Marathi Bible Reading | 18th week in ordinary Time | Tuesday 4th August 2026

 सामान्य काळातील अठरावा आठवडा

मंगळवार ४ ऑगस्ट  २०२ 

जे तोंडात जाते ते माणसाला विटाळवीत नाही, तर जे तोंडातून निघते ते माणसाला विटाळविते." Not that which goeth into the mouth defileth a man: but what cometh out of the mouth, this defileth a man.

सर्व धर्मगुरूंचा आश्रयदाता
 संत जॉन मारी वियानीचा सण 
-वर्तनसाक्षी (१७८६-१८५९)

संपूर्ण जगभरच्या ख्रिस्तसभेने गौरविलेला आणि प्रमुख धर्मगुरूंचा आश्रयदाता म्हणून सन्मानित करण्यात आलेला संत जॉन मारी वियानी हा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि धर्मगुरूविरोधी वातावरणात जन्माला आला. त्यावेळी युरोपात फ्रेंच राज्यकर्त्यांनी आणि नेपोलियन बोनापार्ट ह्यांच्या कारवायांनी जनजीवन संपूर्णत: विस्कळित केलेले होते.
फ्रान्समधील अत्यंत धार्मिक मातापित्यांच्या पोटी जन्म घेतलेल्या जॉन मारी वियानीचे शिक्षण कसेबसे आटोपलेले होते. वयाच्या १३ व्या वर्षी एका शेतात पेंढ्याच्या गंजीआड लपवून त्याला प्रथम ख्रिस्तशरीर संस्कार देण्यात आलेला होता. प्राथमिक शिक्षण अर्धवट झालेले असल्यामुळे त्याला गुरु विद्यालयातील शिक्षण करताना बऱ्याचशा अडचणींना तोंड द्यावे लागले. केवळ त्याच्या आध्यात्मिक सल्लागारांच्या सूचनेवरून, त्याच्या वैयक्तिक प्रार्थना व श्रद्धेच्या बाबतीत त्याने गाठलेल्या उंचीमुळे इ. स. १८१५ साली त्याने दीर्घकाळ अपेक्षिलेले धर्मगुरूपद त्याला प्राप्त झाले.
तीन वर्षानंतर त्याला आर्स नावाच्या एका खेड्यात सहाय्यक धर्मगुरू म्हणून पाठविण्यात आले. त्यांची नेमणूक करताना व्हिकर जनरल म्हणाले, 'हे बघा फा. जॉन, त्या धर्मग्रामात देवाविषयी फारसा उत्साह आणि ओढ लोकांना वाटत नाही. तुम्ही नक्कीच त्यांच्यात देवा-धर्माविषयी आवड निर्माण कराल अशी माझी खात्री आहे.' व्हिकर जनरलनी सांगितल्याप्रमाणे आर्स खेड्यामध्ये राहणारे खेडूत आणि शेतकरी आध्यात्मिक व नैतिक दृष्ट्या खरोखरच मागासलेले होते. व्यसनाधीनता आणि ओंगळवाणे नाच-गाणे ह्यामुळे त्यांच्या जीवनात बऱ्याच अपप्रवृत्तींनी नुसता धुमाकूळ घातलेला होता.
फा. जॉन मारी वियानी दररोज शांतपणे आपल्या धर्मग्रामातील आजारी आणि गोरगरीब ह्यांना भेटी देऊ लागले. आपल्या धर्मग्रामातील लोकांचे नैतिक अधःपतन पाहून ते अस्वस्थ झाले. लोकांच्या परिवर्तनासाठी तासन्तास गुडघ्यांवर ते अतिपवित्र साक्रामेंतासमोर प्रार्थना करू लागले. त्यांच्या वतीने आपल्या शरीराला कष्ट देऊ लागले. सर्व प्रकारचा त्याग, प्रायश्चित्त आणि आत्मक्लेश ते करू लागले. आपल्या प्रवचनांमधून ते दैनंदिन जीवनात ख्रिस्ती धर्माचे पालन कसे करावे ते साध्या सोप्या भाषेत व अनेक उदाहरणांनी आपल्या भाविकांना पटवून देऊ लागले.
 फा. जॉन ह्यांनी लोकांच्या आध्यात्मिक जडणघडणीसाठी अतिपवित्र साक्रामेंताची भक्ती करणाऱ्यांचा एक संघदेखील सुरू केला. परंतु ह्या सर्वांचा कळस म्हणजे कुमसाराच्या वेळी फा. जॉन ह्यांनी पश्चात्तापी भाविकांना केलेले मोलाचे मार्गदर्शन !
त्यांच्या मते, "जे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने जीवन जगतात त्यांना परमेश्वर आपले मार्ग व शहाणपण प्रकट करीत असतो. त्यामुळेच बऱ्याच अडाणी लोकांना ज्ञानी व विचारवंतांपेक्षा चांगले जीवन जगताना आपण पाहतो."
हळूहळू आपल्या पश्चात्तापी भाविकांची अंत:करणे जाणण्याचे सामर्थ्य फा. जॉन ह्यांना प्राप्त झाले. एखाद्या व्यक्तीने कुमसारात कुठले जरी पाप लपवून ठेवले तरी फा. जॉन त्या भाविकाला त्या पापाची आठवण करून देत. भविष्याचा अचूक वेध घेण्याची क्षमतादेखील त्यांच्याठायी कार्यरत झालेली होती. पुढे तर रोगी लोकांना ते केवळ आपल्या एका स्पर्शाने बरे करीत असत.
 आर्स गावाची नैतिक व आध्यात्मिक प्रगती झालीच; परंतु आता फा. जॉन ह्यांची कीर्ती ऐकून युरोपभरचे लोक तिथे येऊ लागले. त्यामुळे फ्रेंच सरकारनेलियॉन्स रेल्वे स्टेशनवर आर्ससाठी एक खास तिकीट खिडकी उघडली. पाच जादा बसेस सुरू केल्या.
फा. जॉन मारी वियानी दिवसाला १४ ते १८ तास कुमसारासाठी बसू लागले. उन्हाळ्यातील उकाडा आणि हिवाळ्यातील कडाक्याची थंडी फा. जॉन ह्यांना आपल्या भाविकांविषयीच्या तळमळीपासून परावृत्त करू शकली नाही. कधी कधी ते रात्री एक वाजेपर्यंत कुमसाराला बसत. तब्बल २० वर्षे जवळ जवळ २ दशलक्ष लोकांना त्यांनी प्रायश्चित्त संस्कार दिला असावा. त्यात कार्डिनल्स, बिशप्स, धर्मगुरू, व्रतस्थ, सामान्य जनता अशा जीवनातल्या सर्व स्तरातील लोकांचा समावेश होता. आजारी, वृद्ध, अपंग, निराधार ह्यांनादेखील ते मार्गदर्शन करीत. आरोग्यदान देत. हे त्यांचे प्रेषितकार्य त्यांना अधिक प्रभावीपणे करता यावे म्हणून बिशपांनी त्यांना धर्मगुरूंच्या वार्षिक (तपसाधनेपासून) रिट्रीटपासून खास सूट दिलेली होती.

