(St Canice of Dungiven)11th Otober 2020

सामान्य काळातील २८ वा रविवार 

"बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत"

संत कॅनिस ह्यांचा सण 

देवाकडे वळा आणि म्हणा, देवा मी मातीचा गोळा आहे, तू कुंभार आहेस माझ्यापासून तुला जे काही करायचंय  ते कर ! - अविलाचे संत जॉन

यशया २५:६-१०

त्या वेळेस, सर्वशक्तिमान परमेश्वर, डोंगरावरील सर्व लोकांना मेजवानी देईल. मेजवानीत उत्कृष्ट अन्नपदार्थ व उंची मद्य असेल. मांस कोवळे व चांगल्या प्रतीचे असेल.सध्या बुरख्याने सर्व राष्ट्रे आणि लोक झाकून गेले आहेत. हा बुरखा म्हणजेच “मृत्यू” होय. पण मृत्यूवर पूर्णपणे मात करता येईल आणि परमेश्वर माझा प्रभू, प्रत्येक चेहऱ्यावरचा, प्रत्येक अश्रू पुसून टाकील. पूर्वी त्याच्या लोकांनी दु:ख भोगले पण देव पृथ्वीवरचे दु:ख दूर करील. परमेश्वराने सांगितले असल्यामुळेच हे सर्व घडून येईल. तेव्हा लोक म्हणतील, “हा आपला देव आहे. आपण ज्याची वाट पाहत आहोत तोच हा. तो आपले रक्षण करायला आला आहे. आपण त्या आपल्या परमेश्वराची वाट पाहत आहोत, म्हणून जेव्हा परमेश्वर आपले रक्षण करील तेव्हा आनंद साजरा करू आणि सुखी होऊ.” परमेश्वराचे सामर्थ्य ह्या डोंगरावर असल्याने मवाबचा पराभव होईल. परमेश्वर कचऱ्याच्या ढिगातील गवताच्या काडीप्रमाणे शत्रूला पायाखाली तुडवील.

हा प्रभूचा शब्द आहे... 


स्तोत्र २३:१-६

प्रतिसाद : परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. 

१)परमेश्वर माझा मेंढपाळ आहे,मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो, तो मला संथ पाण्यावर नेतो, तो माझा जीव ताजातवाना करतो. 

२)तो आपल्या नावासाठी मला नीती मार्गाने चालवतो मृत्यूछायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही. कारण तू माझ्या बरोबर आहेस, तुझी आकडी आणि तुझी काठी मला धीर देतात 

३)तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्यापुढे ताट काढतोस तू माझ्या डोक्याला तेलाचा अभंग करतोस माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे 

४)खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण आणि दयाही लाभतील  आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन.


फिलिप्पैकरांस ४:१२-१४,१९-२०

गरजू स्थितीत किंवा सर्व विपुल असताना कसे राहायचे ते मी जाणतो. कोणत्याही वेळी आणि सर्व परिस्थितीत तृप्त राहण्याचे व भुकेले राहण्याचे, भरपूर बाळगण्याचे आणि अपूरेपणात राहाण्याचे अशा सर्व परिस्थितीत राहण्याचे रहस्य मी शिकलो आहे. जो ख्रिस्त मला सामर्थ्य देतो त्याच्याद्धारे मी सर्व परिस्थितीचा सामना करु शकतो.तरीही माझ्या संकटकाळात तुम्ही साहाय्य केलेत हे चांगले केले.आणि माझा देव तुमच्या सर्व गरजा ख्रिस्त येशूच्या ठायी असलेल्या त्याच्या गौरवी संपत्तीला साजेल अशा रीतीने पुरवील.आपला देव व पिता याला अनंतकाळ गौरव असो. आमेन.

हा प्रभूचा शब्द आहे... 


जयगोष                                                                         योहान ८:१२

आलेलूया,आलेलूया !

प्रभु म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे,

जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा

प्रकाश राहील. 

आलेलूया !


शुभवर्तमान 

मत्तय २२:१-१४


येशूने त्यांच्याशी बोलण्यास सूरुवात करून पुन्हा एकादा बोधकथेचा वापर केला. तो म्हणाला,स्वर्गाचे राज्य एका राजासारखे आहे, त्याने त्याच्या मुलाच्या लग्नानिमित्त भोजनाचे आमंत्रण दिले. त्याने त्याच्या नोकरांना पाठवून, ज्यांना लग्नाचे आमंत्रण होते आशाना बोलाविण्यास सांगिले. पण लोकांनी राजाच्या मेजवानीस येण्यास नकार दिला. नंतर राजाने आणखी काही नोकरांना पाठवून दिले. राजा नोकरांना म्हणाला, मी त्या लोकांना अगोदरच आमंत्रण दिले आहे म्हणून आता जा आणि त्यांना सांगा, पाहा, मेजवानी तयार आहे. मी चांगल्यातील चांगले बैल आणि वासरे कापली आहेत आणि सगळे तयार आहे. लग्नाच्या मेजवानीस या!’ नोकर गेले आणि त्यांनी लोकांस येण्यास सांगतले, पण त्यांनी नोकरांच्याकडे लक्ष दिले नाही. ते आपापल्या कामास निघून गेले एक शेतात काम करायला गेला तर दुसरा व्यापार करायला गेला. काहींनी मालकाच्या उरलेल्या नोकरांना पकडून मार दिला व जिवे मारले. राजा फार रागावला. त्याने त्याचे सैन्य पाठविले आणि त्यांनी त्या खुन्यांना ठार मारले. त्यांनी त्यांचे शहर जाळले. “मग राजा त्याच्या नोकरांना म्हणाला, ‘मेजवानी तयार आहे, पण ज्यांना बोलाविले होते ते पात्र नव्हते, म्हणून रस्त्यांच्या कोपऱ्यांवर जा आणि तेथे तुम्हांला जे भेटतील त्यांना लग्नाच्या मेजवानीला बोलवा. मग ते नोकर रस्त्यावर गेले. त्यांना जे जे लोक भेटले त्यांना जमा केले. ज्या ठिकाणी लग्नाची मेजवानी तयार होती तेथे नोकरांनी चांगल्या आणि वाईट लोकांना जमा केले आणि ती जागा भरून गेली. “मग त्या सर्वांना भेटण्यास राजा तेथे आला. मेजवानीसाठी साजेल असा पोशाख न केलेला एक मनुष्य राजाला तेथे आढळला. राजा त्याला म्हणला, ‘मित्रा, तुला तेथे कोणी व कसे येऊ दिले? मेजवानीला साजेसे कपडे नसताना तू येथे कसा आलास?’ पण तो गप्प राहिला. तेव्हा राजाने नोकरांना सांगितले, या मनुष्याचे हात व पाय बांधा आणि त्याला बाहेर अंधारात टाका, तेथे रडणे आणि दातखाणे चालेल.’ “कारण बोलाविलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडे.”

प्रभूचे हे शुभवर्तमान... 

प्रार्थना - हे प्रभू येशू तुझी जीवनदायी वचने, तुझ्या प्रेमळ आज्ञा आणि तू देत असलेली स्वर्गीय मेजवानी स्वीकारण्यास आम्हाला कृपा दे, आमेन

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या