Marathi Bible Reading | 18th week in ordinary Time| Monday 4th August 2025

सामान्यकाळातील १८ वा सप्ताह 

सोमवार दिनांक ४ ऑगस्ट  २०२५

मग ते सर्व जेवून तृप्त झाले .  

And they all ate and were satisfied. 


सर्व धर्मगुरूंचा आश्रयदाता
 संत जॉन मारी वियानीचा सण 

-वर्तनसाक्षी (१७८६-१८५९)


संपूर्ण जगभरच्या ख्रिस्तसभेने गौरविलेला आणि प्रमुख धर्मगुरूंचा आश्रयदाता म्हणून सन्मानित करण्यात आलेला संत जॉन मारी वियानी हा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि धर्मगुरूविरोधी वातावरणात जन्माला आला. त्यावेळी युरोपात फ्रेंच राज्यकर्त्यांनी आणि नेपोलियन बोनापार्ट ह्यांच्या कारवायांनी जनजीवन संपूर्णत: विस्कळित केलेले होते.
फ्रान्समधील अत्यंत धार्मिक मातापित्यांच्या पोटी जन्म घेतलेल्या जॉन मारी वियानीचे शिक्षण कसेबसे आटोपलेले होते. वयाच्या १३ व्या वर्षी एका शेतात पेंढ्याच्या गंजीआड लपवून त्याला प्रथम ख्रिस्तशरीर संस्कार देण्यात आलेला होता. प्राथमिक शिक्षण अर्धवट झालेले असल्यामुळे त्याला गुरु विद्यालयातील शिक्षण करताना बऱ्याचशा अडचणींना तोंड द्यावे लागले. केवळ त्याच्या आध्यात्मिक सल्लागारांच्या सूचनेवरून, त्याच्या वैयक्तिक प्रार्थना व श्रद्धेच्या बाबतीत त्याने गाठलेल्या उंचीमुळे इ. स. १८१५ साली त्याने दीर्घकाळ अपेक्षिलेले धर्मगुरूपद त्याला प्राप्त झाले.
तीन वर्षानंतर त्याला आर्स नावाच्या एका खेड्यात सहाय्यक धर्मगुरू म्हणून पाठविण्यात आले. त्यांची नेमणूक करताना व्हिकर जनरल म्हणाले, 'हे बघा फा. जॉन, त्या धर्मग्रामात देवाविषयी फारसा उत्साह आणि ओढ लोकांना वाटत नाही. तुम्ही नक्कीच त्यांच्यात देवा-धर्माविषयी आवड निर्माण कराल अशी माझी खात्री आहे.' व्हिकर जनरलनी सांगितल्याप्रमाणे आर्स खेड्यामध्ये राहणारे खेडूत आणि शेतकरी आध्यात्मिक व नैतिक दृष्ट्या खरोखरच मागासलेले होते. व्यसनाधीनता आणि ओंगळवाणे नाच-गाणे ह्यामुळे त्यांच्या जीवनात बऱ्याच अपप्रवृत्तींनी नुसता धुमाकूळ घातलेला होता.
फा. जॉन मारी वियानी दररोज शांतपणे आपल्या धर्मग्रामातील आजारी आणि गोरगरीब ह्यांना भेटी देऊ लागले. आपल्या धर्मग्रामातील लोकांचे नैतिक अधःपतन पाहून ते अस्वस्थ झाले. लोकांच्या परिवर्तनासाठी तासन्तास गुडघ्यांवर ते अतिपवित्र साक्रामेंतासमोर प्रार्थना करू लागले. त्यांच्या वतीने आपल्या शरीराला कष्ट देऊ लागले. सर्व प्रकारचा त्याग, प्रायश्चित्त आणि आत्मक्लेश ते करू लागले. आपल्या प्रवचनांमधून ते दैनंदिन जीवनात ख्रिस्ती धर्माचे पालन कसे करावे ते साध्या सोप्या भाषेत व अनेक उदाहरणांनी आपल्या भाविकांना पटवून देऊ लागले.
 फा. जॉन ह्यांनी लोकांच्या आध्यात्मिक जडणघडणीसाठी अतिपवित्र साक्रामेंताची भक्ती करणाऱ्यांचा एक संघदेखील सुरू केला. परंतु ह्या सर्वांचा कळस म्हणजे कुमसाराच्या वेळी फा. जॉन ह्यांनी पश्चात्तापी भाविकांना केलेले मोलाचे मार्गदर्शन !
त्यांच्या मते, "जे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने जीवन जगतात त्यांना परमेश्वर आपले मार्ग व शहाणपण प्रकट करीत असतो. त्यामुळेच बऱ्याच अडाणी लोकांना ज्ञानी व विचारवंतांपेक्षा चांगले जीवन जगताना आपण पाहतो."
हळूहळू आपल्या पश्चात्तापी भाविकांची अंत:करणे जाणण्याचे सामर्थ्य फा. जॉन ह्यांना प्राप्त झाले. एखाद्या व्यक्तीने कुमसारात कुठले जरी पाप लपवून ठेवले तरी फा. जॉन त्या भाविकाला त्या पापाची आठवण करून देत. भविष्याचा अचूक वेध घेण्याची क्षमतादेखील त्यांच्याठायी कार्यरत झालेली होती. पुढे तर रोगी लोकांना ते केवळ आपल्या एका स्पर्शाने बरे करीत असत.
 आर्स गावाची नैतिक व आध्यात्मिक प्रगती झालीच; परंतु आता फा. जॉन ह्यांची कीर्ती ऐकून युरोपभरचे लोक तिथे येऊ लागले. त्यामुळे फ्रेंच सरकारनेलियॉन्स रेल्वे स्टेशनवर आर्ससाठी एक खास तिकीट खिडकी उघडली. पाच जादा बसेस सुरू केल्या.
फा. जॉन मारी वियानी दिवसाला १४ ते १८ तास कुमसारासाठी बसू लागले. उन्हाळ्यातील उकाडा आणि हिवाळ्यातील कडाक्याची थंडी फा. जॉन ह्यांना आपल्या भाविकांविषयीच्या तळमळीपासून परावृत्त करू शकली नाही. कधी कधी ते रात्री एक वाजेपर्यंत कुमसाराला बसत. तब्बल २० वर्षे जवळ जवळ २ दशलक्ष लोकांना त्यांनी प्रायश्चित्त संस्कार दिला असावा. त्यात कार्डिनल्स, बिशप्स, धर्मगुरू, व्रतस्थ, सामान्य जनता अशा जीवनातल्या सर्व स्तरातील लोकांचा समावेश होता. आजारी, वृद्ध, अपंग, निराधार ह्यांनादेखील ते मार्गदर्शन करीत. आरोग्यदान देत. हे त्यांचे प्रेषितकार्य त्यांना अधिक प्रभावीपणे करता यावे म्हणून बिशपांनी त्यांना धर्मगुरूंच्या वार्षिक (तपसाधनेपासून) रिट्रीटपासून खास सूट दिलेली होती.

