सामान्यकाळातील ३२ वा सप्ताह
सोमवार दि. १० नोव्हेंबर २०२५
त्याने पश्चात्ताप केला तर त्याला क्षमा कर,
if he repents, forgive him.
अपराध्यांना क्षमा करण्यासाठी देवाच्या कृपेची गरज असते. हीच देवाची कृपा आपल्या देवावरील विश्वासाच्या द्वारे प्राप्त होते. विश्वास वाढवा.' प्रभू येशूने स्पष्ट करुन| शिष्यांनी येशूला म्हटले, 'आमचा सांगितले की, 'केवळ मोहरीच्या दाव्याएवढा विश्वास सुद्धा आपल्याला देवाची प्रचंड महानता व शक्ति अनुभवण्यास मिळू शकते.' आपण आज प्रभूच्या वचनांवर चिंतन करीत असताना आपला देवावरील विश्वास तपासून पाहू या. ह्या जगातील आपले जीवन परस्परांच्या विश्वासाने जर सुकर बनते तर| देवावरील आपला विश्वास आपल्याला प्रचंड शक्ति आणि अंतर्बाह्य जीवन बदलण्याची प्रेरणा देऊ शकतो. आज आपल्या वर्तणुकीवर आणि देवावरील विश्वासावर चिंतन | करण्याचा दिवस आहे.
पहिले वाचन :ज्ञानग्रंथ १:१-७
वाचक :ज्ञानग्रंथ या पुस्तकातून घेतलेले वाचन
"ज्ञानी दयाशील असतो. प्रभूच्या आत्म्याने जग भरून टाकले आहे."
भूपतींनो, न्यायाची आवड धरा. सरळ मनाने प्रभूचे चिंतन करा. प्रांजळपणे त्याचा ध्यास घ्या. प्रभूची कसोटी न पाहणाऱ्यांना तो सापडतो. त्याच्यावर श्रद्धा टाकणाऱ्यांना तो दर्शन देतो. विपरीत बुद्धीमुळे मनुष्य देवापासून दुरावतो. त्याच्यासामर्थ्याची कसोटी पाहणारा मूर्ख त्याच सामर्थ्याने दोषी ठरतो. •कारण कपटी मनामध्ये ज्ञान प्रवेश करणार नाही, किंवा पापांच्या आहारी गेलेल्या शरिरामध्ये वस्ती करणार नाही. शिस्तप्रिय व शुद्ध आत्मा फसवेगिरीपासून दूर पळून जातो, मूर्ख विचारापासून तो अलिप्त असतो आणि अन्यायाने डोके वर काढले असता तो त्याला विरोध करतो.
ज्ञानी दयाशील असतो तरीदेखील देव-निंदकाला तो दोषमुक्त करणारा नाही. कारण देव त्याच्या अंतर्यामाचा साक्षी आहे. तो त्याचे मन बरोबर ओळखतो आणि त्याचे शब्द ऐकून घेतो. कारण प्रभूच्या आत्म्याने जग भरून टाकले आहे. साऱ्या गोष्टी सामावून घेणाऱ्या आत्म्याला उच्चारलेला प्रत्येक शब्द माहीत आहे.
प्रभूचा शब्द.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Wisdom 1:1-7
Love righteousness, you rulers of the earth, think of the Lord with uprightness and seek him with sincerity of heart; because he is found by those who do not put him to the test and manifests himself to those who do not distrust him. For perverse thoughts separate people from God, and when his power is tested, it convicts the foolish; because wisdom will not enter a deceitful soul or dwell in a body enslaved to sin. For a holy and disciplined spirit will flee from deceit and will rise and depart from foolish thoughts and will be ashamed at the approach of unrighteousness. For wisdom is a kindly spirit and will not free a blasphemer from the guilt of his words, because God is witness of his inmost feelings and a true observer of his heart and a hearer of his tongue. Because the Spirit of the Lord has filled the world, and that which holds all things together knows what is said.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १३९:१-१०
प्रतिसाद :प्रभो, मला शाश्वत जीवनाच्या मार्गाने ने.
१) हे परमेश्वरा, तू मला पारखले आहेस,
तू मला जाणतोस, माझे बसणे आणि
माझे उठणे तू जाणतोस,
तू दुरून माझे मनोगत समजतोस.
तू माझे चालणे आणि माझे निजणे बारकाईने पाहतोस.
माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे.
२) हे परमेश्वरा, माझ्या मुखातून असा
एकही शब्द येत नाही की,
तो तुला मुळीच ठाऊक नाही.
तू मागूनपुढून मला घेरले आहेस,
माझ्यावर तू आपला हात ठेवला आहेस,
हे ज्ञान माझ्या कल्पनेपलीकडे आहे,
हे अगम्य आहे, हे माझ्या आवाक्याबाहेर आहे.
३) मी तुझ्या आत्म्यापासून कोठे जाऊ?
मी तुझ्यासमोरून कोठे पळू ?
मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस.
अधोलोकी मी आपले अंथरूण केले,
तरी पाहा, तेथे तू आहेस.
४) मी प्रभातपंख धारण करून समुद्राच्या
अगदी पलीकडल्या तीरावर जाऊन राहिलो,
तरी तेथेही तुझा हात मला नेईल,
तुझा उजवा हात मला धरून राहील
Psalm 139:1-3, 4-6, 7-8, 9-10
Lead me Lord , in the way everlasting
O Lord, you search me and you know me!
You yourself know my resting and rising:
you discern my thoughts from afar.
You mark when I walk or lie down;
you know all my ways through and through.
Before ever a word is on my tongue, you know it,
O Lord, through and through.
Behind and before, you besiege me,
your hand ever laid upon me.
Too wonderful for me, this knowledge;
too high, beyond my reach.
O where can I go from your spirit,
or where can I flee from your face?
If I climb the heavens, you are there.
If I lie in the grave, you are there.
If I take the wings of the dawn
or dwell at the sea's furthest end,
even there your hand would lead me;
your right hand would hold me fast. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे परमेश्वरा, बोल, तुझा दास ऐकत आहे, सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत.
आलेलुया!
Acclamation:
R. Alleluia, alleluia.
You shine as lights in the world, holding fast to the word of life.
R. Alleluia, alleluia.