Marathi Bible Reading | Tuesday 3rd June 2025 |7th week of Easter

पुनरुत्थान सातवा   सप्ताह  

मंगळवार  दि. ३ मे  २०२५ 

 तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हांला निवडले आणि तुम्हांला नेमले आहे.You did not choose me, but I chose you and appointed you that you should go and bear fruit

✝️



युगांडाचे रक्तसाक्षी
चार्ल्स ल्वांगा, जोसेफ कासा आणि त्यांचे सहकारी
(१८८६-१८८७)

अप्पर नीलच्या प्रदेशातील जमातींमध्ये १८८७ सालापासून ख्रिस्ती मिशनऱ्यांनी आपले मिशनकार्य सुरू केलेले होते. त्यानंतरच्या पुढच्या वर्षातील इस्टर जागरणविधीच्या वेळी पहिले काही स्नानसंस्कार पार पडले. ह्या नवसंस्कारितांमध्ये पूर्वी इस्लाम धर्मातून प्रॉस्टेस्टंट पंथामध्ये आलेले काही स्त्री पुरुष होते. ह्या वाढत्या कॅथलिक धर्मप्रसाराला रोखून धरण्यासाठी १८८६ साली अरब व प्रॉटेस्टंट पंथातील काहींनी राजा म्वांगा ह्याला चिथावले. त्याने जोसेफ कासा आणि मारूंबा ह्या प्रमुख मिशनऱ्यांची हत्या घडवून आणली.
    आजच्या दिवशी ख्रिस्तसभा युगांडातील प्रारंभीच्या ख्रिस्ती लोकांमध्ये श्रद्धेची जोपासना करणाऱ्या व त्यासाठी क्रूर अशा छळवादाला मिठी मारणाऱ्या १३ ते ३० वर्षे वयातील २२ निग्रो मुले व युवक ह्यांचा सन्मान करते. या २२ जणांपैकी १३ जणांना जिवंत जाळण्यात आले. काहींना ३ जून १८८६ मध्ये ठार करण्यात आले.
        हे २२ आफ्रिकन निग्रो इ. स. १९२० साली प्रथम धन्यवादित म्हणून घोषित करण्यात आले. ह्या २२ जणांव्यतिरिक्त ८० इतर जण ह्या छळामध्ये केले गेले. ह्या सर्व युगांडाच्या रक्तसाक्षींना २२ जून १९६४ साली पोप पॉल सहावे ह्यांनी संतपद बहाल केले. 
चिंतन : “रक्तसाक्ष्यांना साखळदड बांधण्यात आले. तुरुंगात टाकण्यात आले, त्यांना फटके मारण्यात आले, जाळण्यात आले, त्यांना अक्षरशः कांपण्यात आले तरी त्यांची संख्या वाढतच राहिली.” - संत अगस्तीन


पहिले वाचन   प्रे. कृ.  २०: १७-२७
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन   
" मी माझी दौड आणि सुवार्ता सांगण्याची सेवा जी मला प्रभू येशूपासून प्राप्त झाली आहे ती शेवटास नेली आहे. "

पौलने मिलेताहून इफिस येथे निरोप पाठवून मंडळींच्या वडीलजनांना बोलावून घेतले. ते त्याच्याजवळ आल्यावर त्याने त्यांस म्हटले :
“मी आशिया प्रांतात पहिल्याने पाऊल टाकल्या दिवसापासून तुम्हांबरोबर नेहमी कसा होतो, म्हणजे फार नम्रतेने, आसवे गाळीत आणि यहुद्यांच्या कटामुळे माझ्यावर आलेली संकटे सोशीत मी प्रभूची सेवा कशी केली, हे तुम्हांला ठाऊक आहे. जे हितकारक ते तुम्हांला सांगण्यात आणि चार लोकांत आणि घरोघर शिकवण्यात मी कसूर केली नाही. पश्चात्ताप करून देवाकडे वळणे आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे ह्यासंबंधाने यहुदी आणि हेल्लेणी ह्यांना मी साक्ष देत होतो. पण आता पाहा, मी अंतर्यामी बद्ध होऊन येरुशलेमात जात आहे, तेथे मला काय काय होईल ते माहीत नाही; केवळ इतके कळते की, बंधने आणि संकटे माझी वाट पाहत आहेत; ह्याविषयी पवित्र आत्मा मला नगरोनगरी साक्ष देत आहे. मी तर आपल्या प्राणाची किंमत एवढीसुद्धा करीत नाही, ह्यासाठी मी आपली धाव आणि देवाच्या कृपेची सुवार्ता निश्चितार्थाने सांगण्याची जी सेवा मला प्रभू येशूपासून प्राप्त झाली आहे ती शेवटास न्यावी, आणि आता पाहा, ज्यांच्यामध्ये मी राज्याची घोषणा करीत फिरलो त्या तुम्हा कोणाच्याही दृष्टीस माझे तोंड पुन्हा पडणार नाही, हे मला ठाऊक आहे. म्हणून आजच्या दिवशी मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की, मी सर्वांच्या रक्ताविषयी निर्दोष आहे, कारण देवाचा संपूर्ण मनोदय तुम्हांला सांगण्यास मी कसूर केली नाही.”
प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Acts 20: 17-27
And sending from Miletus to Ephesus, he called the ancients of the church. And when they were come to him, and were together, he said to them: You know from the first day that I came into Asia, in what manner I have been with you, for all the time, Serving the Lord with all humility, and with tears, and temptations which befell me by the conspiracies of the Jews; How I have kept back nothing that was profitable to you, but have preached it to you, and taught you publicly, and from house to house, Testifying both to Jews and Gentiles penance towards God, and faith in our Lord Jesus Christ. And now, behold, being bound in the spirit, I go to Jerusalem: not knowing the things which shall befall me there: Save that the Holy Ghost in every city witnesseth to me, saying: That bands and afflictions wait for me at Jerusalem. But I fear none of these things, neither do I count my life more precious than myself, so that I may consummate my course and the ministry of the word which I received from the Lord Jesus, to testify the gospel of the grace of God. And now behold, I know that all you, among whom I have gone preaching the kingdom of God, shall see my face no more.
 Wherefore I take you to witness this day, that I am clear from the blood of all men; For I have not spared to declare unto you all the counsel of God.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ६८:१०-११,२०-२१