उत्साह, कळकळ, तळमळ, नम्रता, सहनशीलता, गरिबीचे व्रत आणि उद्योगप्रियता अशा विविध गुणांनी संपन्न असलेल्या फा. जॉन ह्यांची शरीरयष्टी मात्र किरकोळ स्वरूपाची होती. ४० वर्षे केवळ उकडलेली बटाटी खाणे, सैतानी हल्ल्यांचा प्रतिकार करणे, बेसुमार जागरण करणे अशा अवस्थेत घालविल्यामुळे त्यांची प्रकृती आणखी खालावली.
त्यांच्या या सेवाकार्यामुळे ख्रिस्तसभेने त्यांच्या हयातीतच त्यांचा सन्मान केला. फ्रेंच सरकारने त्यांना 'ए नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर' हा किताब देऊन गौरविले. फा जॉन ४ ऑगस्ट १८५९ साली स्वर्गवासी झाले आणि पोप पायस अकरावे ह्यांनी इ.स. १९२५ साली त्यांना संत म्हणून सन्मानित केले.
चिंतन : देवाला अर्पण केल्याशिवाय आपण ज्या गोष्टी करतो त्या पूर्णपणे व्यर्थ होतात. संत जॉन मारी वियानी

ख्रिस्तसभा आज धर्मगुरुंचा आश्रयदाता संत जॉन वियात्री ह्यांचा सन्मान  करीत आहे. गरीबीचे व्रत घेऊन संत जॉन वियात्री ह्यांनी श्रद्धावंतांना खऱ्या ख्रिस्ती जीवनाची ओळख करून दिली. ह्या महान संताचा आदर्श आपल्या सर्वांना प्रेरणादायी ठरावा.
.
पहिले वाचन : गणना ११:४-१५
वाचक :गणना या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"माझ्या एकट्याच्याने ह्या सर्व लोकांचा भार सहन होत नाही.'
इस्राएल लोकही पुन्हा रडगाणे चालवून म्हणाले, “आम्हांला खायला मांस कोण देईल ? इजिप्त देशात आम्हाला मासे अगदी फुकट खावयाला मिळत त्याची आम्हांस आठवण होते; त्याचप्रमाणे काकड्या, खरबूजे, शाकभाजी, कांदे, लसूण, यांचीही आम्हांला आठवण होते; पण आता आमचा जीव सुकून गेला आहे, येथे काहीच नाही; येथे पाहावे तो ह्या मान्नाखेरीज काही एक दृष्टीस पडत नाही." हा मान्ना धण्यासारखा असून त्याचा रंग मोत्याच्या रंगासारखा होता. लोक चोहोकडे फिरून तो जमा करीत आणि जात्यात दळीत किंवा उखळात कुटीत आणि मग भांड्यात शिजवून त्याच्या भाकरी करीत; तेलात तळलेल्या पुरीसारखी त्याची चव असे. रात्री तळावर दव पडले म्हणजे त्याबरोबर मान्ना पडत असे.सर्व कुटुंबातील लोक आपआपल्या तंबूंच्या दाराशी येऊन रडत आहेत आणि त्यांच्यावर परमेश्वराचा कोप फार भडकला आहे, हे मोशेने ऐकले तेव्हा त्याला फार वाईट वाटले. मोशे परमेश्वराला म्हणाला “तू आपल्या दासाला दुःख का देत आहेस? तू या सर्व लोकांचा भार माझ्यावर घालत आहेस, यावरून तुझी माझ्यावर कृपादृष्टी नाहीशी दिसते, असे का? तू मला सांगतोस की, जसा पिता तान्या बाळाला वाहून नेतो तसे तू त्यांना त्यांच्या पूर्वजांना मी शपथपूर्वक देऊ केलेल्या देशाप्रत आपल्या उराशी धरून घेऊन जा; तर मी या सर्व लोकांचे गर्भधारण केले आहे. काय? या सर्वांना मी प्रसवलो आहे काय ? या सर्व लोकांना पुरेल एवढे मांस मी कोठून आणू ? ते माझ्याकडे रडगाणे करत आहेत की, आम्हांला खावयास मांस दे. माझ्या एकट्याच्याने ह्या सर्व लोकांचा भार सोसवत नाही; तो मला अतिशय जड जात आहे. माझ्याशी असेच वर्तन ठेवण्याची तुझी इच्छा असली तर आणि माझ्यावर तुझी कृपादृष्टी असल्यास मला एकदाचे मारून टाक; माझी दुर्दशा मला पाहू देऊ नकोस.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Numbers 11:4b-15
