Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bible Reading | Monday 2nd June 2025 |7th week of Easter

पुनरुत्थान सातवा   सप्ताह  

सोमवार  दि. २ मे  २०२५ 

 तरी मी एकटा नाही, कारण पिता माझ्याबरोबर आहे.

Yet I am not alone, for the Father is with me.

✝️



संत मार्सेलिनस व पीटर सण
- रक्तसाक्षी (३०४)

डायक्लोशियन या क्रूर सम्राटाच्या काळात मार्सेलिनस नावाचे धर्मगुरू कार्य करीत होते. पीटर ह्याला दुष्टात्मा निवारणाचे अद्भुत सामर्थ्य लाभलेले होते. या दोघांना सम्राटाने त्यांच्या श्रद्धेपायी तुरुंगात टाकले होते. त्या तुरुंगात अनेक ख्रिस्ती लोक आपल्या श्रद्धेपायी दुःख वेदना सहन करीत होते. मार्सेलिनस आणि पीटर ह्यांनी तुरुंगातील लोकांना ख्रिस्ती शिकवणुकीचे धडे दिले. त्याचा परिणाम असा झाला की हे कैदी आनंदाने आपली शिक्षा भोगू लागले ते पाहून आर्थिमिऊस हा तुरुंगाधिकारीसुद्धा ख्रिस्ती झाला.
पीटर व मार्सेलिनस ह्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. तुरुंगातील कैद्यांकडून प्रतिकार होऊ नये म्हणून दोघांना सिल्वा नायाग्रा नामक जंगलात नेण्यात आले. तिथे त्यांच्या मारेकऱ्यांनी त्यांच्या खाचा आधीच तयार ठेवलेल्या होत्या. कोणत्याही ख्रिस्ती व्यक्तींना त्यांची थडगी मिळू नयेत म्हणून त्यांना गुपचूप खाचेत लोटून देण्यात आले व त्यावर माती टाकण्यात आली. मात्र पुढे एक मजेदार गोष्ट घडून आली. ह्या दोन रक्तसाक्ष्यांच्या मारेकऱ्यांचेच परिवर्तन होऊन ते ख्रिस्ती झाले व त्यांनीच ह्या खाचा सर्व ख्रिस्ती लोकांना दाखविल्या.
पुढे लुसिला आणि फर्मिना या दोन देवभक्त स्त्रियांनी त्यांचे अवशेष व्यवस्थितपणे जतन करून व्हिया लॅव्हिकाना येथे पुरले. कॉन्स्टन्टाईन राजाच्या परिवर्तनानंतर त्याने ह्या संतांच्या थडग्यांवर महामंदिर बांधले व आपली आई संत हेलेना (सण १८ ऑगस्ट) हिला त्यामध्ये पुरले.

प्रभू येशू आपल्या अस्वस्थ शिष्यांना आजच्या शुभवर्तमानात सांगत आहे, 'देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा.' गोंधळलेल्या स्थितीत असलेल्या शिष्यांना व आपल्या सर्वांना प्रभू येशू आज सांगत आहे. ‘विश्वास ठेवा’. देवावरील आणि प्रभू येशूवरील विश्वासाने आपण सार्वकालिक जीवनात प्रवेश मिळवू शकतो,जो कोणी त्याच्यावर विश्वास | • ठेवून त्याला अनुसरतो त्याला जीवनाचे 'सत्य' कळते आणि आपण खऱ्या  अर्थाने प्रभूच्या सार्वकालिक जीवनाचे सहभागीदार बनतो.

पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये १९:१-८
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
 “तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हांस पवित्र आत्मा मिळाला काय ?"
अपुल्लो करिंथ येथे असता पौल वरच्या प्रांतांमधून जाऊन इफिस येथे पोहचला. तेथे कित्येक शिष्य त्याला आढळले. त्यांना तो म्हणाला, "तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हांस पवित्र आत्मा मिळाला काय ?" त्यांनी त्याला म्हटले, “पवित्र आत्मा आहे की काय हे आम्ही ऐकलेही नाही." तो त्यांना म्हणाला, "मग तुम्ही कसला बाप्तिस्मा घेतला ?" ते म्हणाले, “योहानचा बाप्तिस्मा" पौलने म्हटले, "योहान पश्चात्तापाचा बाप्तिस्मा देत असे, तो लोकांना सांगत असे की, माझ्यामागून येणाऱ्यावर म्हणजे येशूवर तुम्ही विश्वास ठेवावा." हे ऐकून त्यांनी प्रभू येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेतला आणि पौलने त्यांच्यावर हात ठेवले, तेव्हा त्यांच्यावर पवित्र आत्मा आला; ते वेगवेगळ्या भाषा बोलू लागले आणि ईश्वरी संदेश देऊ लागले. ते सगळे सुमारे बारा पुरुष होते. नंतर तो सभास्थानात जाऊन देवाच्या राज्याविषयी वादविवाद करीत आणि प्रमाण पटवीत निर्भीडपणे तीन महिने बोलत गेला.
प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Acts 19:1-8

