Marathi Bible Reading | 32nd week in ordinary Time | Tuesday 11th November 2025

सामान्यकाळातील ३२ वा सप्ताह 

मंगळवार  दि. ११ नोव्हेंबर २०२५

आम्ही सांगितलेल्या कामाचे नोकर आहोत, आम्ही आमचे कर्तव्य केले आहे, असे म्हणा.''We are unworthy servants; we have only done what was our duty!

टुअर्सचे संत मार्टिन
- महागुरू, वर्तनसाक्षी (३१६-३९७)

 ✝️  
हंगेरीमधील पलोनिया नामक प्रांतात सुरक्षादलामध्ये मोठ्या हुद्यावर कार्य करीत असलेल्या एका अधिकाऱ्याच्या घरी मार्टिनचा जन्म झाला.  मार्टिनला गॉल शहरातील एमियन्स ह्या ठिकाणी राजकीय दरबारात भरती करण्यात आले. त्यावेळी तो केवळ १५ वर्षांचा होता.

एकदा आपल्या घोड्यावरून प्रवास करीत असताना रस्त्याच्या कडेला त्याला एक भिकारी थंडीने कुडकुडत असताना दिसला. त्याच्या अंगावर लाज झाकण्यापुरती लक्तरे होती. ते पाहून मार्टिनला त्याची दया आली. दरम्यानच्या काळात ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेण्यासाठी आवश्यक असलेले धर्मशिक्षण तो घेत होता. त्याचा जबरदस्त पगडा त्याच्यावर बसला होता. मार्टिनने मागचा पुढचा विचार न करता स्वतःच्या अंगावरील अत्यंत उंची झगा आपल्या हातातील तरवारीने कापून टाकला व त्या भिकाऱ्याच्या अंगाभोवती लपेटला. त्या भिकाऱ्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मार्टिन सुखावला. एका आगळ्या वेगळ्या आनंदात समाधानाने तो घरी परतला. रस्त्यावर त्याला पाहणारे सर्व लोक मार्टिनला हसत होते. रात्री स्वप्नात त्याला प्रभू येशू त्या झग्यामध्ये दिसला. त्याच्या अंगावर उरलेल्या झग्याचा तुकडा होता. पुढे मार्टिनच्या अंगावरील फाटका झगा तो फ्रँकीश किंग्सच्या नावाने उभारलेल्या चॅपलमध्ये बरीच वर्षे जपून ठेवण्यात आला. ह्या घटनेनंतर आपल्याला लवकरच ख्रिस्ती धर्मात बाप्तिस्मा मिळावा म्हणून मार्टिन धडपडू लागला. लवकरच त्याची ही इच्छा पूर्ण झाली. त्यानंतर त्याने मिलिटरीमधून स्वत:ची सुटका करून घेतली आणि तो संत हिलरीच्या (सण १३ जाने.) संस्थेत दाखल झाला. पेव्हिया येथे कुटुंबांना भेटी देत असताना त्याला त्याची आई भेटली. तिचे मनपरिवर्तन करून त्याने तिला ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली. मात्र त्याच्या वडिलांनी ख्रिस्ती धर्म नाकारला.

दरम्यानच्या काळात एरियस नावाचा एक पाखंडी धर्मगुरू ख्रिस्तसभेमध्ये उदयास आलेला होता. त्याच्या मते पवित्र त्रैक्यातील तीन व्यक्ती समस्वरुपाच्या नसून एक दुसऱ्यापेक्षा कनिष्ठ आहेत. हा विचार गॉल शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात स्वीकारला गेला की संत हिलरी ह्यांनाच गॉल शहरातून हद्दपार करण्यात आले. आता त्यांची जागा मार्टिनने घेतली आणि तो भूमध्य समुद्राच्या किनारी एक साधू व मठवासी बनून जीवन जगू लागला.

इ. स. ३६१ मध्ये पुन्हा एकदा संत हिलरी ह्यांना बोलावण्यात आले आणि मार्टिन पुन्हा पोईटिएर्स येथे परतला. तेथे बरेचसे अनुयायी त्याला मिळाले. त्यांच्या सहाय्याने त्याने गॉलमधील पहिला बेनेडिक्टाईन मठ स्थापन केला. जिथे जिथे मूर्तिपूजेला स्थान आहे तिथे तिथे खऱ्या देवाची पूजा सुरू व्हावी ही मार्टिनची तीव्र इच्छा होती. म्हणून अधूनमधून तो आपला मठ सोडून प्रेषित कार्यासाठी संपूर्ण गॉल शहरात हिंडत असे.

अशा प्रकारे दहा वर्षे गेली. त्यानंतर मार्टिनला फ्रान्समधील टुअर्स नावाच्या शहरातून बोलावणे आले आणि त्याच्या लोकप्रियतेमुळे त्यांच्या इच्छेविरुद्ध त्याला महागुरूपदाची दीक्षा देण्यात आली. महागुरू म्हणून तो अत्यंत साधे आणि क्लेशमय जीवन जगत असे. इतर साधूसंतांना आपला त्रास होऊ नये म्हणून त्याने स्वतःसाठी एक वेगळी खोली बांधून घेतली होती, परंतु तिथेही त्याच्या खोलीभोवती इतर मठवाशांनी आपापले मठ उभारले. आजपर्यंत हा मठांचा समूह मारमोटूर इथे अस्तित्वात आहे.

