उपवासकाळातील पहिला सप्ताह
सोमवार दि.२३ फेब्रुवारी २०२६
✝️
Truly, I say to you, as you did it to one of the least of these my brothers, you did it to me."
“मी तुम्हांला सत्य सांगतो ज्याअर्थी तुम्ही कनिष्ठ बंधूपैकी एकाला केले, त्या अर्थी ते मला केले आहे.
संत पॉलीकार्प
- (५९-१५५)
✝️
शुभवर्तमानकार संत योहान (सण २७ डिसें.) ह्याने पॉलीकार्प ह्याला ख्रिस्ती धर्माविषयी सुवार्ता सांगितली आणि त्याला पूर्ण धर्मशिक्षण देऊन त्याने ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली. पुढे संत योहान पात्म नावाच्या बेटावर बंदिस्त अवस्थेत होता. परंतु तिथे जाण्याअगोदर ३७ वर्षीय पॉलीकार्प ह्याला त्याने स्मर्णा . येथल्या ख्रिस्तमंडळीचा प्रमुख (बिशप) नेमले. यहुदयांनी सतत त्यांचा छळ केला आणि त्यांच्या वाट्याला अठरा विश्वे दारिद्र्य आले. तरीही बिशप पॉलीकार्प ह्यांनी आपली ख्रिस्ती श्रद्धा अढळ राखली व ते पवित्र जीवन जगत राहिले.
इ. स. १५५ साली वयाच्या ९६ व्या वर्षी इस्टर ह्या सणाची निश्चित तारीख ठरविण्यासाठी ते रोम येथे जाऊन पोप ॲनिसेटस् ह्यांना भेटले. त्यांच्या भेटीने हा वादग्रस्त प्रश्न सुटला नसला तरी पौर्वात्य परंपरेनुसार त्यांना निसान ह्या यहुदी महिन्याच्या १४ तारखेला (मग तो रविवार असो वा नसो) प्रभूचे पुनरुत्थान साजरे करण्याची परवानगी पोप महाशयांनी दिली.
पोपमहाशयांची भेट आटोपून बिशप पॉलीकार्प आपल्या स्मर्णा येथील धर्मप्रांतात परततात तोच ख्रिस्ती लोकांचा भयंकर छळ सुरू झाला. लोकांच्या आग्रहाखातर त्यांना शहराच्या सीमेवरच एका गुप्तस्थळी हलविण्यात आले. परंतु शिक्षेच्या भीतीपोटी एका गुलामाने शेवटी हे गुपित उघड केले. बिशपांना राज्यपालाच्या न्यायदरबारात आणण्यात आले आणि त्यांनी ख्रिस्ताचा धिक्कार करावा म्हणून त्यांच्यावर दडपण आणले गेले. परंतु त्यावेळी ते अगदी खंबीरपणे म्हणाले, “माझ्या आयुष्याची ९६ वर्षे मी ज्या प्रभूची सेवा केली आहे त्या माझ्या उद्धारकाला व राजाला मी काही क्षणातच धिक्कारू शकेन काय?”
त्यांचे ते निर्भीडपणाचे उत्तर ऐकून राज्यपाल संतापला. त्यांचे हात पाठीवर बांधण्यात आले आणि त्याला जिवंत जाळण्यासाठी खुल्या मैदानावर आणण्यात आले. त्यावेळी ते पवित्र त्रैक्याची स्तुती गौरव करीत होते. ख्रिस्ताच्या दुःखाचा प्याला पिण्यासाठी देवाने आपली निवड केली म्हणून ते देवाला धन्यवाद देत होते. त्यांची प्रार्थना सुरू असतानाच त्यांच्या भोवती चिता रचण्यात आली. त्यांचा “आमेन" हा शब्द ऐकताच चिता पेटविण्यात आली. सर्व लाकडे जळून खाक झाली तरी बिशप पॉलीकार्प ह्यांच्या शरीराला अग्नीचा थोडासादेखील स्पर्श झालेला नव्हता. शेवटी अपमानीत झालेल्या राज्यपालाने सूडभावनेने त्यांच्या शरीरात भाला भोसकला व त्यांना ठार मारले.
"संत पॉलीकार्पची कृत्ये” ह्या परिपत्रात बिशप पॉलीकार्प ह्याचे रक्तसाक्षीत्व वर्णन करण्यात आलेले आहे. ख्रिस्ती परंपरेने हे पत्र जतन करून ठेवलेले आहे. तसेच तत्कालीन ख्रिस्तसभेतील जगभरच्या ख्रिस्तमंडळ्यांना छळास तोंड देता यावे म्हणून आपल्या पवित्र महागुरूचे रक्तसाक्षी मरणाचे वर्णन करणारे हे पत्र सर्वत्र प्रसारित करण्यात आले. ख्रिस्ती रक्तसाक्ष्यांच्या यादीतील हा सर्वात प्राचीन पुरावा आहे. यावरून त्याही अवस्थेत ख्रिस्तसभा आपल्या रक्तसाक्ष्यांची माहिती व अवशेष जतन करून ठेवीत असे ह्याला आधार मिळतो.
कानाच्या आजारासाठी संत पॉलीकार्प ह्यांचा धावा केला जातो.
