Marathi Bible Reading | 6th Week of Easter | Wednesday 13th May 2026

 पुनरुत्थानकाळ  सहावा सप्ताह 

बुधवार  दि. १३ मे २०२६

तरी तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल;But when he, the Spirit of truth, is come, he will teach you all truth. 

ख्रिस्तसभा आज फातिमा येथे दर्शन दिलेल्या मरिया मातेचा सन्मान  करीत आहे. १३ मे ते १३ ऑक्टोबर १९१७ साली सतत सहा वेळा फ्रान्सिस्को, जसिंटा व लुसी ह्या तीन मुलांना दर्शन देऊन पवित्र मरियेने पवित्र जपमाळेची प्रार्थना भक्तिभावाने करण्याचा संदेश दिला आहे. आपल्या जीवनात  पवित्र मरियेची भक्ती वाढावी आणि कौटुंबिक प्रार्थना व्हावी म्हणून फातिमा मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करु या.
फातिमा गावी पवित्र मरियेने काही भाकिते केली (ज्याला 'फातिमाची रहस्ये किंवा 'गुपिते' ह्या नावानेदेखील संबोधण्यात आले आहे). त्यापैकी पहिले भाकीत पवित्र मरियेने तिच्या तिसऱ्या दर्शनामध्ये १३ जुलै १९१७ साली केले. हे पहिले भाकीत/रहस्य नरकाविषयी होते. पवित्र मरियेने जेव्हा आपले दोन्ही हात उघडले, तेव्हा तिच्या हातांतून बाहेर पडलेल्या प्रकाशमय किरणांनी पृथ्वी दुभंगली आणि तिन्ही मुलांना आगीसारखासमुद्र दिसला, त्या आगीत भूते (demons) आणि मानवी आत्मे आक्रोश आणि वेदना ह्यांमध्ये बुडालेले होते. नरकाचा हा दृष्टांत पाहून मुले भयभीत झाली, परंतु पवित्र मरियेने त्यांना धीर देत म्हटले, "तुम्ही नरक पाहिला आहे जेथे पापी लोकांचे आत्मे जात आहेत. त्यांना वाचवण्यासाठी परमेश्वर माझ्या निष्कलंक हृदयाची भक्ती जगामध्ये प्रस्थापित करू इच्छितो. मी तुम्हाला जे सांगते ते तुम्ही केले तर अनेक जिवांचे रक्षण होईल आणि जगात शांती प्रस्थापित होईल.” पवित्र मरियेने मुलांना (म्हणजेच मुलांद्वारे संपूर्ण जगाला) दररोज रोझरी करण्याचे आणि पाप्यांच्या परिवर्तनासाठी स्वार्थत्याग करण्याचे आव्हान केले. १३ जून २०१७ च्या दर्शनामध्ये मुलांना - मरियेने जी प्रार्थना शिकवली होती ती परत १३ जुलै २०१७च्या दर्शनामध्ये त्यांना रोझरीच्या प्रत्येक रहस्यानंतर म्हणायला सांगितली : “हे माझ्या येशू, आमच्या पापांची क्षमा कर, नरकाच्या अग्नीपासून आमचे रक्षण कर, सर्व मनुष्यांना स्वर्गाकडे ने, विशेषकरून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे.”

