"ही दुष्ट पिढी आहे ही चिन्ह मागते"
यॉर्कचे संत विल्फ्रेड ह्यांचा सण
जेव्हा देव एखाद्या आत्म्याला कृपेने भरू इच्छितो तेव्हा तो प्रथम त्या आत्म्याला श्रद्धेने भरत असतो. - संत अल्फान्सोस
गलतीकरांस ४:२२-२४,२६-२७,
असे लिहिले आहे की, अब्राहामाला दोन पुत्र होते. एक त्याला गुलाम मुलीपासून झाला व दुसरा स्वतंत्रस्त्रीपासून जन्मलेला.
देवाच्या वचनाचा परिणाम म्हणून जन्मला.
या गोष्टी दृष्टांतरुप आहेत, त्या स्त्रिया दोन करार आहेत. एक करार सीनाय पर्वतावर झाला. आणि ज्यांच्या नशिबीगुलामगिरी होती अशा लोकांना त्याने जन्म दिला. हा करार हागारशी संबंध दर्शवितो.
परंतु स्वर्गीययरुशलेम स्वतंत्र आहे. स्वर्गीय यरुशलेम ही आमची आई आहे. कारण असे लिहिले आहे.जिने जन्म दिला नाही, त्या मूल नसलेल्या (स्त्रीने) आनंद करावा! ज्या तुला प्रसूतिवेदना झालेल्या नाहीत ती तू आनंदानेघोष कर, आरोळी मार, कारण जिला पती आहे तिच्या मुलांपेक्षा सोडलेल्या स्त्रीची मुले अधिक आहेत” यासाठी बंधूंनो, आपण गुलाम मुलीची नाही तर स्वतंत्र स्त्रीची मुले आहोत. आम्ही स्वातंत्र्यात राहावे म्हणून ख्रिस्ताने आम्हांला मुक्त केले, म्हणून स्थिर राहा. आणि नियमशास्त्राच्या जुवाच्यागुलामगिरीचे ओझे पुन्हा लादून घेऊ नका.
हा प्रभूचा शब्द आहे...
स्तोत्र ११३:१-७
प्रतिसाद : परमेश्वराचे नाव सदासर्वकाळ धन्यवादित असो.
१)परमेश्वराचे स्तवन करा, परमेश्वराचे सेवकहो, तुम्ही त्याचे स्तवन करा ,परमेश्वराच्या नावाचे स्तवन करा, येथून पुढे परमेश्वराचे नाव सर्वकाळ धन्यवादित असो.
२)सूर्याच्या उगवती पासून मावळती पर्यंत परमेश्वराचे नाव स्तवनीय आहे, परमेश्वर सर्व राष्ट्र होऊन उन्नत आहे, त्याचे वैभव आकाशाहून उंच आहे.
३)परमेश्वर आमचा देव जो उच्च स्थळी राजासनारूढ आहे,जो आकाश आणि पृथ्वी ह्याचे अवलोकन करण्यात लवून पाहतो, त्याच्यासारखा कोण आहे? तो कंगालांना धुळीतून उठवतो, भुकेलेल्यांना उकिरड्यावरून उचलतो.
जयगोष स्तोत्र ११८:१३५
आलेलूया,आलेलूया !
प्रभु म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे,
जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा
प्रकाश राहील.
आलेलूया !
शुभवर्तमान
लूक ११:२९-३२
जसजसा लोकसमुदाय वाढू लागला, तेव्हा तो बोलू लागला, “ही पिढी दुष्ट पिढी आहे. ती चिन्ह मागत आहे, आणि योनाच्या चिन्हाशिवाय कोणतेही चिन्ह तिला दिले जाणार नाही. कारण जसा योना निनवेच्या लोकांकरिता चिन्ह होता तसा मनुष्याचा पुत्रही या पिढीसाठी चिन्ह होईल. दक्षिणेकडची राणीन्यायाच्या दिवशी या पिढीविरुद्ध उठेल आणि ती त्यांचा धिक्कार करील. कारण ती पृथ्वीच्या दक्षिण टोकाकडून शलमोनाचे शहाणपण ऐकण्यासाठी आली, आणि आता तर शलमोनापेक्षाही थोर असा कोणी एक थेथे आहे. न्यायाच्या दिवशी निनवेचे लोक या पिढीबरोबर उभे राहतील व त्यांचा धिक्कार करतील. कारण योनाचा उपदेश ऐकून त्यांनी पश्चाताप केला पण आता योनापेक्षाही थोर असा कोणी येथे आहे.
प्रभूचे हे शुभवर्तमान...
प्रार्थना - हे प्रभू येशू, तुझी तर तारणदायी कृपा अनुभवून ती इतरांना सांगण्यास आम्हाला शक्ती दे ,आमेन
0 टिप्पण्या