चिंतन : आपल्या हौतात्म्यावेळी बिशप पॉलीकार्प ह्यांनी पुढीलप्रमाणे प्रार्थनाकेली : हे प्रभो, ह्या दिवसाच्या आणि क्षणाच्या भेटीबद्दल रक्तंसाक्ष्यांच्या संगतीत मी ख्रिस्ताच्या एकाच प्याल्यात सहभागी व्हावे, तुझा अभिषिक्त म्हणून गौरविले जावे, आत्म्याने व शरीराने पुन्हा उठविले जावे आणि पवित्र आत्म्याद्वारे अमरत्वाचे शाश्वतजीवन जगावे यासाठी मला पात्र बनव. तुझ्या संतांच्या सहवासात एक समृद्ध व प्रसन्न यज्ञ म्हणून माझ्या जीवनाचा स्वीकार होवो, आमेन.
मोशेद्वारे दहा आज्ञांचा पुनरुच्चार केलेला आपण आजच्या वाचनात पाहतो देवप्रीति आणि परस्पर प्रीतिच्या आज्ञा पाळण्यानेच मानवाला नीतिमत्व प्राप्त होणार असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
शेवटच्या न्यायाच्या दिवशी घडणाऱ्या घटनेचा वृत्तांत| देण्यात आला आहे. देवाच्या आज्ञा पाळणारे ते आशिर्वादित आणि देवाविरुद्ध वागणारे ते शापित ठरविले जातील. प्रभू येशू स्पष्टपणे सांगत आहे की, 'ज्या अर्थी ह्या माझ्या कनिष्ठ बंधुपैकी एकासाठी केले त्या अर्थी ते मला केले.' भूकेल्यांस अन्न, तान्हेल्यास पाणी, उघड्यांस वस्त्र, निराश्रितांस आश्रय, आजाऱ्यांना व बंदिवानाना भेट देणे अशा अनेक प्रकारे आपण देव प्रीतिची आज्ञा पाळू शकतो. देवाचे प्रतिरुप असलेली प्रत्येक व्यक्ती आपला बंधु व भगिनी आहे, म्हणूनच त्यांची सेवा हीच परमेश्वराची सेवा आहे. आजच्या चंगळवादी युगात आपल्याला गरजवंतांचा विसर पडलेला असताना प्रभू येशू जणू सांगत आहे की सर्व गरजवंतांमध्ये तुम्ही माझा चेहरा पाहा. संत मदर तेरेजांनी सुद्धा प्रत्येकामध्ये ख्रिस्ताचा चेहरा पाहिला व त्यांची सर्वतोपरी सेवा केली.
गरजवंतांमध्ये आपण ख्रिस्त पहावा, जाणावा, ओळखावा आणि त्याची सेवा करण्यासाठी पुढाकार घेता यावा म्हणून आज अंतर्मुख बनून प्रभूकडे विनयशील व परोपकारी हृदय मागू या.
पहिले वाचन लेवीय १९:१-२,११-१८
वाचक : लेवीय या पुस्तकातून घेतलेले वाचन
“आपल्या शेजाऱ्याचा न्याय निःस्पृहपणे कर."
परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएलच्या सर्व मंडळींस सांग की, तुम्ही पवित्र असावे, कारण मी परमेश्वर तुमचा देव पवित्र आहे. तुम्ही चोरी करू नये, एकमेकांशी कपटाने वागू नये व लबाडी करू नये. माझ्या नावाची शपथ वाहून आपल्या देवाच्या नावाला कलंक लावू नये, मी परमेश्वर आहे.
आपल्या शेजाऱ्यांवर जुलूम करू नको व त्याला लुबाडू नको, मजुराची मजुरी रात्रीचा दिवस उजाडेपर्यंत आपल्याजवळ ठेवू नको.
बहिऱ्याला शिव्याशाप देऊ नको, ठोकर लागेल अशी वस्तू आंधळ्यापुढे ठेवू नको. तू आपल्या देवाचे भय बाळग. मी परमेश्वर आहे.
न्यायनिवाडा करताना अन्याय करू नको. गरिवाकडे तुच्छतेने पाहू नको आणि सामर्थ्यापुढे नमू नको, आपल्या शेजाऱ्याचा न्याय निःस्पृहपणे कर. आपल्या लोकांमध्ये चहाड्या करीत इकडे तिकडे फिरू नको. आपल्या शेजाऱ्याच्या जिवावर उठू नको, मी परमेश्वर आहे.
आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष बाळगू नको. आपल्या शेजाऱ्याची अवश्य कानउघाडणी कर, नाही तर त्याच्यामुळे तुला पाप लागेल. सूड उगवू नको किंवा आपल्या भाऊबंदापैकी कोणाचा दावा धरू नको, तर आपल्या शेजाऱ्यांवर स्वतःसारखी प्रीती कर. मी परमेश्वर आहे.
प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Leviticus 19:1-2, 11-18
The Lord spoke to Moses, saying, "Speak to all the congregation of the people of Israel and say to them, You shall ball be be holy, for I the Lord your God am holy. You shall not steal; you shall not deal falsely: you shall not lie to one another. You shall not swear by my name falsely, and so profane the name of your God: I am the Lord. You shall not oppress your neighbour or rob him. The wages of a hired worker shall not remain with you all night until the morning. You shall not curse the deaf or put a stumbling block before the blind, but you shall fear your God I am the Lord. You shall do no injustice in court. You shall not be partial to the poor or defer to the great, but in righteousness shall you judge your neighbour. You shall not go around as a slanderer among your people, and you shall not stand up against the life of your neighbour: I am the Lord. You shall not hate your brother in your heart, but you shall reason frankly with your neighbour, lest you incur sin because of him. You shall not take vengeance or bear a grudge against the sons of your own people, but you shall love your neighbour as yourself: I am the Lord.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १९:८-१०,१५