Marathi Bible Reading |Saturday 13th December 2025 | 2nd Week of Advent

आगमनकाळातील दुसरा  सप्ताह 

शनिवार दि. १३ डिसेंबर ०२५

एलिया केव्हाच आला आहे पण लोकांनी त्याला ओळखले नाही.
I tell you that Elijah has already come, and they did not recognise him,


संत ल्यूसी 
कुमारिका, रक्तसाक्षी ( २८३-३०४)
एका प्राचीन ख्रिस्ती परंपरेनुसार संत ल्युसी ही इटलीमधील सायराकूस या ठिकाणी एका श्रीमंत कुटुंबात जन्माला आली होती. तिचे वडील तिच्या बालपणीच मरण पावले आणि जरी ल्युसी हिने आमरण कौमार्याचे व्रत स्वीकारण्याचा व देवाशी एकनिष्ठ राहण्याचा निश्चय केलेला असला तरी तिच्या विधवा आईने मात्र एका श्रीमंत परंतु मूर्तिपूजक युवकाशी तिची सोयरिक करून दिली. संत सिसिलीयाप्रमाणे आपण देखील आपल्या पतीचे मनपरिवर्तन करू आणि आपल्या पावन व्रताचा आदर राखण्यास त्याचे मन वळवू अशी आशा ती आपल्या मनाशी बाळगून होती.
ल्यूसीची आई बरीच वर्षे रक्तस्रावाने पीडलेली होती. त्यामुळे तिच्या मुलीच्या सूचनेवरून ५० मैल अंतरावर असलेल्या संत आगथाच्या चमत्कारकर्त्या थडग्याला भेट देण्याचे तिने मान्य केले. तिथे ती ताबडतोब गेली आणि संपूर्णपणे बरी झाली. आपले दुखणे कायमचे बरे झाले हे पाहून ल्युसीच्या आईला अत्यानंद झाला. तिने त्या चमत्काराप्रीत्यर्थ आपल्या मुलीकडे आपली संपत्ती गोरगरिबांना वाटून टाकण्यासाठी सुपूर्द केली. यापूर्वी ल्युसीने आपल्या आईला तशी विनंती अनेकदा केलेली होती. परंतु आईने मात्र त्याला मान्यता दिली नव्हती.
आपल्या भावी पत्नीने व सासूने आपल्याला मिळणाऱ्या संपत्तीची अशी उधळपट्टी केल्याचे कानी येताच लोभी वृत्तीच्या त्या तरुणाने रागापायी लुसीला सिसिली देशाच्या गव्हर्नरकडे आणले व ती ख्रिस्ती जीवन जगत असल्याचे त्याच्या निदर्शनास आणून दिले.
तो काळ ख्रिस्ती लोकांच्या (डायक्लोशियन) छळाचा काळ होता. एखादा रोमन कितीही देशभक्त असला तरी चालेल परंतु तो ख्रिस्ती असण्याला सम्राटचा तीव्र विरोध होता. जणू ख्रिस्ती धर्म राष्ट्रीय एकात्मतेला आणि लोकांच्या राष्ट्रनिष्ठेला धोकादायक होता अशीच त्यांची धारणा झाली होती.
अशा पार्श्वभूमीवर एक कट्टर ख्रिस्ती म्हणून संत ल्यूसी हिला गर्व्हनरच्या समोर उभे करण्यात आले. तिला अत्यंत भयानक आणि लज्जास्पद मानहानीला व छळाला सामोरे जावे लागले. शेवटी ती १३ डिसेंबर ३०४ साली वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी एक कुमारिका म्हणून रक्तसाक्षी बनली. एका तरवारीने तिचा गळा चिरून तिला आरपार भोसकण्यात आले होते. ज्या कंठातून ख्रिस्ताचे नाव उच्चारले जात होते तो कंठ भेदून छेदून टाकण्यात आला होता.
ती सिसिली देशातील सायराकूस प्रांताची आश्रयदाती संत आहे. डोळे 
येणे, घशाचे विकार, रक्तस्राव आणि संसर्गजन्य रोगांपासून मुक्ती मिळविण्यासाठी तिचा धावा केला जातो. 
चिंतन : ज्यांची हृदये शुद्ध आहेत तेच खऱ्या अर्थाने पवित्र आत्म्याचे मंदिर आहे. - संत ल्यूसी 

