(Saint Callixtus I)14th October 2020

"तुम्हा परुश्याची केवढी दुर्दशा  होणार! तुम्हा  शास्त्र्यांचीही केवढी दुर्दशा  होणार!"

संत पोप कॅलीक्स्टस पहिले ह्यांचा सण

"जागृत राहा आणि प्रार्थना करा कारण ती वेळ व समय तुम्हाला ठाऊक नाही " - (मार्क १३: ३३)

गलतीकरांस  ५:१८-२५, 

पण जर तुम्ही आत्म्याकडून चालविले जाता तर तुम्ही नियमशास्त्राधीन नाही. देहाची कर्मे तर उघड आहेत, ती म्हणजे, जारकर्म, अशुद्धता, कामातुरपणा, मूर्तिपूजा, चेटकें, द्वेष, मारामारी,मत्सर, राग, स्वार्थी हेवेदावे, पक्षभेद, दारुबाजी, रंगेलपणा, अशासारख्या दुसऱ्या सर्व गोष्टी. या गोष्टीविषयी मी तुम्हांला सूचना देत आहे. ज्याप्रमाणे मी पूर्वी तुम्हांला सूचना केल्या होत्या. जे लोक अशा गोष्टी करतात त्यांना देवाच्याराज्यात वाटा मिळणार नाही.  पण आत्मा या गोष्टी निर्माण करतो: प्रीति, आनंद, शांति, सहनशीलता, दयाळूपणा,चांगुलपणा, विश्वास, सौम्यता व आत्मसंयमन. अशा गोष्टीविरुद्ध नियमशास्त्र नाही. जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी देहस्वभावला त्यांच्या वासना व इच्छांसह वधस्तंभावर खिळले आहे. जर आम्ही आत्म्याने जगतो, तर तो जसा चालवितो तसे आम्हीसुद्धा त्याच्यामागे चालू या.

हा प्रभूचा शब्द आहे... 


स्तोत्र १:१-४,६

प्रतिसाद : प्रभो, जो कोणी तुला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. 

१)जो मनुष्य दुर्जनांच्या सल्ल्याने चालत नाही पापीजनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही तर तो परमेश्वराच्या नियम शास्त्रात रमतो त्याच्या नियम शास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो तो धन्य. 

२)जे झाड पाण्याच्या प्रवाहात जवळ लावलेले असते जे आपल्याला हंगामी फळ देते.  ज्याची पाने कोमेजत नाहीत. असे झाडासारखा आहे आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. 

३)दुर्जन तसे नाहीत, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भूशासारखे आहेत.  कारण नितीमानांचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो. 


जयगोष                                                                         

आलेलूया,आलेलूया !

प्रभू आपल्या वचनाला जागतो,

त्याची प्रत्येक कृती प्रेमाची असते

आलेलूया !


शुभवर्तमान 

लूक  ११:४२-४६


परुश्यांनो तुम्हाला धिक्कार असो कारण तुम्ही पश्चात्ताप करता व पुदिन्याचा व प्रत्येक वनस्पतीचा दशांश देता. परंतु तुम्ही न्याय आणि देवाविषयीचे प्रेम याकडे दुर्लक्ष करता. तुम्ही या गोष्टी प्रथम काराव्यात व मुख्य गोष्टींकडे दुर्लक्ष करु नये. परुश्यांनो तुमचा धिक्कार असो, कारण तुम्हांला सभास्थानातील महत्त्वाच्या जागी बसणे आणि बाजारात नमस्कार घेणे आवडते. तुमचा धिक्कार असो कारण तुम्ही खुणा न केलेल्या कबरांसारखे आहात, अशा कबरांवर लोक नकळत पाय देऊन चालतात.” नियमशास्त्राचा एक शिक्षक येशूला म्हणाला, “गुरुजी, तुम्ही असे बोलता तेव्हा तुम्ही आमचासुद्धा अपमान करता.” तेव्हा येशू म्हणाला$ “नियमशास्त्राच्या शिक्षकांनो तुमचाही धिक्कार असो, कारण तुम्ही लोकांना वाहण्यास कठीण असे ओझे लादता व ते उचलण्यास तुमच्या एका बोटानेसुद्धा मदत करीत नाही.

प्रभूचे हे शुभवर्तमान... 

आपल्या विचारांनी आणि कृतीत विरोधाभास नसावा तर सर्वदा सत्याने न्यायाने व नीतिने चालावे. पवित्र आत्म्याचा सन्मान करून खरे ख्रिस्ती जीवन जगण्यास प्रेरणा मिळावी म्हणून प्रार्थना करूया.

प्रार्थना - हे पवित्र आत्म्या आमच्या प्रेरणा व सांत्वनकर्त्या ये आणि आम्हाला तुझ्या कृपा वर्षावाने भरून टाक ,आमेन

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या