शनिवार ४ एप्रिल २०२६
पुनरुत्थान - जागरण विधी)
प्रभू शब्द विधी : उत्पत्ती १:१-२:२, निर्गम १४:१५-१५:१,
यहेज्केल ३६:१६-२८
उपासना विधी : रोमकरांस ६:३- ११,
स्तोत्र ११८:१-२, १६-१७, २२-२३, मत्तय २८:१-१०
"येशू मेलेल्यातून उठला आहे, तो तुमच्या आधी गालिलात जात आहे."
"Do not be afraid; go and tell my brothers to go to Galilee, and there they will see me."
प्रभू येशूने आपल्या बलिदानाद्वारे आणि पुनरुत्थानद्वारे देवाचे स्वर्गीय दालन उघडे केले आहे. जगातील सर्व दु:खे, संकटे तसेच दुष्टता, पाप व सैतान ह्यांवर प्रभू येशून विजय मिळवला आहे. प्रभूवर श्रद्धा ठेवणाऱ्या आपणा सर्वांना पुनरुत्थानामुळे आशा प्राप्त झाली आहे. प्रभूच्या पुनरुत्थान सहभागी होण्यासाठी आपण सर्वांनी अतःकरणापासून त्याला आपल्या जीवनात स्वीकारू या..
पहिले वाचन रोमकरांस पत्र ६:३-११
वाचक : पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
आपण सर्वांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तेव्हा आपण त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला, ह्याविषयी तुम्ही अजाण आहात काय? तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो, ह्यासाठी की, ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवी सामर्थ्याने मेलेल्यांतून उठविला गेला त्याचप्रमाणे आपणही नवजीवन जगावे.
कारण जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपात त्याच्याशी संयुक्त झालो आहोत तर त्याच्या पुनरुत्थानाच्याही प्रतिरूपात त्याच्याशी संयुक्त होऊ. आपल्याला ठाऊक आहे की, हे पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण ह्यापुढे पापाचे दास्य करू नये, म्हणून आपल्यातील जुना मनुष्य त्याच्याबरोबर क्रुसावर खिळला गेला. कारण जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्त होऊन नीतिमान ठरला आहे. आपण ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असल्यास त्याच्याबरोबर जिवंतही राहू अशी आपली श्रद्धा आहे. मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त ह्यापुढे मरण पावत नाही, त्याच्यावर ह्यापुढे मरणाची सत्ता चालत नाही हे आपणांला ठाऊक आहे कारण तो मरण पावला, तो पापाला एकदाचाच मरण पावला, तो जगतो तो देवासाठीच जगतो. तसे तुम्हीही ख्रिस्त येशूमध्ये स्वत:स पापाला मेलेले खरे, पण देवाप्रीत्यर्थ जिंवत झालेले असे माना.
प्रभूचा शब्द -
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
Romans 6:3-11
Brethren: Do you not know that all of us who have been baptised into Christ Jesus were baptised into his death? We were buried therefore with him by baptism into death, in order that, just as Christ was raised from the dead by the glory of the Father, we too might walk in newness of life. For if we have been united with him in a death like his, we shall certainly be united with him in a resurrection like his. We know that our old self was crucified with him in order that the body of sin might be brought to nothing, so that we would no longer be enslaved to sin. For one who has died has been set free from sin. Now if we have died with Christ, we believe that we will also live with him. We know that Christ, being raised from the dead, will never die again; death no longer has dominion over him. For the death he died he died to sin, once for all, but the life he lives he lives to God. So you also must consider yourselves dead to sin and alive to God in Christ Jesus.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ११८:१-२,१६-१७,२२-२३
प्रतिसाद : आलेलुया, आलेलुया, आलेलुया!
१) परमेश्वराचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. आता इस्राएलने म्हणावे की, "त्याची दया सनातन आहे."
२ )परमेश्वराचा उजवा हात उंचावलेला आहे, परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करतो. मी मरणार नाही मी जगेन आणि परमेश्वराच्या कृत्याचे वर्णन करीन.
३) बांधणाऱ्यानी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे. ही परमेश्वराची करणी आहे,ती आमच्या दृष्टीने अद्भुत आहे.
Psalm 118:1-2, 16ab-17, 22-23
This is the day the Lord has made;
let us rejoice in it and be glad. (Or: Alleluia)
Give praise to the Lord, for he is good;
his mercy endures forever.
Let the house of Israel say,
"His mercy endures forever."R
"The Lord's right hand has done mighty deeds.
His right hand is exalted.
The Lord's right hand has done mighty deeds.
" I shall not die, I shall live
and recount the deeds of the Lord. R
The stone that the builders rejected
has become the cornerstone.
By the Lord has this been done,
a marvel in our eyes. R
जयघोष
आलेलूया ,आलेलूया ,आलेलूया ,
Acclamation:
Alleluia, Alleluia, Alleluia.
