सामान्यकाळातील २३ वा सप्ताह
बुधवार दिनांक १० सप्टेंबर २०२५
"अहो गरीब जनहो, तुम्ही धन्य; कारण देवाचे राज्य तुमचे आहे!"
"Blessed are you who are poor, for yours is the kingdom of God.
तोलेंटिनोचे संत निकोलस
वर्तनसाक्षी (१२४५-१३०५)
धर्मगुरुपदाची दीक्षा मिळाल्यानंतर फा. निकोलस ह्यांनी दररोज देवराज्याची सुवार्ता घोषविण्याचा निश्चय केला. त्यांचे वक्तृत्व आणि वाणीतील माधुर्य भल्याभल्यांना ख्रिस्ताच्या चरणी लोळण घ्यायला लावी. देवाने त्यांना अद्भूत चमत्कारांचीसुद्धा देणगी दिलेली होती. त्यांच्या केवळ आशीर्वादामुळे व स्पर्शाने आजारी बरे होत असत.
ह्या सवपिक्षा महत्त्वाचे म्हणजे फा. निकोलस ह्यांना गोरगरिबांविषयी आस्था होती. शुद्धिस्थानांतील आत्म्यांच्या तारणासाठी ते दररोज मध्यस्थीची प्रार्थना करीत. एखाद्याच्या आत्म्याला पवित्र मिस्सा अर्पण केल्यामुळे तो आत्मा कालांतराने शुद्धिस्थानातून मुक्त होऊन स्वर्गात कसा जाई त्याचे दृष्टान्त वा साक्षात्कार फा. निकोलस ह्यांना प्रत्यक्ष मिस्सावली अर्पण करताना झालेला आहे.
फा. निकोलस १० सप्टेंबर १३०५ रोजी मरण पावले. शुद्धिस्थानातील आत्म्यांच्या तारणासाठी संत निकोलस ह्यांचा धावा केला जातो. त्यांचे अविनाशी शरीर तोलेंटिनो येथे भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आलेले आहे.
✝️
प्रभूठायी नम्र आणि लीन बनून आपण सात्विकतेचे पवित्र जीवन जगण्यासाठी आणि प्रभूयेशूमध्ये नवीन जीवन जगण्यासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे.
प्रभू येशू ख्रिस्त सर्वांसाठी सर्व काहीं बनला. त्याचे अनुकरण करणारे संत महात्मे सुद्धा आज स्वर्गराज्यात आहेत, कारण त्यांनी छळवणुकीबरोबरच देवाची सुवार्ता पसरविली आणि ते परोपकारी जीवन जगले. आपण सुद्धा धन्यवादीत बनण्यासाठी ख्रिस्ताची शिकवण आत्मसात करुन ख्रिस्ती जीवन जगू या.
पहिले वाचन : कलस्सै ३:१-११
वाचक : पौलचे कलस्सैकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
" तुम्ही ख्रिस्ताबरोबर मृत झाला आहा. यासाठी
तुमच्यामध्ये जे ऐहिक आहे त्याला तुमच्यामधून नष्ट करा."
जर तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहा, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. कारण तुम्ही मृत झाला आहा आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रकट केला जाईल तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रकट केले जाल. यासाठी तुमच्यामध्ये जे ऐहिक आहे, म्हणजे जारकर्म, अशुद्धता, कामविकार, दुर्वासना आणि धनलोभ म्हणजे जणू मूर्तिपूजा यांना तुमच्यामधून नष्ट करा, यामुळे देवाचा कोप होतो. तुम्हीही पूर्वी त्या वासनांत जगत होता, त्यामध्ये तुम्ही चालत होता. परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपणा, निंदा आणि मुखाने शिवीगाळ करणे, ही सर्व आपणांपासून दूर करा. एकमेकांशी लबाडी करू नका, आता तुम्ही जुन्या मनुष्याला त्याच्या कृतीसह काढून टाकले आहे, आणि जो नवा मनुष्य, आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्याला तुम्ही धारण केले आहे, ह्यात हेल्लेणी आणि यहुदी, सुंता झालेला आणि न झालेला, बर्बर आणि स्कुथी, दास आणि स्वतंत्र हा भेदच नाही, तर ख्रिस्त सर्व काही आणि सर्वात आहे.