उत्साह, कळकळ, तळमळ, नम्रता, सहनशीलता, गरिबीचे व्रत आणि उद्योगप्रियता अशा विविध गुणांनी संपन्न असलेल्या फा. जॉन ह्यांची शरीरयष्टी मात्र किरकोळ स्वरूपाची होती. ४० वर्षे केवळ उकडलेली बटाटी खाणे, सैतानी हल्ल्यांचा प्रतिकार करणे, बेसुमार जागरण करणे अशा अवस्थेत घालविल्यामुळे त्यांची प्रकृती आणखी खालावली.
त्यांच्या या सेवाकार्यामुळे ख्रिस्तसभेने त्यांच्या हयातीतच त्यांचा सन्मान केला. फ्रेंच सरकारने त्यांना 'ए नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर' हा किताब देऊन गौरविले. फा जॉन ४ ऑगस्ट १८५९ साली स्वर्गवासी झाले आणि पोप पायस अकरावे ह्यांनी इ.स. १९२५ साली त्यांना संत म्हणून सन्मानित केले.
चिंतन : देवाला अर्पण केल्याशिवाय आपण ज्या गोष्टी करतो त्या पूर्णपणे व्यर्थ होतात. संत जॉन मारी वियानी

ख्रिस्तसभा आज धर्मगुरुंचा आश्रयदाता संत जॉन वियात्री ह्यांचा सन्मान  करीत आहे. गरीबीचे व्रत घेऊन संत जॉन वियात्री ह्यांनी श्रद्धावंतांना खऱ्या ख्रिस्ती जीवनाची ओळख करून दिली. ह्या महान संताचा आदर्श आपल्या सर्वांना प्रेरणादायी ठरावा.