While Apollos was at Corinth, Paul passed through the inland country and Came to Ephesus. There he found some disciples. And he said to them, "Did you receive the Holy Spirit when you believed?" And they said "No, we have not even heard that there is a Holy Spirit." And he said, "Into what then were you baptised?" They said, "Into John's baptism." And Paul said, "John baptised with the baptism of repentance, telling the people to believe in the one who was to come after him, that is, Jesus." On hearing this, they were baptised in the name of the Lord Jesus. And when Paul had laid his hands on them, the Holy Spirit came on them, and they began speaking in tongues and prophesying. There were about twelve men in all. And he entered the synagogue and for three months spoke boldly, reasoning and persuading them about the kingdom of God.

This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ६८:२-७
प्रतिसाद : अहो पृथ्वीवरील राष्ट्रांनो, तुम्ही देवाचे गीत गा.

१) देवाने उठावे, त्याच्या वैऱ्यांची दाणादाण होवो.
त्याचा द्वेष करणारे त्याच्यापुढून पळोत.
जसा धूर फाकतो तशी त्यांची फाकाफाक कर; 
जसे मेण अग्नीपुढे ठेवले असता वितळते 
तसे दुष्ट देवापुढे नष्ट होवोत.

२. )परंतु धार्मिक हर्षोत, देवापुढे आनंदोत्सव करोत, 
हर्षामुळे आनंद करोत. देवाचे गीत गा, 
त्याच्या नामाचे स्तवन करा. त्याच्यापुढे आनंदोत्सव करा.

३) पितृहीनांचा पिता, विधवांचा कैवारी 
असा देव आपल्या पवित्र निवासस्थानी आहे. 
एकटे असलेल्यांना देव कुटुंबवत्सल करतो, 
बंदिवानांना बाहेर काढून भाग्यवान करतो.

Psalm 60:2-1, 4-5ac, 6-7ab

You kingdoms of the earth, sing to God. 
Let God arise, let his foes be scattered. 
Let those who hate him flee from his presence. 
As smoke is driven away, so drive them away, 
like was that melts before the fire, 
so the wicked shall perish at the presence of God. R 

But the just shall rejoice
at the presence of God;
they shall exult with glad rejoicing.
 O sing to God, make music to his name.
The Lord is his name; exult at his presence.

Father of orphans, defender of widows:
such is God in his holy place.
God gives the desolate
a home to dwell in:
 he leads the prisoners forth into prosperity: R

जयघोष  
आलेलुया, आलेलुया! 
जा, सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा. युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुम्हांबरोबर आहे.
आलेलुया !

Acclamation: 
  If then you have been raised with Christ, seek the things that are above, where Christ in seated at the right hand of God.

शुभवर्तमान   योहान १६:२९-३३
वाचक :  योहानलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

   “धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. "
येशूचे शिष्य त्याला म्हणाले, "पाहा, आता आपण उघड बोलता, अन्योक्तीने काही सांगत नाही. आता आम्हांला कळले आहे की, आपल्याला सर्व काही कळते आणि कोणी आपणाला विचारावे ह्याची आपणाला गरज नाही; ह्यावरून आपण देवापासून आला आहा असा आम्ही विश्वास धरतो." येशूने त्यांना उत्तर दिले, “आता तुम्ही विश्वास धरता काय? पाहा, अशी वेळ येत आहे, किंबहुना आली आहे, की तुमची दाणादाण होऊन तुम्ही सर्व आपआपल्या घरी जाल आणि मला एकटे सोडाल; तरी मी एकटा नाही, कारण पिता माझ्याबरोबर आहे. माझ्या ठायी तुम्हांला शांती मिळावी म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील, तरी धीर धरा; मी जगाला जिंकले आहे."
 "प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:John 16:29-33
At that time: The disciples said to Jesus, "Ah, now you are speaking plainly and not using figurative speech! Now we know that you know all things and do not need anyone to question you this is why we believe that you came from God." Jesus answered them, "Do you now believe! Behold, the hour is coming, indeed it has come, when you will be scattered, each to his own home, and will leave me alone. Yet I am not alone, for the Father is with me. I have said these things to you, that in me you may have peace. In the world you will have tribulation. But take heart; I have overcome the world.
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ 
                                                 
