सामान्यकाळातील १८ वा सप्ताह
बुधवार दि. ६ ऑगस्ट २०२५
"हा माझा पुत्र, माझा निवडलेला आहे, ह्याचे तुम्ही ऐका.”
This is my beloved Son; hear him.
प्रभू येशूचे रुपांतर
"हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याचे तुम्ही ऐका.”
आपल्या दुःखसहन, मरण व पुनरुत्थान घटनेच्या जवळजवळ एक वर्ष आधी प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या तीन लाडक्या शिष्यांना पेत्र, याकोब व योहान ह्यांना-कैसेरिया फिलिप्पीयाजवळ असलेल्या डोंगरावर नेले. ऑरिजेन या धर्मगुरूंच्या काळातील एका परंपरेनुसार (इ. स. २५४) हा पर्वत गालिलीतील ताबोर पर्वत असल्याचे मानले जाते. तिबिर्याच्या समुद्र सपाटीपासून या डोंगराची उंची २,००० फूट इतकी आहे.
या डोंगरावर प्रभू येशूने आपल्या शिष्यांना आपले वैभव प्रकट केले. त्याचे मूख सूर्यासारखे तेजस्वी झाले. त्याची वस्त्रे बर्फासारखी शुभ्र व चकचकीत झाली. मोशे आणि एलिया त्याच्या बाजूला उभे असलेले शिष्यांच्या दृष्टीस पडले (मोशे हे नियमशास्त्राचे तर एलिया हे संदेष्ट्यांचे प्रतीक मानले गेले आहे) आकाशातून वाणी झाली की, “हा माझा परमप्रिय पुत्र आहे ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.”
दुःखसहनाच्या काळात आपल्या शिष्यांच्या श्रद्धेला तडा जाऊ नये म्हणून प्रभूने आपल्या वैभवाचे दर्शन त्यांना ह्या रूपांतराच्या रूपाने घडविले.
पुढे निसर्ग देवतेची पूजा करणाऱ्या अख्रिस्ती लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर येशूचे रूपांतर हा सोहळा चौथ्या व पाचव्या शतकात उदयास आला. मात्र पोप कॅलिस्टस तिसरे ह्यांनी बेलग्रेड येथे हुनियादी जानोस ह्याने तुर्कांवर मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ १४५६ साली हा सोहळा संपूर्ण जगभर साजरा केला जावा असा आदेश काढला. स्वत: पोप महाशयांनी या सोहळ्यानिमित्ते तयार केलेली प्रातः प्रार्थना व सायंप्रार्थना धर्मगुरूंच्या (ब्रिव्हरी) प्रार्थना पुस्तकात समाविष्ट केलेली आहे.
ह्याच दिवशी रोममध्ये संत जॉन लॅटरन महामंदिराचा सणसुद्धा साजरा केला जातो.
चिंतन : “आपण इथे असावे हे बरे आहे” असे संत पीटर प्रभूला म्हणाला. येशूच्या बरोबर असणे आणि सर्वदा त्याच्या सहवासात राहणे खरोखर किती चांगले आहे. परमेश्वराच्या सहवासात राहणे, त्याच्या समान होत जाणे आणि त्याच्या दिव्य तेजात न्हाऊन निघणे ह्यापेक्षा आपला सन्मान तो काय? -सिनाईचे बिशप अनास्थासियुस
✝️
पहिले वाचन :दानीएल ७:९-१०,१३-१४
वाचक :दानीएलच्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"त्याचा पेहेराव बर्फासारखा पांढरा होता.'
