Marathi Bible Reading | 23rd week in ordinary Time| Monday 8th September 2025

सामान्यकाळातील २३ वा सप्ताह 

सोमवार  दिनांक ८ सप्टेंबर  २०२५

“पाहा कुमारी गर्भवती होईल तिला मुलगा होईल. त्याला 'इम्मानुएल' म्हणजे आमच्यासह देव असे नाव पडेल.” 
 "Behold, the virgin shall conceive and bear a son, and they shall call his name Emmanuel (which means, God with us).


  
Nativity of the Blessed Virgin Mary - Feast 
Happy Birthday Dear Mama Mary

पवित्र मरियेचा जन्मदिन सोहळा 

 ✝️

संत अल्फान्सोस लिगरी ह्यांनी आपल्या लिखाणामध्ये धन्य कुमारी पवित्र मरियेविषयी पुढील माहिती दिलेली आहे : 'देवाच्या पुत्राची माता होण्यासाठी पवित्र मरियेची निवड होणार होती. त्यादृष्टीने देवाने तिला तिच्या गर्भसंभवाच्या पहिल्या क्षणापासून निष्कलंक व मूळपापापासून दूर ठेवले. अशाप्रकारे परमेश्वराने तिला सर्व देवदूत व सर्व संत ह्यांच्याहून उच्च असे स्थान दिले.'
'पवित्र मरियेचा आत्मा ही देवाची पृथ्वीतलावर सर्वोत्कृष्ट अशी निर्मिती होती. स्वर्गात आणि पृथ्वीवर या सुंदर आत्म्याविषयी किती जल्लोष आणि आनंद मानला गेला असेल नाही? बाळ मरियेच्या जन्माबद्दल, देवाला प्रिय आणि पवित्र वाटणाऱ्या या बाळाच्या अत्युत्तम देणगीबद्दल आपणदेखील आनंद करावा हे उचित आहे.'
पवित्र मरिया नक्की कोणत्या ठिकाणी व वर्षी जन्मली त्याविषयी निश्चित पुरावा उपलब्ध नाही. मात्र संत जोकिम आणि आना हे मूळचे गालिलातील होते व नंतर ते जेरूसलेम येथे आले. ती दोघे बरीच वर्षे नि:संतान होते. त्यांच्या प्रदीर्घ प्रार्थनेनंतर त्यांच्या म्हातारपणी त्यांना झालेले कन्यारत्न म्हणजे देवाची निवडलेली कन्या, मरिया होय.
सर्वसाधारण सहाव्या शतकात सिरिया किंवा पॅलेस्टाईनमध्ये पवित्र मरियेच्या वाढदिवसाचा सोहळा साजरा होऊ लागला. रोमन ख्रिस्तसभेने साधारण सातव्या शतकापासून हा सोहळा आपल्या मुख्य उपासनेमध्ये समाविष्ट केला.
आज धन्य कुमारी पवित्र मरियेचा वाढदिवस ! युगानुयुग राज्य करणाऱ्या व जगाचा सम्राट होणाऱ्या ख्रिस्ताची माता होण्यासाठी देवाने तिची जडणघडण केली. धन्य तो परमेश्वर, धन्य ती कुमारी मरिया क्रेतचे संत एण्ड्रयू 
गेल्या नऊ दिवसापासून धन्य कुमारी मरियेच्या जीवनावर आपण चिंतन केलेले आहे. आज मरियामाते सारखे श्रद्धापूर्ण, प्रेमळ व परोपकारी जीवन आपल्याला जगता यावे म्हणून निश्चय करू या. जशी मरिया माता ख्रिस्तमय झाली होती तसे आपणसुद्धा ख्रिस्ताठायी समर्पित जीवन जगण्याचा निर्धार करू या.
✝️
पहिले वाचन : मीखा  ५:१-४
वाचक : मीखाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"असा समय येत आहे की, प्रसूतिवेदना पावणारी प्रसूत होईल."
प्रभू असे म्हणतो : हे बेथलेहेम एफ्राथा, जरी यहुदाच्या नगरामध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यातून एकजण निघेल, तो माझ्यासाठी इस्राएलचा सत्ताधीश होईल. त्याचा उगम प्राचीन काळापासून, अनादी काळापासून आहे. म्हणून प्रसूतिवेदना पावणारी प्रसूत होईपर्यंत तो त्यांना परक्यांच्या अधीन करील. मग त्याच्या बंधूंचा अवशेष परत इस्राएलच्या वंशजाकडे येईल. तो प्रभूच्या प्रतापाने आपल्या प्रभू देवाच्या नावाच्या ऐश्वर्याने प्रकट होईल, आपल्या प्रजेचे पालन करील आणि ते निर्धास्त वस्ती करतील. कारण आता त्याची थोरवी पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पोहोचेल.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Micah 5:2-5a (Or: Romans 8:28-30)
Thus says the Lord: You, O Bethlehem Ephrathah, who are too little to be among the clans of Judah, from you shall come forth for me one who is to be ruler in Israel, whose coming forth is from of old, from ancient days. Therefore he shall give them up until the time when she who is in labour has given birth; then the rest of his brothers shall return to the people of Israel. And he shall stand and shepherd his flock in the strength of the Lord, in the majesty of the name of the Lord his God. And they shall dwell secure, for now he shall be great to the ends of the earth. And he shall be their peace.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  १३ :६,७
प्रतिसाद :मी प्रभुठायी हर्ष करतो. 

