Marathi Bible Reading | Monday 9th February 2026 | 5th Week in ordinary Time

सामान्यकाळातील ५वा  सप्ताह

सोमवार  दि ९ फेब्रुवारी  २०२६

  ✝️ 

आणि आपल्या वस्त्राच्या गोंड्याला तरी स्पर्श करू द्या अशी त्याला विनंती करीत
And all those who touched him were saved.
✝️


संत मिंग्वेल कोर्देरो 
•वर्तनसाक्षी (१८५४-१९१०)

चिंतन : “येशूला जसा हवा तसा त्याने माझा वापर करावा म्हणून मी स्वतःला संपूर्णत: त्याच्या हाती सोपवतो. मी लिहिलेला प्रत्येक शब्द, वाचलेले सर्व काही, माझ्या टेबलावर जे काही मी करतो आणि शाळेतील माझी सर्व कार्ये मी देवाच्या महान गौरवासाठी अर्पण करू इच्छितो.” संत मिंग्वेल कोर्डेरो

पहिले वाचन १ राजे ८:१-७,९-१३
वाचक :   राजाच्या पहिल्या  पुस्तकातून घेतलेले वाचन
"त्यांनी कराराचा कोश मंदिराच्या गाभाऱ्यात आणला आणि परमेश्वराचे मंदिर मेघाने व्यापले."
शलमोन राजाने परमेश्वराच्या कराराचा कोश दावीदपुरातून म्हणजे सियोनेतून वरती आणण्यासाठी इस्राएलचे वडीलजन, वंशाचे सर्व मुख्य आणि सर्व पितृकुळांचे सरदार यांना शलमोन राजाकडे येरुशलेमात जमा केले. सर्व इस्राएल पुरुष एथानीम मासी म्हणजे सातव्या महिन्यातल्या सणाच्या दिवसात शलमोन राजापाशी जमा झाले. इस्राएल लोकांचे सर्व वडीलजन आले तेव्हा याजकांनी कोश उचलून घेतला. परमेश्वराचा कोश, दर्शनमंडप आणि त्या मंडपातील सर्व पवित्र पात्रे ही सर्व याजक आणि लेवी यांनी वर वाहून नेली. शलमोन राजा आणि त्याच्यापाशी जमलेली सर्व इस्राएल मंडळी यांनी कोशापुढे शेरडांमेंढरांचे आणि गुराढोरांचे बली इतके अर्पण केले की त्यांच्या संख्येची मोजदाद करता आली नाही. मग याजकांनी परमेश्वराच्या कराराचा कोश मंदिराच्या गाभाऱ्यात, परमपवित्रस्थानात करुबांच्या पंखाखाली त्याच्या ठिकाणी नेऊन ठेवला. कोशस्थानाच्यावर करुबांचे पंख पसरले होते, तो कोश व त्याचे दांडे त्यावर त्यांचे आच्छादन होते. इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यावर परमेश्वराने त्यांच्याशी करार केला त्या समयी होरेब येथे मोशेने या कोशात दोन दगडी पाट्या ठेवल्या होत्या, त्याखेरीज त्यात दुसरे काही नव्हते. याजक पवित्रस्थानातून बाहेर आले तेव्हा परमेश्वराचे मंदिर मेघाने व्यापले. त्या मेघामुळे याजकांना सेवाचाकरी करण्यास उभे राहवेना, कारण परमेश्वराच्या तेजाने परमेश्वराचे मंदिर भरून गेले.
मग शलमोन राजा म्हणाला, "परमश्वराने म्हटले आहे की मी निबीड अंध:कारात वस्ती करीन. तुझ्यासाठी निवासस्थान, तुला युगानुयुगे राहाण्यासाठी मी मंदिर बांधले आहे."
 प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading 1 Kings 8:1-7, 9-13 
Solomon then summoned the elders of Israel to Jerusalem to bring
the ark of the covenant of Yahweh up from the City of David, that is, Zion. All the men of Israel assembled round King Solomon in the month of Ethanim, at the time of the feast (that is, the seventh month). When all the elders of Israel had arrived, the priests took up the ark and the Tent of Meeting and all the sacred utensils which were in the Tent. King Solomon and all Israel, present with him before the ark, sacrificed countless, innumerable sheep and oxen. The priests brought the ark of the covenant of Yahweh to its place, in the Debir of the Temple, that is, in the Holy of Holies, under the wings of the winged creatures for the winged creatures spread their wings over the place where the ark stood, forming a canopy over the ark and its shafts. There was nothing in the ark except the two stone tablets which Moses had placed in it at Horeb, the tablets of the covenant which Yahweh made with the Israelites when they came out of Egypt. Now when the priests came out of the Holy Place, the cloud filled the Temple of Yahweh, and because of the cloud the priests could not stay and perform their duties. For the glory of Yahweh filled the Temple of Yahweh. Then Solomon said: 'Yahweh has chosen to dwell in thick cloud. I have built you a princely dwelling, a residence for you for ever.'
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद  स्तोत्र १३२:६-७,८-१०
प्रतिसाद :  हे परमेश्वरा, ऊठ, तू आपल्या सामर्थ्याच्या कोशासह आपल्या विश्रामस्थानी ये !

