प्रभू येशूचे पुनरुत्थान -सोहळा
रविवार ५ एप्रिल २०२६
“त्यांनी प्रभूला कबरीतून नेले व त्याला कोठे ठेवले हे आम्हांला ठाऊक नाही."
"They have taken the Lord out of the tomb, and we do not know where they have laid him."
पहिले वाचन पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये १०:३४अ.३७-४३
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
“तो मेलेल्यातून उठल्यानंतर आम्ही त्याच्याबरोबर खाणेपिणे केले. "
पेत्रने बोलण्यास आरंभ केला, "योहानने बाप्तिस्म्याची घोषणा केल्यानंतर गालिलपासून प्रारंभ होऊन सर्व यहुदियांमध्ये घडलेली गोष्ट तुम्हांला तर माहीतच आहे. नाझरेथकर येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला, तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला, कारण देव त्याच्याबरोबर होता आणि त्याने यहुद्यांच्या देशात व येरुशलेममध्ये जे काही केले त्या सर्वांचे साक्षी आम्ही आहो. त्यांनी त्याला क्रुसावर टांगून मारले, पण त्याला देवाने तिसऱ्या दिवशी उठवले आणि त्याने प्रकट व्हावे असे केले. तरी हे प्रकटीकरण सर्व लोकांना नव्हे, पण देवाने अगोदरच निवडलेल्या आम्हा साक्षीदारांना केले. येशू मेलेल्यातून उठल्यानंतर आम्ही त्याच्याबरोबर खाणेपिणे केले. त्याने आम्हांस अशी आज्ञा केली की, लोकांस उपदेश करा आणि अशी साक्ष द्या की, देवाने नेमलेला असा जिवंतांचा व मेलेल्यांचा न्यायाधीश तो हाच आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल अशी साक्ष सर्व संदेष्टे त्याच्याविषयी देतात, "
प्रभूचा शब्द
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
Acts 10:34a, 37-43
In those days: Peter opened his mouth and said: "You yourselves know what happened throughout all Judea, beginning from Galilee after the baptism that John proclaimed: how God anointed Jesus of Nazareth with the Spirit and with power He went about doing good and healing all who were oppressed by the devil, for God was with him. And we are witnesses of all that he did both in the country of the Jews and in Jerusalem. They put him to death by hanging him on a tree, but God raised him on the third day and caused him to appear, not to all the people but to us who had been chosen by God as witnesses, who ate and drank with him after he rose from the dead. And he commanded us to preach to the people and to testify that he is the one appointed by God to be judge of the living and the dead. To him all the prophets bear witness that everyone who believes in him receives forgiveness of sins through his name."
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ११८:१-२,१६-१७,२२-२३
प्रतिसाद : प्रभूचा हा दिवस आहे, ह्या दिवशी आपण उल्हास व आनंद करू या.
१ परमेश्वराचे उपकार स्मरण करा कारण
तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे.
आता इस्राएलने म्हणावे की,
"त्याची दया सनातन आहे."
२ परमेश्वराचा उजवा हात उंचावलेला आहे,
परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करतो.
मी मरणार नाही, मी जगेन,
आणि परमेश्वराच्या कृत्यांचे वर्णन करीन.
३ बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड
कोनशिला झाला आहे.
ही परमेश्वराची करणी आहे,
ती आमच्या दृष्टीने अद्भुत आहे.
Psalm 118:1-2, 16ab-17, 22-23
This is the day the Lord has made;
let us rejoice in it and be glad. (Or: Alleluia)
Give praise to the Lord, for he is good;
his mercy endures forever.
Let the house of Israel say,
"His mercy endures forever."R
"The Lord's right hand has done mighty deeds.
His right hand is exalted.
The Lord's right hand has done mighty deeds.
" I shall not die, I shall live
and recount the deeds of the Lord. R
The stone that the builders rejected
has become the cornerstone.
By the Lord has this been done,
a marvel in our eyes. R
दुसरे वाचन कलस्सै ३:१-४
वाचक : पौलचे कलस्सैकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"जेथे ख्रिस्त आहे, तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा.
तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठवले गेला आहा, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. कारण तुम्ही मृत झाला आहा आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रकट केला जाईल तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रकट केले जाल.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
Colossians 3:1-4 (or: 1 Corinthians 5:6b-8)
Brethren: If you have been raised with Christ, seek, the things that are above, where Christ is, seated at the right hand of God. Set your minds on things that are above, not on things that are on earth. For you have died, and your life is hidden with Christ in God. When Christ who is your life appears, then you also will appear with him in glory.