प्रतिसाद : पृथ्वीवरील राष्ट्रांनो, देवाचे गीत गा. 

१) हे देवा, तू विपुल पाऊस पाठवून दिलास;
तुझे वतन कोमेजले होते 
तेव्हा तू ते यथास्थित केले. 
त्यात तुझी मंडळी राहिली; 
हे देवा, तू आपल्या चांगुलपणाने दीनांसाठी बेगमी केली. 

२) प्रभूचा धन्यवाद होवो, 
तो प्रतिदिनी आमचा भार वाहतो; 
देव हा आमचे तारण आहे, 
हा आमचा देव आम्हाला संकटातून मुक्त करणारा आहे
 मृत्यूपासून सुटण्याचे मार्ग दाखवणे 
हे प्रभू जो परमेश्वर त्याच्याकडे आहे.

 Psalms 68: 10-11, 20-21
R. (33a) Sing to God, O kingdoms of the earth.

10 Thou shalt set aside for thy inheritance a free rain, O God: and it was weakened, but thou hast made it perfect.
11 In it shall thy animals dwell; in thy sweetness, O God, thou hast provided for the poor.
R. Sing to God, O kingdoms of the earth.

20 Blessed be the Lord day by day: the God of our salvation will make our journey prosperous to us.
21 Our God is the God of salvation: and of the Lord, of the Lord are the issues from death.
R. Sing to God, O kingdoms of the earth.

जयघोष  
आलेलुया, आलेलुया! 
मी पित्यापासून निघून जगात आलो आहे; पुन्हा जग सोडून पित्याकडे जात आहे.
आलेलुया!

Acclamation: 
 Alleluia:
R. Alleluia, alleluia.
I will ask the Father and he will give you another Advocate to be with you always.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान   योहान  १७:१-११
वाचक :  योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 "बापा, तू आपल्या पुत्राचा गौरव कर.'

येशू वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, “हे माझ्या बापा, वेळ आली आहे; पुत्राने तुझा गौरव करावा म्हणून तू आपल्या पुत्राचा गौरव कर. जे तू त्याला दिले आहेत त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे, म्हणून तू मनुष्यमात्रावर त्याला अधिकार दिला आहे. सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला आणि ज्याला तू पाठवले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. जे काम तू मला करावयास दिले ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझा गौरव केला आहे. तर आता हे माझ्या बापा, जग होण्यापूर्वी जो माझा गौरव तुझ्याजवळ होता त्याच्यायोगे तू आपणाजवळ माझा गौरव कर."
"जे लोक तू मला जगातून दिले त्यांना मी तुझे नाव प्रकट केले, ते तुझे होते आणि तू ते मला दिले आणि त्यांनी तुझे वचन पाळले आहे. आता त्यांना समजले आहे की, जे काही तू मला दिले आहे ते सर्व तुझ्यापासून आहे. कारण जी वचने तू मला दिली ती मी त्यांना दिली आहेत, ती त्यांनी स्वीकारली; मी तुझ्यापासून आलो हे त्यांनी खरोखर ओळखले आणि तू मला पाठवले असा त्यांनी विश्वास ठेवला. त्यांच्यासाठी मी विनंती करतो. मी जगासाठी विनंती करीत नाही, तर जे तू मला दिले आहेत त्यांच्यासाठी करतो. कारण ते तुझे आहेत. जे माझे ते सर्व तुझे आहे आणि जे तुझे ते माझे आहे आणि त्यांच्या ठायी माझा गौरव झाला आहे. ह्यापुढे मी जगात नाही, मी आता तुझ्याकडे येत आहे."
 "प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading: John 17: 1-11a
These things Jesus spoke, and lifting up his eyes to heaven, he said: Father, the hour is come, glorify thy Son, that thy Son may glorify thee. As thou hast given him power over all flesh, that he may give eternal life to all whom thou hast given him. Now this is eternal life: That they may know thee, the only true God, and Jesus Christ, whom thou hast sent. I have glorified thee on the earth; I have finished the work which thou gavest me to do.And now glorify thou me, O Father, with thyself, with the glory which I had, before the world was, with thee. I have manifested thy name to the men whom thou hast given me out of the world. Thine they were, and to me thou gavest them; and they have kept thy word. Now they have known, that all things which thou hast given me, are from thee: Because the words which thou gavest me, I have given to them; and they have received them, and have known in very deed that I came out from thee, and they have believed that thou didst send me. I pray for them: I pray not for the world, but for them whom thou hast given me: because they are thine: And all my things are thine, and thine are mine; and I am glorified in them. And now I am not in the world, and these are in the world, and I come to thee.
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ 
                                                 