रक्तसाक्षी नसूनही एक संत म्हणून गौरविला गेलेला मार्टिन हा पाश्चात्य देशातील एक पहिला संत मानला जातो. मध्ययुगात तर त्याची कीर्ती दिगंतापर्यंत जाऊन पोहोचली. त्याच्यामुळे पाश्चात्य देशातील बरीचशी ख्रिस्तमंदिरे त्याच्याच नावाने उभारली गेलेली आहेत. शिवाय काही शहरांनाही त्याचे नाव देण्यात आले आहे. मार्टिन ११ नोव्हेंबर ३९७ साली मरण पावला.

चिंतन : हे प्रभो जर तुझ्या लोकांना माझी गरज असेल तर कष्ट करण्यात मी कधीही हयगय करणार नाही. तुझ्या पवित्र इच्छेप्रमाणे होवो.संत मार्टि

अपराध्यांना क्षमा करण्यासाठी देवाच्या कृपेची गरज असते. हीच देवाची कृपा आपल्या देवावरील विश्वासाच्या द्वारे प्राप्त होते.  विश्वास वाढवा.' प्रभू येशूने स्पष्ट करुन| शिष्यांनी येशूला म्हटले, 'आमचा सांगितले की, 'केवळ मोहरीच्या दाव्याएवढा विश्वास सुद्धा आपल्याला देवाची प्रचंड महानता व शक्ति अनुभवण्यास मिळू शकते.' आपण आज प्रभूच्या वचनांवर चिंतन करीत असताना आपला देवावरील विश्वास तपासून पाहू या.  ह्या जगातील आपले जीवन परस्परांच्या विश्वासाने जर सुकर बनते तर| देवावरील आपला विश्वास आपल्याला प्रचंड शक्ति आणि अंतर्बाह्य जीवन बदलण्याची प्रेरणा देऊ शकतो. आज आपल्या वर्तणुकीवर आणि देवावरील विश्वासावर चिंतन | करण्याचा दिवस आहे.  

पहिले वाचन :ज्ञानग्रंथ या पुस्तकातून घेतलेले वाचन २:२३-३:९
"मूर्खाच्या दृष्टीने आत्मे मरण पावले पण ते मात्र शांतीमध्ये आहेत."

देवाने मानव अविनाशी असा निर्माण केला आणि त्याला आपल्या शाश्वत प्रतिरूपासारखे बनवले. पण सैतानाच्या द्वेषवृत्तीमुळे मरणाने जगात प्रवेश केला आणि त्याच्या पक्षाच्या असणाऱ्या साऱ्यांना मरणाचा अनुभव येतो.
नीतिमांनाचे आत्मे देवाच्या हाती आहेत आणि कोणतीही पीडा त्यांना स्पर्श करणार नाही. मूर्खाच्या दृष्टीने आत्मे मरण पावले, त्यांचे जाणे पीडा म्हणून समजले गेले. आमच्यापासून त्यांचे जाणे त्यांचा संपूर्ण विनाश असे मानले गेले पण ते मात्र शांतीमध्ये आहेत.
कारण जरी माणसांच्या दृष्टीने त्यांना शिक्षा झाली, तरी त्यांना शाश्वत जीवनाची पूर्ण आशा आहे. थोडीशी शिस्त अंगी बाणल्यामुळे त्यांचा मोठा लाभ होईल. देवाने त्यांची कसोटी घेतली आणि त्यांच्या दृष्टीने ते त्याच्या सहवासाला पात्र ठरले. सोन्याची पारख भट्टीत करावी तशी त्यांची त्याने केली. होमार्पणाप्रमाणे त्याने त्यांचा स्वीकार केला.
न्यायाच्या दिवशी ते चकाकतील. संकटातून ठिगण्या उडाव्या तसे चमकतील. ते राष्ट्राचा कारभार पाहतील आणि लोकांवर राज्य करतील. प्रभू त्यांच्यावर सर्वकाळ राज्य करील, त्यांच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्यांना सत्याची जाणीव होईल. श्रद्धावंत जन त्याच्याबरोबर प्रेमामध्ये राहतील. कारण कृपा आणि दया त्याच्या निवडलेल्या लोकांवर आहे आणि तो त्याच्या पवित्र जनांवर लक्ष ठेवतो.
प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Wisdom 2:23-3:9

God created mankind for incorruption and made him in the image of his own character, but through the devil's envy death entered the world, and those who belong to his party experience it. But the souls of the righteous are in the hand of God, and no torment will ever touch them. In the eyes of the foolish they seemed to have died, and their departure was thought to be an evil thing, and their going from us to be their destruction; but they are at peace. For though in the sight of men they were punished, their hope is full of immortality. Having been disciplined a little, they will receive great good, because God tested them and found them worthy of himself; like gold in the furnace he tried them, and like a sacrificial whole burnt offering he accepted them. In the time of their visitation they will shine forth and will run like sparks through the stubble. They will govern nations and rule over peoples, and the Lord will reign over them for ever. Those who trust in him will understand truth, and the faithful will abide with him in love, because grace and mercy are upon his holy ones, and he watches over his chosen, 
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ३४:२-३,१६-१७,१८-१९
प्रतिसाद :मी सदैव परमेश्वराला धन्यवाद देईन.

