Marathi Bible Reading |Friday 27th March 2026 | 5th Week of Lent

  उपवासकाळातील पाचवा  सप्ताह 

शुक्रवार दि. २ मार्च  २०२६

 माझ्यामध्ये पिता व पित्यामध्ये मी आहे हे तुम्ही ओळखून समजून घ्यावे."

that you may know and undentand that the Father is in me and I am in the Father. 


इजिप्तचे संत जॉन  
(मठवासी ) 
वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत संत जॉन ह्यांनी आपल्या वडिलांबरोरबर सुतारकीचा व्यवसाय केला. पवित्र जीवन जगण्यासाठी तो अरण्यात एकांतवासात निघून गेला.  आता आपला आत्मा आणि परमेश्वर असा एकच ध्यास त्याला लागलेला होता. त्यामुळे उर्वरित ५० वर्षांच्या आयुष्यात त्याने एकाही स्त्रीचे तोंड पाहिले नाही. क्वचितच तो एखाद्या माणसाची भेट घेई. त्याच्या ह्या कर्तव्य व जागृत मनोवृत्तीमुळे देवाने त्याला तीन दानांची देणगी दिली, १) जे कोणी त्याच्या सहवासात असत त्यांना निरामय आनंद आणि प्रसन्नता ह्याचा जवळून अनुभव येई. २) आपल्या धर्माधिकाऱ्यांशी तो अत्यंत आदराने व आज्ञाधारकपणे वागत असे. ३) निर्मात्याच्या ध्यासानेही त्याने त्याज्य मानलेल्या निर्मित वस्तूंवर त्याला विशेष अधिकार देण्यात आलेला होता. सैतान सतत जॉनला मोहात पाडण्याचा प्रयत्न करी परंतु जॉन आणखी मोठ्या प्रमाणात प्रार्थना करीत राही. देवाशी दीर्घकाळ संवाद साधल्यामुळे त्याला रोग बरे करण्याची आणि संदेश देण्याची अद्भुत शक्ती लाभलेली होती. जे त्याच्याकडे सल्ला मागण्यासाठी येत असत त्यांच्याशी ते आठवड्यातून दोन वेळा एका खिडकीतून बोलत असत.  आजारी लोकांसाठी तेलाला आशीर्वाद देत असत व येणाऱ्या भावी गोष्टींची पूर्वसूचना लोकांना देत असत.  राजा थिओडोसियस ह्यांना तर संत जॉन ह्यांनी त्याच्या भावी विजयाविषयी आणि मरणाच्या वेळेविषयी पूर्वकल्पना दिली होती. आपल्या जीवनातील अखेरचे तीन दिवस जॉन संपूर्णपणे देवाच्या सहवासात होते. तिसऱ्या दिवशी ते गुडघे टेकून प्रार्थना करीत असतानाच देवाच्या अधीन झाले. इ. स. ३९४ साली वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांना सुखाचे मरण आले

पहिले वाचन यिर्मया  २१:१०-१३
वाचक  यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन 
“पराक्रमी वीराप्रमाणे प्रभू माझ्याबरोबर आहे."

यिर्मया म्हणतो, “मी पुष्कळांना कुजबुजताना ऐकतो; चोहोकडे दहशत आहे! मला ठेच लागावी म्हणून टपणारे माझे सर्व इष्टमित्र म्हणतात की, “त्याच्यविरुद्ध गिल्ला करा! आपण त्याच्याविरुद्ध गिल्ला करू या !” “कदाचित तो फसेल, म्हणजे त्याच्याहून आपण प्रबळ होऊन त्याचा सूड उगवू," तरी पराक्रमी वीराप्रमाणे प्रभू माझ्याबरोबर आहे; म्हणून माझा छळ करणारे ठोकर खातील, ते प्रबळ होणार नाहीत ते शहाणपणाने वागले नाहीत म्हणून ते अत्यंत फजीत होतील. विसर न पडेल अशी त्यांची कायमची अप्रतिष्ठा होईल. तरी हे धार्मिकांचे सत्त्व पाहणाऱ्या, अंतर्याम व हृदय पारखणाऱ्या, सेनाधीश परमेश्वरा, तू त्याचा सूड घेशील तो मला पाहू दे; कारण मी आपली फिर्याद तुझ्यापुढे सादर केली आहे.
प्रभुपुढे गाणे गा; प्रभूचे स्तवन करा, कारण त्याने दुर्जनांच्या हातून दीनांचा बचाव केला आहे.
प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Jeremiah 20:10-13