  
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये १७:१५.२२-१८:१
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
"ज्याचे तुम्ही अज्ञानाने भजन करता त्या देवाला मी तुम्हांला जाहीर करतो."
पौलला पोहोचविणाऱ्यांनी त्याला अथेन्सपर्यंत नेले आणि सीला आणि तीमथी ह्यांनी आपणाकडे होईल तितके लवकरयावे अशी त्याची आज्ञा घेऊन ते निघाले.
पौल अरीयपगाच्या मध्यभागी उभा राहून म्हणाला :
"अहो अथेन्सकरांनो, तुम्ही सर्व बाबतीत देवदेवतांना फार मान देणारे आहा असे मला दिसते. कारण मी फिरता फिरता तुमच्या पूज्य वस्तू पाहताना, अज्ञात देवाला, ही अक्षरे लिहिलेली वेदी मला आढळली. ज्याचे तुम्ही अज्ञानाने भजन करता ते मी तुम्हाला जाहीर करतो. ज्या देवाने जग आणि त्यातले अवघे निर्माण केले तो स्वर्गाचा आणि पृथ्वीचा प्रभू असून हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाही आणि त्याला काही उणे आहे म्हणून माणसांच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाही. कारण जीवन, प्राण आणि सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो आणि त्याने एकापासून माणसांची सर्व राष्ट्र निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या सबंध पाठीवर राहावे असे केले आहे. त्यांचे नेमलेले समय आणि त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरवल्या आहेत; त्यांनी देवाचा शोध करावा, म्हणजे चाचपडत चाचपडत त्याला कसे तरी प्राप्त करून घ्यावे. तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही, कारण आपण त्याच्या ठायी जगतो, वागतो आणि आहो. तसेच तुमच्या कवींपैकीही कित्येकांनी म्हटले आहे,
"आपण वास्तविक त्याचा वंश आहो."
तर मग आपण देवाचे वंशज असताना मनुष्याच्या चातुर्याने आणि कल्पनेने कोरलेले सोने, रुपे किंवा पाषाण, ह्यांच्या आकृतीसारखा देव आहे असे आपल्याला वाटता कामा नये. अज्ञानाच्या काळाकडे देवाने डोळेझाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चात्ताप करावा अशी तो माणसांना आज्ञा करतो. त्याने असा एक दिवस नेमला आहे की, ज्या दिवशी तो. आपण नेमलेल्या मनुष्याच्या द्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्त्वाने करणार आहे, त्याने त्याला मेलेल्यांमधून उठवून ह्याविषयीचे प्रमाण सर्वांना पटवले आहे."
तेव्हा मृताच्या पुनरुत्थानाविषयी ऐकून कित्येक थट्टा करू लागले. कित्येक म्हणाले, "ह्याविषयी आम्ही तुमचे पुन्हा आणखी ऐकू." इतके झाल्यावर पौल त्यांच्यामधून निघून गेला. तरी काही माणसांनी त्याला चिकटून राहून विश्वास ठेवला, त्यात दिओनुस्य अरीयपगकर, दामारी नावाची कोणी स्त्री आणि त्यांच्याबरोबर इतर कित्येक होते. त्यानंतर तो अथेन्स सोडून करिंथ येथे गेला.
प्रभूचा शब्द .
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
First Reading: Acts 17: 15, 22 – 18: 1
And they that conducted Paul, brought him as far as Athens; and receiving a commandment from him to Silas and Timothy, that they should come to him with all speed, they departed. But Paul standing in the midst of the Areopagus, said: Ye men of Athens, I perceive that in all things you are too superstitious. For passing by, and seeing your idols, I found an altar also, on which was written: To the unknown God. What therefore you worship, without knowing it, that I preach to you: God, who made the world, and all things therein; he, being Lord of heaven and earth, dwelleth not in temples made with hands; Neither is he served with men’s hands, as though he needed any thing; seeing it is he who giveth to all life, and breath, and all things: And hath made of one, all mankind, to dwell upon the whole face of the earth, determining appointed times, and the limits of their habitation. That they should seek God, if happily they may feel after him or find him, although he be not far from every one of us: For in him we live, and move, and are; as some also of your own poets said: For we are also his offspring. Being therefore the offspring of God, we must not suppose the divinity to be like unto gold, or silver, or stone, the graving of art, and device of man. And God indeed having winked at the times of this ignorance, now declareth unto men, that all should everywhere do penance. Because he hath appointed a day wherein he will judge the world in equity, by the man whom he hath appointed; giving faith to all, by raising him up from the dead. And when they had heard of the resurrection of the dead, some indeed mocked, but others said: We will hear thee again concerning this matter. So Paul went out from among them. But certain men adhering to him, did believe; among whom was also Dionysius, the Areopagite, and a woman named Damaris, and others with them. After these things, departing from Athens, he came to Corinth.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र १४८:१-२,११-१२,१३,१४
प्रतिसाद  : तुझ्या ऐश्वर्याने आकाश आणि पृथ्वी भरली आहे.

१ परमेश्वराचे स्तवन करा !
आकाशातून परमेश्वराचे स्तवन करा, ऊर्ध्वलोकी त्याचे स्तवन करा. अहो त्याच्या सर्व दूतांनो, त्याचे स्तवन करा. त्याच्या सर्व सैन्यांनो, त्याचे स्तवन करा.

२ पृथ्वीवरील राजे आणि सर्व प्रजा, अधिपती आणि पृथ्वीवरील सर्व न्यायाधीश; कुमार आणि कुमारी, वृद्ध आणि तरूण त्याचे स्तवन करा,

३ ही सगळी परमेश्वराच्या नामाचे स्तवन करोत कारण केवळ त्याचेच नाम उच्च आहे त्याचे ऐश्वर्य पृथ्वीच्या आणि आकाशाच्या वर आहे.

४ त्याने आपल्या लोकांचा उत्कर्ष केला आहे. हे त्याच्या सर्व भक्तांना त्याच्याजवळ असलेल्या लोकांना म्हणजे इस्त्राएलच्या संततीला स्तुतिपात्र झाले आहे. परमेश्वराचे स्तवन करा.