मी पाहत असता आसने मांडण्यात आली आणि एक पुराणपुरुष आसनारूढ झाला. त्याचा पेहेराव बर्फासारखा पांढरा होता, त्याच्या डोक्याचे केस स्वच्छ लोकरीसारखे होते. त्याचे आसन प्रत्यक्ष अग्निज्वालामय होते आणि त्या आसनाची चक्रे धगधगीत अग्निरूप होती. त्याच्यासमोरून अग्निप्रवाह वाहत होता. हजारो देवदूत त्याची सेवा करत होते. लाखो लोक त्याच्यासमोर उभे होते. न्यायसभा भरली, पुस्तके उघडली गेली. मी रात्रीच्या दृष्टांतात पाहिले इतक्यात पाहा, आकाशातील मेघांवर आरूढ होऊन मानवपुत्रासारखा कोणी आला, तो त्या पुराणपुरुषाकडे आला आणि त्याला त्यांनी त्याच्याजवळ नेले. सर्व लोक, सर्व राष्ट्रे आणि सर्व भाषा बोलणारे लोक, यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्याला प्रभुत्व, वैभव आणि राज्य ही दिली. त्याचे प्रभुत्व अक्षय आणि अढळ आहे, त्याचे राज्य अविनाशी आहे.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Daniel 7:9-10, 13-14
As I looked, thrones were placed, and the Ancient of Days took his seat; his clothing was white as snow, and the hair of his head like pure wool; his throne was fiery flames; its wheels were burning fire A stream of fire issued and came out from before him; a thousand thousands served him, and ten thousand times ten thousand stood before him; the court sat in judgment, and the books were opened. I saw in the night visions, and behold, with the clouds of heaven there came one like a son of man, and he came to the Ancient of Days and was presented before him. And to him was given dominion and glory and a kingdom, that all peoples, nations, and languages should serve him; his dominion is an everlasting dominion, which shall not pass away, and his kingdom one that shall not be destroyed.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ९७:१-२,५-६,९
प्रतिसाद : परमेश्वर राज्य करतो, तो साऱ्या भूतलावर परमश्रेष्ठ आहे.
१)परमेश्वर राज्य करतो, पृथ्वी उल्हास करो,
द्विपसमूह हर्ष करो.
ढग आणि अंधार त्याच्याभोवती आहेत,
नीती आणि न्याय त्याच्या राजासनाचा आधार आहेत.
२ )परमेश्वरासमोर, सर्व पृथ्वीच्या प्रभूसमोर
पर्वत मेणाप्रमाणे वितळले.
आकाश त्याची न्यायपरायणता जाहीर करते,
सारी मानवजात त्याचे ऐश्वर्य पाहते.
Psalm 97:1-2, 5-6, 9
The Lord is king, most high above all the earth.
The Lord is king, let earth rejoice;
let the many islands be glad.
Cloud and darkness surround him;
justice and right are the foundation of his throne. R
The mountains melt like wax
before the face of the Lord,
before the face of the Lord of all the earth.
The skies proclaim his justice;
all peoples see his glory. R
For you indeed are the Lord,
most high above all the earth,
exalted far above all gods. R
दुसरे वाचन २ पेत्र १: १६-१९
वाचक : संत पेत्राने पाठवलेल्या दुसऱ्या पत्रातून घेतलेले वाचन
"आकाशातून आलेली ही वाणी आम्ही ऐकली.'
चातुर्याने कल्पिलेल्या कथांना अनुसरून आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य आणि आगमन ह्यांसंबंधाने तुम्हांला कळवले असे नाही, तर त्याचे ऐश्वर्य प्रत्यक्ष पाहणारे होतो. कारण त्याला देवपित्यापासून सन्मान आणि गौरव मिळाला, तेव्हा ऐश्वर्ययुक्त गौरवाच्या द्वारे अशी वाणी झाली की, “हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.” त्याच्याबरोबर पवित्र डोंगरावर असताना आकाशातून आलेली ही वाणी आम्ही स्वतः ऐकली. शिवाय अधिक निश्चित असे संदेष्टयाचे वचन आम्हाजवळ आहे, ते काळोख्या जागी प्रकाशणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे. तुमच्या अंत:करणात दिवस उजाडेपर्यंत आणि पहाटेचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद
Second Reading :2 Peter 1:16-19
Beloved: We did not follow cleverly devised myths when we made known to you the power and coming of our Lord Jesus Christ, but we were eyewitnesses of his majesty. For when he received honour and glory from God the Father, and the voice was borne to him by the Majestic Glory, "This is my beloved Son, with whom I am well pleased", we ourselves heard this very voice borne from heaven, for we were with him on the holy mountain. And we have the prophetic word more fully confirmed, to which you will do well to pay attention as to a lamp shining in a dark place, until the day dawns and the morning star rises in your hearts.
