Marathi Bible Reading | Third Sunday of Advent | 14th December 2025

आगमनकाळातील  तिसरा  रविवार

१४ डिसेंबर  २०२५

माझ्यानंतर येणारा माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. त्याची पादत्राणे वाहून न्यायची माझी लायकी नाही. तो पवित्र आत्म्याने आणि अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करील. he shall baptize you in the Holy Ghost and fire.  

आनंद   (Joy ) 

तो स्वर्गीय  आनंद  घेऊन प्रभू येशू येत आहे

प्रभू येशूच्या येण्याने देवाची पुनर्वसनाची व मानवाच्या उद्धाराची योजना साकार झाली.   प्रभू पुन्हा येणार आहे व जगाचा न्याय निवाडा करणार आहे. आजच्या दुसऱ्या -वाचनात प्रभूचा प्रेषित संत याकोब प्रभूच्या पुनरागमनाचा संदेश देत आहे. संत  याकोब म्हणत आहे, 'अहो बंधूनो, तुम्ही धीर धरा, आपली अंत:करणे स्थिर करा, प्रभूच्या आगमनाची वेळ आली आहे, पाहा न्यायधीश दाराजवळ उभा आहे. ' 
प्रभूला स्वीकारण्यास आपण सज्ज असावे, आपण कोणीही दोषी ठरु नये म्हणून आपण आज आपले जीवन आचरण तपासून पाहू या. प्रभूला शरण जाऊ या कारण, 'प्रभू फार कनवाळू व दयाळू आहे.'

पहिले वाचन : :  यशया ३५ : १-६,१०
वाचन : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
  "परमेश्वर स्वतः येईल आणि आमचा उद्धार करील. "

अरण्य आणि रुक्ष भूमीही हर्षतील. वाळवंट उल्हासेल आणि कमलाप्रमाने फुलेल. ते अत्यंत प्रफुल्लित होईल. आनंदाने गाऊन ते उत्सव करील. लबानोनची शोभा त्याला मिळेल. कार्मेल आणि शारोन यांचे ऐश्वर्य त्याला प्राप्त होईल. ती परमेश्वराचे वैभव आमच्या देवाचे ऐश्वर्य पाहतील.
थरथरणारे हात दृढ करा. लटपटणारे गुडघे बळकट करा. घाबऱ्या मनाच्या लोकांना म्हणा, धीर धरा. भिऊ नका. पाहा, तुमचा देव सूड घ्यावयास, अनुरूप असे प्रतिफल द्यावयास येईल. तो येईल आणि तुमचा उद्धार करील.
तेव्हा अंधांचे नेत्र उघडतील. बहिऱ्यांचे कान मोकळे होतील. तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील. मुक्यांची जीभ गजर करील.
मुक्त केलेले परमेश्वराचे लोक परत येतील. ते जयजयकार करीत सियोनात येतील. त्यांच्या मस्तकी अक्षय आनंद राहील. ते आनंद आणि हर्ष पावतील. दुःख आणि उसासे पळ काढतील.
प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading : First Reading: Isaiah 35: 1-6a, 10
The land that was desolate and impassable shall be glad, and the wilderness shall rejoice, and shall flourish like the lily. It shall bud forth and blossom, and shall rejoice with joy and praise: the glory of Libanus is given to it: the beauty of Carmel, and Saron, they shall see the glory of the Lord, and the beauty of our God. Strengthen ye the feeble hands, and confirm the weak knees. Say to the fainthearted: Take courage, and fear not: behold your God will bring the revenge of recompense: God himself will come and will save you. Then shall the eyes of the blind be opened, and the ears of the deaf shall be unstopped. Then shall the lame man leap as a hart, and the tongue of the dumb shall be free. And the redeemed of the Lord shall return, and shall come into Sion with praise, and everlasting joy shall be upon their heads: they shall obtain joy and gladness, and sorrow and mourning shall flee away.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र : १४६:६ - १०
प्रतिसाद :  प्रभो, ये आणि आमचा उद्धार कर. 

१.  तो सदैव सत्यवचनी असतो. 
छळलेल्यांना न्याय देतो. 
भुकेल्यांना अन्न देतो. 
प्रभू बंदिवानांना मुक्त करतो.

२.  प्रभू आंधळ्यांना दृष्टी देतो. 
प्रभू वाळून गेलेल्यांना ताठ उभे करतो. 
प्रभू परक्यांना सांभाळतो.
अनाथ आणि विधवा यांची दाद घेतो..