: Psalms 148: 1-2, 11-12, 13, 14
R. Heaven and earth are full of your glory.

1 Praise ye the Lord from the heavens: praise ye him in the high places.
2 Praise ye him, all his angels: praise ye him, all his hosts.
R. Heaven and earth are full of your glory.

11 Kings of the earth and all people: princes and all judges of the earth:
12 Young men and maidens: let the old with the younger,
R. Heaven and earth are full of your glory.

13 Praise the name of the Lord: For his name alone is exalted. The praise of him is above heaven and earth.
R. Heaven and earth are full of your glory.

14 He hath exalted the horn of his people. A hymn to all his saints: to the children of Israel, a people approaching to him. Alleluia.
R. Heaven and earth are full of your glory.

जयघोष  

आलेलुया, आलेलुया! 
सर्व वस्तूंचा मस्तक असलेला ख्रिस्त मेलेल्यातून उठला आहे. त्याने सर्व मानवजातीवर दया केली आहे.
आलेलुया !

Acclamation: 
 Alleluia: John 14: 16
R. Alleluia, alleluia.
 I will ask the Father and he will give you another Advocate to be with you always.

R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान   योहान  १६:१२-१५
वाचक :  योहानलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"सत्याचा आत्मा तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल."
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "मला अद्यापि तुम्हांला पुष्कळ गोष्टी सांगावयाच्या आहेत, परंतु आताच तुमच्याने त्या सोसवणार नाहीत. तरी तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल; तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल, तेच सांगेल आणिहोणाऱ्या गोष्टी तुम्हांला कळवील. तो माझा गौरव करील, जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हांला कळवील. जे काही पित्याचे आहे ते सर्व माझे आहे. म्हणून मी म्हणालो की, जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हांला कळवीन.
 "प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
Gospel: John 16: 12-15
I have yet many things to say to you: but you cannot bear them now. But when he, the Spirit of truth, is come, he will teach you all truth. For he shall not speak of himself; but what things soever he shall hear, he shall speak; and the things that are to come, he shall shew you. He shall glorify me; because he shall receive of mine, and shall shew it to you. All things whatsoever the Father hath, are mine. Therefore I said, that he shall receive of mine, and shew it to you.
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतनफातिमेची माता मरियाः धन्य कुमारी मरियेची ही उपाधी १९१७ साली पोर्तुगालमधील फातिमा येथे तीन गुराखी मुलांना लुसिया, जसिंता आणि फ्रान्सिस्को हयांना दिलेल्या दर्शनांवर आधारित आहे. फातिमेच्या संदेशामध्ये हृदयपरिवर्तन, पापांची प्रायश्चित्ते आणि धन्य कुमारी मरियेला स्वतःला समर्पित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे विशेषतः जपमाळ प्रार्थनेद्वारे. फातिमेच्या मातेचा सण १९३० साली स्थानिक बिशपांनी अधिकृतपणे मान्य केला, आणि २००२ साली संपूर्ण कॅथलिक चर्चच्या दिनदर्शिकेत समाविष्ट करण्यात आला. फातिमेची माता मरिया आपल्याला प्रार्थना, पश्चात्ताप आणि शांतीचे जीवन जगण्याचे आमंत्रण देते, ज्यायोगे जगात प्रेम आणि देवाची कृपा पसरू शकेल. आजच्या सुवार्तेत येशू आपल्या शिष्यांना आश्वस्त करतो की त्यांच्या भविष्यात पवित्र आत्मा त्यांना मार्गदर्शन करील. तो सांगतो की सध्या त्यांना अनेक गोष्टी समजणार नाहीत, पण सत्याचा आत्मा त्यांना सर्व सत्यात नेईल. आजच्या काळातही जग 'अज्ञात देवाला' शोधत आहे सत्य, शांती आणि अर्थाच्या शोधात भटकत आहे. अशा काळात, आपल्यालाही पौलाप्रमाणे धैर्याने सत्याची घोषणा करायला बोलावले आहे. प्रत्येक संधीचा उपयोग करून शुभवर्तमानाचा प्रकाश पसरवू या, ख्रिस्ताच्या प्रकाशाने अंधकार दूर करू या. आणि निर्भयपणे जाहीर करू या 'अज्ञात देव आता अज्ञात राहिला नाही; तो आहे येशू जगाचा तारणहार!"

प्रार्थना : हे पवित्र मरिया माते, देवप्रीतित वाढण्यास व श्रद्धापूर्ण जीवन जगण्यास  प्रेरणा मिळावी म्हणून आम्हासाठी विनंती कर, आमेन.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या