१) मी तुझ्या दयेवर विसंबून आहे. 
माझे हृदय तू सिध्द केलेल्या तारणाने उल्हासेल.

२)परमेश्वराने माझ्यावर फार उपकार केले आहेत,
म्हणून मी त्याची स्तुतिस्तोत्रे गाईन.
परमेश्वर राजासमोर जयघोष करा.



Psalm salm 13:6, 7a

I will greatly rejoice in the Lord.

As for me, I trust in your merciful love. 
Let my heart rejoice in your salvation. R

I will sing to the Lord who
 has been bountiful with me. R

 
जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
हे पवित्र कुमारी मरिये, तू धन्य असून गौरवास पात्र आहेस, कारण न्यायसूर्य ख्रिस्त, आमचा परमेश्वर, तुझ्या पोटी जन्मला.
 आलेलुया!

Acclamation: 
Blessed are you, holy Virgin Mary, 
deserving of all praise; 
from you rose the sun of justice, Christ our God.

शुभवर्तमान  मत्तय  १:१-१६, १८-२३
वाचक :मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 "मरियेच्या पोटी पवित्र आत्म्याच्या योगानेच गर्भ राहिला आहे."
आब्राहामचा पुत्र दावीद ह्याचा पुत्र जो येशू ख्रिस्त ह्याच्यापर्यंतची वंशावळ : आब्राहाम हा इसहाकचा बाप, इसहाक याकोबचा, याकोब यहूदा व त्याचे भाऊ यांचा बाप, यहूदा, पेरेस आणि जेरह यांचा बाप (त्यांची आई तामार), पेरेस हेसरोमाचा, हेसरोम रामाचा, राम अम्मीनादाबाचा, अम्मीनादाब नहशोनाचा, नहशोन सलमोनचा, सलमोन बवाजाचा बाप (बवाजाची आई राहाब), बवाज ओबेदचा बाप (ओबेदची आई रूथ), ओबेद इशायचा आणि इशाय राजा दावीद याचा बाप होता.
दावीद शलमोनचा बाप होता (शलमोनाची आई पूर्वी उरियाची पत्नी होती) शलमोन रहबामाचा, रहबाम अबीयाचा, अबीया आसाचा, आसा यहोशाफाटाचा, यहोशाफाट योरामाचा, योराम उज्जीयाचा, उज्जीया योथामाचा, योथाम आहाजाचा, आहाज हिजकीयाचा, हिजकीया मनश्शेचा, मनश्शे आमोनाचा, आमोन योशीयाचा, योशीया हा यखन्या आणि त्याचे भाऊ यांचा बाप, या काळात यहुदी लोक बाबिलोन येथे हद्दपार करण्यात आले.
बाबिलोन येथे हद्दपार झाल्यानंतर : यखन्या शलतीएलाचा बाप, शलतीएल जेरुब्बाबेलाचा, जेरूब्बाबेल अबीहूदाचा, अबीहूद एल्याकीमाचा, एल्याकीम अज्जूराचा, अज्जूर सादोकाचा, सादोका याखीमाचा, याखीम एलीहूदाचा, एलीहूद एलाजाराचा, एलाजार मत्तानाचा, मत्तान याकोबाचा, याकोब योसेफचा बाप. हा योसेफ  मरियेचा पती असून तिच्याच पोटी ख्रिस्त म्हटलेल्या येशूचा जन्म झाला.
*(येशू ख्रिस्ताच्या जन्माची घटना अशी घडली : त्याची आई मरिया हिचा योसेफाशी वाड्. निश्चय झाला होता. पण त्यांचे लग्न होण्यापूर्वीच, पवित्र आत्म्याच्या योगाने ती गर्भवती असल्याचे दिसून आले. तिचा भावी पती योसेफ सज्जन होता. मरियेची अब्रू चव्हाट्यावर मांडायची त्याची इच्छा नव्हती, म्हणून त्याने आपला वाड्.निश्चय गुपचूप मोडून टाकण्याचा बेत केला. हा बेत त्याच्या मनात घोळत असतानाच प्रभूच्या एका दूताने त्याला स्वप्नात दर्शन दिले आणि तो म्हणाला, “दावीदच्या पुत्रा, योसेफ, आपली पत्नी म्हणून मरियेचा स्वीकार करायला भिऊ नकोस, कारण तिच्या पोटी पवित्र आत्म्याच्या योगानेच गर्भ राहिला आहे. तिला मुलगा होईल, तू त्याचे नाव येशू असे ठेव, कारण तोच आपल्या लोकांना पापांपासून मुक्त करणार आहे.”) या घटना घडण्याचे कारण म्हणजे प्रभूने आपल्या संदेष्ट्यामार्फत वदवले होते. * “पाहा कुमारी गर्भवती होईल तिला मुलगा होईल. त्याला 'इम्मानुएल' म्हणजे आमच्यासह देव असे नाव पडेल.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :Matthew 1:18-23 (Longer Form: Matthew 1:1-16, 18-23) 