I hear many whispering. Terror is on every side! "Denounce him! Let us denounce him!" say all my close friends, watching for my fall. "Perhaps he will be deceived; then we can overcome him and take our revenge on him." But the Lord is with me as a dread warrior; therefore my persecutors will stumble; they will not overcome me. They will be greatly shamed, for they will not succeed. Their eternal dishonour will never be forgotten. O Lord of hosts, who tests the righteous, who sees the heart and the mind, let me see your vengeance upon them, for to you have I committed my cause. Sing to the Lord; praise the Lord! For he has delivered the life of the needy from the hand of evildoers.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद  स्तोत्र  १८ : २-७
प्रतिसाद : मी संकटात प्रभूचा धावा केला आणि त्याने माझी वाणी ऐकली.

१) प्रभो, तू मला प्रिय आहेस, 
तू माझे सामर्थ्य आहेस; प्रभू माझा दुर्ग, 
माझा गड आहे, तू माझा उद्धारकर्ता आहेस. 
माझा देव, माझा खडक आहे, 
त्याचा आश्रय मी घेतो; तो माझे कवच,
 माझ्या रक्षणाचे साधन आहे, 
तो माझा उंच बुरुज आहे. 
स्तुतिपात्र प्रभूचा मी धावा करतो.
 तेव्हा शत्रूंपासून माझा बचाव होतो.

२ )मृत्यूच्या बंधनांनी मला जखडले;
 नाशाच्या पुरांनी मला भिवविले; 
अधोलोकांच्या बंधनांनी मला जखडले, 
मृत्यूचे पाश माझ्यावर आले.

३) मी आपल्या संकटात प्रभूचा धावा केला;
माझ्या देवाला मी हाक मारली.
 त्याने आपल्या मंदिरातून माझी वाणी एकेली;
 माझी हाक त्याच्या कानी गेली.

Psalm 18:2-3a, 3bc-4, 5-6, 7

R. In my anguish I called to the Lord, and he heard me.

I love you, Lord, my strength; 
O Lord, my rock, my fortress, my saviour. R

My God, my rock where I take refuge; 
my shield, my saving strength, my stronghold. 
I cry out, "Praised be the Lord!" 
and see, I am saved from my foes. R

The waves of the death rose about me 
the torrents of destruction assailed me; 
the snares of the grave surrounded me; 
the traps of death confronted me. R

I In my anguish I called to the Lord; 
I cried to my God for help. 
From his temple he heard my voice; 
my cry to him reached his ears. R.

जयघोष  
बी हे देवाचा शब्द आहे, पेरणारा ख्रिस्त आहे. ज्याला ते सापडेल त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल

Acclamation: 
  Your words, Lord, are spirit and life, you have the words of eternal life.