In those days: The people of Israel wept and said, "Oh that we had meat to eat! We remember the fish we ate in Egypt that cost nothing, the cucumbers, the melons, the leeks, the onions, and the garlic. But now our strength is dried up, and there is nothing at all but this manna to look at." Now the manna was like coriander seed, and its appearance like that of bdellium. The people went about and gathered it and ground it in hand mills or beat it in mortars and boiled it in pots and made cakes of it. And the taste of it was like the taste of cakes baked with oil. When the dew fell upon the camp in the night, the manna fell with it. Moses heard the people weeping throughout their clans, each one at the door of his tent. And the anger of the Lord blazed hotly, and Moses was displeased. Moses said to the Lord, "Why have you dealt ill with your servant? And why have not found favour in your sight, that you lay the burden of all this people on me? Did I conceive all this people? Did I give them birth, that you should say to me, 'Carry them in your bosom, as a nurse carries a sucking child, to the land that you swore to give their fathers? Where am I to get meat to give to all this people? For they weep before me and say, 'Give us meat, that we may eat.' I am not able to carry all this people alone; the burden is too heavy for me. If you will treat me like this, kill me at once, if I find favour in your sight, that I may not see my wretchedness,"
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र   ८१:१२-१६
प्रतिसाद :  देव आमचे सामर्थ्य आहे, त्याचे मोठ्याने गुणगान करा.

१) माझ्या लोकांनी माझी वाणी ऐकली नाही, 
इस्राएलने माझे ऐकले नाही, 
ह्यामुळे मी त्यांना त्यांच्या हृदयाच्या निष्ठुरतेप्रमाणे वागू दिले; 
ते आपल्याच संकल्पांप्रमाणे चालले.

२) माझे लोक माझे ऐकतील, 
इस्राएल माझ्या मार्गानी चालेल, 
तर बरे होईल! मी तेव्हाच त्यांच्या वैऱ्यांचा बीमोड करीन, 
त्यांच्या शत्रूंवर मी आपला हात चालवीन.

३) परमेश्वराचे द्वेष्टे त्याला वश होतील, 
पण इस्राएलचा काल अखंड राहील. 
मी त्याला गव्हाचे सत्त्व खाऊ घालीन आणि
 पहाडातल्या मधाने मी तुला तृप्त करीन.


 Psalm  81:12-13, 14-15, 16-17
Sing joyfully to God our strength.

My people did not heed my voice,
and Israel would not obey me. 
So left them in their stubbornness of heart,
to follow their own designs. R 

O that my people would heed me,
that Israel would walk in my ways!
At once I would subdue their foes, turn my hand against their enemies. R

Those who hate the Lord would cringe before him, and their subjection would last forever.
But Israel I would feed with finest wheat,
and satisfy with honey from the rock. R

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
 प्रभू म्हणतो, “मी तुम्हाला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले, ते सर्व मी तुम्हाला कळवले आहे.
 आलेलुया!