Now the birth of Jesus Christ took place in this way. When his mother Mary had been betrothed to Joseph, before they came together she was found to be with child from the Holy Spirit. And her husband Joseph, being a just man and unwilling to put her to shame, resolved to send her away quietly. But as he considered these things, behold, an angel of the Lord appeared to him in a dream, saying, "Joseph, son of David, do not fear to take Mary as your wife, for that which is conceived in her is from the Holy Spirit, She will bear a son, and you shall call his name Jesus, for he will save his people from their sins. All this took place to fulfill what the Lord had spoken by the prophet: "Behold, the virgin shall conceive and bear a son, and they shall call his name Emmanuel (which means, God with us).
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन: 
खिस्तसभा आज पवित्र मरियेचा जन्मदिन साजरा करीत आहे. दि ८ डिसेम्बर रोजी आपण पवित्र मरियेचा निष्कलंक गर्भसंभव साजरा करीत असतो. पवित्र मरिया संत अन्ना हिच्या उदरी गर्भी संभवली तीच मुळी कृपेच्या अवस्थेत ! देवाने तिच्या शरीराला मूळ पापाचा डाग लागू दिला नाही कारण येशूस ज्या उदरात नऊ महिने राहणार होता ते उदर कलंकित असून चालणार नव्हते. ह्याचाच अर्थ पवित्र मरियेचा हा सण केवळ तिचा सन्मान करणारा नसून येशूचे माहात्म्य दर्शविणारा होता. तद्वतच मावलीचा जन्मदिन पाळून ख्रिस्तसभा येशूची थोरवी गाते. आजचे पहिले वाचन ज्या बेथलेहेम येथे येशूचा जन्म झाला त्या बेथलेहम नगरीचे गोडवे गाताना दिसते. बाबिलोनच्या सैन्याने बेथलेहेम एफ्राथा सारख्या लहानशा नगरीवर हल्ला करण्याचा बेत केला तेव्हा तेथील लोक बिथरून गेले. देवाने मीखा नावाच्या साध्यासुध्या कारागिराला लोकांना धीर देण्यासाठी पाठविले. त्यावेळी त्याने जो संदेश दिला तो आजच्या पहिल्या वाचनात आपल्याला पाहायला मिळतो.
शुभवर्तमानात येशूची वंशावळ आणि योसेफाला दूताचा निरोप ह्या घटना वाचायला मिळतात. दोन्ही ठिकाणी मरियेठायी देवाने किती महत्कृत्यें केली आहेत हे अधोरेखित केले गेलेले आहे. तरुणाच्या इतिहासात तिने जशी महत्त्वपूर्ण जबाबदारी बजावली तसेच संदेष्टयांनी केलेल्या भाकितांची परिपूर्ती देवाने तिच्याद्वारे करून दाखविली. अशा महान देवमातेचा जन्मदिन साजरा करीत असताना आपण स्वतःला प्रश्न विचारू याः
माझ्या जीवनात पवित्र मरियेला कोणते स्थान आहे? तिच्या जीवनावरून देव माळ व्यक्तिशः आणि माझ्या समाजाला कोणता संदेश देऊ इच्छितो ?
प्रार्थना :  हे धन्य पवित्र माते, तुझ्यासारखे पवित्र व सेवाभावी जीवन जगण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या