This is the word of God
Thanks be to God
शुभवर्तमान लूक ९ : २८-३६
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन ९:२८-३६
"येशू प्रार्थना करत असता त्याच्या मुखाचे रूपांतर झाले. "
पेत्र, योहान व याकोब ह्यांना बरोबर घेऊन येशू प्रार्थन करण्यास डोंगरावर गेला आणि तो प्रार्थना करत असता त्याच्या मुखाचे रूपांतर होऊन त्याचे वस्त्र पांढरे व चकचकीत झाले आणि पाहा, मोशे व एलिया हे दोघे जण त्याच्याबरोबर संभाषण करत होते. ते तेजोमय दिसले आणि तो जे आपले निर्गमन येरुशलेममध्ये पूर्ण करणार होता त्याविषयी ते बोलत होते. तेव्हा पेत्र आणि सोबती झोपेने भारावले होते, पण ते जागे झाले आणि त्यांना त्याचे तेज व त्याच्याजवळ उभे राहिलेले दोन पुरुष दिसले. मग असे झाले की, ते त्याच्यापासून निघून जात असताना पेत्रने येशूला म्हटले, "गुरुजी, आपण येथेच असावे हे बरे, आम्ही तर मंडप करू, आपणासाठी एक, मोशेसाठी एक आणि एलियासाठी एक" हे जे तो बोलला त्याचे त्याला भान नव्हते. तो हे बोलत असता मेघ उतरून त्यांच्यावर छाया करू लागला आणि ते मेघात शिरले तेव्हा ते भयभीत झाले. तेव्हा मेघातून अशी वाणी झाली की, "हा माझा पुत्र, माझा निवडलेला आहे, ह्याचे तुम्ही ऐका.” ही वाणी झाली तेव्हा येशू एकटाच दिसला. ह्यावर ते गप्प राहिले आणि ज्या गोष्टी त्यांनी पाहिल्या होत्या त्यातले काहीच त्या दिवसात त्यांनी कोणाला सांगितले नाही
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
Gospel Reading
: Luke 9: 28b-36
Jesus took Peter, and James, and John, and went up into a mountain to pray. And whilst he prayed, the shape of his countenance was altered, and his raiment became white and glittering.And behold two men were talking with him. And they were Moses and Elias, Appearing in majesty. And they spoke of his decease that he should accomplish in Jerusalem. But Peter and they that were with him were heavy with sleep. And waking, they saw his glory, and the two men that stood with him. And it came to pass, that as they were departing from him, Peter saith to Jesus: Master, it is good for us to be here; and let us make three tabernacles, one for thee, and one for Moses, and one for Elias; not knowing what he said.And as he spoke these things, there came a cloud, and overshadowed them; and they were afraid, when they entered into the cloud. And a voice came out of the cloud, saying: This is my beloved Son; hear him. And whilst the voice was uttered, Jesus was found alone. And they held their peace, and told no man in those days any of these things which they had seen.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:
परमेश्वर सत्य, पवित्र व चांगला आहे. त्या परमेश्वरी प्रकटीकरणाला मानवी प्रतिसाद म्हणजे श्रद्धा होय. त्या मार्ग, सत्य व जीवन असलेल्या प्रभू येशूच्या प्रकटीकरणाचा सण आज आपण साजरा करतो... शुभवर्तमानात तीन लक्षवेधक टप्पे आहेत:
१) येशू तीन शिष्यांना विशेष प्रार्थनेच्या अनुभव व अनुभूतीसाठी सोबतीला निवडतो.
२) त्यावेळी येशूचे रुपांतर होते, त्याचे कपडे शुभ्र होतात, मोशे व एलिया (नियमशास्त्र व संदेष्टे ह्यांचे प्रतिनिधी) येशूसोबत (मरण व पुनरुत्थानाविषयी) चर्चा करताना दिसतात.
३) प्रस्तुत प्रसंगी पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्यातील एकता व एकात्मता दिव्य वाणीद्वारे प्रकट होते. येशूचे रुपांतर ही घटना येशूच्या पुनरुत्थानाची नांदी होय. सदरहू अद्भूत प्रसंग जॉन, जेम्स व पीटर ह्यांना देह-चित्त हादरणारा होता. त्यामुळेच येशू, मोशे व एलिया ह्यांच्यासाठी तीन तंबू उभारण्याविषयी व डोंगरावरच राहायचा विचार पीटर मांडतो. पण येशूचे ऐका ही परमपित्याची वाणी ते प्रमाण मानतात... आपण किती ख्रिस्तानुभव घेतलाय ? कुठे ? कशा प्रकारे ?
प्रार्थना :हे प्रभू येशू, तुझ्याशी एकनिष्ठ राहण्यास व तुझ्या वैभवात सहभागी होण्यास पात्र बनण्यास मला प्रेरणा व कृपा दे, आमेन.

0 टिप्पण्या