सामान्यकाळातील २३ वा सप्ताह
मंगळवार दिनांक ९ सप्टेंबर २०२५
जे अशुद्ध आत्म्यांनी पीडलेले होते त्यांना त्याने बरे केले.
And those who were troubled with unclean spirits were cured.
संत पीटर क्लेवर
वर्तनसाक्षी (१५८१-१६५४)
✝️
इ. स. १६१० साली तो मध्य अमेरिकेतील कार्ताजेना येथे येऊन पोहोचला. तेथे त्याला धर्मगुरुपदाची दीक्षा देण्यात आली आणि त्यानंतरची ४४ वर्षे त्यांनी निग्रो गुलामांमध्ये कार्य करण्यासाठी त्या मिशनच्या प्रमुख केंद्रात घालविली.
त्यावेळी मध्य अमेरिकेमध्ये गुलामांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय जोरात चालत असे. छोटे मोठे व्यापारी कैद्यांना व आपल्या हाताखालच्या गुलामांना वेस्ट इंडिजच्या व्यापाऱ्यांच्या हाती सोपवीत. मात्र ह्या खरेदी विक्रीतील पिळवणूक इतकी विकोपाला गेलेली होती की उपासमार, चेंगराचेंगरी आणि कुपोषण ह्यामुळे बरेचसे गुलाम मरून जात. तरीही उरलेल्या काही गुलामांकडून मात्र व्यापाऱ्यांना मिळणारा नफा काही कमी नव्हता.
संत पीटर क्लेवर हा त्या काळ्या लोकांच्या जीवनात रस घेऊन त्यांच्या सुखदुःखांचा विचार करणारा पहिला गोरा मनुष्य होता. खरेदी विक्रीच्या वेळी तो जातीने बोटीजवळ उभा राही. आजाऱ्यांना व मरणासन्न अवस्थेत असणाऱ्या गुलामांना तो रूग्णाभ्यंग संस्कार देई. भीतीने थरथर कापणाऱ्या निग्रो गुलामांना थोडी फळे व शीतपेये देई. व्यापाऱ्यांचा राग आणि आपल्या उच्च अधिकाऱ्यांचा रोष ओढवून घेऊनदेखील फा. पीटर क्लेवर अत्यंत शांत डोक्याने आपली ख्रिस्ती श्रद्धा पसरविण्यासाठी धडपडत असत.
एका भव्य स्नानसंस्कार विधीच्या वेळी खुल्या मैदानात फा. पीटर ह्यांनी हजारो निग्रोंना व्यक्तिश: मरिया- येशूची मेडल भेट म्हणून दिली. त्याच्या संपूर्ण कारकीर्दीत ३००,००० लोकांना त्याने रुग्णसंस्कार, प्रायश्चित्त संस्कार व स्नानसंस्कार दिल्याची नोंद आहे. इतकेच करून ते थांबले नाहीत. परिवर्तन झालेल्या लोकांच्या घरोघरी भेट देणे, त्यांचे विवाहसंस्कार साजरे करणे, त्यांच्या मुलांना स्नानसंस्कार देणे अशी आध्यात्मिक कर्तव्ये त्यांनी अत्यंत तत्परतेने पुढे सुरू ठेवली.
फा. पीटर क्लेवर ८ सप्टेंबर १६५४ साली मरण पावले आणि त्यांना त्यांचे परमस्नेही ब्र. अल्फान्सोस रॉड्रिग्ज (सण ३१ ऑक्टोबर) ह्यांच्यासह १८८८ साली संतपद बहाल करण्यात आले. ते कॅथलिक मिशनचे आश्रयदाते मानले जातात.
पहिले वाचन : कलस्सै २:६-१५
वाचक : पौलचे कलस्सैकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
“देवाने तुम्हांला त्याच्याबरोबर जिवंत केले, त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली. "
ख्रिस्त येशू जो प्रभू, ह्याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्याच्यामध्ये चालत राहा. त्याच्यामध्ये मुळावलेले, रचले जात असलेले, तुम्हांला शिकवल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले आणि निरतंर उपकारस्तुती करणारे व्हा.