धर्मगुरूंसाठी प्रार्थना 

हे प्रेमळ प्रभो, आमच्या धर्मगुरूंचा / सांभाळ कर./ ते तुझे आहेत. तुझ्या पवित्र मंदिरात / त्यांच्या जीवनाचे दीप तेवत आहेत./ ते जगाचे आहेत, / परंतु जगाचे नाहीत. / जेव्हा त्यांना ऐहिक सुखाचा/मोह होईल / तेव्हा तुझ्या हृदयात / तू त्यांना सुरक्षित ठेव. / ते एकाकी असताना, / तू त्यांना सांभाळ. / धर्मगुरू म्हणून / आपण करीत असलेला त्याग / व्यर्थ आहे, / असे त्यांना वाटू लागेल / तेव्हा त्यांना दिलासा दे. त्यांना तुझ्या शिवाय / कोणीच नाही, तरीही त्यांना संवेदनशील / मानवी हृदय आहे/ देहाचा दुर्बलपणा आहे, / ह्याची आठवण ठेव. / जी पवित्र भाकर / ते दररोज हाती घेतात/ त्या भाकरीसारखे  /  त्यांना अतिनिष्कलंक ठेव. / त्यांचे सर्व विचार, शब्द आणि कृती / ह्यांना तू आशीर्वाद दे. /आमेन.
 (अनुमती कार्डिनल डोघेर्ती)

पहिले वाचन : यिर्मया ३०:१-२, १२-१५.१८-२२
वाचन : यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"तुझ्या घोर दुष्कर्मामुळे तुझी पापे फार झाली आहेत, म्हणून मी तुला हे सर्व केले आहे. मी याकोबच्या डेऱ्यांचा बंदिवास उलटवीन."

परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले : परमेश्वरइस्राएलचा देव असे म्हणतो की. जी वचने मी तुला सांगितली ती सर्व पुस्तकात लिहून ठेव.
कारण परमेश्वर म्हणतो : “तुझी जखम असाध्य आहे, तुझा घाय भारी आहे. तुझी दाद लावणारा कोणी नाही. तुझ्या घायास उपचार नाही, मलमपट्टी नाही. तुझे सर्व वल्लभ तुला विसरले आहेत; ते तुला विचारत नाहीत; तुझ्या घोर दुष्कर्मामुळे, तुझी पापे फार झाल्यामुळे, तुला शत्रूप्रमाणे जखम करून, क्रूर जनांप्रमाणे शिक्षा करून, मी तुला घायाळ केले आहे. तू आपल्या घायामुळे का ओरडतेस ? तुझी जखम असाध्य आहे. तुझ्या घोर दुष्कर्मामुळे तुझी पापे फार झाली आहेत, म्हणून मी तुला हे सर्व केले आहे."
परमेश्वर म्हणतो, “मी याकोबच्या डेऱ्यांचा बंदिवास उलटवीन, मी त्याच्या वस्तीस्थानावर दया करीन; नगर पुन्हा त्याच्याच टेकडीवर बांधतील आणि राजवाड्यातून पूर्ववत वस्ती होईल. त्यांमधून उपकारस्मरणाचा आणि आनंदोत्सव करणाऱ्यांचा शब्द उठेल. मी त्यांची संख्या वाढवीन, ती अल्प होणार नाही; मी त्यांचा गौरव करीन, म्हणजे ते क्षुद्र असावयाचे नाहीत. त्यांच्या मुलांची स्थिती पूर्ववत होईल, त्यांची मंडळी माझ्यासमोर स्थिर राहील; त्यांच्यावर जुलूम करणाऱ्यांना मी शासन करीन. त्यांचा पुढारी त्यांच्यातलाच होईल, त्यांचा नियंता त्यांच्यातूनच निघेल; मी त्याला जवळ आणीन म्हणजे तो माझ्या सन्निध येईल, कारण माझ्या सन्निध येण्याचा कोणाच्या मनाला हिय्या झाला आहे, असे परमेश्वर म्हणतो, “तुम्ही माझे लोक व्हाल आणि मी तुमचा देव होईन."
प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :

