी प्रवृत्ती असणाऱ्या आणि जागतिक वैभवासाठीच कष्ट करणाऱ्यांना सल्ला देत आहे. "माणसांना जे उच्च वाटते ते देवाच्या दृष्टीने ओंगळ आहे." सुख, संपत्ती, अधिकार, मान-सन्मान मिळविण्यासाठी आणि प्रसिध्दीची हाव असणाऱ्यांसाठी प्रभू येशू म्हणत आहे की, “तुम्हाला देवाची व धनाची सेवाचाकरी करता येत नाही!" 

 प्रभू येशू धनवानांचा नव्हे तर गरिबांचा  कैवारी आहे. आपल्या जागतिक धनाची नव्हे तर अंतःकरणाची श्रीमंती त्याला  हवी आहे. आपले विचार व कृती देवाच्या इच्छेनुसार आहे का? आपण आध्यात्मिक दृष्ट्या धनवान आहोत का?


पहिले वाचन : रोम  १६:३-९,१६,२२-२७
वाचक : पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
 "पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम करा."

ख्रिस्त येशूमध्ये माझे सहकारी, प्रिस्का आणि अक्विला ह्यांना सलाम सांगा. त्यांनी माझ्या जिवाकरिता आपला जीव धोक्यात घातला. त्यांचे आभार केवळ मीच मानतो असे नव्हे तर परराष्ट्रीयांच्या सर्व मंडळ्याही मानतात. जी मंडळी त्यांच्या घरी जमत असते तिलाही सलाम सांगा. माझा प्रिय अपैनत ह्याला सलाम सांगा, तो ख्रिस्तासाठी आशिया देशाचे प्रथमफळ आहे. मरियेला सलाम सांगा, तिने तुमच्यासाठी फार श्रम केले आहेत. माझे नातेवाईक आणि सोबतीचे बंदिवान अंद्रोनीक व युनिया ह्यांना सलाम सांगा ते प्रेषितांमध्ये नामांकित आहेत आणि माझ्यापूर्वीच ते ख्रिस्तामध्ये होते. प्रभूमध्ये माझा प्रिय आप्लियात ह्याला सलाम सांगा. ख्रिस्तामध्ये आमचा सहकारी उर्बान आणि माझा प्रिय स्ताखू ह्यांना सलाम सांगा. पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम करा. ख्रिस्ताच्या सर्व मंडळ्या तुम्हांला सलाम सांगतात.
हे पत्र लिहून देणारा मी तर्तिय तुम्हांला प्रभूमध्ये सलाम सांगतो.
माझे आणि सर्व मंडळीचे आतिथ्य करणारा गायस ह्याचा तुम्हांला सलाम. नगराचा खजिनदार एरास्त व भाऊ क्वर्त ह्यांचा तुम्हांला सलाम.
आता जे रहस्य गतयुगात गुप्त ठेवले होते, परंतु आता जे प्रकट झाले आहे आणि सर्व राष्ट्रांतील लोकांनी विश्वासाच्या अधीन व्हावे म्हणून सनातन देवाच्या आज्ञेने संदेष्ट्यांच्या लेखांद्वारे त्यांना जे कळवण्यात आले आहे, त्या रहस्याच्या प्रकटीकरणाला अनुसरूनच माझ्या सुवार्तेप्रमाणे आणि येशू ख्रिस्ताविषयीच्या घोषणेप्रमाणे तुम्हाला स्थिर करण्यास समर्थ असा जो एकच ज्ञानी देव, त्याला येशू ख्रिस्ताच्याद्वारे युगानुयुगे गौरव असो. आमेन.
प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Romans 16:3-9, 16, 22-27

Brethren: Greet Prisca and Aquila, my fellow workers in Christ Jesus, who risked their necks for my life, to whom not only I give thanks but all the churches of the Gentiles give thanks as well. Greet also the church in their house. Greet my beloved Epaenetus, who was the first convert to Christ in Asia. Greet Mary, who has worked hard for you. Greet Andronicus and Junia, my kinsmen and my fellow prisoners. They are well known to the apostles, and they were in Christ before me. Greet Ampliatus, my beloved in the Lord. Greet Urbanus, our fellow worker in Christ, and my beloved Stachys. Greet one another with a holy kiss. All the churches of Christ greet you. Tertius, who wrote this letter, greet you in the Lord. Gaius, who is host to me and to the whole church, greets you. Erastus, the city treasurer, and our brother Quartus, greet you. Now to him who is able to strengthen you according to my gospel and the preaching of Jesus Christ, according to the revelation of the mystery that was kept secret for long ages but has now been disclosed and through the prophetic writings has been made known to all nations, according to the command of the eternal God, to bring about the obedience of faith-to the only wise God be glory for evermore through Jesus Christ! Amen.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र १४५:२-५,१०-११
प्रतिसाद : हे परमेश्वरा, मी तुझ्या नावाला सदैव धन्यवाद देईन.

१) मी प्रतिदिवशी तुला धन्यवाद देईन, 
आणि सदासर्वकाळ तुझ्या नावाचे स्तवन करीन. 
परमेश्वर थोर आणि परमस्तुत्य आहे, 
त्याची थोरवी अगम्य आहे.

२) एक पिढी दुसऱ्या पिढी पुढे तुझ्या कृत्यांची
 प्रशंसा करत राहील, त्या तुझ्या पराक्रमांचे वर्णन करतील. 
तुझ्या वैभवाचा गौरवयुक्त प्रताप 
आणि तुझी अद्भुत कृत्ये ह्यांचे मी मनन करीन.