३.  प्रभू सज्जनांवर प्रेम करतो..
पण दुर्जनांचे बेत फिसकटून टाकतो. 
प्रभू सदासर्वदा राज्य करील. सियोन, 
तुझा देव पिढ्यान्पिढ्या राज्य करील

 : Psalms 146: 6-7, 8-9a, 9bc-10
R. (Is 35:4) Lord, come and save us.

6 The LORD God made heaven and earth, the sea, and all things that are in them.
7 The LORD God keepeth truth for ever: who executeth judgment for them that suffer wrong: who giveth food to the hungry. The Lord looseth them that are fettered:
R. Lord, come and save us.

8 The Lord enlighteneth the blind. The Lord lifteth up them that are cast down: the Lord loveth the just.
9a The Lord keepeth the strangers.
R. Lord, come and save us.

9bc He will support the fatherless and the widow: and the ways of sinners he will destroy.
10 The Lord shall reign for ever: thy God, O Sion, unto generation and generation.
R. Lord, come and save us.


दुसरे वाचन:याकोबचे पत्र   ५ :७-१०
वाचक : याकोबचे पत्र यातून घेतलेले वाचन 
"आपली अंत:करणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ जवळ आली आहे.' "

बंधुजनहो, प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा. पाहा, शेतकरी भूमीच्या मौल्यवान पिकाची वाट पाहात असता, त्याला पहिला आणि शेवटचा पाऊस मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरतो. तुम्हीही धीर धरा. आपली अंत:करणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ जवळ आली आहे. बंधुनो, तुम्ही दोषी ठरू नये म्हणून एकमेकांविषयी कुरकुर करू नका. पाहा, न्यायाधीश दाराजवळ उभा आहे. बंधूनो, जे संदेष्टे प्रभूच्या नावाने बोलले त्यांचे दुःखसहन आणि त्यांचा धीर यांविषयीचा कित्ता घ्या.
प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.

Second Reading: 
Second Reading: James 5: 7-10
Be patient therefore, brethren, until the coming of the Lord. Behold, the husbandman waiteth for the precious fruit of the earth: patiently bearing till he receive the early and latter rain. Be you therefore also patient, and strengthen your hearts: for the coming of the Lord is at hand. Grudge not, brethren, one against another, that you may not be judged. Behold the judge standeth before the door. Take, my brethren, for an example of suffering evil, of labour and patience, the prophets, who spoke in the name of the Lord.
This is the word of God 
Thanks be to God 

जयघोष         
आलेलुया, आलेलुया !  
परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे. कारण गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी त्याने मला अभिषेक केला आहे.
आलेलुया!