Acclamation: 
 Man shall not live by bread alone, but by every word that comes from the mouth of God,

शुभवर्तमान   मत्तय १४:१३-२१
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 "येशूने वर आकाशाकडे पाहून सर्व मासे आणि भाकरी आशीर्वादित करून मोडल्या आणि शिष्यांना आणि लोकसमुदायांना दिल्या.”
योहान बाप्तिस्ताच्या मरणाविषयी ऐकून येशू तेथून तारवात बसून निघाला आणि अरण्यात एकान्ती गेला. हे ऐकून लोकसमुदाय नगरातून त्याच्यामागे पायी पायी गेले. मग त्याने बाहेर येऊन मोठा लोकसमुदाय पाहिला; तेव्हा त्यांचा त्याला कळवळा आला आणि त्यांच्यातील दुखणेकऱ्यांना त्याने बरे केले. दिवस उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “ही अरण्यातली जागा आहे आणि वेळ होऊन गेली आहे; लोकांनी गावात जाऊन स्वतः करिता खाण्यासाठी विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या." येशू त्यांना म्हणाला, “त्यांना जाण्याची गरज नाही; तुम्हीच त्यांना खायला द्या. ते त्याला म्हणाले, “आमच्याजवळ केवळ पाच भाकरी आणि दोन मासे आहेत." तो म्हणाला, “ते इकडे माझ्याजवळ आणा.” मग त्याने लोकसमुदायांना गवतावर बसायची आज्ञा केली आणि त्या पाच भाकरी व ते दोन मासे घेऊन त्याने वर आकाशाकडे पाहून आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडून शिष्यांना दिल्या, शिष्यांनी लोकसमुदायांना दिल्या. मग ते सर्व जेवून तृप्त झाले आणि उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या त्यांनी भरून घेतल्या. जेवणारे सुमारे पाच हजार पुरुष होते; शिवाय स्त्रिया आणि मुले होतीच.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :Matthew 14:13-21

At that time: When Jesus heard (of the death of John the Baptist), he withdrew from there in a boat to a desolate place by himself. But when the crowds heard it, they followed him on foot from the towns. When he went ashore he saw a great crowd, and he had compassion on them and healed their sick. Now when it was evening, the disciples came to him and said, "This is a desolate place, and the day is now over; send the crowds away to go into the villages and buy food for themselves." But Jesus said, "They need not go away; you give them something to eat." They said to him, "We have only five loaves here and two fish." And he said, "Bring them here to me." Then he ordered the crowds to sit down on the grass, and taking the five loaves and the two fish, he looked up to heaven and said a blessing. Then he broke the loaves and gave them to the disciples, and the disciples gave them to the crowds. And they all ate and were satisfied. And they took up twelve baskets full of the broken pieces left over. And those who ate were about five thousand men, besides women and children.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन: 
शिष्यांचा व्यावहारिक दृष्टीकोन आणि प्रभू येशू ख्रिस्ताची दूरदृष्टीची भूमिका लक्षणीय आहे. शिष्यांना मोठ्या लोकसमुदायाला भोजन देण्याविषयीची चिंता वाटते; परंतु येशू रायाला लोकाांना तृप्त करण्याविषयीची तयारी दिसते. एकीकडे तुटपुंज्या संसाधनानी शिष्य भांबावलेले आढळतात तर दुसरीकडे येशूला लोकांचा इतका कळवळा आला होता की त्या अडचणीच्या वेळी त्याच्यातील औदार्य जागृत होते आणि तो पुढाकार घेतो. भाकरी व माशांचा चमत्कार हा सहभागितेचा उत्कृष्ट नमुना आहे. चमत्कार दर्शवितो की मानवी मर्यादेपेक्षा परमेश्वरी दया,सामर्थ्य व विना-अट प्रेम महान असते. तरीसुद्धा, अद्भूत कार्यासाठी सबळ परमेश्वर दुर्बल मानवी सहभाग मागतो व त्याचा स्वीकार करतो. पाच भाकरी व दोन माशांद्वारे येशू चमत्कार करतो. त्याद्वारे स्त्रिया व मुले ह्याांच्यासह ५००० पुरुष तृप्त होतात तरीसुद्धा उरलेल्या तुकड्यांनी १२ टोपल्या भरतात... आपण मोठ्या मनाने व मोकळ्या हाताने देतो का?

प्रार्थना :हे प्रभू येशू, तू देत असलेल्या स्वर्गीय भोजनात सहभागी होण्यास व तुझी कृपा अनुभवण्यास आम्हाला पात्र बनव, आमेन., आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या