चिंतन:एखाद्या जागेचा, परिसराचा किंवा जवळच्या व्यक्तीचा निरोप घेतेवेळी साहजिकच आपल्या मनाची घालमेल होते. बहुधा ह्याचे कारण भविष्याविषयीची अनिश्चितता व मागे सोडून चाललेल्यांविषयी काळजी हेच असते. आजची दोन्ही वाचने ही ह्याच मानवी भावनांचे प्रतिबिंब आहे. इफिशियन भागातील कार्य आटोपून संत पॉल जेव्हा जेरूसलेमला जायला निघाले आहेत तेव्हा तिथे पुढे काय वाढून ठेवले आहे ह्याची त्यांना एव्हाना पूर्वकल्पना आली होती. तर प्रभू येशू ख्रिस्तही पित्याकडे परतण्याची त्याची वेळ जवळ आलेली आहे हे जाणून आहे. म्हणूनच आजवर केलेल्या कार्याचा आढावा घेत ज्यांच्यावर उवर्रित कार्य सोपवले आहे त्यांविषयी काळजी व्यक्त करीत आहे व परमेश्वर पित्याकडे त्यांच्यासाठी प्रार्थना करीत आहे. दोन्ही वाचनांचे सार हेच आहे की परमेश्वरानेआपल्या प्रत्येकावर काही विशिष्ट कार्य व जबाबदारी सोपवलेली आहे. संत पॉल व खुद्द प्रभू येशूख्रिस्ताने त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी यथाशक्ती पार पाडलेली आहे. ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून आमच्यावर सोपवलेली जबाबदारी आपण आजवर पार पाडली आहे का? ह्यापुढे ती विशिष्ट जबाबदारी ओळखून ती पार पाडण्यासाठी झटणार आहोत का?

प्रार्थना :  हे प्रभू परमेश्वरा, सर्वकालिक जीवन देणारी वचने जाणून तुला । ओळखण्यास व तुझ्या वचनाप्रमाणे आचरण करण्यास आम्हाला कृपा आमेन.


                    पवित्र आत्म्याचा नोव्हेना प्रार्थना

हे माझ्या परमेश्वरा । पवित्र आत्म्या आम्ही तुला नमन करतो, आम्ही तुझ्याशिवाय काहीही करू शकत नाहीत, । हे तुझ्या दैवी उपस्थितीत आम्ही मान्य करतो हे पवित्र आत्म्या । महान कैवारी, तू गरीबांचा पिता आहेस. तू उत्कृष्ट सांत्वनकर्ता आहेस आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त । ह्याने आश्वासन दिले होते की मी तुम्हास अनाथ असे सोडणार नाही हे पवित्र आत्म्या आम्ही परमेश्वराच्या प्रेमास अपात्र आहोत । तू प्रभू येशूची आई मरिया व पहिल्या शिष्यांवर पेन्टेकॉस्टच्या दिवशी अवतरलास । व त्यांना तुझ्या दानांनी भरलेस! हे पवित्र आत्म्या त्याच दयेने व दानशूरतेने । त्या दानांचा आम्हावर वर्षाव कर आमच्या अंतःकरणात तुला पसंत नसलेले असे सर्व नष्ट कर व त्यात येऊन तू वस्ती कर आमच्या शाश्वत चांगुलपणासाठी असलेल्या गोष्टी आम्हाला स्पष्ट दिसाव्यात व समजाव्यात म्हणून आमचे मन तुझ्या दैवी प्रकाशाने । उल्हसित कर. हे पवित्र आत्म्या । आमचे अंत:करण । तुझ्या शुध्द प्रेमाने भर । विविध बंधनात जखडून ठेवणाऱ्या आसक्ती आमच्या हृदयातून काढून टाक आम्हाला प्रभू येशूच्या प्रेमाने भर । परमेश्वरी इच्छेला आमच्या जीवनात प्राधान्य असावे । म्हणून पवित्र आशा-आकांक्षांनी जगण्यास आम्हाला प्रेरणा दे । नम्रता, विरक्ती, आज्ञाधारकपणा व ऐहिक जगाच्या मोहापासून दूर राहण्याचा प्रभू येशूने घालून दिलेला आदर्श आमच्या जीवनात व कृतीत उतरविण्यास आम्हाला कृपा दे. । आमेन!

आमच्या स्वर्गीय बापा व तीन नमो मरिया

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या