"तुम्ही स्वतः आत गेला नाही व जे आत जात होते त्यात तुम्ही प्रतिबंध केला"
आविलांची संत तेरेसा ह्यांचा सण
"जेव्हा तुम्ही ही पवित्र ख्रिस्त शरीर स्वीकारता तेव्हा आपल्या शरीराचे डोळे बंद करा आणि आत्म्याचे डोळे उघडा त्यानंतर आपल्या हृदयाच्या केंद्रस्थानी प्रभू येशू ख्रिस्त विराजमान झालेला पहा " - (संत तेरेजा)
इफिसकरांस १:१,३-१०
देवाच्या इच्छेने झालेला येशू ख्रिस्ताचा दास पौल याजकडून, इफिसयेथे जे देवाचे लोक आहेत त्यांना व येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणान्यांना.
आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गराज्यातील प्रत्येक आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आम्हांला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे.ख्रिस्तामध्ये देवाने आम्हांला जग निर्माण होण्यापूर्वी त्याच्या आमच्यावरिल प्रेमामुळे त्याच्यासमोर आम्ही निर्दोष व पवित्र असावे म्हणून निवडले आहे.त्याच्या कृपायुक्त हेतूनुसार येशू ख्रिस्ताद्वारे त्याने दत्तक होण्यासाठी आमची नेमणूक केली.त्याने हे त्याच्या गौरवी कृपेची स्तुति व्हावी म्हणून केले. ही कृपा त्याने त्याच्या प्रिय पुत्राद्वारे आम्हांला फुकट दिली. त्याच्यामध्ये ख्रिस्ताच्या रक्ताने आम्ही स्वंतत्र केले गेलो,त्याच्या कृपेच्या समृद्धीने आम्हांला आमच्या पापांची क्षमा मिळाली आहे.त्याची कृपा आपले ज्ञान आणि समजबुद्धी वाढविण्यास कारणीभूत ठरली आहे. ख्रिस्तामध्ये आपणांला दाखविण्याच्या त्याच्या अनुग्रहाप्रमाणे त्याच्या इच्छेचे रहस्य आपल्याला कळविले.पृथ्वीवरील आणि स्वर्गातील सर्व गोष्टी ख्रिस्तामध्ये एकत्र आणण्यासाठी अशी ती योजना काळाच्या पूर्णतेसाठी होती.
हा प्रभूचा शब्द आहे...
स्तोत्र ९७:१
प्रतिसाद : परमेश्वराने राष्ट्रांसमोर आपले तारणकार्य प्रकट केले आहे.
१)परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा कारण त्याने अद्भूत कृत्ये केली आहेत त्यांनी आपल्या उजव्या हाताने आपल्या पवित्र बाहुने मुक्ती दान आणले आहे.
२)परमेश्वराने आपले तारण कार्य प्रकट केले आहे राष्ट्रांत समोर आपले न्यायी पण प्रकट केले आहे त्याने इस्रायलच्या घराण्यावरील आपली सत्यता आणि आपली दया ह्यांचे स्मरण केले आहे.
३)पृथ्वीच्या सर्व सिमानी आमच्या देवाचे तारणकार्य पाहिले आहे, अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो परमेश्वराचा जयजयकार करा, उच्च स्वराने आपला आनंद जग जाहीर करा.
४)परमेश्वराची स्तोत्रे विणेवर गा संगीत स्वराने गा कर्णा आणि शिंग वाजून परमेश्वर राजा ह्याचा जयघोष करा.
जयगोष
आलेलूया,आलेलूया !
हे येरूशलेम प्रभुचे गुणगान गा!
तो आपले आदेश पृथ्वीवर पाठवतो.
आलेलूया !
शुभवर्तमान
लूक ११:४७-५४
तुमचा धिक्कार असो, कारण तुमच्या पूर्वजांनी ठार केलेल्या भविष्यवाद्यांसाठी तुम्ही कबरा बांधता. अशा प्रकारे तुमच्या पूर्वजांनी केलेल्या कृत्यांचे समर्थन करता. यामुळे देवाचे ज्ञानसुद्धा असे म्हणाले, “मी प्रेषित व संदेष्ट त्यांच्याकडे पाठवीन. त्यांपैकी काही जणांना ते ठार मारतील व काही जणांचा ते छळ करतील!’ तेव्हा या पिढीस भविष्यवाद्यांचे जे रक्त जगाच्या प्रारंभापासून सांडले गेले त्याबद्दल दंड भरुन द्यावा लागेल. म्हणजे हाबेलाच्या रक्तापासून ते जखऱ्या जो देवाचे मंदिर व वेदी यांच्यामध्ये मराला गेला. खरोखर मी तुम्हांस सांगतो या पिढिला ते भरुन द्यावे लागेल. “नियमशास्त्राच्या शिक्षकांनो तुमचा धिक्कार असो. कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली काढून घेतली आहे. तुम्ही स्वत:ही आत गेला नाहीत आणि जे आत जाण्याचा प्रयत्न करत होते$ त्यांनाही जाऊ दिले नाही.”येशू तेथून निघून जात असता नियमशास्त्राचे शिक्षक व परुशी फार विरोध करु लागले व त्याला अनेक गोष्टीविषयी प्रश्न विचारु लागले. तो जे बोलेल त्यामध्ये त्याला एखाद्या सावजाप्रमाणे पकडण्यासाठी टपून बसले.
प्रभूचे हे शुभवर्तमान...
प्रार्थना - हे प्रभू परमेश्वरा तुझ्या वचनाप्रमाणे जीवन आचरण करून इतरांच्या जीवनात तुझ्या प्रीतीचा दीप प्रज्वलित करण्यास प्रेरणा दे ,आमेन
0 टिप्पण्या