पहिले वाचन बेन सिरा  ४८:१-४,९-११
वाचक : बेन सिरा या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"एलिया पुन्हा येईल.”
एलिया भविष्यवादी अग्नीप्रमाणे उठला आणि त्याचे शब्द मशालीप्रमाणे जळत होते. त्याने त्यांच्यावर दुष्काळ आणला आणि त्याने आपल्या आस्थेने त्यांची संख्या कमी करून घेतली. त्याच्यामुळे प्रभूने आज्ञा केली आणि आकाशाचे दरवाजे बंद झाले आणि तीन वेळा अग्नीचा वर्षावसुद्धा करून घेतला. हे एलिया, तुझ्या अद्भुत कार्यांनी तू किती महान होतास !
अग्नीच्या चक्रवातामधून, ज्वालामय अश्वाच्या रथातून तुला वर घेतले गेले. तुझ्याविषयी असे लिहिले गेले आहे की, देवाचा कोप प्रज्वलित होण्याच्या अगोदर तो शांत करण्यासाठी, मुलाचे मन पित्याकडे वळविण्यासाठी आणि याकोबची कुळे पुनः प्रस्थापित करण्यासाठी तू नेमलेल्या वेळी तयार असशील जे प्रेमाने नटवले आहेत आणि ज्यांनी तुला पाहिलेले आहे ते धन्य होत कारण आम्हीसुद्धा निश्चित जगणार आहोत.
प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Sirach 48:1-4, 9-11b

In those days: The prophet Elijah arose like a fire, and his word burned like a torch. He brought a famine upon them, and by his zeal he made them few in number. By the word of the Lord he shut up the heavens, and also three times brought down fire. How glorious you were, O Elijah, in your wondrous deeds! And who has the right to boast that which you have? You who were taken up by a whirlwind of fire in a chariot with horses of fire; you who are ready at the appointed time, it is written, to calm the wrath of God before it breaks out in fury to turn the heart of the father to the son, and to restore the tribes of Jacob. Blessed are those who saw you and those who have been fallen asleep in love.
This is the word of God 
Thanks be to God 


प्रतिसाद स्तोत्र :८०:२-३,१५-१६,१८-१९
प्रतिसाद :  प्रभो, आम्हांला पूर्वस्थितीवर आण.
१) हे इस्राएल राष्ट्रांच्या मेंढपाळा, आमच्याकडे लक्ष दे.
करुबासनावर विराजमान झालेल्या परमेश्वरा,
आम्हांला तुझे तेजस्वी दर्शन घडू दे. 
तुझा पराक्रम गाजव आणि 
आमचा उद्धार करायला धावून ये. 

२) हे सर्वसमर्थ देवा, मागे फीर, 
स्वर्गातून नजर टाकून बघ. 
या द्राक्षलतेची, आपल्या उजव्या हाताने 
लावलेल्या रोपाची काळजी घे. 

३ ) तू निवडलेल्या आणि आपल्या सेवेसाठी 
समर्थ केलेल्या मानवावर 
तुझा वरदहस्त दे. पुन्हा काही आम्ही
 तुझ्यापासून तोंड फिरवून जाणार नाही. 
आम्हांला नवजीवन दे
म्हणजे आम्ही तुझ्या नामाचा धावा करू.

३) पण दुर्जनांचे ते मुळीच नाही 
वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे ते आहेत. 
सज्जनांच्या मार्गावर प्रभूचे लक्ष असते. 
परंतु दुर्जनांचा मार्ग विनाशाकडे जातो.


Psalm Psalm 80:2ac and 3b, 15-16a, 18-19
R     O God, bring us back; let your face shine on us, and we shall be saved.