ख्रिस्ताप्रमाणे नसलेले, तर माणसाच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्त्वज्ञान आणि पोकळ भुलथापा ह्यांच्या योगाने तुम्हांला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या. कारण ख्रिस्ताच्या ठायीच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते आणि जो सर्व सत्तेचे आणि अधिकाराचे मस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहे, त्याच्या ठायी तुमची सुंताही झाली आहे, परंतु ती माणसांच्या हातून झालेली नाही, तर तुम्ही आपला दैहिक स्वभाव झुगारून दिल्याने ख्रिस्ताच्या सुंतेच्या द्वारे तुमची सुंता झाली. तुमचा स्नानसंस्कार झाला तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर पुरले गेला आणि ज्याने त्याला मेलेल्यातून उठवले त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाच्या द्वारे त्याच्याबरोबर उठवलेही गेला. जे तुम्ही आपल्या अपराधांनी आणि देहस्वभावाची सुंता न झाल्याने मेलेले होता त्या तुम्हांला त्याने त्याच्याबरोबर जिवंत केले, त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली.
आपल्याविरूद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधीचे ऋणपत्र त्याने खोडले आणि क्रुसाला खिळून ते रद्द केले. सत्ताधिशांना आणि अधिकाऱ्यांना नाडून त्याच्याविरूद्ध क्रुसावर जयोत्सव करून त्यांचे उघडउघड प्रदर्शन केले.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Colossians 2:6-15
Brethren: As you received Christ Jesus the Lord, so walk in him, rooted and built up in him and established in the faith, just as you were taught, abounding in thanksgiving. See to it that no one takes you captive by philosophy and empty deceit, according to human tradition, according to the elemental spirits of the world, and not according to Christ. For in him the whole fullness of deity dwells bodily, and you have been filled in him, who is the head of all rule authority. In him also you were circumcised with a circumcision made without hands, by putting off the body of the flesh, by the circumcision of Christ, having been buried with him in baptism, in which you were also raised with him through faith in the powerful working of God, who raised him from the dead. And you, who were dead in your trespasses and the uncircumcision of your flesh, God made alive together with him, having forgiven us all our trespasses, by cancelling the record of debt that stood against us with its legal demands. This he set aside, nailing it to the cross. He disarmed the rulers and authorities and put them to open shame, by triumphing over them in him.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १४५ :१-२,८-११
प्रतिसाद : प्रभू सगळ्यांना चांगला आहे.
१) हे राजा, माझ्या देवा, मी तुझी थोरवी गाईन,
सदासर्वकाळ तुझ्या नावाला धन्यवाद देईन,
मी प्रतिदिवशी तुला धन्यवाद देईन,
आणि सदासर्वकाळ तुझ्या नावाचे स्तवन करीन.
२) प्रभू कृपाळू आणि दयाळू आहे,
तो मंदक्रोध आणि अतिदयाळू आहे.
प्रभू सगळ्यांना चांगला आहे,
त्याची कृपा त्याने निर्मिलेल्या सर्व कृत्यांवर आहे.
३) हे प्रभू, तुझी सर्व कृत्ये तुझी स्तुती गातील
आणि तुझे भक्त तुला धन्यवाद देतील.
हे देवा, ते तुझ्या राज्याचा महिमा वर्णितील,
आणि तुझा पराक्रम कथन करतील.
Psalm 145: 1b-2. 8-9, 10-11
How good is the Lord to all. R
will extol you, my God and king,
and bless your name forever and ever.
I will bless you day after day,
and praise your name forever and ever. R
The Lord is kind and full of compassion,
slow to anger, abounding in mercy.
How good is the Lord to all,
compassionate to all his creatures. R
All your works shall thank you,
O Lord, and all your faithful ones bless you.
They shall speak of the glory of your reign,
and declare your mighty deeds. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे प्रभो, तुझी वचने आत्मा आणि जीवन अशी आहेत, सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत,
आलेलुया!
Acclamation:
I chose you from the world that you should go and bear fruit and that your fruit should abide, says the Lord.