: Jeremiah 30: 1-2, 12-15, 18-22
This is the word that came to Jeremias from the Lord, saying:
Thus saith the Lord, the God of Israel, saying: Write thee all the words that I have spoken to thee, in a book. For thus saith the Lord: Thy bruise is incurable, thy wound is very grievous.There is none to judge thy judgment to bind it up: thou hast no healing medicines. All thy lovers have forgotten thee, and will not seek after thee: for I have wounded thee with the wound of an enemy, with a cruel chastisement: by reason of the multitude of thy iniquities, thy sins are hardened. Why criest thou for thy affliction? thy sorrow is incurable: for the multitude of thy iniquity, and for thy hardened sins I have done these things to thee. Thus saith the Lord: Behold I will bring back the captivity of the pavilions of Jacob, and will have pity on his houses, and the city shall be built in her high place, and the temple shall be founded according to the order thereof. And out of them shall come forth praise, and the voice of them that play: and I will multiply them, and they shall not be made few: and I will glorify them, and they shall not be lessened. And their children shall be as from the beginning, and their assembly shall be permanent before me: and I will visit against all that afflict them. And their leader shall be of themselves: and their prince shall come forth from the midst of them: and I will bring him near, and he shall come to me: for who is this that setteth his heart to approach to me, saith the Lord? And you shall be my people: and I will be your God.
This is the word of God 
Thanks be to God 


प्रतिसाद स्तोत्र : १०२:१६-२३
प्रतिसाद : परमेश्वराने सियोन पुन्हा बांधले आहे.

१) राष्ट्रे परमेश्वराच्या नामाला 
आणि पृथ्वीवरचे सर्व राजे तुझ्या 
ऐश्वर्याला भितील; कारण परमेश्वराने 
सियोन पुन्हा बांधले आहे, 
तो आपल्या गौरवाने प्रकट झाला आहे. 
त्याने निराश्रितांच्या प्रार्थनेकडे लक्ष दिले आहे 
त्यांची प्रार्थना त्याने तुच्छ मानली नाही.

२) पुढच्या पिढीसाठी हे लिहून ठेवले जाईल, 
पुढे उत्पन्न होणारी प्रजा परमेश्वराचे स्तवन करील; 
कारण परमेश्वराने आपल्या उच्च 
पवित्रस्थानावरून पृथ्वीकडे पाहून 
बंदिवानांचे उसासे ऐकले 
ज्याचे मरण ठेवले होते त्यांना सोडवले.

३) तुझ्या सेवकांचे वंशज कायम टिकून राहतील, 
त्यांची संतती तुझ्यासमोर स्थानिक होईल. 
ह्यासाठी की त्यांनी सियोनात परमेश्वराच्या
 नामाची घोषणा करावी आणि 
येरुशलेममध्ये त्याची स्तुती गावी; 
परमेश्वराची उपासना करायला लोक
 आणि राज्ये एकत्र होतील तेव्हा असे होईल.


: Psalms 102: 16-18, 19-21, 29 and 22-23
R. (17) The Lord will build up Zion again, and appear in all his glory.

16 And the Gentiles shall fear thy name, O Lord, and all the kings of the earth thy glory.
17 For the Lord hath built up Sion: and he shall be seen in his glory.
18 He hath had regard to the prayer of the humble: and he hath not despised their petition.
R. The Lord will build up Zion again, and appear in all his glory.

19 Let these things be written unto another generation: and the people that shall be created shall praise the Lord:
20 Because he hath looked forth from his high sanctuary: from heaven the Lord hath looked upon the earth.
21 That he might hear the groans of them that are in fetters: that he might release the children of the slain:
R. The Lord will build up Zion again, and appear in all his glory.