O shepherd of Israel, hear us, 
enthroned on the cherubim, shine forth. 
Rouse up your might and come to save us. R

 God of hosts, turn again, we implore;
 look down from heaven and see. 
Visit this vine and protect it,
 the vine your right hand has planted. R

May your hand be on the man at your right hand,
 the son of man you have confirmed as your own. 
And we shall never forsake you again;
 give us life that we may call upon your name. R


जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया!  
परमेश्वराचा दिवस आता जवळ आला आहे. 
पाहा, तो आमचे तारण करण्यास येत आहे. 
आलेलुया!

Acclamation: 
 Prepare the way of the Lord, make his paths straight and all flesh shall see the salvation of God.

शुभवर्तमान मत्तय १७:१०-१३
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“एलिया केव्हाच आला आहे पण लोकांनी त्याला कधीच ओळखले नाही."
पर्वतावरून खाली येत असताना शिष्यांनी येशूला विचारले, “मग एलिया यायला हवा असे शास्त्री कसे म्हणत ?"
येशूने उत्तर दिले, "एलिया येईल आणि सारे काही स्थिरस्थावर करील, पण मी तुम्हांला सांगतो. एलिया केव्हाच आला आहे पण लोकांनी त्याला ओळखले नाही. त्यांनी आपल्या मर्जीनुसार त्याला वागवले. मानवपुत्रालाही त्यांच्या हातून तसेच भोगावे लागेल." येशू बाप्तिस्मा करणाऱ्या योहान विषयी बोलत आहे हे तेव्हा कोठे शिष्यांच्या लक्षात आले.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :Matthew 17:10-13

As they were coming down the mountain, the disciples asked Jesus, "Then why do the scribes say that first Elijah must come?" He answered, "Elijah does come, and he will restore all things. But I tell you that Elijah has already come, and they did not recognise him, but did to him whatever they pleased. So also the Son of Man will certainly suffer at their hands." Then the disciples understood that he was speaking to them of John the Baptist.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन:
ख्रिसमसच्या सणाच्या तयारीसाठी विद्यार्थी शाळेचे सभागृह सजवत होते. सभागृहात क्रुसावरील येशूची इमाज त्यांना ख्रिस्मससाठी योग्य वाटत नसल्यामुळे भिंतीवरून काढून टाकण्याचा विचार करत होते त्यावेळी त्याचे प्रिन्सिपल सभागृहात आले तेव्हा फादरानी विद्यार्थ्यांना क्रसिफिक्स भिंतीवर राहू देण्याची विनंती केली. ते म्हणालेः शेवटी, क्रुसावर बलिदान देण्यासाठीच येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. आपला एखादा नातेवाईक मरण पावल्यावर हसणे आपणास अयोग्य वाटते. ख्रिस्मस काळात दुःखसहन आणि मृत्यूबद्दल बोलणे आपल्याला अयोग्य वाटते. परंतु आपण हे लक्षात ठेवू या की येशूच्या जन्मापासून आपण क्रूस वेगळा करू शकत नाही. हे अपमानाचे लक्षण नसून गौरवाचे लक्षण आहे. येशूचा जन्म आपल्याला वाईटापासून सोडविण्यासाठी झाला. आजचा शुभवर्तमानाचा उतारा या तीन महान संदेष्ट्यांबद्दल बोलतोः एलीया, जॉन द बॅप्टिस्ट आणि स्वतः येशू. या तिघांना माहीत होते की त्यांना देवाने देवाविषयी बोलण्यासाठी, उभे राहून देवाच्या सत्याबद्दल सांगण्यासाठी पाठवले होते. ते खरे बोलतात म्हणून त्यांचे काय होईल याची त्यांना भीती वाटत नाही. परंतु लोकांनी त्यांचा संदेश ऐकण्यास नकार दिला, त्यांनी त्यांची चेष्टा केली, टीका केली आणि त्यांना नाकारले आणि हे तीन संदेष्टे लहान वयातच मरण पावले.

प्रार्थना:हे प्रभू येशू, अंतर्मनाने तुला ओळखण्यास व तुझ्या वचनाप्रमाणे आचरण करण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या