(वरच्या फोटो वर क्लिक करा)
Today's Program :
1. 9.30 Angelus
2. Flag Hoisting followed by Novena Prayer
3. Holy Eucharist by Rev. Bishop Allwyn D'Silva
( Auxiliary Bishop , Archdiocese of Bombay )
Celebrated at Fatima Church Karjat.
Parish Priest: Rev Fr Louis Kajar
Holy Eucharist :
First Reading - Isaiah 7:10-14 ( Marathi )
Second Reading - Romans 8:28-30 ( English ) Gospel - Gospel of Luke 1:26-38 ( English )
"दानधर्म करा म्हणजे सर्व काही तुमच्या करिता शुद्ध आहे "
संत एडवर्ड ह्यांचा सण
राजा एडवर्ड इतका दयाळू होता की सर्वात नीच माणसाला सुद्धा तो कधी एक कटु शब्द बोलला नाही - माल्सेस्वरीचे संत विल्यम
गलतीकरांस ५:१-६,
आम्ही स्वातंत्र्यात राहावे म्हणून ख्रिस्ताने आम्हांला मुक्त केले$ म्हणून स्थिर राहा. आणि नियमशास्त्राच्या जुवाच्या गुलामगिरीचे ओझे पुन्हा लादून घेऊ नका. ऐका! मी पौल, तुम्हांला सांगत आहे की, जर सुंता करुन घेऊन तुम्ही नियमशास्त्राकडे वळला तर ख्रिस्त तुमच्यासाठी कोणत्याही किंमतीचा नाही. सुंता करुन घेणाऱ्या प्रत्येक माणसाल मी पुन्हा एकदा जाहीर करतो की, तो संपूर्ण नियमशास्त्र पाळण्यास बांधलेला आहे. तुमच्यापैकी जे नियमशास्त्राने नीतिमान ठरुपाहतात, त्यांचा ख्रिस्ताबरोबरचा संबंध तुटला आहे. देवाच्या दयेच्या बाहेर आता तुम्ही आहात. आम्ही तर आत्म्याने विश्वासाकडून न्यायीपणाच्या आशेची वाट पाहात आहोत. कारण ख्रिस्त येशूमध्ये सुंता झालेले व सुंता न झालेले यांनाकाही अर्थ नाही तर विश्वास जो प्रीतीद्वारे कार्य करतो त्याला आहे.
हा प्रभूचा शब्द आहे...
स्तोत्र ११९:४१,४३-४५,४७-४८
प्रतिसाद : हे परमेश्वरा तुझे वात्सल्य मला लाभो.
१)हे परमेश्वरा तुझे वात्सल्य मला लाभो.तुझ्या वचनानुसार तू सिद्ध केलेले तारण मला प्राप्त होवो. तू आपले सत्यवचन माझ्या मुखातून कधीही नाहीसे होऊ देऊ नकोस कारण मी तुझ्या निर्णयाची आशा धरली आहे.
२)मी तुझे नियमशास्त्र सदासर्वकाळ पाळत राहीन मी राजरोसपणे चालेन, कारण मी तुझ्या विधींचा आश्रय केला आहे.
३)मी तुझ्या आज्ञांचा आनंद मानीन, त्या मला प्रिय आहेत तुझ्या आज्ञा मला प्रिय आहेत म्हणून मी आदराने आपले हात उंचावीन आणि तुझ्या नियमाचे मनन करीन.
जयगोष
आलेलूया,आलेलूया !
मी परमेश्वराची अपेक्षा करतो,
मी त्याच्या वचनाची आशा धरतो.
आलेलूया !
शुभवर्तमान
लूक ११:३७-४१
जेव्हा येशूने आपले बोलणे संपविले तेव्हा एका परुश्याने त्याला आपलल्याबरोबर जेवायला बोलाविले. तो आत गेला आणि आपल्या जागी रेलून बसला. परंतु त्याने जेवणापूर्वी हात धुतले नाहीत हे पाहून परुश्याला फार आश्चर्य वाटले. तेव्हा प्रभु त्याला म्हणाला$ “तुम्ही परुशी प्याला व ताट बाहेरुन स्वच्छ करता पण तुम्ही आतून अधाशीपणाने व फसवणुकीच्या दुष्टतेने भरले आहात. तुम्ही मूर्ख लोक! ज्याने बाहेरील बाजू बनवली तो आतली बाजू बनवणार नाही का? पण जे आतमध्ये आहे, ते गरीबांना द्या. आणि नंतर सर्व काही तुमच्यासाठी स्वच्छ होईल.
प्रभूचे हे शुभवर्तमान...
प्रार्थना - हे प्रभू येशू, अंतःकरणापासून तुझा शोध घेण्यास व शुद्धतेचे जीवन जगण्यास प्रेरणा दे ,आमेन
0 टिप्पण्या