29 The children of thy servants shall continue: and their seed shall be directed for ever.
22 That they may declare the name of the Lord in Sion: and his praise in Jerusalem;
23 When the people assemble together, and kings, to serve the Lord.
R. The Lord will build up Zion again, and appear in all his glory.

जयघोष                                    
आलेलुया, आलेलुया !   
 माझ्या देवा, तुझे मार्ग मला दाखव; 
तुझ्या सत्याला अनुसरून वागायला मला शिकव
आलेलुया!

Acclamation:
Alleluia: John 1: 49b
R. Alleluia, alleluia.
49b Rabbi, you are the Son of God; you are the King of Israel.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान  मत्तय १५ : १-२, १०-१४
वाचक :  मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

यरुशलेमाहून परुशी आणि शास्त्री येशूकडे येऊन म्हणाले, “आपले शिष्य वाडवडिलांचा संप्रदाय का मोडतात ? कारण जेवतेवेळी ते हात धूत नाहीत.” तेव्हा त्याने लोकसमुदायाला आपल्याकडे बोलावून म्हटले, “ऐका आणि समजून घ्या; जे तोंडात जाते ते माणसाला विटाळवीत नाही, तर जे तोंडातून निघते ते माणसाला विटाळविते." नंतर शिष्य येऊन त्याला म्हणाले, “हे वचन ऐकून परुशी नाराज झाले, हे आपल्याला कळले काय ?” त्याने उत्तर दिले, "माझ्या स्वर्गातील पित्याने लावले नाही असे प्रत्येक रोप उपटले जाईल. त्यांना राहू द्या; ते आंधळ्याचे आंधळे वाटाडे आहेत आणि आंधळा आंधळ्याला नेऊ लागला तर दोघेही खाचेत पडतील.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :
Matthew 15: 1-2, 10-14
1 Then came to him from Jerusalem scribes and Pharisees, saying:

2 Why do thy disciples transgress the tradition of the ancients? For they wash not their hands when they eat bread.
10 And having called together the multitudes unto him, he said to them: Hear ye and understand.
11 Not that which goeth into the mouth defileth a man: but what cometh out of the mouth, this defileth a man.
12 Then came his disciples, and said to him: Dost thou know that the Pharisees, when they heard this word, were scandalized?
13 But he answering them, said: Every plant which my heavenly Father hath not planted, shall be rooted up.
14 Let them alone: they are blind, and leaders of the blind. And if the blind lead the blind, both will fall into the pit.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

 चिंतन
देव आपल्याला निरोगी करणारा, उद्धारकर्ता व आपली पुर्नरचना करणारा आहे. अगदी आपल्या दुःखाच्या भाराने वाकलेल्या व तुटलेल्या अवस्थेतही तो आपल्या जखमा बऱ्या करण्याचे आपल्याला शुद्ध करण्याचे आश्वासन देतो आणि त्यासाठी तो सदैव कार्यरत असतो. संदेष्टा यिर्मया आजच्या पहिल्या वाचनात आपल्याला ह्याविषयी स्मरण करून देत आहे. शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त खऱ्या शुद्धतेविषयी भाष्य करीत आहेत. त्यावेळी, अशुद्धता व अपवित्रता ही बाह्य गोष्टींमुळे नाही तर आपल्या अंतःकरणात उमटणाऱ्या वाईट विचारांमुळे येते ह्यावर भर देत आहे. जर अंतःकरण शुद्ध व पवित्र असेल, तर ते आपल्या कृतींतून प्रतिबिंबित होईल. म्हणूनच, अंतरंगाची शुद्धता हा अशा आदर्श जीवनाचा पाया आहे जिथे देवाचा सन्मान व इतरांचा आदर होतो. परमेश्वराला अपेक्षित असलेले आदर्श जीवन जगण्यासाठी आपले अंतरंग त्याने शुद्ध करावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या सेवाकार्याला वाहून घेतलेल्या सर्व धर्मगुरुंना चांगले आरोग्य लाभू दे, त्यांना तू सुरक्षित ठेव, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या