१ पाहा, एफ्राथात आम्ही कोशाविषयी ऐकले; 
तो वैराण प्रदेशात आम्हाला सापडला. 
आपण त्याच्या निवासमंडपात जाऊ, 
त्याच्या पदासनापुढे दंडवत घालू.

२ हे परमेश्वरा, ऊठ; तू आपल्या सामर्थ्याच्या कोशासह 
आपल्या विश्रामस्थानी ये. 
तुझे याजक नीतिमत्त्वाने भूषित होवोत; 
तुझे भक्त आनंदघोष करोत, 
तुझा सेवक दावीद ह्याच्याप्रीत्यर्थ तू आपल्या 
अभिषिक्ताचे तोंड मागे फिरवू नकोस.

Psalm 132:6-7, 8-10

Go up, Lord, to the place of your rest.
Behold we have heard of it in Ephrata:
 we have found it in the fields of the wood.
7 We will go into his tabernacle: 
We will adore in the place where his feet stood.

R. Lord, go up to the place of your rest!

8 Arise, O Lord, into thy resting place: 
thou and the ark, which thou hast sanctified. 
Let thy priests be clothed with justice: 
and let thy saints rejoice. 
For thy servant David’s sake, turn not away 
the face of thy anointed.

Lord, go up to the place of your rest!R

जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया! 
माझा जीव परमेश्वराची प्रतीक्षा करतो, मी त्याच्या वचनाची आशा धरतो. 
  आलेलुया!

Acclamation: 
R. Alleluia, alleluia.
 My sheep hear my voice, says the Lord; and I know them, and they follow me.
Alleluia, alleluia.

शुभवर्तमान   मार्क ६ :५३-५६
वाचक : मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"येशूला जितके स्पर्श करीत तितके बरे होत असत."

येशू आणि त्याचे शिष्य पलीकडे जाऊन गनेसरेतच्या किनाऱ्यास पोहचले तेव्हा त्यांनी मचवा बांधून ठेवला. ते मचव्यातून उतरताच लोकांनी त्याला ओळखले आणि ते आसपासच्या सर्व भागात चोहोकडे धावपळ करीत सुटले आणि जेथे कोठे तो आहे म्हणून त्यांच्या कानी आले तेथे तेथे ते आजाऱ्यांना बाजेवर घालून नेऊ लागले. तो खेड्यापाड्यांत, नगरात किंवा शेतामळ्यांत कोठेही जावो, तेथे ते आजाऱ्यांना भर बाजारात आणून ठेवीत आणि आपल्या वस्त्राच्या गोंड्याला तरी स्पर्श करू द्या अशी त्याला विनंती करीत आणि जितके त्याला स्पर्श करीत तितके बरे होत असत.
प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
Mark 6:53-56
Having made the crossing, Jesus and his disciples came to land at Gennesaret and moored there. When they disembarked people at once recognised him, and started hurrying all through the countryside and brought the sick on stretchers to wherever they heard he was. And wherever he went, to village or town or farm, they laid down the sick in the open spaces, begging him to let them touch even the fringe of his cloak. And all those who touched him were saved.
  This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनप्रभू येशूच्या नाझरेथ गावचे लोक आणि गालिलच्या समुद्रकिनारी राहणारे लोक यात किती फरक दिसून येतो. गालिलच्या लोकांनी प्रभू येशूवरील विश्वास अतिशय उत्कृष्टरीत्या प्रकट केला. त्यामुळेच प्रभू येशूने तेथे अनेक चमत्कार केले. त्यांच्या विश्वासाची सत्यता यावरूनही दिसून येते की त्यांनी येशूला फक्त स्वतःपुरता ठेवण्याचा स्वार्थी प्रयत्न केला नाही. उलट, ज्यांना येशूची सर्वाधिक गरज होती अशांना देखील लोकांनी त्याच्याकडे आणले. हे विश्वास आणि निःस्वार्थी सेवा यांच्यातील नाते स्पष्ट करते. आपण येशूकडे केवळ समस्यांसाठी जातो का, की त्याच्याशी नातं बांधण्यासाठी ? येशू केवळ शरीर नव्हे तर आत्म्यालाही आरोग्य देतो. ख्रिस्ती जीवन म्हणजे सतत येशूकडे धाव घेणे आणि इतरांना त्याच्याकडे नेणे. 
 हे प्रभू येशू, तुझ्या स्पर्शाने मला सर्वांगीण आरोग्यदान दे आणि मला इतरांसाठी तुझ्या प्रेमाचे साधन बनव. आमेन.

प्रार्थना : हे करुणासागर प्रभू, आमच्या अंत:करणात तुझी करूणा जागृत ठेव, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या