सामान्यकाळातील २९ वा सप्ताह
शुक्रवार दि. २४ ऑक्टोबर २०२५
मी तुला सांगतो, पै न् पै फेडीपर्यंत तू तेथून सुटणार नाहीस..
I tell you, you will never get out until you have paid the very last penny."
बार्सेलोना येथे त्यांनी धार्मिक विषयांवरील पुस्तकांचे ग्रंथालय उभारले. ते इतके जगद्विख्यात झाले की ख्रिस्ती धर्मातील प्राचीन आणि आधुनिक काळातील महत्त्वाची पुस्तके आणि ग्रंथ अगदी सवलतीच्या दरात जगभर जाऊ लागले. जिथे कुठे संत अँथनी जात तिथे ते आपणाबरोबर ख्रिस्ती साहित्य, पुस्तके नेत आणि लोकांना मोफत वाटत असत.
संत अँथनी हे स्वतः एक सिद्धहस्त लेखक होते. त्यांनी १३० पुस्तके लिहिली. दि. २४ ऑक्टो. १८७० साली ते मरण पावले. त्यांचे अवशेष १८९७ साली गोळा गेले जात असताना त्यांचं हृदय अविनाशी अवस्थेत सापडले. इ. स. १९५० साली त्यांना संतपद देण्यात आले.
चिंतन : आपण सगळीकडे मिशनरी पाठवू शकत नसल्याकारणाने निदान चांगली पुस्तके तरी सर्वत्र पाठवावीत. कारण चांगली पुस्तके ही मिशनऱ्यांप्रमाणे चांगले प्रेषितकार्य करू शकतात. - संत अँथनी मेरी क्लॅरेट
आपल्या अंत:करणात दैहिक आणि आध्यात्मिक भावनांचे जणू युध्द सुरु असते. म्हणूनच संत पौल आपल्याला आठवण करून देत आहे की, देवाने त्याचा आत्मा आपल्यामध्ये घातला आहे. पवित्र आत्म्याची आराधना करुन जे चांगले, पवित्र आणि नैतिक त्याचा आपण स्वीकार करावा आणि पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आपण आपले निर्णय घ्यावेत.
आपण जर योग्यप्रकारे येणाऱ्या आव्हानाला सामोरे जाण्याची तयारी केली नसेल तर आपला न्याय होणार आहे. जीवनात जे जे चांगले, न्याय, दैवी आणि पवित्र असेल त्याचा स्वीकार करण्यासाठी देवाकडे सद्सद्विवेक बुध्दीची प्रेरणा मागू या.
आज आपण शरीराने, मनाने व आत्म्याने प्रभूला शरण जाऊ या. आपल्या संपूर्ण जीवनावर परमेश्वराला ताबा घेण्यासाठी विनंती करु या..
पहिले वाचन :रोम. ७:१८-२५
वाचक : पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"मला ह्या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवील?"
मला ठाऊक आहे की, माझ्या ठायी म्हणजे माझ्या देहस्वभावात काही चांगले वसत नाही. कारण इच्छा करणे हे मला साधते, पण चांगले ते कृतीत आणणे ते मला साधत नाही. जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करत नाही, तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करतो. आता जे करावेसे वाटत नाही ते जर मी करतो तर ते कर्म मीच करतो असे नव्हे, तर माझ्या ठायी वसणारे पाप ते करते.
तर मग जो मी सत्कर्म करू इच्छितो त्या माझ्याजवळ वाईट आहेच असा नियम मला आढळतो. माझा अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करतो, तरी माझ्या अवयवात मला निराळाच नियम दिसतो. तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवातील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो. किती मी दुर्दैवी माणूस! ह्या मरणाधीन असलेल्या देहापासून मला कोण सोडवील? आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे देवाचे आभार मानतो.
प्रभूचा शब्द.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Romans 7:18-25a
Brethren: know that nothing good dwells in me, that is, in my flesh For have the desire to do what is right, but not the ability to carry it out for do not do the good I want, but the evil I do not want is what I keep on doing Now i do what I do not want, it is no longer I who do it, but sin that dwells within me. So I find it to be a law that when I want to do right, evil lies close at hand. For I delight in the law of God, in my inner being, but I see in my members another law waging war against the law of my mind and making me captive to the law of sin that dwells in my members Wretched man that I am! Who will deliver me from this body of death? Thanks be to God through Jesus Christ our Lord!
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ११९: ६६,६८,७६-७७
प्रतिसाद : प्रभो, तुझे नियम मला शिकव.
१) विवेकबुद्धी आणि ज्ञान मला दे,:
कारण तुझ्या आज्ञांवर माझी निष्ठा आहे.
तू चांगला आहेस, तू चांगले करतोस,
तुझे नियम मला शिकव.
२) तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनानुसार
तुझ्या वात्सल्याने मला सांत्वन प्राप्त होऊ दे.
माझ्यावर करुणा करा म्हणजे मी जगेन.
कारण तुझे शास्त्र माझा पूर्णानंद आहे.
३) तुझे नियमशास्त्र मी कधीही विसरणार नाही,
कारण तू त्यांच्याद्वारे मला नवजीवन दिले आहेस,
मी तुझा आहे, माझे तारण कर,
कारण मी तुझ्या नियमशास्त्राचा आश्रय घेतला आहे.
Psalm 119:66, 68, 76, 77, 93, 94
Teach me your statutes, O Lord.
Teach me good judgment and knowledge
for I trust in your commands. R
You are good, and you do what is good:
teach me your statutes. R
Let your merciful love console me
by your promise to your servant. R
Show me compassion, that I may live,
for your law is my delight. R.
I will never forget your precepts,
for with them you give me life. R
Save me, I am yours,
for I seek your precepts. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे,
माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही
आलेलुया!
Acclamation:
R. Alleluia, alleluia.
Blessed are you, Father, Lord of heaven and earth, that you to little children the mysteries of the kingdom. have revealed
R. Alleluia, alleluia.