१ मी सदैव परमेश्वराला धन्यवाद देईन. 
माझ्या मुखात त्याचे स्तवन असेल. 
माझा जीव परमेश्वराच्या ठायी प्रतिष्ठा मिरवील,
 दीनजन हे ऐकून हर्ष करतील.

२ वाईट करणाऱ्यांची आठवणसुद्धा पृथ्वीवर राहू नये 
म्हणून परमेश्वर त्यांना विन्मुख होतो. 
परमेश्वराचे नेत्र नीतिमांनाकडे असतात. 
त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात.

३ ते धावा करतात, तो ऐकून परमेश्वर त्यांना 
त्यांच्या सर्व संकटातून मुक्त करतो. 
परमेश्वर भग्नहृदयी लोकांच्या सन्निध असतो, 
अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो.

Psalm 34:2-3, 16-17, 18-19 
I will bless the Lord at all times;

I will bless the Lord at all times;
 praise of him is always in my mouth. 
In the Lord my soul shall make its boast; 
the humble shall hear and be glad. R 

The Lord turns his eyes to the just, 
and his ears are open to their cry.
The Lord turns his face against the wicked 
to destroy their remembrance from the earth. R

When the just cry out, the Lord hears,
 and rescues them in all their distress. 
The Lord is close to the broken-hearted;
 those whose spirit is crushed he will save. R

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया!  
हे परमेश्वरा, बोल, तुझा दास ऐकत आहे, सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत.
 आलेलुया!

Acclamation: 
R. Alleluia, alleluia.
    If anyone loves me, he will keep my word, says the Lord; and my Father mil love him, and we will come to him.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान लुक १७:७-१०
वाचक :लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"आम्ही केवळ नोकर आहोत, आम्ही आमचे कर्तव्य केले आहे."
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, तुम्हापैकी असा कोण आहे की, त्याचा नांगरणारा किंवा मेंढरे राखणारा नोकर शेतातून आल्यावर तो त्याला म्हणेल काय, “आताच येऊन जेवायला बस ? उलट माझे जेवण तयार कर, माझे खाणेपिणे येईपर्यंत कंबर बांधून माझी सेवा कर आणि मग तू खा आणि पी, असे तो त्याला म्हणणार नाही काय ? सांगितलेली कामे नोकराने केली म्हणून तो त्याचे उपकार मानतो काय ? त्याप्रमाणे तुम्हांला सांगितलेली सर्व कामे केल्यावर, आम्ही सांगितलेल्या कामाचे नोकर आहोत, आम्ही आमचे कर्तव्य केले आहे, असे म्हणा.'
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :Luke 17:7-10: 

At that time: Jesus said, "Will any one of you who has a servant ploughing or keeping sheep say to him when he has come in from the field, 'Come at once and recline at table? Will he not rather say to him, 'Prepare supper for me, and dress properly, and serve me while I eat and drink, and afterwards you will eat and drink? Does he thank the servant because he did what was commanded? So you also, when you have done all that you were commanded, say, 'We are unworthy servants; we have only done what was our duty!
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन:  
आज संत मार्टिनचा स्मृती दिवस. ते अखिस्ती होते, सैन्यात होते. अगदी पंधरावर्षीय मार्टिनला फ्रान्समध्ये राज्याच्या सैन्यात भरती करण्यात आले. ख्रिस्ती होण्यासाठी धर्मशिक्षण घेत असताना मार्टिनने थंडीत गारठलेल्या अर्धनग्न भिकाऱ्याला आपला अर्धा अंगरखा कापून दिला. मार्टिनचा अर्धा अंगरखा राज्याच्या देवालयात आहे. त्या घटनेनंतर त्याने बाप्तिस्मा स्वीकारला. त्याला सैन्यातून मुक्त केले व तो संत हिलरीच्या शिष्यगणात भरती झाला. त्याच्या आईचे त्याने धर्मपरिवर्तन केले. मात्र त्याचा बाप अख्रिस्तीच राहिला. त्याने मुर्तिपूजक जगाच्या परिवर्तनासाठी कार्य केले. पुढे ते फ्रान्सचे बिशप झाले. त्यांनी मठ स्थापला जो आजतागायत आहे. आपल्या जीवनात आपण सुवार्ता प्रचारासाठी कार्य करावे म्हणून प्रार्थना करू या.

प्रार्थना :हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या आज्ञेत राहून आमची कर्तव्ये व जबाबदारी  नीष्ठेने पार पाडण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या