Acclamation: 
 Isaiah 61: 1

R. Alleluia, alleluia.
1 The Spirit of the Lord is upon me, because he has anointed me to bring glad tidings to the poor.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान  मत्तय ११:२-११
वाचक :  मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
   "ज्याचे आगमन होणार आहे ते आपणच, की आम्ही आणखी कुणाची वाट पाहावी ?"
योहान तुरुंगात असताना त्याने ख्रिस्ताच्या कार्याविषयी ऐकून आपल्या शिष्यांकरवी त्याला निरोप पाठवून विचारले "ज्याचे आगमन होणार आहे ते आपणच, की आम्ही आणखी कुणाची वाट पाहावी ?
येशूने त्यांना उत्तर दिले, "जे तुम्ही ऐकत आहात आणि पाहात आहात ते जाऊन योहानला सांगा. अंधांना दृष्टी प्राप्त होते, पंगू चालतात, महारोगी शुद्ध होतात, बहिऱ्यांना ऐकू येते, मेलेले जिवंत केले जातात आणि गरिबांना शुभसंदेश ऐकवला जातो. ज्याला माझी अडचण वाटत नाही तो धन्य." योहानचे जासूद जायला निघाले तेव्हा येशू जमावाला योहानविषयी विचारू लागला, “तुम्ही रानावनात काय पहायला गेला होता ? वाऱ्याच्या झोतावर डोलणारे बोरु काय ? नाही, तर मग काय पहायला गेला होता ? भरजरी वस्त्र घालणाऱ्या माणसाला पहायला काय ? अहो, तलम वस्त्र धारण करणारे राजवाड्यात असतात. मग कशाला तिकडे गेला होता ? एखाद्या संदेष्ट्याला पहायला काय ? अर्थात मी म्हणतो, संदेष्ट्यापेक्षा श्रेष्ठ आहे त्याला. पहा, मी आपला जासूद तुझ्या अगोदर पाठवीत आहे. पुढे जाऊन तो तुझ्यासाठी मार्ग खुला करील, असे ज्याच्याविषयी धर्मशास्त्रात म्हटले आहे तो हाच. मी तर खरेच सांगते, स्त्रीच्या पोटी जन्माला आलेल्या सर्वांत योहानपेक्षा श्रेष्ठ असा कुणी झाला नाही. मात्र स्वर्गराज्यातला सर्वांत कनिष्ठ तो त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :   Matthew 11: 2-11
Now when John had heard in prison the works of Christ: sending two of his disciples he said to him: Art thou he that art to come, or look we for another? And Jesus making answer said to them: Go and relate to John what you have heard and seen. The blind see, the lame walk, the lepers are cleansed, the deaf hear, the dead rise again, the poor have the gospel preached to them. And blessed is he that shall not be scandalized in me. And when they went their way, Jesus began to say to the multitudes concerning John: What went you out into the desert to see? a reed shaken with the wind? But what went you out to see? a man clothed in soft garments? Behold they that are clothed in soft garments, are in the houses of kings. But what went you out to see? a prophet? yea I tell you, and more than a prophet. For this is he of whom it is written: Behold I send my angel before thy face, who shall prepare thy way before thee. Amen I say to you, there hath not risen among them that are born of women a greater than John the Baptist: yet he that is the lesser in the kingdom of heaven is greater than he.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन:
आगमनकाळातील तिसऱ्या रविवारी आपली माता ख्रिस्तसभा आपल्याला प्रभूच्या आगमनाची तयारी करण्यासाठी आणखी काही विचार देते:
अ. आपण देवाची करुणा गृहीत धरू नये : परमेश्वराच्या क्रोधाची इस्राएली लोकांना जाणीव होती तसाच अनुभवदेखील होता. इस्राएलला शिस्त लावण्यासाठी तो जसा त्यांना शिक्षा करतो तसाच परराष्ट्रीयांना आपले सार्वभौम सामर्थ्य दर्शविण्यासाठी तो धारेवर धरतो. आजच्या पहिल्या वाचनात मात्र त्याच्या करुणेचे चित्र रंगविण्यात आलेले आहे. मात्र इस्राएलने त्याची ही करुणा गृहीत धरू नये असे यशया सुचवितो. 
ब. आपण चिकाटीने प्रभूच्या येण्याची वाट पाहावी : आजच्या दुसऱ्या वाचनात याकोब एकूण तीन प्रतिमा वापरतो. शेतकरी, न्यायाधीश आणि जुन्या करारातील ईयोब हे पात्र ! हे तिघेही धैर्याने व चिकाटीने परमेश्वराच्या कृपेची वाट पाहणाऱ्यांचे प्रतिनिधी होत. शेतकरी फळांची वाट पाहतो, न्यायाधीश न्यायदानाची तयारी करतो तर ईयोब आपल्या संकटात परमेश्वराची वाट पाहात होता. आपणही त्यांचे अनुकरण करीत कुरकूर न करता धिराने प्रभूची वाट पाहायला हवी. 
क. आपली पूर्वतयारी सत्याच्या भक्कम पायांवर उभारलेली असावी : शुभवर्तमानात योहान बाप्तिस्ताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी तीन प्रतिमा वापरण्यात आलेल्या आहेत : वाऱ्याने हलणारा बोरू, तलम वस्त्रे पांघणारे व संदेष्टा. तो वाऱ्यानुसार पाठ फिरविणाऱ्यांपैकी नव्हता. त्याचे जीवन सत्याच्या भक्कम पायावर उभारलेले होते. त्याची जीवनशैली राजेशाही नव्हती, ती त्याच्या पाचारणाला व प्रेषितकार्याला साजेशी होती. एक संदेष्टा म्हणून त्याने अनैतिक जीवन जगणाऱ्या राजावर कडक ताशेरे ओढले व त्या सत्यासाठी प्राणार्पण केले.

आत्मपरीक्षण : प्रभूची करूणा गृहीत न धरता धैर्याने, चिकाटीने व सत्यतेने मला प्रभूच्या आगमनाची तयारी कशाप्रकारे करता येईल ?

प्रार्थना विश्वासाने आणि खऱ्या अंत:करणाने, हे प्रभू येशू तुला सामोरे जाण्यास आम्ही पात्र ठरोवत म्हणून आम्हाला कृपा दे, आमेन..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या