३) हे परमेश्वरा, तुझे सर्व प्राणिमात्र तुझी स्तुती गातात 
आणि तुझे भक्त तुला धन्यवाद देतात. 
ते तुझ्या राज्याचा महिमा वर्णितात 
आणि तुझा पराक्रम कथन करतात..

Psalm 145:2-3, 4-5, 10-11 
Iwill bless your name forever, my king and my God.

I will bless you day after day, 
and praise your name forever and ever. 
The Lord is great and highly to be praised; 
his greatness cannot be measured. R 

Age to age shall proclaim your works, 
shall declare your mighty deeds. 

They will tell of your great glory 
and splendour, and recount your wonderful works. R

All your works shall thank you, 
O Lord, and all your faithful ones bless you.
They shall speak of the glory of your reign, 
and declare your mighty deeds.

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया!  
आपण त्याच्या सृष्ट वस्तूतील जसे काय प्रथमफळ व्हावे,
म्हणून पित्याने स्वतःच्या इच्छेने आपणाला सत्यवचनाने जन्म दिला.
 आलेलुया!

Acclamation: 
R. Alleluia, alleluia.
  Though Jesus Christ was rich, yet for your sake he became poor, so that you by his poverty might become rich.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान लुक १६: ९-१५
वाचक :लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“तुम्ही अनीतिकारक धनाविषयी विश्वासू झाला नाही तर जे खरे ते तुम्हांला कोण सोपवून देईल ?”

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, अनीतिकारक धनाने तुम्ही आपणांसाठी मित्र जोडा, ह्यासाठी की ते नाहीसे होईल तेव्हा त्यांनी तुम्हांस सार्वकालिक वस्तीत घ्यावे,
"जो अगदी थोड्या गोष्टींविषयी विश्वासू तो पुष्कळ गोष्टींविषयीही विश्वासू आहे आणि जो अगदी थोड्या गोष्टींविषयी अन्यायी तो पुष्कळ गोष्टींविषयीही अन्यायी आहे. म्हणून तुम्ही अनीतिकारक धनाविषयी विश्वासू झाला नाही तर जे खरे धन ते तुम्हांला कोण सोपवून देईल? आणि जे दुसऱ्यांचे त्याविषयी तुम्ही विश्वासू झाला नाही ते जे आपले आहे ते तुम्हांला कोण देईल? कोणत्याही चाकराला दोन धन्यांची सेवाचाकरी करता येत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील आणि दुसऱ्याला प्रीती करील अथवा एकाला धरून राहील आणि दुसऱ्याला तुच्छ मानील. तुम्हाला देवाची आणि धनाची सेवाचाकरी करता येत नाही.
धनलोभी परुशी हे सर्व ऐकत होते आणि त्याला हसत होते. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, तुम्ही स्वतःला लोकांपुढे, नीतिमान म्हणवून घेणारे आहा, परंतु देव तुमची अंतःकरणे ओळखतो, कारण माणसांना जे परमश्रेष्ठ वाटते ते देवाच्या दृष्टीने तिरस्करणीय आहे.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :Luke 16:9-15: At that time: Jesus said to his disciples, "I tell you, make friends for yourselves by means of unrighteous wealth, so that when it fails they may receive you into the eternal dwellings, "One who is faithful in a very little is also faithful in much, and one who is dishonest in a very little is also dishonest in much. If then you have not been faithful with the unrighteous wealth who will entrust to you the true riches? And if you have not been faithful with that which is another's, who will give you that which is your own? No servant can serve two masters, for either he will hate the one and love the other, or he will be devoted to the one and despise the other. You cannot serve God and money." The Pharisees, who were lovers of money, heard all these things, and they ridiculed him.
And he said to them, "You are those who justify yourselves before men, but God knows your hearts. For what is exalted among men is an abomination in the sight of God.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन:  
आपण तारणाच्या कुपान पाणी काढण्यासाठी पवित्र मिस्साला जातो. रिक्त ओंजळीने कृपाप्रसाद घेण्यास जातो. रोज देव आपल्या ओंजळीत भरभरून देतो व प्रभू येशूला काळजाच्या कुपीत घेऊन जीवन जगण्यास जातो. ओंजळ दिवसभरात रिकामी होते. पुनः आपण याजक म्हणून रिक्त ओंजळ भरण्यास देव दर्शनाला चर्चवर येतो. परंतु जर आपण धनलोभी असू, आपला लगाव पैशाशी असेल तर आपण रिक्त ओंजळीने देवाची याचना करायला पवित्र मिस्साला जातो व धनलोभाकडे रिक्त ओंजळीने परत जातो. दोन धन्याची आपण सेवा करू पाहतोः धनाची व देवाची. गुरूड पक्ष्याच्या पंखाला दोरी व दगड बांधला तर तो उडू शकत नाही. त्याच प्रमाणे धनलोभी देवासमीप येऊ शकत नाही. पवित्र मिस्साबलिदानात उपस्थित राहून आपण रिक्त हस्ते घरी परत जातो. देवाच्या विहिरीत पाणी भरायला येतो व रिकामे भांडे घेऊन कोरडे परत जीवन जगायला समाजात जातो. जीवनाचे उद्दीष्ट असफल होते.

प्रार्थना :हे परमेश्वरा, तुच एकमेव देव आहेस, अंतःकरणापासून तुझीच सेवा करण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या