First Reading :Colossians 3:1-11
Brethren: If then you have been raised with Christ, seek the things that are above, where Christ is, seated at the right hand of God. Set your minds on things that are above, not on things that are on earth. For you have died, and your life is hidden with Christ in God. When Christ who is your life appears, then you also will appear with him in glory. Put to death therefore what is earthly in you: sexual immorality, impurity, passion, evil desire, and covetousness, which is idolatry. On account of these the wrath of God is coming. In these you too once walked, when you were living in them. But now you must put them all away: anger, wrath, malice, slander, and obscene talk from your mouth. Do not lie to one another, seeing that you have put off the old self with its practices and have put on the new self, which is being renewed in knowledge after the image of its creator. Here there is not Greek and Jew, circumcised and uncircumcised, barbarian, Scythian, slave, free; but Christ is all, and in all.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १४४:२-३,१०-१३ अब
प्रतिसाद : प्रभू सगळ्यांना चांगला आहे.
१ मी प्रतिदिवशी तुला धन्यवाद देईन,
आणि सदासर्वकाळ तुझ्या नामाचे स्तवन करीन,
प्रभू थोर आणि परमस्तुत्य आहे, त्याची थोरवी अगम्य आहे.
२ हे प्रभू, तुझी सर्व कृत्ये तुझी स्तुती गातील
आणि तुझे भक्त तुला धन्यवाद देतील.
हे देवा, ते तुझ्या राज्याचा महिमा वर्णितील,
आणि तुझा पराक्रम कथन करतील.
३ ह्यामुळे तुझे पराक्रम आणि
तुझ्या राज्याचे प्रबल वैभव ही मानवजातीला कळावी.
तुझे राज्य युगानुयुगे राहणारे राज्य आहे,
तुझा राज्याधिकार पिढ्यान्पिढ्या टिकणारा आहे.
Psalm 145:2-3, 10-11, 12-13ab
How good is the Lord to all.
I will bless you day after day,
and praise your name forever and ever.
The Lord is great and highly to be praised;
his greatness cannot be measured. R
All your works shall thank you, O Lord,
and all your faithful ones bless you.
They shall speak of the glory of your reign,
and declare your mighty deeds. R.
To make known your might to
the children of men,
and the glorious splendour of your reign.
Your kingdom is an everlasting kingdom;
your rule endures for all generations. R.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
प्रभू म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे,
जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.
आलेलुया!
Acclamation:
Rejoice and leap for joy, says the Lord, for behold, your reward is great in heaven.
.
शुभवर्तमान लूक ६:२०-२६
वाचक :लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
अहो गरीब जनहो, तुम्ही धन्य ! धनवानांची केवढी दुर्दशा होणार !
येशूने आपल्या शिष्यांकडे दृष्टी लावून म्हटले, "अहो गरीब जनहो, तुम्ही धन्य; कारण देवाचे राज्य तुमचे आहे!"
“अहो, जे तुम्ही आता भुकेले आहा ते तुम्ही धन्य, कारण तुम्ही तृप्त व्हाल! "“अहो, जे तुम्ही आता रडता ते तुम्ही धन्य, कारण तुम्ही हसाल !”
"मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हांला वाळीत टाकतील, तुमची निंदा करतील आणि तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील, तेव्हा तुम्ही धन्य ! त्या दिवशी आनंदित होऊन उड्या मारा; कारण पाहा, स्वर्गात त्याचे प्रतिफळ मोठे आहे, त्यांचे पूर्वज संदेष्ट्यांना असेच करीत असत.”