शुभवर्तमान मत्तय २८:१-१०
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"येशू मेलेल्यातून उठला आहे, तो तुमच्या आधी गालिलात जात आहे." शब्बाथानंतर आठवड्याचा पहिला दिवस उजाडताच मग्दालिया मरिया व दुसरी मरिया ह्या कबर पाहायला आल्या. तेव्हा पाहा, मोठा भूमिकंप झाला, प्रभूचा दूत स्वर्गातून उतरला, त्याने येऊन धोंड एकीकडे लोटली आणि तीवर तो बसला. त्याचे रूप विजेसारखे होते आणि त्याचे वस्त्र बर्फासारखे शुभ्र होते. त्याच्या भयाने पहारेकरी थरथर कापले व मृतप्राय झाले. देवदूताने त्या स्त्रियांना म्हटले, “तुम्ही भिऊ नका, क्रुसावर खिळलेल्या येशूचा तुम्ही शोध करीत आहात, हे मला ठाऊक आहे. तो येथे नाही, कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या, तो निजला होता ते हे स्थळ पाहा आणि लवकर जाऊन त्याच्या शिष्यांना सांगा की, तो मेलेल्यातून उठला आहे. पाहा, तो तुमच्या आधी गालिलात जात आहे, तेथे तो तुमच्या दृष्टीस पडेल. पाहा, मी तुम्हाला हे सांगितले आहे.” तेव्हा त्या स्त्रिया भीतीने व हर्षातिशयाने कबरीपासून लवकर निघून त्याच्या शिष्यांना हे वर्तमान सांगायला धावत गेल्या. मग पाहा, येशू त्यांना भेटून म्हणाला, “तुम्हाला शांती असो!” त्यांनी जवळ जाऊन त्याचे चरण धरून त्याला नमन केले. तेव्हा येशूने त्यांना म्हटले, “भिऊ नका,” जा, माझ्या भावांना सांगा की, त्यांनी गालिलात जावे, तेथे मी त्यांच्या दृष्टीस पडेन.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
Matthew 28:1-10
After the Sabbath, towards the dawn of the first day of the week, Mary Magdalene and the other Mary went to see the tomb. And behold, there was a great earthquake, for an angel of the Lord descended from heaven and came and rolled back the stone and sat on it. His appearance was like lightning, and his clothing white as snow. And for fear of him the guards trembled and became like dead men. But the angel said to the women, "Do not be afraid, for I know that you seek Jesus who was crucified. He is not here, for he has risen, as he said. Come, see the place where he lay. Then go quickly and tell hisdisciples that he has risen from the dead, and behold, he is going before you to Galilee, there you will see him. See, I have told you." So they departed quickly from the tomb with fear and great joy, and ran to tell his disciples. And behold, Jesus met them and said, "Greetings!" And they came up and took hold of his feet and worshipped him. Then Jesus said to them, "Do not be afraid; go and tell my brothers to go to Galilee, and there they will see me."
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: इस्टरच्या जागरणविधीमध्ये ख्रिस्तसभा मानवाच्या तारणाचा इतिहास सादर करते. इस्टरच्या सकाळच्या मिस्सेमध्ये मात्र येशूच्या पुनरुत्थानाचे परिणाम वर्णन करते. पहिल्या वाचनात नमूद करण्यात आलेली पापक्षमा (प्रे. कृ. १०:३४, ३७- ४३) आणि दुसऱ्या वाचनात नमूद करण्यात आलेले सार्वकालिक जीवन (कलस्सै ३:१-४) याव्यतिरिक्त आजचे शुभवर्तमान (योहान २०:१-९) येशूच्या पुनरुत्थानाचे तीन परिणाम सादर करते:
अ. येशूचे पुनरुत्थान - स्वर्ग आणि पृथ्वीला जोडणारा दुवा : संत मार्कच्या शुभवर्तमानात एक तरुण स्त्रियांच्या दृष्टीस पडतो व तो त्यांना प्रभूच्या पुनरुत्थानाची शुभवार्ता देतो. मत्तयमध्ये मात्र एक देवदूत स्वर्गातून उतरतो व येशूच्या थडग्यावरील धोंड सरकवून तिच्यावर बसतो. मत्तयच्या शुभवर्तमानात देवदूतांना जे अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आलेले आहे (योसेफला स्वप्नात दर्शन देऊन मार्गदर्शन करणे, अरण्यातील मोहानंतर येशूची सेवा करणे, युगाच्या समाप्तीच्या वेळी कापणी करणे, स्वर्गातील पित्यासमोर हजर राहणे) त्याला हे वर्णन धरून आहे.
ब. येशूचे पुनरुत्थान - नव्या युगाचा प्रारंभ: मार्कमधील स्त्रिया इतक्या भयभीत झाल्या होत्या की, त्या कोणालाही काही सांगत नाहीत. मत्तयमधील स्त्रिया भीतीने व हर्षातिशयाने धावतपळत शिष्यांकडे येतात आणि त्यांना येशूच्या पुनरुत्थानाची सुवार्ता सांगतात. ख्रिस्तसभेतील एका नव्या युगाच्या प्रारंभाचे ते द्योतक होय.
क. येशूचे पुनरुत्थान -नव्या जबाबदारीची नवीन जाणीव : मत्तयमधील शिष्य येशूच्या दुःखसहनप्रसंगी विखुरलेले होते. आता त्यांनी गालीलात एकत्र यावे असा निरोप पुनरुत्थित ख्रिस्त स्त्रियांकरवी त्यांना पाठवतो. ह्या प्रेषितांना गालीलातच प्रभूने पाचारण केले होते. आता तिथूनच त्यांना एका नव्या जबाबदारीची नव्याने जाणीव पुनरुत्थित येशू करून देणार होता याचेच ते होते. सूचक
आत्मपरीक्षण : येशूच्या पुनरुत्थानाचा कोणता परिणाम माझ्या जीवनात प्रामुख्याने दिसून येतो ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या पुनरुत्थानात सहभागी होण्यास आम्हाला पात्र बनव, आमेन
Happy Easter to Everybody

0 टिप्पण्या