चिंतन:आजच्या पहिल्या वाचनात येशूवर विश्वास ठेवून त्याच्या नावाने ज्यांनी बाप्तिस्मा घेतलात्यांना पवित्र आत्म्याचे सामर्थ्य प्राप्त झाले व ते निरनिराळी भाषा बोलू लागले, देवाचा संदेश देऊ लागले, परमेश्वराच्या राज्याविषयी निर्भीडपणे लोकांना सांगू लागले ह्याविषयी आपल्याला सांगण्यात आले आहे. ह्याद्वारे संत पॉल आपल्या निदर्शनास आणून देत आहेत की केवळ ख्रिस्तावर विश्वास ठेवून बाप्तिस्मा घेतल्याने आपल्याला परिपूर्ण जीवन लाभत नाही. तर ख्रिस्ताठायी परिपूर्ण जीवन हे केवळ पवित्र आत्म्याच्या देणगीमुळेच प्राप्त होऊ शकते. शुभवर्तमानात येशूचे शिष्य इतके दिवस त्याच्या संगतीत राहून व त्याच्या सहवासात घालवूनही लवकरच त्याला सोडून सर्वत्र विखुरले जातील ह्याविषयी सांगितले आहे. वास्तविक शिष्यांचे असे सर्वत्र विखुरले जाणे हे सुवार्तेच्या प्रसारासाठी जगाच्या कानाकोपऱ्यात जाणे ह्या अर्थाने आहे. म्हणूनच, सुवार्ताप्रसाराच्या कठीण कार्यासाठी केवळ विश्वास असून भागणार नाही तर पवित्र आत्म्याचे वरदानही आवश्यक असेल ह्याची तो त्यांना जाणीव करून देतो. तसेच, ह्या कार्यात पवित्र आत्म्याच्या रुपात तो नेहमी त्यांच्या सोबत राहून मार्गदर्शन करणार आहे असे आश्वासन देत त्यांना शांती बहाल करतो व निश्चित करतो. येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेतलेले व दृढीकरण साक्रामेंताद्वारे पवित्र आत्म्याचा लाभ घडलेले आपण त्याचे अनुयायी म्हणून सुवार्ता प्रसाराचे कार्य हे आपले आद्य कर्तव्य ठरते. आजच्या काळात व प्रतिकल प्ररिस्थितीत ख्रिस्तावरील आपल्या श्रद्धेत डळमळीत न होता परमेश्वराला अपेक्षित असलेले कार्य करण्यास पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने त्याने आपल्याला सबळ व सक्षम करावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

प्रार्थना :  हे प्रभू येशू, तूच एकमेव जगाचा राजा आहेस, तुझी साक्ष इतरांना देण्यास आम्हाला धैर्याचा आत्मा बहाल कर, आमेन.


                    पवित्र आत्म्याचा नोव्हेना प्रार्थना

हे माझ्या परमेश्वरा । पवित्र आत्म्या आम्ही तुला नमन करतो, आम्ही तुझ्याशिवाय काहीही करू शकत नाहीत, । हे तुझ्या दैवी उपस्थितीत आम्ही मान्य करतो हे पवित्र आत्म्या । महान कैवारी, तू गरीबांचा पिता आहेस. तू उत्कृष्ट सांत्वनकर्ता आहेस आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त । ह्याने आश्वासन दिले होते की मी तुम्हास अनाथ असे सोडणार नाही हे पवित्र आत्म्या आम्ही परमेश्वराच्या प्रेमास अपात्र आहोत । तू प्रभू येशूची आई मरिया व पहिल्या शिष्यांवर पेन्टेकॉस्टच्या दिवशी अवतरलास । व त्यांना तुझ्या दानांनी भरलेस! हे पवित्र आत्म्या त्याच दयेने व दानशूरतेने । त्या दानांचा आम्हावर वर्षाव कर आमच्या अंतःकरणात तुला पसंत नसलेले असे सर्व नष्ट कर व त्यात येऊन तू वस्ती कर आमच्या शाश्वत चांगुलपणासाठी असलेल्या गोष्टी आम्हाला स्पष्ट दिसाव्यात व समजाव्यात म्हणून आमचे मन तुझ्या दैवी प्रकाशाने । उल्हसित कर. हे पवित्र आत्म्या । आमचे अंत:करण । तुझ्या शुध्द प्रेमाने भर । विविध बंधनात जखडून ठेवणाऱ्या आसक्ती आमच्या हृदयातून काढून टाक आम्हाला प्रभू येशूच्या प्रेमाने भर । परमेश्वरी इच्छेला आमच्या जीवनात प्राधान्य असावे । म्हणून पवित्र आशा-आकांक्षांनी जगण्यास आम्हाला प्रेरणा दे । नम्रता, विरक्ती, आज्ञाधारकपणा व ऐहिक जगाच्या मोहापासून दूर राहण्याचा प्रभू येशूने घालून दिलेला आदर्श आमच्या जीवनात व कृतीत उतरविण्यास आम्हाला कृपा दे. । आमेन!

आमच्या स्वर्गीय बापा व तीन नमो मरिया