Marathi Bible Reading | Tuesday 10th February 2026 | 5th Week in ordinary Time

सामान्यकाळातील ५वा  सप्ताह

मंगळवार  दि १० फेब्रुवारी  २०२६

  ✝️ 

तुम्ही आपला संप्रदाय चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता
Making void the word of God by your own tradition, which you have given forth. 
✝️
संत स्कोलास्टिका 
- कुमारिका (४८०-५४७)
✝️
 स्कोलास्टीका ही इटलीतील नर्सिया या ठिकाणी जन्मली होती. संत बेनेडिक्ट (सण ११ जुलै) ह्यांची ती जुळी बहीण होय. एकदम बालवयात तिने आपल्या भावाप्रमाणे आपल्या कुटुंबाच्या संपत्ती व ऐश्वर्यावर पाणी सोडून त्याच्यासह सुबियाको येथे जाण्याचे व आयुष्यभर देवाची सेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते आणि मोठेपणी दोघेही सुबियाको येथे जाऊन ते स्वप्न पूर्ण केले. परंतु नंतर बेनेडिक्ट दक्षिण इटलीतील मोन्टे कॅसिनो येथे गेल्यामुळे तिने सुबियाको येथेच राहून बेनेडिक्टाईन आचारसंहितेवर आधारित एका कॉन्व्हेन्टची स्थापना केली. तिथे तिला बऱ्याच तरूण मुली येऊन मिळाल्या होत्या.
हे दोघे भाऊ-बहिणी वर्षातून केवळ एकदाच उपवासकाळामध्ये आध्यात्मिक गोष्टींवर विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी भेटत असत. दोघांची आध्यात्मिक प्रगती एवढी विलक्षण झालेली होती की त्यांचे समकालीन संत ग्रेगरी महान ह्यांनी त्यांच्या एकत्र भेटीतील मौल्यवान आध्यात्मिक विचारांचे संकलन केलेले आहे. दोघांच्या शेवटच्या भेटीचे त्यांनी केलेले हृदयस्पर्शी वर्णन तर आपल्याला दोघांच्या आध्यात्मिक उदात्ततेची जाणीव करून देते.
“आपला मरणकाळ जवळ येऊन ठेपला आहे असे जाणवताच स्कोलास्टिका हिने आपल्या पवित्र भावाला विनंती केली की, आपण रात्रभर व पहाटेपर्यंत आध्यात्मिक गोष्टींवर चर्चा करू." परंतु बेनेडिक्ट हे आपल्या मठवासीय आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करणारे होते. त्यामुळे अंधार पडण्याआधी आपल्याला आपल्या मठाच्या नियमानुसार परतले पाहिजे ह्याविषयी त्यांनी ठाम भूमिका घेतली. अशा वेळी स्कोलॅस्टिका हिने देवाजवळ कळकळीची याचना केली की, बेनेडिक्टच्या मनातील विचार बदलून त्याने रहावे कारण ही रात्र शेवटची रात्र आहे. तिची विनंती ऐकली गेली. एकाएकी आभाळ भरून आले. सोसाट्याचा वारा सुटला. विजा चमकू लागल्या. मुसळधार पावसाला सुरूवात झाली. ढगांच्या प्रचंड गडगडाटाने भूमी हादरून गेली. ह्या परिस्थितीपुढे बेनेडिक्टने हात टेकले. ही देवाची इच्छा आहे असे मानून बेनेडिक्टने आपल्या मठात परतण्याचा बेत रद्द केला. न्याय आणि शिस्तीचा कायदा प्रेमाच्या सामर्थ्यापुढे जणू पांगळा ठरला होता. दोन्ही संतांनी रात्रभर आध्यात्मिक मेजवानी झोडली. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघे आपापल्या संघात निघून गेले.
तिसऱ्या दिवशी बेनेडिक्टला निरोप मिळाला की, आपली बहीण स्वर्गवासी झालेली आहे. त्यावेळी दोघे ६७ वर्षांचे होते. बेनेडिक्टने मॉन्टेकॅसिनो येथे स्वत:साठी एक थडगे तयार ठेवले होते. त्यात त्याने आपल्या स्वतःच्या हातांनी स्कोलास्टिकाला मूठमाती दिली. थोड्याच दिवसांनी २१ मार्च रोजी त्याचीही प्राणज्योत मालवली. त्याला तिच्या शेजारीच पुरण्यात आले.
अशा प्रकारे दोन महान संतांचा एकत्र जन्म व एकत्र मृत्यू झाला (४८० ५४७). ह्या दोन संतांनी स्थापन केलेल्या व्रतस्थ संघातून १४ शतकात जवळजवळ ५०० संत ख्रिस्तसभेला देण्यात आलेले आहेत. वादळवाऱ्यात संत स्कोलास्टिकाचा धावा केला जातो.

