पुनरुत्थानकाळ सहावा सप्ताह
मंगळवार दि. १२ मे २०२६
मी जावे हे तुमच्या हिताचे आहे, कारण मी गेलो नाही तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही.
it is to your advantage that I go away, for if I do not go away, the Helper will not come to you.
अगदी चौथ्या शतकापासून संत नेरियस, आखिलिस आणि डॉमिटिला ह्यांची भक्ती पूर्वापार चालत आलेली आहे. एकदा त्यांच्या सणाच्या शुभप्रसंगी रोम शहरात संत ग्रेगरी महान ह्यांनी आपल्या प्रवचनात सांगितले "ह्या जगातील सर्व प्रकारची सुखे आणि समृद्धी ह्या रक्तसाक्ष्यांच्या चरणाशी लोटांगण घालत होती. त्याचवेळी त्यांनी आपल्या सुखासीनतेवर लाथ मारली आणि सर्व उपभोग पायाखाली चिरडून टाकले." संत ग्रेगरी ज्या चर्चमध्ये हे प्रवचन देत होते ते चर्च ह्या संतांच्या थडग्यावर उभारण्यात आलेले होते आणि पोप ह्या नात्याने ते त्यांचे अठ्ठाविसावे प्रवचन होते.
नेरियस आणि आखिलियस हे प्रेटोरियन सैनिक होते आणि फ्लेविया डॉमिटिला हिच्या घरी षंढ म्हणून काम करीत होते. ख्रिस्ती श्रद्धेसाठी जेव्हा डॉमिटिला हिला हद्दपार करण्यात आले होते तेव्हा या दोघांनी तिला पाठिंबा दिला. त्यामुळे टेरासिना बेटावर दोघांचा शिरच्छेद करण्यात आला आणि ट्राजन सम्राटने मूर्तीपूजा करण्यास नकार देणाऱ्या डॉमिटिला हिला जिवंत जाळून टाकले.
“प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल.” आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्ताने कैवारी पवित्र आत्मा पाठविण्यासाठी त्याचे पित्याकडे जाणे गरजेचे असल्याचे आपल्या शिष्यांना सांगितले. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामुळे व दानांमुळे शिष्यांना प्रेरणा व कृपा मिळणार होती.
प्रभू येशूची सुवार्ता व साक्ष देणाऱ्या संत पौल व सिला ह्यास बंदिवासात शिक्षा भोगित असताना फटक्यांचा मार खाऊन बंदिवासात असलेल्या त्या दोघांनी सुटकेसाठी प्रार्थना केली| नाही तर, देवाला धन्यवाद देऊन ते मोठ्याने स्तुतिगीते गाऊ लागले. सर्व स्थितीत देवाला धन्यवाद देणे त्यांनी उचित मानले. अत्यंत बिकट प्रसंगात त्यांनी देवाची स्तुति केली आणि देवाने आपले गौरव त्यांना प्रकट केले.
संत पौलाने ह्यावेळी म्हटले, 'प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल'. देव आपले संकल्प, आपल्या योजना आणि इच्छा रहस्यमय रितीने पूर्णत्वास नेत असतो, हे आजच्या ह्या घटनेद्वारे स्पष्ट होत
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये १६:२२-३४
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
"प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे आणि तुझ्याघराण्याचे तारण होईल.'
लोक पौल आणि सीला ह्यांच्यावर उठले आणि अधिकाऱ्यांनी त्यांची वस्त्रे फाडून काढली आणि त्यांना छड्या मारावयाची आज्ञा दिली. मग पुष्कळ फटके मारल्यावर त्यांना बंदिशाळेत टाकून त्यांनी बंदिशाळेच्या नायकाला त्यांना बंदोबस्तात ठेवण्याचा हुकूम केला. त्याला असा हुकूम मिळाल्यावर त्याने त्यांना आतल्या बंदिखान्यात घालून त्यांचे पाय खोड्यात अडकवले. परंतु मध्यरात्रीच्या सुमारास पौल आणि सोला हे प्रार्थना करीत असता आणि गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते. तेव्हा एकाएको असा मोठा भूमिकंप झाला की, बंदिशाळेचे पाय डगमगले. सर्व दरवाजे लागलेच उघडले आणि सर्वांची बधने तुटली. तेव्हा बंदिशाळेच्या नायकाने जागे होऊन बंदिशाळेचे दरवाजे उघडे पाहिले आणि बंदिवान पळून गेले आहेत असा तर्क करून तो तरवार उपसून आपलाच घात करणार होता. इतक्यात पौल मोठ्याने ओरडून म्हणाला, "तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नको, कारण आम्ही सर्वजण येथेच आहो." मग दिवे मागवून तो आत धावत गेला. कापत कापत पौल आणि सीला ह्यांच्या पाया पडला आणि त्यांना बाहेर काढून म्हणाला, “महाराज, माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे?" ते म्हणाले, "प्रभू येश्वर विश्वास ठेव म्हणजे तुझे आणि तुझ्या घराण्याचे तारण होईल." त्यांनी त्याला आणि त्याच्या घरातील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले. मग रात्रीच्या त्याच घटकेला त्याने त्यांना जवळ घेऊन त्यांच्या जखमा साफ केल्या आणि तेव्हाच त्याने आणि त्याच्या घरच्या सर्व माणसांनी बाप्तिस्मा घेतला. मग बंदिशाळेच्या नायकाने त्यांना घरी नेऊन जेवू घातले आणि देवावर विश्वास ठेवून त्याने आणि त्याच्या घरच्या सर्व मंडळीने आनंदोत्सव केला.
प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
Acts 16:22-34
In those days: The crowd of Philippians joined in attacking Paul and Silas, and the magistrates tore the garments off them and gave orders to beat them with rods. And when they had inflicted many blows upon them, they threw them into prison, ordering the jailer to keep them safely. Having received this order, he put them into the inner prison and fastened their feet in the stocks. About midnight Paul and Silas were praying and singing hymns to God, and the prisoners were listening to them, and suddenly there was a great earthquake, so that the foundations of the prison were shaken. And immediately all the doors were opened, and everyone's bonds were unfastened. When the jailer woke and saw that the prison doors were open, he drew his sword and was about to kill himself, supposing that the prisoners had escaped. But Paul cried with a loud voice, "Do not harm yourself, for we are all here." And the jailer called for lights and rushed in, and trembling with fear he fell down before Paul and Silas. Then he brought them out and said, "Sirs, what must I do to be saved?" And they said, "Believe in the Lord Jesus, and you will be saved, you and your household." And they spoke the word of the Lord to him and to all who were in his house. And he took them the same hour of the night, and washed their wounds; and he was baptised at once, he and all his family. Then he brought them up into his house, and set food before them. And he rejoiced along with his entire household that he had believed in God.
This is the word of God
Thanks be to God