“परंतु तुम्हा धनवानांची केवढी दुर्दशा होणार ! कारण तुम्ही आपले सांत्वन भरून पावलाच आहात."“अहो, जे तुम्ही आता तृप्त झाला आहा त्या तुमची केवढी
दुर्दशा होणार ! कारण तुम्हाला भूक लागेल.”
“अहो, जे तुम्ही आता हसता त्या तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही शोक कराल आणि रडाल.”
"जेव्हा सर्व लोक तुम्हांला बरे म्हणतील तेव्हा तुमची केवढी दुर्दशा होणार! त्यांचे पूर्वज खोट्या संदेष्ट्यांना असेच म्हणत असत."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading :Luke 6:20-26
At that time: Jesus lifted up his eyes on his disciples, and said: "Blessed are you who are poor, for yours is the kingdom of God. Blessed are you who are hungry now, for you shall be satisfied. Blessed are you who weep now, for you shall laugh. Blessed are you when people hate you and when they exclude you and revile you and spum your name as evil, on account of the Son of Man! Rejoice in that day, and leap for joy for behold, your reward is great in heaven; for so their fathers did to the prophets. But woe to you who are rich, for you have received your consolation. Woe to you who are full now, for you shall be hungry. Woe to you who laugh now, for you shall mour and weep. Woe to you, when all people speak well of you, for so their fathers did to the false prophets."
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:
भौतिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन ह्यांच्यात फरक आहे. भौतिक जीवन ह्या जगातील नश्वर गोष्टींमध्ये सुख मानते आणि मनुष्य ह्या जगातील भौतिक आणि शारीरिक गोष्टींच्या मागे धावत सुटतो. दुर्दैवाने आयुष्यभर परिश्रम करूनही त्याला खरे सुख समाधान ह्या जगात मिळतच नाही आणि सुखाचा दर्जा पाहण्यापक्षा सुखसोयीची संख्या वाढविण्यामध्ये माणूस मश्गुल राहतो. भौतिकतेकडून अध्यात्माकडे जाण्याऐवजी तो भौतिक गोष्टींची अधिकाधिक जमवाजमव करीत राहतो आणि बुडत्याचा पाय खोलात अशी त्याची अवस्था होते. संत पॉल आपल्या पत्रात पृथ्वीवरील गोष्टींवरून आपले लक्ष काढून आपण स्वर्गीय गोष्टींकडे लावावे असे सुचवितो. जुन्या मनुष्यास (आदाम) काढून नवा मनुष्य (ख्रिस्त) धारण करण्यास तो आपल्यालाही पाचारण करीत आहे. त्यासाठी ख्रिस्त स्वतः आजच्या शुभवर्तमानात धन्योद्गार आणि दुःखोद्गार देत आहे. दीन, भुकेलेले, शोक करीत असलेले, छळ सहन करीत असलेले ह्यांना तो धन्य म्हणतो कारण त्याची देवावर, त्याच्या औदार्यावर आणि त्याच्या साहाय्यावर आहे. याउलट जे धनवान आहेत, खाऊनपिऊन तृप्त झालेले आहेत, मौजमजा करीत आहेत आणि लोकांच्या खोट्या स्तुतीसाठी हपापलेले आहेत त्यांची दुर्दशा होणार असे ख्रिस्त म्हणतो कारण त्यांचे हे भौतिक वैभव फार काळ टिकणारे नाहीआणि जगातील वैभवात राहण्याची सवय जडल्यामुळे ते काढून घेतले जाईल तेव्हा त्यांना खूप कष्टदायक अवस्थेत जीवन जगणे फार कठीण जाणार आहे असे भाकीत तो करतो. मी भौतिक पातळीवर जीवन जगतो/ते की आध्यात्मिक पातळीवर जीवन जगतो/ते? धन्योद्गार किंवा दुःखोद्गार ह्यांच्यातील कोणते वचन मला लागू पडते ?
प्रार्थना :हे प्रभू येशू, आमच्या अंत:करणात करुणेचा व दयेचा दीप प्रज्वलित कर, आमेन.
0 टिप्पण्या