पहिले वाचन : १ राजे ८:२२-२३,२७-३०
वाचक :   राजाच्या पहिल्या  पुस्तकातून घेतलेले वाचन

तू म्हणालास, "माझ्या नावाचा निवास येथे होईल; तुझ्या लोकांच्या प्रार्थनेकडे कान दे."
शलमोन राजाने इस्राएलच्या सर्व मंडळी देखत परमेश्वराच्या वेदीसमोर उभे राहून आकाशाकडे हात पसरले; तो म्हणाला, “परमेश्वरा, इस्राएलच्या देवा, वर आकाशात अथवा खाली पृथ्वीवर तुझ्यासमान कोणी देव नाही; जे तुझे सेवक मनोभावे तुझ्यासमोर वागतात त्यांच्याशी तू आपल्या करारानुसार आणि दयेने वागतोस.
"परंतु देव हा भूतलावर खरोखर निवास करील काय ? आकाश आणि नभोमंडळ यात तुझा समावेश होणे नाही; तर हे मंदिर मी बांधले आहे यात तो कसा व्हावा ? तरी हे माझ्या देवा, परमेश्वरा, तुझ्या सेवकाच्या प्रार्थनेकडे, विनंतीकडे लक्ष दे; आज तुझा सेवक तुझा धावा करीत आहे आणि तुझ्यापुढे प्रार्थना करीत आहे, तिच्याकडे कान दे; माझ्या नावाचा निवास येथे होईल असे ज्या स्थलाविषयी तू म्हटले त्या ह्या स्थलाकडे, ह्या मंदिराकडे अहोरात्र तुझी दृष्टी असो. जी प्रार्थना तुझा सेवक या स्थलाकडे तोंड करून करीत आहे तीऐक. तुझ्या सेवकाच्या विनवणीकडे आणि तुझे लोक इस्राएल ह्या स्थलाकडे तोंड करून तुझी विनवणी करतील तिच्याकडे तू कान दे; स्वर्गातील तुझ्या निवासस्थानी तू ती श्रवण कर आणि श्रवण करून त्यांना क्षमा कर."
 प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading 1 Kings 8:1-7, 9-13 
: First Kings 8: 22-23, 27-30
 And Solomon stood before the altar of the Lord in the sight of the assembly of Israel, and spread forth his hands towards heaven;
 And said: Lord God of Israel, there is no God like thee in heaven above, or on earth beneath: who keepest covenant and mercy with thy servants that have walked before thee with all their heart. Is it then to be thought that God should indeed dwell upon earth? for if heaven, and the heavens of heavens cannot contain thee, how much less this house which I have built? But have regard to the prayer of thy servant, and to his supplications, O Lord my God: hear the hymn and the prayer, which thy servant prayeth before thee this day:
That thy eyes may be open upon this house night and day: upon the house of which thou hast said: My name shall be there: that thou mayest hearken to the prayer, which thy servant prayeth in this place to thee. That thou mayest hearken to the supplication of thy servant and of thy people Israel, whatsoever they shall pray for in this place, and hear them in the place of thy dwelling in heaven; and when thou hearest, shew them mercy.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद  स्तोत्र :३३,४,५.१०,११
प्रतिसाद  : हे सेनाधीश परमेश्वरा, तुझी निवासस्थाने किती रम्य आहेत !