शुभवर्तमान लूक ६:१२-१९
वाचक :लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"येशूने रात्रभर प्रार्थना केली आणि बारा जणांना त्यांना प्रेषित असे नाव दिले. "
निवडून येशू प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करीत राहिला. मग दिवस उगवल्यावर त्याने आपल्या शिष्यांना बोलावले आणि त्यातून पुढील बाराजणांना निवडून त्यांना प्रेषित असे नावही दिले. शिमोन, ह्याला त्याने पेत्र हेही नाव दिले आणि त्याचा भाऊ आंद्रेया, याकोब, योहान, फिलीप, बार्थेलोम्यू, मत्तय, थोमास, अल्फीचा मुलगा याकोब, जिलोत म्हटलेला शिमोन, याकोबचा मुलगा यहुदा आणि जो पुढे विश्वासघातकी निघाला तो यहुदा इस्कर्योत.
येशू त्यांच्याबरोबर खाली उतरून सपाटीच्या जागेवर उभा राहिला आणि त्याच्या शिष्यांचा मोठा समुदाय आणि सर्व यहुदीया व येरुशलेम येथून आणि सोर आणि सिदोन ह्याकडल्या समुद्रकिनाऱ्यापासून त्याचे श्रवण करण्यासाठी व आपले रोग बरे करून घेण्यासाठी जे लोक आले होते. त्यांचा मोठा जमाव तेथे उभा होता. जे अशुद्ध आत्म्यांनी पीडलेले होते त्यांना त्याने बरे केले. तेव्हा सर्व समुदायांची त्याला स्पर्श करण्याची धडपड चालली होती, कारण त्याच्यापासून सामर्थ्य निघून ते सर्वांना निरोगी करीत होते.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading :Luke 6:12-19
In those days Jesus went out to the mountain to pray, and all night he continued in prayer to God. And when day came, he called his disciples and chose from them twelve, whom he named apostles: Simon, whom he named Peter, and Andrew his brother, and James and John, and Philip, and Bartholomew, and Matthew, and Thomas, and James the son of Alphaeus, and Simon who was called the Zealot, and Judas the son of James, and Judas Iscariot, who became a traitor. And he came down with them and stood on a level place, with a great crowd of his disciples and a great multitude of people from all Judea and Jerusalem and the sea coast of Tyre and Sidon, who came to hear him and to be healed of their diseases. And those who were troubled with unclean spirits were cured. And all the crowd sought to touch him, for power came out from him and healed them all.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:
ख्रिस्ती व्यक्तीची विचारसरणी, कार्यपद्धती आणि जीवनशैली ह्यांचा उगम प्रभू येशू खिस्ताच्या देहधारण, जीवन, कार्य आणि पास्का रहस्यामध्ये दडलेला आहे. कलससै येथील लोकांनी बाप्तिस्मा घेतल्याने त्यांच्यात नेमका कोणता फरक पडला किंवा पडायला हवा आहे हे संत पॉल आजच्च्या पहिल्या वाचनात आपल्याला समजून सांगत आहे. ख्रिस्ती अंत्यविधीमध्ये अशाच प्रकारची प्रार्थना केली जाते : "बाप्तिस्मा साक्रामेताद्वारे तो/ती खिस्ताठायी मरण पावला/पावली. त्याला/तिला खिस्ताच्या पुनरुत्थानातदेखील सहभागी कर." त्या पुनरुस्थित जीवनाला सुरुवात बाप्तिस्म्यानंतर होते आणि त्याची परिपूर्ती मरणोत्तर सार्वकालिक जीवनात होते. संत पॉल आपल्याला अशाच प्रकारचे जीवन जगायला बोलावीत आहे. आपल्या प्रेषितांची निवड करून त्यांना प्रेषितकार्यावर पाठविणारा येशू स्वतः तशा प्रकारचे प्रेषितकार्य करून दाखवितो. त्यात उपदेश आणि आरोग्यदान ह्यांचा विशेष समावेश असल्याचे दिसून येते.
माझ्या बाप्तिस्म्याने माझ्या जीवनात कोणता फरक पडलेला आहे? देवाने मला नक्की कोणत्या प्रेषितकार्यासाठी बोलाविलेले आहे? त्यासाठी मला नक्की कोणाकडून किंवा - कक्षाकडून प्रेरणा मिळते ?.
प्रार्थना :हे प्रभू येशू, विश्वासात दृढ राहून तुझ्या वचनात वाढण्यास व तुझ्या सामर्थ्याचा गुणण्याची स्पर्श अनुभवण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.

0 टिप्पण्या