जयघोष
ख्रिस्त, आपला वल्हांडणाचा यज्ञब ली
समर्पिण्यात आला आहे. म्हणून चला,
आपण उत्सव करू या.
Acclamation:
Christ, our Passover lamb, has been sacrificed. Let us therefore celebrate the festival in the Lord
शुभवर्तमानयोहान २०:१-९
वाचक : योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“त्याने मेलेल्यांमधून पुन्हा उठावे हे आवश्यक होते. "
आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस अंधारातच मरिया मग्दालिया कबरेजवळ आली आणि कबरीच्या तोंडावरून धोंड काढलेली आहे असे तिने पाहिले, ह्यास्तव शिमोन पेत्र व येशूचा प्रिय शिष्य ह्यांच्याकडे धावत येऊन ती त्यांना म्हणाली, “त्यांनी प्रभूला कबरीतून नेले व त्याला कोठे ठेवले हे आम्हांला ठाऊक नाही." ह्यावरून पेत्र व तो दुसरा शिष्य बाहेर पडून कबरीकडे जायला निघाले. तेव्हा ते दोघे बरोबर धावत गेले आणि तो दुसरा शिष्य पेत्रपेक्षा लवकर धावत पुढे गेला व कबरीजवळ प्रथम पोहोचला आणि ओणवा होताच त्याला तागाची वस्त्रे पडलेली दिसली, परंतु तो आत गेला नाही. मग सिमोन पेत्रही त्याच्यामागून येऊन पोहोचला व कबरीत शिरला आणि तागाची वस्त्रे पडलेली आणि त्याच्या डोक्याला होता तो रुमाल तागाच्या वस्त्रांजवळ नव्हे, तर वेगळा एकीकडे गुंडाळून पडलेला आहे असे त्याला दिसले तेव्हा जो दुसरा शिष्य पहिल्याने कबरीजवळ आला होता तोही आत गेला आणि त्याने पाहून श्रद्धा ठेवली, कारण त्याने मेलेल्यांमधून पुन्हा उठावे हे अवश्य आहे, हा शास्त्रलेख त्यांना तोपर्यंत समजला नव्हता.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
John 20:1-9
On the first day of the week Mary Magdalene came to the tomb early, while it was still dark, and saw that the stone had been taken away from the tomb. So she ran and went to Simon Peter and the other disciple, the one whom Jesus loved, and said to them, "They have taken the Lord out of the tomb, and we do not know where they have laid him." So Peter went out with the other disciple, and they were going towards the tomb. Both of them were running together, but the other disciple outran Peter and reached the tomb first. And stooping to look in, he saw the linen cloths lying there, but he did not go in. Then Simon Peter came, following him, and went into the tomb. He saw the linen cloths lying there, and the face cloth, which had been on Jesus' head, not lying with the linen cloths but folded up in a place by itself. Then the other disciple, who had reached the tomb first, also went in, and he saw and believed; for as yet they did not understand the Scripture, that he must rise from the dead.
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: वाढीसाठी अनेकदा संघर्ष करावा लागतो. हेराक्लिटसचे शब्द आपल्या हृदयात गुंजतातः जर संघर्ष नसेल तर स्थिरता असते. गव्हाच्या दाण्याप्रमाणे येशू जमिनीवर पडला, स्वतःसाठी मरण पावला आणि आता नवीन जीवनाची वाट पाहत आहे. शांतता आणि अंधारात, एक बीज अंकुरते, त्याच्या फुटण्याच्या क्षणाची वाट पाहत आहे. आज, आपल्याला आत डोकावून पाहण्यासाठी आणि आपल्याला पुनरुत्थानाची आवश्यकता असलेल्या क्षेत्रांची ओळख पटविण्यासाठी आमंत्रित केले आहे. आपल्याला नवीन जीवन, नवीन प्रकाश, नवीन प्रेरणा आणि नवीन ऊर्जेची आवश्यकता आहे. आपण आपल्या दुःखासोबत धीराने वाट पाहूया, आपला उठलेला प्रभू आपल्या अंधारात प्रकाश आणेल यावर विश्वास ठेवून. ही शांतताआपल्या स्वतःच्या परिवर्तनासाठी प्रोत्साहनवर्धक ठरू दे. आपली अंतःकरणे नवीन होऊ दे आणि आपणाला ईस्टर रविवारी त्याच्यासोबत उठू दे.
लाजाळूपणापासून धाडसाकडेः आपण पीटरच्या परिवर्तनावर विचार करत असताना.
प्रार्थना : मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो' हे पुनरुत्थित प्रभू मला नवजीवनाचे वरदान दे, आमेन.
Happy Easter to Everybody
0 टिप्पण्या