१ माझ्या जिवाला परमेश्वराच्या अंगणांची उत्कंठा लागली असून मी झुरत आहे. माझा जीव आणि देह हर्षाने जिवंत देवाचा घोष करत आहेत.

२ हे सेनाधीश परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, तुझ्या वेदीजवळ चिमणीला घरटे करावयास आणि निळवीला आपल्या पिलांसाठी कोटर बांधावयास स्थळ मिळाले आहे.

३ तुझ्या मंदिरात राहणारे किती धन्य आहेत ! ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतील. हे देवा, तू आमची ढाल आहेस, अवलोकन कर, तू आपल्या अभिषिक्ताच्या मुखाकडे दृष्टी लाव.

४ खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्त्र दिवसांपेक्षा उत्तम आहे. दुष्टपणाच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे मला इष्ट वाटते

: Psalms 84: 3, 4, 5 and 10, 11
R. (2) How lovely is your dwelling place, Lord, mighty God!

3 My soul longeth and fainteth for the courts of the Lord. My heart and my flesh have rejoiced in the living God.
R. How lovely is your dwelling place, Lord, mighty God!

4 For the sparrow hath found herself a house, and the turtle a nest for herself where she may lay her young ones: Thy altars, O Lord of hosts, my king and my God.
R. How lovely is your dwelling place, Lord, mighty God!

5 Blessed are they that dwell in thy house, O Lord: they shall praise thee for ever and ever.
10 Behold, O God our protector: and look on the face of thy Christ.
R. How lovely is your dwelling place, Lord, mighty God!

11 For better is one day in thy courts above thousands. I have chosen to be an abject in the house of my God, rather than to dwell in the tabernacles of sinners.
R. How lovely is your dwelling place, Lord, mighty God!

जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया! 
हे येरुशलेमे, परमेश्वराचे गुनगाण गा! तो आपले आदेश पृथ्वीवर पाठवतो.

  आलेलुया!

Acclamation: 
Alleluia: Psalms 119: 36, 29b
R. Alleluia, alleluia.
36, 29b Incline my heart, O God, to your decrees; and favor me with your law.
R. Alleluia, alleluia.