शुभवर्तमान योहान  १०:३१-४२
वाचक :योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 पुन्हा यहुद्यांनी येशूला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु तो त्याच्या हातातून निसटला "
यहुद्यांनी त्याला दगडमार करायला पुन्हा दगड उचलले. येशू त्यांना म्हणाला, “मी पित्याकडची पुष्कळशी चांगली कृत्ये तुम्हांला दाखवली आहेत; त्यातून कोणत्या कृत्यामुळे तुम्ही मला दगडमार करता ?” यहुद्यांनी त्याला उत्तर दिले “चांगल्या कृत्यासाठी आम्ही तुम्हांला दगडमार करत नाही, तर दुर्भाषणासाठी; कारण तुम्ही मानव असून स्वतःला देव म्हणवता." येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही देव आहा असे मी म्हणालो " हे तुमच्या शास्त्रात लिहिले नाही का? ज्यांना देवाचे वचन प्राप्त झाले त्यांना जर त्याने देव म्हटले (आणि शास्त्रलेखाचा भंग होत नाही), तर ज्याला पित्याने पवित्र कार्यास्तव नेमून जगात पाठवले त्या मला, “मी देवाचा पुत्र आहे" असे म्हटल्यावरून तुम्ही दुर्भाषण करता असे तुम्ही म्हणता काय? मी आपल्या पित्याची कृत्ये करीत नसल्यास माझ्यावर विश्वास ठेवू नका; परंतु जर मी ती करतो तर माझ्यावर विश्वास न ठेवला तरी त्या कृत्यांवर विश्वास ठेवा; अशासाठी की, माझ्यामध्ये पिता व पित्यामध्ये मी आहे हे तुम्ही ओळखून समजून घ्यावे." ते त्याला पुन्हा धरायला पाहू लागले; परंतु तो त्याच्या हाती न लागता निघून गेला. मग तो पुन्हा यार्देनच्य पलीकडे, योहान पहिल्याने बाप्तिस्मा करीत असे त्या ठिकाणी गेला व तेथे राहिला. तेव्हा त्याच्याकडे पुष्कळ लोक आले; ते म्हणाले, “योहानने काही चिन्ह केले नाही खरे, तरी योहानने ह्याच्याविषयी जे काही सांगितले ते सर्व खरे आहे" तेथे पुष्कळ लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला
प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
John 10:31-42
At that time: The Jews picked up stones again to stone Jesus. Jesus answered them, "I have shown you many good works from the Father, for which of them are you going to stone mel" The Jews answered him, "It is not for a good work that we are going to stone you but for blasphemy, because you, being a man, make yourself God." Jesus answered them, "Is it not written in your Law, I said, you are gods? If he called them gods to whom the word of God came and Scripture cannot be broken- do you say of him whom the Father consecrated and sent into the world, "You are blaspheming', because I said, 'I am the Son of God' I am not doing the works of my Father, then do not believe me; but if I do them, even though you do not believe me, believe the works, that you may know and undentand that the Father is in me and I am in the Father. "Again they sought to arrest him, but he escaped from their hands. He went away again across the Jordan to the place where John had been baptizing at first, and there he remained. And many came to him. And they said, "John did no sign, but everything that John said about this man was true." And many believed in him there.
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनसर्व साधारणपणे माणूस जेव्हा संकटाने वेढला जातो तेव्हा तो  हतबल, निराश होतो. मात्र तो परमेश्वरावर विश्वास ठेवून जगत असेल तर आलेल्या संकटासाठी परमेश्वराला धन्यवाद, स्तुती देण्यास तो कचरत नाही. यिर्मया संदेष्ट्याच्या चोहोबाजूने दहशत होती. त्याला मारण्याचा कट रचिला जात होता. परंतु त्याचा परमेश्वरावरील विश्वास त्याला तारतो. प्रभू पुढे गाणे गा. प्रभूचे स्तवन करा. कारण त्याने दुर्जनांच्या हातून दीनांचा बचाव केला आहे. प्रभू येशूला शास्त्री-परुशी लोकांनी घेरले असता आपले नाते हे स्वर्गातील पित्याशी आहे. तो आपणावर विपुल प्रेम करतो याची साक्ष वचनातून, अद्भुत कृत्यातून देत होता. तरीही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. त्याला मारण्यासाठी ते धावले. येशूने एकच उत्तर दिले, मी आपल्या पित्याची कृत्ये करीत नसल्यास माझ्यावर विश्वास ठेवू नका परंतु जर मी ती करतो तर माझ्यावर विश्वास न ठेवला तरी त्या कृत्यांवर विश्वास ठेवा अशासाठी की माझ्यामध्ये पिता व पित्यामध्ये मी आहे हे तुम्ही ओळखून समजून घ्यावे."

प्रार्थना : हे प्रभू येशू, तू देव आहेस व आमचे सर्वस्व आहेस, हे जाणण्यास व तुला ओळखण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या