आगमनकाळातील पहिला सप्ताह
सोमवार दि. १ डिसेंबर २०२५
येशूजवळ आलेला शताधिपती हा प्रचंड विश्वासाची देणगी लाभलेला माणूस होता. शताधिपतीने आपल्या आजारी चाकराला बरे करण्यासाठी चाकराकडे येण्याची विनंती न करता आपली अपात्रता व्यक्त करीत म्हटले, 'प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. प्रभू येशूच्या सामर्थ्यावर आणि दयेवर शताधिपतीचा पूर्ण विश्वास होता. सामर्थ्यशाली प्रभूने आपल्या घरी यावे इतका मी योग्य नाही अशी कबुली त्याने दिली. केवळ त्याच्या श्रद्धेमुळेच त्याचा चाकर बरा झाला. प्रभू येशूच्या सामर्थ्यावर आणि दयेवर विश्वास ठेवून शरण जाणाऱ्यांच्या जीवनात परिवर्तन आणि चमत्कार घडू शकतात.
आपण सर्वजण सुद्धा अपात्र असून प्रभू येशूने आपल्याकडे यावे एवढी पात्रता आपल्यात नाही. तरी सुद्धा प्रभू अतीपवित्र ख्रिस्तशरीर संस्कारामध्ये आपल्याकडे येत असतो. प्रभूच्या वचनात, शब्दात, स्पर्शात महान सामर्थ्य आहे. आपली प्रभू वरील श्रद्धा दृढ असायला हवी. ह्या आगमन काळात प्रभूला स्वीकारण्याची तयारी करीत असताना शताधिपतीसारखी आपली श्रद्धा मजबूत बनविण्यासाठी प्रभूला शरण जाऊ या.
पहिले वाचन : यशया २ :१-५
वाचक :यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
"प्रभू सर्व राष्ट्रांना परमेश्वराच्या चिरशांतीच्या राज्यात एकत्रित करतो."
आमोजचा पुत्र यशया याला यहुदा आणि येरुशलेम याविषयी प्राप्त झालेले दृष्टान्तवचन शेवटल्या दिवसांत असे होईल की, परमेश्वराच्या मंदिराचा पर्वत, पर्वतांच्या शिखरांवर स्थापण्यात येईल आणि सर्व पर्वतांहून तो उंच होईल. त्याकडे सर्व राष्ट्रांतील लोक लोटतील, देशादेशांतील लोकांच्या झुंडी जातील आणि म्हणतील, “चला, परमेश्वराने आपले मार्ग आम्हांला शिकवावेत आणि आम्ही त्याच्या मार्गाने चालावे, म्हणून आपण त्याच्या पर्वताकडे, याकोबच्या देवाच्या निवासस्थानी जाऊ या.' कारण सियोनातून धर्मशास्त्र आणि येरुशलेमातून परमेश्वराचे वचन निघेल तो राष्ट्रांचा न्यायनिवाडा करील. देशोदेशीच्या लोकांचा न्याय करील आणि ते आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करतील, आपल्या भाल्यांच्या कोयत्या करतील. यापुढे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रांवर तरवार उचलणार नाही. ते यापुढे युद्धकला शिकणार नाहीत. याकोबच्या घराण्या चल, ये, आपण परमेश्वराच्या प्रकाशात चालू. मेघ आणि रात्रीसाठी प्रज्वलित अग्नीचा प्रकाश निर्माण करील. त्याच्या सर्व वैभवावर छत्र असेल आणि दिवसा ऊन लागू नये, सावली मिळावी आणि वादळ आणि पाऊस यापासून रक्षण व्हावे, निवारा आणि आश्रय असावा म्हणून हा मंडप घालण्यात येईल.
प्रभूचा शब्द.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Isaiah 2:1-5
The word that Isaiah the son of Amoz saw concerning Judah and Jerusalem It shall come to pass in the latter days that the mountain of the house of the Lord shall be established as the highest of the mountains, and shall be lifted up above the hills; and all the nations shall flow to it, and many peoples shall come, and say: "Come, let us go up to the mountain of the Lord, to the house of the God of Jacob, that he may teach us his ways and that we may walk in his paths." For out of Zion shall go forth the law, and the word of the Lord from Jerusalem. He shall judge between the nations, and shall decide disputes for many peoples; and they shall beat their swords into ploughshares, and their spears into pruning-hooks; nation shall not lift up sword against nation, neither shall they learn war any more. O house of Jacob, come, let us walk in the light of the Lord.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १२२:१-४,८-९
प्रतिसाद : चला, आपण परमेश्वराच्या मंदिरात जाऊ.
१) “चला आपण परमेश्वराच्या मंदिरात जाऊ
असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला.
हे येरुशलेम, तुझ्या वेशींना आमचे पाय लागले आहेत.
२ ) हे येरुशलेम, एकत्र जोडलेल्या नगरीसारखी
तू बांधलेली आहेस. इस्रायला घालून दिलेल्या निर्बंधांप्रमाणे
तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश, परमेश्वराच्या नावाने
उपकारस्मरण करण्यासाठी चढून येतात.
३) माझे बंधू आणि माझे मित्र यांच्याकरिता
“तुझ्यामध्ये शांती वसो!” अशी मी प्रार्थना करीन.
परमेश्वर आमचा देव याच्या मंदिराकरिता
आणि तुझ्या कल्याणासाठी मी झटत जाईन.
Psalm 122:1-2, 4-5, 6-7, 8-9
. Let us go rejoicing to the house of the Lord.
I rejoiced when they said to me,
"Let us go to the house of the Lord."
And now our feet are standing
within your gates, O Jerusalem, R
Jerusalem is built as a city
bonded as one together.
It is there that the tribes go up,
the tribes of the Lord. R.
For Israel's witness it is
to praise the name of the Lord.
There were set the thrones for judgment,
the thrones of the house of David.
For the peace of Jerusalem pray,
"May they prosper, those who love you"
May peace abide in your walls,
and security be in your towers.
For the sake of my family and friends,
let me say, "Peace upon you."
For the sake of the house of the Lord, our God,
I will seek good things for you. R
जयघोष
हे समर्थ देवा, आम्हांला पूर्व स्थितीवर आण तुझी कृपादृष्टी आम्हांवर वळव म्हणजे आमचे तारण होईल.
Acclamation:
Come to save us, Lord our God, let your face shine on us, and we shall be saved