शुभवर्तमान   मार्क ७:१-१३
वाचक : मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून देता आणि माणसांच्या संप्रदायाला चिकटून राहता."
परुशी आणि येरुशलेमहून आलेले कित्येक शास्त्री एकत्र जमून येशूकडे आले. त्यांनी त्याच्या काही शिष्यांना अस्वच्छ म्हणजे न धुतलेल्या हातांनी जेवताना पाहिले होते. (कारण परुशी आणि इतर सर्व यहुदी वाडवडिलांच्या संप्रदायाला अनुसरून हात नीट धुतल्यावाचून जेवत नाहीत; बाजारातून आल्यावर पाणी शिंपडल्याशिवाय ते जेवत नाहीत आणि पेले, घागरी, पितळेची भांडी धुणे आणि असल्या बऱ्याच रूढी ते पाळत असत.) ह्यावरून परुश्यांनी आणि शास्त्रांनी त्याला विचारले, "आपले शिष्य हात न धुता जेवतात, वाडवडिलांच्या संप्रदायाप्रमाणे ते का चालत नाहीत ?" त्याने त्याला उत्तर दिले, "तुम्हा ढोंग्यांविषयी यशयाने चांगलाच संदेश देऊन ठेवला आहे. त्याचा लेख असाः
"हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात,
परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे;
ते माझी व्यर्थ उपासना करतात,
कारण ते शास्त्र म्हणून जे शिकतात, ते असतात मनुष्याचे नियम."
तुम्ही देवांची आज्ञा बाजूला सारून देता आणि माणसांच्या संप्रदायाला चिकटून राहता."
आणखी तो त्यांना म्हणाला, "तुम्ही आपला संप्रदाय पाळण्याकरिता देवाची आज्ञा मोडण्याचा छान मार्ग शोधून काढला आहे! कारण मोशेने सांगितले आहे की, 'तू आपला बाप आणि आपली आई ह्यांचा मान राख आणि जो कोणी आपल्या बापाची किंवा आईची निंदा करतो त्याला देहान्त शिक्षा व्हावी.' पण तुम्ही म्हणता, 'जर एखादा आपल्या बापाला अथवा आईला म्हणाला की, जे मी तुम्हाला पोषणासाठी द्यावयाचे ते कुर्बान (म्हणजे अर्पण) केले आहे,' तर तुम्ही त्याला आपल्या बापासाठी किंवा आईसाठी पुढे काही करू देत नाही; अशा प्रकारे तुम्ही आपला संप्रदाय चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता आणि ह्यासारख्या आणखी पुष्कळ गोष्टी करता."
प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
 Mark 7: 1-13
And there assembled together unto him the Pharisees and some of the scribes, coming from Jerusalem. And when they had seen some of his disciples eat bread with common, that is, with unwashed hands, they found fault. For the Pharisees, and all the Jews eat not without often washing their hands, holding the tradition of the ancients: And when they come from the market, unless they be washed, they eat not: and many other things there are that have been delivered to them to observe, the washings of cups and of pots, and of brazen vessels, and of beds. And the Pharisees and scribes asked him: Why do not thy disciples walk according to the tradition of the ancients, but they eat bread with common hands? But he answering, said to them: Well did Isaias prophesy of you hypocrites, as it is written: This people honoureth me with their lips, but their heart is far from me. And in vain do they worship me, teaching doctrines and precepts of men. For leaving the commandment of God, you hold the tradition of men, the washing of pots and of cups: and many other things you do like to these. And he said to them: Well do you make void the commandment of God, that you may keep your own tradition. For Moses said: Honour thy father and thy mother; and He that shall curse father or mother, dying let him die. But you say: If a man shall say to his father or mother, Corban, (which is a gift,) whatsoever is from me, shall profit thee. And further you suffer him not to do any thing for his father or mother, Making void the word of God by your own tradition, which you have given forth. And many other such like things you do.
  This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनपरुशी येशूवर आरोप करतात की त्याचे शिष्य परंपरेचे पालन करत नाहीत. येशू त्यांना सांगतो की खरी उपासना बाह्य विधींमध्ये नाही, तर अंतःकरणात असते. निर्मळ उपासनेचा उच्चांक म्हणजे पवित्र मिस्साबली; ख्रिस्ताच्या बलिदानाशी पूर्णपणे एकरूप होणे-आपले शरीर, मन आणि आत्मा देवाला जिवंत बलिदान म्हणून अर्पण करणे. मिस्सामध्ये याजक अर्पणाच्या वेळेस प्याल्यात द्राक्षारसाबरोबर पाण्याचा एक थेंब मिसळतात. नंतर हे मिश्रण ख्रिस्तस्वरूप त्याचे रक्त बनते. तो पाण्याचा थेंब ख्रिस्ताच्या मानवी स्वरूपाचे प्रतीक असतो. खरी उपासना तेव्हाच सुरू होते, जेव्हा मिस्साच्या बाह्य विधीसोबत आपल्या अंतर्मनाची सुद्धा ऐक्यता साधली जाते. आणि मग अशी उपासना मिस्सा संपल्यानंतरही आपल्या जीवनाच्या प्रत्येक भागात वाहत राहते. आपली मिस्साबलीत 'सहभागी' होण्याची 'सवय' केवळ कर्मकांड/सोपस्कार बनले आहे का? 

प्रार्थना : हे प्रभू, माझी उपासना मनापासून आणि प्रेमाने तुझ्यापुढे सादर व्हावी म्हणून माझे हृदय शुद्ध कर.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या